Latest Post

पुणे : पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड ( वय 53) यांचे गुरूवारी सकाळी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. चार दिवसापूर्वीच त्यांची बदली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून करण्यात आली होती.परंतु राज्य शासनाने पुन्हा त्याच्या बदलीला स्थगिती दिली होती. गायकवाड यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.गायकवाड बुधवारी रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात काम करत होते. परंतु गुरूवारी (दि.7) रोजी सकाळी घरी असताना ह्रदयविकाराच्या तीव्र झटका आला.त्यांना तातडीने उपचारासाठी पुणे स्टेशन येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. गायकवाड यांची सहा महिन्यापूर्वीच सातारा येथून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयत अतिरिक्त जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली होती. शासनाने मागील आठवड्यात महसूल विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. यामध्ये साहेबराव गायकवाड यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली. परंतु येथे कामगार संघटनांनी राज्य शासन नियुक्त अधिकारी म्हणून गायकवाड यांना अतिरिक्त आयुक्त पदावर हजर करून घेण्यास विरोध करण्यात आला. दरम्यान शासनाने त्यांच्या बदलीला स्थगिती दिली. यामुळे बुधवारी ते नेहमी प्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या पदावर रात्री उशिरापर्यंत काम करत होते. गायकवाड यांच्या निधनाने संपूर्ण महसूल विभागात हळहळ व्यक्त होत आहे.

शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा   -  राहाता तालुक्यातिल सावळीविहीर येथे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांचा वाढदिवसा निमित् लॉक  डाऊनचे नियम पाळत वृक्ष रोपण  करण्यात आले तशेच गावातील गोर गरीब लोकांना या कोरोना मुळे  निर्माण झालेल्या  परिस्तिथीत किराणा किट वाटप करण्यात आले त्या प्रसंगी किरण जपे दिनेश आरने चंद्रकांत जपे कापसे आदींनी लोकडाऊन चे नियम पाळत गावात किराणा किट सह साबण व सॅनिटायझर वाटप केले शिवसैनिकांनी ह्या संकटकाळात गोर गरिबांना मदत केल्याने गोर गरिबांनी समाधान व्यक्त केले.

शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा शिर्डीतील काल तपासणी साठी नेलेले सर्वजन निगेटिव्ह  १४ दिवस होम कोरोटाईन शिर्डीकरांमध्ये आनंद  शिर्डी  येथील रहिवासी असलेले डॉक्टर हे वैद्यकीय सेवेत येवलाला कार्यरत आहेत काही दिवसा पूर्वी ते आपल्या घरी आले होते त्या नंतर ते परत येवला येथे गेले होते त्यानंतर ह्या डॉक्टर ला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते खबरदारी म्हणून डॉक्टरच्या साधिण्यात आलेले सर्व लोकांना अहमदनगर येथे तपासणी साठी नेण्यात आले होते तपासणी झाल्या नंतर त्या सर्व लोकांना होम कोरोनटाईन करण्यात आले आहे
व सर्व निगेटिव्ह आहेत अशे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर घाघरे यांनी सांगितले सुरुवातीला शिर्डीत मोठी खडबड उडाली होते परंतु बाकीचे लोक निगेटिव्ह असल्याचे समजतात शिर्डीकरांनी समाधान व्यक्त केले संपूर्ण परिसर सॅनिटायजर करण्यात आले व पोलिसांनी दोन वेळेस पदसंचालन केले आहे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला  आहे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे कोणीही कामा शिवाय घरा बाहेर निघू नये प्रशासनास सहकार्य करावे अशे बिंदास न्यूज तर्फे आवाहन करण्यात आले.

(शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा ) - सध्या कोरोना मुळे देशभरात सर्वत्र संकटकालीन परिस्तिथी निर्माण झालेली असतांना लॉक डाऊन काळात सर्वजण घरात असतांना पत्रकार मात्र इतर कोरोना वायरीयर्स  प्रमाणे स्वतःचा जीव धोक्यात घालून घरात बसलेल्यांना अपडेट बातम्या व  परिस्तिथीचा आढावा देण्यासाठी रात्रदिवस प्रयत्न करत असतांना या लोकशाहीचा चौथास्तंब समजल्या जाणार्या प्रसिद्दी माध्यमांना  मात्र शासकीय अधिकारी फक्त त्यांच्या स्वार्था पुरतेच वापर करीत आहेत  आपला उदोउदो करण्यासाठी पत्रकारांना निमंत्रण दिले जाते पत्रकार परिषद घेतली जाते पण पाणी जिथे मुरते तेथे मात्र पत्रकारांना मुद्दाम दूर ठेवले जाते यामुळे सध्या प्रसिद्दी माध्यमातून ह्या  शासकीय अधिकारी विरोधात तीव्र नाराजगी पसरली आहे प्रसिद्दी माध्यमे शासकीय अधिकारी ज्या खुर्चीवर बसले आहेत जणू आपली स्वताची प्रॉपर्टी समजत आहे कि काय अशी शंका येऊ लागली आहे सध्या कोरोनाच्या आपत्तीकालीन परिस्तिथीत जशे डॉक्टर पोलीस सफाई कामगार जीव धोक्यात घालून देशा साठी काम करीत आहेत तशेच पत्रकार हि देशा साठी काम करीत आहे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना शासन पगार देते शासन कडून गाड्या  देतात त्या गाड्या मध्ये पेट्रोल डिजेल शासनाकडून दिले जाते परंतु पत्रकाराला कुठेही पगार दिला जात नाही कुठलेही सौरक्षण नसतांना दिवस रात्र पत्रकार हा काम करीत असतो त्यामुळे पत्रकाराचीही ह्या काळात महत्वाची भूमिका आहे अनेकदा पत्रकारांना अडचणी निर्माण केल्याचे जातात केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सुद्धा पत्रकारांना अडवू नये या कोरोना आपत्तीतजनक काळात पत्रकारांचीही भूमिका महत्वाची आहे पत्रकारांमुळे सत्य उजेडात येते पत्रकारांना अडविले तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही जावडेकर यांनी दिला असतांना काल साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकावरून उत्तर प्रदेश मधील कामगारांना श्रमिक रेल्वे सोडण्यात आली होती जिल्ह्यातून हि पहिली रेल्वे सुटणार असल्याने पत्रकार तेथे जात असतांना रेल्वे पोलीसान्नि मात्र आडमुठे धोरण ठेवले पत्रकारांनी ओडखपात्र दाखवून हि काही पत्रकारांना सोडण्यात आले नाही याची चौकशी करून संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे अर्ज जनमत मराठी चे उप संपादक बिंदास न्यु चे उप संपादक व दैनिक सैदर्शन चे संपादक यांनी संबंधित विभागांना केले आहे जनमत मराठी साठी जितेश लोकाचंदानी शिर्डी अहमदनगर.

बुलडाणा - 7 मे
मागील आठवड्यात जलंब ठाणे अंतर्गत माटरगांव जवळ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाने पहाटे एका पोलिस कर्मचाऱ्याला चिरडले होते. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात पोलिस विभागाने वाळू तस्करांवर धडक कार्रवाई सुरु केली असून रात्री बुलडाणा एलसीबीच्या पथकाने 4 टिप्पर तर पकडलेच परंतु या पथकाचा एका रिकामे टिप्पर व स्विफ्ट डिज़ायर कारने पाठलाग करणारे  6 वाळू तस्कर ही पकडले आहे.या धडक कार्रवाइत एलसीबी ने एकूण 5 टिप्पर, 1 स्विफ्ट डिजायर कार व 6 आरोपी पकडले आहे.पाठलाग करणाऱ्या वाळू तसकरांवर अंढेरा व देऊळगांव राजा पोलिस ठाण्यात विविध कलमानवय गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या कार्रवाई नंतर खडकपूर्णा नदितुन वाळू तस्करी करणाऱ्यांचे धाबे दनानले आहे.
      खामगांव तालुक्यातील जलंब पोलिस ठाणे हद्दी जवळून पूर्णा नदी वाहते.रात्रीच्या वेळी येथून मोठ्या प्रमाणात वाळू तस्कर आपल्या वाहणाने रेती घेऊन जातात.मागील 29 अप्रिलच्या रात्री जलंब ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचारी उमेश शिरसाट यांनी एका वाळू घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग केला असता चालकाने त्यांच्या अंगावरुन आपले वाहन नेले त्या मुळे पोलिस शिपाई उमेश शिरसाट जागेवरच ठार झाले होते.वाळू तस्कर किती माजले हे या घटने नंतर आपले लक्षात येईल. जिल्ह्यातील वाळू तसकरांचे मुसक्या आवळने गरजेचे आहे,हे ळक्षात आल्याने संपूर्ण जिल्ह्यात पोलिस विभागाने करवाया सुरु केले आहे.
       जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या आदेशाने व एलसोबीचे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री एलसीबीचा एक पथक देऊळगाव राजा तालुक्यात रवाना झाला. अंढेरा पोलिस स्टेशन हद्दीतील मेरा फाटा येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या 4 टिप्परवर कारवाई करण्यात आली.या कार्रवाईसाठी निघालेल्या पोलिस पथकाच्या वाहनचे रिकामे टिप्पर व स्वीफ्ट डिज़ायर कारने पाठलाग करून सतत लक्ष ठेवणारे 6 इसमाना त्यांच्या ताब्यातील  टिप्पर व स्विफ्ट कारसह ताब्यात घेण्यात आले आहे.4 अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर विरुद्ध कार्रवाई करण्यासाठी मा.तहसीलदार चिखली यांना पत्र देण्यात आले आहे.पो.स्टे.अंढेरा येथे स्विफ्ट कार मधील आरोपी ज्ञानेश्वर तुकाराम कसरे, आत्माराम बळीराम सोलंकी,अमोल गजानन माळोदे सर्व रा.चिखली तसेच मोकळे टिप्पर मधील आरोपी अब्रार शकील अत्तार रा.चिखली, चालक विठ्ठल सुनील इंगळे  व कंडक्टर राहुल अवसरमोल दोघे रा.चांधई यांच्या विरुद्ध देऊळगांव राजा पो.स्टे. मध्ये कलम 188,269,270,271 भादवि सह 2,3,4 साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम 1897, सह महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना नियम 11 सह कलम 158/177, 3/181 मोटर वाहन कायदा अन्वये कारवाई करण्यात आली आहे.वाळू माफिया विरुद्ध केलेली या धडक मोहिम मध्ये बुलडाणा एलसीबीचे पीएसआई इमरान इनामदार,पीएसआई मुकुंद देशमुख, एएसआई राठोड, एएसआई भुसारी,पोलिस कर्मचारी  चांदूरकर,रघु जाधव,दराडे, चिंचोले,वारुळे,असोलकर,सतीश, चालक काळे,चालक राहुल बोर्डे यांचा सहभाग होता.

संगमनेर (शहर प्रतिनिधी)- दारूचे दुकान उघडल्यानंतर दारू खरेदीसाठी लाईनमध्ये उभे राहणार्‍या अनेक गरीब तळीरामांना मद्यखरेदी चांगलीच महागात पडली आहे. गरीब म्हणून ज्यांना मोफत जेवणाचे डबे दिले जातात तेच गरीब शेकडो रुपये खर्च करून मद्य खरेदी करताना आढळल्याने संतापलेल्या स्वयंसेवी संस्थांनी या तळीरामांचे जेवणाचे डबे त्वरीत बंद करण्याचा निर्णय घेतला. तब्बल 100 जण आजपासून मोफत डब्यांना मुकणार आहेत.शहरात करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. संचारबंदीच्या काळात अनेकांची गैरसोय झाली. शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना अंंमलात आणल्या विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व इतर स्वयंसेवी संस्थांनी प्रशासनाला साथ देत नागरिकांना मदत कार्य सुरू केले.शहरातील गरजू नागरिकांना दररोज 800 मोफत जेवणाचे डबे पुरविण्याचे काम या स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी सुरू केले. यामुळे अनेकांची जेवणाची गैरसोय दूर झाली. अनेक दिवस नागरिक या डब्यांचा आनंद घेत आहेत. आपण गोरगरिबांची सेवा करत असल्याचा आनंद विविध स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते घेत असताना, काल त्यांच्या आनंदावर विरजण पडले. आपण चुकीच्या लोकांची सेवा करत असल्याचे जाणवल्याने पश्चाताप करण्याची वेळ त्यांच्यावर आली.जिल्हाधिकार्‍यांनी देशी व विदेशी दारू सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर काल सकाळी शहरातील विविध दारूची दुकाने सुरू झाली. दारू खरेदी करण्यासाठी मोठी रांग दिसत होती. काही स्वयंसेवकांनी या रांगेचे व्हिडिओ चित्रीकरण केले. या रांगेत दारू खरेदी करण्यासाठी विविध ठिकाणचे नागरिक दिसत होते. गोरगरीब म्हणून ज्यांना जेवणाचे डबे दिले जायचे असे 100 नागरिकही दिसले. यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी या नागरिकांचे जेवणाचे डबे बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करत जेवणाचे डबे बंद करण्यात आले. जेवणासाठी पैसे नसणार्‍यांंकडे दारूसाठी पैसे असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

नेवासा - तालुक्यातील खडका फाटा येथील मे. भांगे ऑरगॅनिक केमिकल्स लिमिटेड या कारखान्याने सॅनिटायझर निर्मीतीसाठीचे अल्कोहोल अवैधरित्या मद्य निर्मीतीसाठी विक्री केल्याची घटना घडली असून मद्यासाठी विकलेले हे अल्कोहोल मंगळवार दि.5 रोजी राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे येथील भरारी पथकाने पकडले असून 6 आरोपींना अटक करण्यात आले आहे.पुणे येथील राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.1चे अधिक्षक यांनी अहमदनगर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात अवैधरित्या मद्यार्काची वाहतूक होत असताना दि. 03 जानेवारी 2020 रोजी गुन्हा क्र. 1/2020 नोंद केला होता. सदर तपासाच्या अनुषंगाने न्यायालयाच्या आदेशानुसार संशयितांना आठवड्यातून एकदा हजेरी लावण्याचे आदेशित केलेले होते. त्यानुसार संशयितांची नियमित चौकशी करुन त्यांच्याकडुन अवैध मद्य निर्मीती व विक्रीबाबत माहिती घेण्यात येत होती.सदर संशयिताकडुन मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा या ठिकाणी सॅनिटायझर निर्मीती घटकामध्ये अवैधरित्या मद्यनिर्मीती साठी मद्यार्क छुप्या पध्दतीने देत असलेबाबत माहिती मिळाली. सद्यस्थितीत कोविड-19 या विषाणुचा अनुषंगाने तसेच लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अवैधरित्या मद्यनिर्मीती व विक्री होऊ नये त्याअनुषंगाने व माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उक्त ठिकाणी छापा टाकण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक संतोष झगडे, तसेच पराग नवलकर यांनी स्वतः विशेष पथकासमवेत सदर कारवाई केली.नेवासे तालुक्यातील मे. भांगे ऑरगॅनिक केमिकल्स लि. या ठिकाणी सॅनिटायझर निर्मीतीसाठी परवानगी अन्न व औषध प्रशासन यांचेकडून घेतली होती. सॅनिटायझर निर्मीतीच्या नावाखाली अवैधरित्या मद्यार्क हे मद्य निर्मीतीसाठी छुप्या पध्दतीने दिले जात असल्याचे दिसून आले. सदर छाप्यात पुढील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला.40 हजार 535 लिटर मद्यार्क (अल्कोहोल), तीन वाहने (टँकर- 2, चारचाकी 1) मद्यार्क किंमत न 20 लाख 67 हजार 282 रुपये दोन टँकर किंमत 43 लाख रुपये तसेच चार चाकी किंमत  तीन लाख रुपये व इतर मुद्देमाल 8 हजार 300 रुपये असे एकुण मुद्देमाल किंमत 66 लाख 75 हजार 585 रुपये सह 6 आरोपी अटक करण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपींगध्ये उस्मान सय्यद शेख, संजय भाऊसाहेब भांगे, ज्ञानेश्वर विष्णु मगर, तानाजी सखाराम दरांडे, शामसुंदर वसंतराव लटपटे, शिवाजी भागुजीराव शिंदे यांचा समावेश आहे.सदर कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्कचे पुणे विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे, याच विभागाचे अधिक्षक संतोष झगडे व पराग नवलकर (अहमदनगर)यांनी स्वत: तसेच राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक अनिल पाटील (अहमदनगर), दुय्यम निरीक्षक सुरज दाबेराव, दिपक सुपे तसेच जवान सागर धुर्वे, गोरख नील, व तात्या शिंदे यांनी सहभाग घेतला, पुढील तपास राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक सुरज दाबेराव (पुणे) हे करीत आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget