Latest Post


बुलडाणा - 28 एप्रिल बुलडाणा वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या वरवंड गावापासून 3 कि.मी. अंतरावर असल्यालेल्या एका शेतात अस्वलाच्या हल्ल्यात 45 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज 29 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता उघडकीस आली.
          जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य हा अस्वलासाठी प्रसिध्द आहे. या आरक्षीत जंगलात मोठ्या प्रमाणात अस्वलांचा अधिवास आहे. आपल्या अधिवास क्षेत्रासाठी अनेकवेळा अस्वलामध्ये झुंज होत असतात. या झुंजी व अनेकवेळा पाण्याच्या शोधात सुध्दा हे अस्वल अभयारण्य सोडून बाहेर येतात. मागील तिन वर्षा अगोदर ज्ञानगंगा अभयारण्याच्या लगतचे गाव वरवंड, डोंगरखंडाळा, डोंगरशेवली, श्रीकृष्ण नगर या भागात अस्वल व मानवी संघार्षामुळे अनेक शेतकरी व शेतमजुर जखमी झाले तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. अस्वलांचे हे वाढत्या हल्ले पाहून तज्ञांची पथक बोलावून त्यांच्या या आक्रम भुमिकेचा अभ्यास करण्यात आला होता. तज्ञ समितीने काही उपाय सुचविले होते. त्यानुसार ज्ञानगंगा अभयाण्यात अस्वलांची आवड असलेल्या खाद्यांचे रोपण करण्यात आले होते. तसेच मोठ्या प्रमाणात पाणवठे तयार करण्यात आले. जेणेकरुन अस्वल अभयारण्य सोडून बाहेर जावू नये यासाठी काळजीही घेण्यात आली.
मागील काही महिन्यांपासून अस्वल व मानवी संघर्षांमध्ये घट झालेली आहे. त्या मानाने अस्वलाचे मानवावर हल्ले करणेही कमी झाले आहे. अशातच आज 29 एप्रिल रोजी अस्वलाच्या हल्ल्यात एक इसम ठार झाल्याची घटना समोर आली याबाबत प्राप्त माहितीनुसार बुलडाणा तालुक्यातील वरवंड या गावातील मोलमजुरी करणारे किसन त्रंबक सुरु शे वय 45 यांची गाय हरपल्याने काल  28 एप्रिल रोजी सायंकाळी शोधण्यासाठी ते गावापासून 3 कि.मी. अंतरावर असलेल्या जंगलात असलेल्या परिसरात गेले असता विजय जाधव यांच्या शेतात दबा धरुन असेल्या अस्वलाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्याने घरच्यांनी त्यांचा शोध घेतला. परंतु ते कोठेही दिसून आले नाही. आज 29 एप्रिल रोजी त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या अवस्थेत दिसून आल्याने गावात एकच खळबळ उडाली.  या घटनेची माहिती वनविभाग व पोलिसांना देण्यात आली. पंचनामा करण्यासाठी बुलडाणा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश टेकाळे, वर्तुळ अधिकारी राहुल चव्हाण, वनरक्षक मोरे, कलीम बिबन शेख, वन्यजीव विभागाचे गिते व इतर घटनास्थळी हजर होते. त्यांचा मृतदेहवर बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात येणार आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- सोशल मिडियाचा काही कडून वापर, गैरवापर होत असतो यामध्ये प्रामुख्याने व्हाँटसअप गृप हा सर्वच क्षेत्रातील माहिती अदान - प्रदान करण्याकरीता जास्त वापरला जात असतो मात्र कोरोनाच्या गंभीर संकटामुळे " गणगोत " या व्हाटस अप ग्रुपच्या माध्यमातुन ग्रूप अॅडमीन राहुल क्षिरसागर यांनी जेष्ठ पत्रकार देवीदास देसाई यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे आवाहन करण्यात आले आणि काही अवधीतच तब्बल अठरा हजार रुपयांचा मदत निधी जमा झाला. कोरोनाचे संकट आपल्या राज्यावर आले  राज्याच्या मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले नाशिक स्थित राहुल क्षिरसागर यांनी "गणगोत " या गृपवर असणार्या प्रत्येक सदस्याला रुपये दोनशे मदत करण्याचे आवाहन केले होते, या आवाहनास वरळी पासुन ते परळी पर्यत मुंबई पुणे ते मराठवाडा बिड गेवराई अहमदनगर येथील सदस्यांनी उत्तम प्रकारे प्रतिसाद दिला.बेलापूर येथील पत्रकार देविदास देसाई यांच्या खात्यावर सर्व सदस्यांनी दोनशे रुपये जमा केली    काहींनी पाचशे काही सदस्यांनी एक हजार असे एकुण १७९७२ रुपये जमा झाले ही रक्कम महावितरणचे बेलापूर विभागाचे अधिकारी चेतन जाधव यांनी आँन लाईनने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाठविली आज प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये अनेक व्हाँटसअप गृप आहेत प्रत्येक गृप अँडमिनने अशा प्रकारे आवाहन करुन निधी जमविला तर थोडा थोडा मिळून फार मोठा निधी जमा होवु शकतो कोरोनाचा लढा जिंकण्यासाठी या उपक्रमाचा इतरांनीही आदर्श घेवुन आपले नाव मदत मागणाऱ्यांच्या यादीत नव्हे तर मदत करणाऱ्यांचा यादीत यावे या करीता प्रयत्न केले तर निश्चितच देशसेवा केल्याचा आनंद होईल.
  सोशल मिडियातुन सोशल वर्क    संपूर्ण भारतभरामध्ये व्हॉटस अॅपचे मोठे जाळे असुन तरुणांपासुन अबालवृद्धापर्यंत प्रत्येक घरात व्हॉटस अॅपचा वापर होतो,  कोरोना या गंभीर आजारामुळे देशासह राज्याची अवस्था बिकट होणार असुन प्रत्येक ग्रुप अॅडमीनने अशी संकल्पना हाती घेतली तर देशभर आपला आदर्श उभा राहु शकतो.

नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे-ना.बाळासाहेब थोरात
 शिर्डी,प्रतिनिधि जय शर्मा )राज्यामध्ये  लॉकडाऊन लागू केल्यानंतरही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. काही ठिकाणी अनावश्यक गर्दी होत आहे. हे अतिशय चिंताजनक आहे. कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संगमनेर येथील उपाययोजनांबाबत आढावा घेताना केले.
            नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष निलेश जाजू, प्रकाश कलंत्री, प्रांताधिकारी शशिकांत मंगळूरे, तहसीलदार अमोल निकम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर  यांच्यासह विविध नगरसेवक व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.
            महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मागील काही दिवसात संगमनेर शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाने हॉटस्पॉट जाहिर केलेल्या ठिकाणी केलेली प्रतिबंधात्मक कारवाई त्याचप्रमाणे तालुक्यात व शहरामध्ये अधिकाधिकपणे प्रभावी ठरणाऱ्या उपाययोजनांसदर्भात मार्गदर्शन करुन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. कोरोनाचे संकट आपल्या घरापर्यंत पोहोचले आहे. त्याचा प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने घराबाहेर पडण्याचे कटाक्षाने टाळावे, नागरिकांनी घरातच राहून स्वत:ला आणि स्वत:च्या कुटुंबीयांनाही सुरक्षित ठेवावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. यावेळी संगमनेर तालुक्यातील व शहरातील मजूरांसाठी करण्यात आलेली व्यवस्था त्याचप्रमाणे होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांची माहिती मंत्रीमहोदयांनी घेतली.

शिर्डी,प्रतिनिधि जय शर्मा )कोपरगाव तालुक्‍यात नोव्‍हेल कोरोना विषाणू प्रार्दूर्भावाच्‍या पार्श्‍वभूमीवीर राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्‍ट होऊ न शकलेल्‍या एपीएल (केशरी शिधापत्रिकाधारक) धारकांना मे,2020 व जून,2020 या दोन महिन्‍यांच्‍या कालावधीत सवलतीच्‍या दराने अन्‍नधान्‍याचा लाभ देण्‍यात येणार आहे. कोपरगाव तालुक्‍यात 16 हजार 777 शिधापत्रिकाधारक असून एकूण  65 हजार 146 लाभार्थी  आहेत. त्‍यांना 3 हजार 6 क्विंटल गहू व 2 हजार 3 क्विंटल तांदूळ वाटप करण्यात येणार आहे. गहू 8 रुपये प्रतिकिलो या दराने प्रतिमाह प्रतिव्यक्ती 3 किलो व तांदूळ 12 रुपये प्रतिकिलो  या दराने प्रतिमाह 2 किलो असे  एकूण पाच किलो अन्नधान्य वितरीत करण्‍यात येणार आहे.
           शिधापत्रिकाधारकांच्‍या नोंदी संगणकीय प्रणालीवर झाल्‍या नसतील अथवा शिधापत्रिकांचे आधार सिडींग झाले नसेल, तरी त्‍या शिधापत्रिकाधारकांना विहीत केलेल्‍या दराने व परिमाणात धान्‍य देण्‍यात येणार आहे. तसेच ज्‍या शिधापत्रिकाधारकांच्‍या शिधापत्रिकेवर बारा अंकी नोंदणी क्रमांक नाही त्‍या शिधापत्रिकाधारकांनाही  या योजनेचा लाभ घेता येईल. अन्‍नधान्‍य वितरणाची प्रक्रिया सुरु  करण्‍यात आली असून लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. कोणताही लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही, तसेच लाभार्थ्यांच्या तक्रारींचे तेथेच निराकरण होईल याची दक्षता सर्व संबधितांनी घ्यावी. असे आवाहन तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार, कोपरगांव योगेश चंद्रे यांनी केले आहे.

(शिर्डी प्रतिनिधि राजेंद्र गडकरी ) -कोरोणामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे, शिर्डीतही त्यामुळे सर्व काही बंद आहे, त्यामुळे बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन ,विमानतळ हे सुद्धा शांत शांत आहे, निर्मनुष्य झालेल्या या सार्वजनिक ठिकाणी आणि आता मोकाट कुत्री ,जनावरे यांनी माणसांची जागा घेतली की काय। असे दिसून येत आहे, वर्दळ नसल्यामुळे प्राणी आता मनुष्यवस्तीत येऊ लागले आहेत, असे चित्र या काळात  दिसत आहेत, गावे ,शहरे बंद असल्याने व सर्व जण आपापल्या घरात असल्याने , वन्य प्राणी ,पाळीव प्राणी ,मोकाट जनावरे  आता सार्वजनिक ठिकाणी दिसू लागले आहेत ,दररोज ग्रामीण भागात दर्शनासाठी गर्दीने भरलेले मंदिरे आता उन्हामुळे व वर्दळ नसल्याने तेथे मोकाट जनावरे आश्रय घेत आहेत, शिर्डीचे नेहमी गजबजलेले साईनगर शिर्डी रेल्वे स्थानक निर्मनुष्य झाले असून 
तेथे ते मोकाट कुत्री आता फिरताना दिसतात,तसेच ग्रामीण भागात तर उन्हाळ्याच्या चटक्यामुळे म्हणा की लॉकडाऊनच्या शांत शांत वातावरणामुळे म्हणा हरीण, कोल्हे ,वानर आदी वन्य प्राणी गावाच्या आसपास येऊ लागले आहेत, एवढेच नाही तर शांत वातावरण व कडक उन्हाळा यामुळे बिळातले साप  बाहेर येऊन रस्त्यावर, मनुष्यवस्तीत दिसू लागले आहेत, कोळपेवाडी येथे नुकतीच एक  धामीन सर्पमित्रांनी पकडली, तसेचअश्वी परिसरातही मुंगूस आणि सापाची लढाईत नुकतेच एका सापाला जीवदान सर्पमित्राने दिले ,सध्या मनुष्यासाठी संचारबंदी आहे, वन्य प्राणी, पाळीव प्राणी, मोकाट जनावरे यांना मात्र यावरून  ग्रामीण भागात सध्या मुक्त संचार असल्याचे दिसून येत आहे. 


 श्रीरामपूर  ( प्रतिनिधी  )- सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असताना श्रीरामपूर तालुक्यात एक रुग्ण वगळता दक्ष पोलीस अधिकारी कार्य तत्पर  महसुल अधिकारी यांच्या ठोस निर्णयामुळे कोरोनावर श्रीरामपूरकरांंनी विजयच मिळविला असेच म्हणावे लागेल लाँक डाऊनची घोषणा होताच अप्पर पोलीस अधिक्षक डाँ दिपाली काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने उपविभागीय अधिकारी अनिल पवार तहसीलदार प्रशांत पाटील श्रीरामपूर शहर पोलीस  स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मसुद खान यांनी अतिशय नियोजनबध्द कार्यक्रम तयार केला जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व पोलीस अधिक्षक अखिलेशकुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर व तालुक्यात चोख बंदोबस्त ठेवुन नागरिकांना घरातच बसण्याचे अवाहन केले ज्यांनी महसुल अधिकारी व पोलीस प्रशासन यांच्या आदेशाला जुमानले नाही त्यांना दांडुक्यांचा प्रसादही मिळाला काही चांगले निर्णय घेण्याकरीता काही कठोर नियमांचे पालन करावेच लागते हे या अधिकार्यांनी कृतीतुन दाखवुन दिले उपविभागीय अधिकारी अनिल पवार उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  मसुद खान यांनी वैयक्तिक लक्ष देवुन नागरीकाना घरातच बसण्याचे वारवार अवाहन
केले ज्यांनी या अवाहनाला जुमानले नाही त्याच्यावर कायदेशीर कारवाई देखील करण्यात आली काही ठिकाणी  पोलीसांनी कडक भूमिका घेतली त्यावेळी काहींनी नाराजीचा सुर आवळला परंतु आज आपल्या तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण  सापडला नाही नव्हे महसुल अधिकारी व पोलीस खात्याने आपल्या तालुक्यात कोरोनाला डोके वर काढुच दिले नाही त्या करीता कठोरात कठोर निर्णय घेण्याची वेळ आली तरी अधिकारी मागे हटले नाही त्यानां श्रीरामपूर नगरपालीका तसेच तालुक्यातील ग्रामपंचायतीनी देखील सहकार्य केले उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने उपविभागीय अधिकारी अनिल पवार तहसीलदार प्रशांत पाटील पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट हे दररोज सकाळपासुनच शहरात पायी गस्त घालत होते त्याचा परिणाम असा झाला की फार गरज असेल तरच श्रीरामपूरचा नागरीक बाहेर पडत होता तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मसुद खान यांनी देखील तालुक्यात चोख बंदोबस्त ठेवला या कालावधीत गरजवंताना मदत करण्यास देखील  श्रीरामपूरकर मागे हाटले नाही अनेक सेवा भावी संस्था नागरीक मदतीसाठी पुढे आहे कोरोनाच्या या सांकटकाळात माणूसकी जिवत असल्याचेही पहावयास मिळाले. 

शिर्डी/प्रतिनिधि जय शर्मा  : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष या नात्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा,2005 अन्वये विविध उपाययोजनांचे आदेश पारित केले असून त्याची जिल्हयात अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासोबतच जिल्हयामध्ये लॉकडाऊन आणि संचारबंदीचे निर्बंध लागू करण्यात आले असून इतर जिल्हयातून अहमदनगर जिल्हयात पर्यायाने तालुक्यात नागरिकांच्या  विनापरवाना ये-जा करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभममीवर काही नागरिक अथवा स्थानिकांचे नातेवाईक, पाहुणे बेकायदेशीरपणे राहाता तालुक्यात प्रवेश करत असल्याचे तालुका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. ही कृती आक्षेपार्ह असून शासकीय आदेशांचे उल्लंघन करणारी आहे.
              राहाता तालुका अथवा परिसरात नवीन व्यक्ती, बाहेरगावचे पाहूणे आल्यास स्थानिकांनी यासंबधीची माहिती तात्काळ तालुका प्रशासनास अथवा नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवावी, जेणेकरून संबंधीताची चौकशी करून योग्य ती वैद्यकीय कार्यवाही करता येईल व संभाव्य धोका टाळता येईल. बाहेरगावाहून आलेल्यांची माहीती लपवून ठेवल्यास संबधितांविरुध्द फौजदारी कारवाई करण्यात येईल. मदतीसाठी तालुका नियंत्रण कक्ष येथे दूरध्वनी क्रमांक क्र.02423-242853 वर संपर्क साधावा. नागरिकांनी घरातच राहून स्वत:ची काळजी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन, राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.
            प्रशासनातील सर्व  यंत्रणा नागरिकांच्या सोईसाठी अहोरात्र कार्यरत आहेत. जे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत, ते नागरिकांच्या हितासाठीच आहेत, त्यामुळे सर्वांनी त्याचे पालन करावे असे आवाहन प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी गोविंद शिंदे यांनी केले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget