(शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा ) - सध्या कोरोना मुळे देशभरात सर्वत्र संकटकालीन परिस्तिथी निर्माण झालेली असतांना लॉक डाऊन काळात सर्वजण घरात असतांना पत्रकार मात्र इतर कोरोना वायरीयर्स प्रमाणे स्वतःचा जीव धोक्यात घालून घरात बसलेल्यांना अपडेट बातम्या व परिस्तिथीचा आढावा देण्यासाठी रात्रदिवस प्रयत्न करत असतांना या लोकशाहीचा चौथास्तंब समजल्या जाणार्या प्रसिद्दी माध्यमांना मात्र शासकीय अधिकारी फक्त त्यांच्या स्वार्था पुरतेच वापर करीत आहेत आपला उदोउदो करण्यासाठी पत्रकारांना निमंत्रण दिले जाते पत्रकार परिषद घेतली जाते पण पाणी जिथे मुरते तेथे मात्र पत्रकारांना मुद्दाम दूर ठेवले जाते यामुळे सध्या प्रसिद्दी माध्यमातून ह्या शासकीय अधिकारी विरोधात तीव्र नाराजगी पसरली आहे प्रसिद्दी माध्यमे शासकीय अधिकारी ज्या खुर्चीवर बसले आहेत जणू आपली स्वताची प्रॉपर्टी समजत आहे कि काय अशी शंका येऊ लागली आहे सध्या कोरोनाच्या आपत्तीकालीन परिस्तिथीत जशे डॉक्टर पोलीस सफाई कामगार जीव धोक्यात घालून देशा साठी काम करीत आहेत तशेच पत्रकार हि देशा साठी काम करीत आहे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना शासन पगार देते शासन कडून गाड्या देतात त्या गाड्या मध्ये पेट्रोल डिजेल शासनाकडून दिले जाते परंतु पत्रकाराला कुठेही पगार दिला जात नाही कुठलेही सौरक्षण नसतांना दिवस रात्र पत्रकार हा काम करीत असतो त्यामुळे पत्रकाराचीही ह्या काळात महत्वाची भूमिका आहे अनेकदा पत्रकारांना अडचणी निर्माण केल्याचे जातात केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सुद्धा पत्रकारांना अडवू नये या कोरोना आपत्तीतजनक काळात पत्रकारांचीही भूमिका महत्वाची आहे पत्रकारांमुळे सत्य उजेडात येते पत्रकारांना अडविले तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही जावडेकर यांनी दिला असतांना काल साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकावरून उत्तर प्रदेश मधील कामगारांना श्रमिक रेल्वे सोडण्यात आली होती जिल्ह्यातून हि पहिली रेल्वे सुटणार असल्याने पत्रकार तेथे जात असतांना रेल्वे पोलीसान्नि मात्र आडमुठे धोरण ठेवले पत्रकारांनी ओडखपात्र दाखवून हि काही पत्रकारांना सोडण्यात आले नाही याची चौकशी करून संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे अर्ज जनमत मराठी चे उप संपादक बिंदास न्यु चे उप संपादक व दैनिक सैदर्शन चे संपादक यांनी संबंधित विभागांना केले आहे जनमत मराठी साठी जितेश लोकाचंदानी शिर्डी अहमदनगर.

Post a Comment