Latest Post

शिर्डी जय शर्मा-राहता तालुक्यात विशेषतः शिर्डी व परिसरात या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या काही किराणा, रेशन दुकानदारांकडून तसेच गॅस एजन्सी वाल्यांकडून सर्वसामान्यांची आर्थिक लुटमार होत असून शासकीय अधिकारी, पोलीस सुद्धा याकडे थातूरमातूर कारवाई करून दुर्लक्ष करीत आहेत, जर येत्या चोवीस तासाच्या आत या लोकांवर,या दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात आली नाही,  तर प्रांताधिकारी शिर्डी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दैनिक साईदर्शन चे संपादक जितेश लोकचंदानी शिर्डी यांनी दिला आहे,कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वत्र लॉकं डाऊन सुरू आहे, त्यावश्यक सेवा सोडून सर्व बंद आहे, सर्वजण आपापल्या घरात आहेत, काम धंदा नसल्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब, मजदूर, कामगार यांना आर्थिक चणचण भासत आहे, अशा संकटकाळात रेशन दुकानदार मात्र शिधापत्रिकाधारकांना नियमात असतानासुद्धा मोफत प्रत्येकी पाच किलो तांदूळ देण्याऐवजी दोन किलो तांदूळ देत आहेत, किराणा दुकानदार किराणा मालाचे भाव अव्वाच्या सव्वा भाव लावीत आहे ,तसेच दुकानाची वेळ ठरवलेली असतानाही दुकान सुरू ठेवले जाते, काही दुकानात गुटखा होलसेल विक्री केली जाते, अशाच  सावळीविहीरला एका किराणा दुकानात छापा टाकला असता अगोदर खबर।लीक झाल्याने गुटखा लंपास झाला, मात्र प्लास्टिक पिशव्या हाती सापडल्या, अशा घटना येथे घडताहेत, संवत्सरच्या एका गॅस एजन्सीवाल्याकडून सावळीविहीर येथील लोकांकडून 740 रुपयांऐवजी 780 रुपये उज्वला गॅस सिलेंडरचे घेतले जात आहेत, शिवाय लॉकडाऊन चे नियम पाळले जात नाही , बंदी असतानाही अनेक ठिकाणी रात्रीचे कूपनलिका खोदण्याचे काम अवैधरित्या परवानगी नसताना अनेक ठिकाणी सुरू असते ,अनेक जण भाजीपाला विक्रीच्या नावाने रस्त्याच्या कडेला बसून नियमभंग करतात मात्र या लोकांवर थातुरमातुर कारवाई अधून-मधून केली जाते, परत जैसे थे परिस्थिती निर्माण होते ,शिर्डी व परिसरात दारु, बियर साठा मोठ्या प्रमाणात असून जादा दराने विक्री होत आहे, सावळीविहीरला परमिट रूम फोडण्यात आले,बियरसाठा शिर्डीला पकडण्यात आला ,राहत्याला देशी दारू दुकान फोडले ,मात्र थातुरमातुर कारवाई झाली ,होलसेल गुटखा विक्री करणारे दुकानदार, किराणामाल अव्वाच्या सव्वा किमतीला विकणारे व वेळेचे बंधन न पाळणारे किराणा दुकानदार ,शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ असतानाही त्यात गफला करणारे रेशन दुकानदार, व उज्वला गॅस सिलेंडरचे जादा पैसे घेणारे गॅस एजन्सी वाल्यांकडून  ग्राहकांची होणारी आर्थिक लूट  त्वरित थांबवावी व अशा  सर्वांची गुप्त पद्धतीने चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी ,जर 24 तासाच्या आत या लोकांवर गुप्त पद्धतीने चौकशी करून  कडक कारवाई झाली नाही तर प्रांताधिकारी कार्यालय, शिर्डी यांच्या समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा  दैनिक साईदर्शन चे संपादक जितेश लोकचंदानी यांनी  दिला आहे.

शिर्डी (जय शर्मा )
 राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे अमोल किराणा स्टोअर्स मध्ये गुटख्याची होलसेल विक्री होत असलेल्या संशयावरून  पोलीस व अन्नभेसळ अधिकार्‍ यांनी धाड टाकली, मात्र त्या अगोदरच ही खबर लिक झाल्याने या अधिकाऱ्यांच्या हाती गुटखा ऐवजी प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिकपत्रवाळ्या हाती लागल्या, या छाप्याची बातमी सावळीविहीर व परिसरात पसरताच सर्वत्र चर्चेला उधाण आले होते, खोदा पहाडऔर निकल गये प्लास्टिक अशी परिस्थिती त्यामुळे झाली,
 राहता तालुक्यातील सावळीविहीर येथे गावात कोठारी यांचे अमोल किराणा स्टोअर्स आहे, या दुकानात विविध कंपन्यांचे गुटखा विक्री केली जात असल्याचा संशय जिल्हा अन्नभेसळ प्रतिबंधात्मक अधिकाऱ्यांना होता, तसेच अहमदनगर पोलीस नियंत्रण कक्षाततूनही तसे आदेश देण्यात आले होते ,त्यावरून अन्न भेसळ अधिकारी व पोलीस यांनी रविवारी दुपारी  येथे या अमोल किराणा स्टोअर्स दुकानांमध्ये छापा टाकला व दुकानांमध्ये  तपासणी केली, मात्र या छाप्याची खबरआगोदरच लिक झाल्याचा संशय आता व्यक्त होत आहे, कुणीतरी ही खबर।लिक केल्यामुळे या शासकीय अधिकाऱ्यांच्या हाताला गुटखा लागला नाही ,पण  या दुकानात प्लास्टिकच्या पिशव्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्या, प्लास्टिकला बंदी असताना प्लास्टिक पिशव्या दुकानात सापडल्याने तशी कारवाई करण्यात येत आहे ,मात्र ही खबर कोणी लिक केली  याचा तपास होणे गरजेचे आहे, या अगोदर काही दिवसापूर्वीच या दुकानात छापा टाकण्यात आला  होता, व त्यावेळी  माल सापडला होता मात्र चिरीमिरी वर  हे प्रकरण दाबून टाकण्यात आले ,अशी चर्चा आहे, यावेळी मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी प्रामाणिक व आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा छापा टाकला, परंतु कुणीतरी ही बातमी लिक केल्यामुळे अधिकाऱ्यांचा वेळ ,श्रम वाया गेले, अशीही नागरिकांत चर्चा होती, हा गुप्त छापा असताना ही खबर कोणी दिली, याची चौकशी होणे गरजेचे आहे, यात कोणता शासकीय कर्मचारी तर नाही ना।। अशी शंका व्यक्त होत आहे, तसेच सध्या लॉक डाऊन सुरू आहे, लॉक डाऊन काळात सावळीविहीर।बु।। ग्रामपंचायतहद्दीत सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत किराणा दुकान उघडे ठेवणे गरजेचे आहे, तसेच या काळात विनाकारण भाव वाढ करणे किंवा जादा भाव घेणे गुन्हाअसताना तरी काही लोकांकडून या आदेशाचे उल्लंघन होत आहे, या सर्व गोष्टींकडे पोलीस, स्थानिक प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहेत, पोलिसांचे एक दोन चक्कर होतात, जीप येते, परंतु नंतर मात्र येथे सर्व आलबेल सुरू होते, पोलीस जिपवरील स्पीकरचा आवाज ऐकताच सर्व आपली दुकाने पटापट बंद करतात, पोलीस गेले की परत उघडतात, यापुढे तरी कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे ,अशी नागरिकांची मागणी आहे.

साकुरी/कोरोणा आजाराच्या पाश्र्वभूमीवर  संचारबंदी व लाॅकडाउन व शिर्डी शहरातील बंद असलेल्या साईबाबा मंदिर यामुळे  संगळे व्यवसाय  जवळपास बंद पडलेले आहेत शिर्डी नगरपंचायत कार्यश्रेत्रात मोठ्या प्रमाणावर शिर्डी नगर पंचायत च्या मालकीची विविध काॅम्पलेक्स मध्ये विविध प्रकारचे व्यवसाय करण्यासाठी गाळे बांधुन दिले आहे  मात्र अडचणी त आलेली बाजारपेठ यामुळे उपजिवीका चालवणे अवघड झाले आहे  अशा वेळी  महाराष्ट्र शासनाने धोरणात्मक निर्णय घेवून सहा महिने भाडे आकारणी करु नये अशी मागणी भाजपचे अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकारिणी सदस्य व  राहता तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते बाळासाहेब काशिनाथ गाडेकर  यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे केली आहे
    अगोदरच वाढलेले गाळ्याचे भांडे होत नसलेला व्यापार साईभक्त भाविकांची नसलेली गर्दी अशी संकटाची मालीका सुरू असताना  १३मार्च रोजी बंद  झालेले  साई मंदीर कोरोणाच्या महामारी. मुळे   असलेली संचारबंदी व लाॅकडाउन   वाढत असलेल्या या आजाराने बाजारपेठेत जवळपास सहा महिन्यांत तरी पुर्व पदावर येईल अशी खात्री दिसत नसल्याने  राज्यसरकारने ज्या ज्या महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत   ग्रामपंचायत  बाजारसमिती या माध्यमातून भव्य काॅम्पलेक्स बांधुन गाळे भाडे तत्वावर दिली आहे त्याच्या साठी जलदगतीने युद्ध पातळीवर निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे

नाशिक l प्रतिनिधी - जिल्ह्यात करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून रविवारी (दि.२६) सहा नवे करोना बाधित रुग्ण आढळले. त्यापैकी पाच रुग्ण एकटया येवला तालुक्यातील आहे.तर आदिवासी तालुका असलेल्या सुरगाण्यातही करोनाने शिरकाव केला आहे. या ठिकाणी अतिदुर्गम तलपाडा गावातील २४ वर्षीय तरुणाला करोनाची लागण झाली आहे.हा तरुण नाशिकमधील जिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवक असल्याचे समजते. हा रुग्ण शहरातील दिंडोरी रोडवरील आरटीओ कॉर्नर परिसरातील असल्याचे समजते. या रुग्णाच्या संपर्कात कोण-कोण आले असावे याबाबतची माहिती घेण्यास गती दिली जाणार आहे. यामुळे जिल्हयात करोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा आकडा १४९ वर पोहचला अाहे.करोनाचे हाॅटस्पाॅट ठरलेल्या मालेगावमध्ये सोमवारी एकही नवा करोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडला नाही. या ठिकाणी तीन रुग्ण करोनामुक्त झाले.एकीकडे हा दिलासा मिळाला असताना सहा नवे करोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यात पाच रुग्ण हे येवल्यातील असून एक सुरगाण्यातील आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यात करोनाचा फैलाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.येवल्यातील करोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या सहा झाली आहे. तर मालेगावमध्ये १२७, सुरगाणा एक अशी करोना बाधित रुग्णांची संख्या आहे. नाशिक शहरासह मालेगाव वगळून इतर तालुक्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 23 वर पोहोचली आहे.दरम्यान, सुरगाणा तालुक्यातील रुग्ण नाशिकमध्ये वास्तव्यास असून सुरगाणावासियांनी चिंता करण्याची गरज नाही. तसेच आरोग्य यंत्रणा या रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचारास सुरुवात करणार असून नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी असे आवाहन करण्यात आले आहे.

श्रीरामपूर : शहरातील बाजारतळावरील दोन किराणा दुकान चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री फोडले. या दुकानातून चोरट्यांनी ७० हजारांचा किराणा माल चोरून नेला आहे.बाजार तळावर नगरपरिषद शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये कांकरिया यांच्या शैलेश किराणा दुकानाचे मागील बाजूचे शटर कटावणीने वाकवून चोरट्यांनी दुकानातील सुमारे ४० हजाराचा किराणा माल चोरून नेला आहे. चोरट्यांनी सीसीटिव्ही कॅमेऱ्यावर कपडा टाकून चोरी केली. शुक्रवारी रात्री चोरी झाली आहे.श्रीरामपूर -संगमनेर रोडवरील महावीर पापडीवाल यांच्या संतोष किराणा या नावाने दुकान आहे. या दुकानाच्या मागील बाजूचे पत्रे चोरट्यांनी उचकटून आत प्रवेश केला. यावेळी त्यांनी दुकानातील तेल, तुपाचे बॉक्स, चणाडाळ, साखर, साबण असा सुमारे ३० हजाराचा माल चोरून नेला आहे. कांकरिया व पापडीवाल यांनी दोघांनी दुकान चोरी प्रकरणी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

मुंबई - कोरोनाने राज्य पोलीस दलातला रविवारी दुसरा बळी घेतला आहे. यात वाकोला पोलीस पाठोपाठ मुंबईतील ५३ वर्षीय पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेने पोलिसांमध्ये कोरोनाची दहशत वाढली आहे. राज्यभरात कर्तव्य बजावत असताना सर्वाधिक पोलीस कोरोनाच्या विळख्यात अडकत आहे. कोरोनाच्या लढाईत कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या दोन पोलिसांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर, गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली. तसेच, या पोलीस कुटुबीयांना ५० लाख रुपये देण्याची घोषणाही देशमुख यांनी केली. शनिवारी पहाटे चार वाजेपर्यंत राज्यभरात ९६ कोरोनाबाधित पोलिसांची नोंद झाली. यात १५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी ३ अधिकारी आणि ४ पोलीस यातून बरे झाले असून अन्य पोलिसांवर उपचार सुरु आहेत. यात सर्वाधिक फटका मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना बसताना दिसत आहे. त्यात, राज्य पोलीस दलातील दोन पोलिसांना कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले. त्यानंतर, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी जनेतशी संवाद साधला. त्यावेळी, देशभरात आज सर्व मंदिरे बंद आहेत, मग देव कुठंयं असा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर, तो देव आज डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांमध्ये आहे, तो देव यांच्या माध्यमातून आपलं काम करत आहेत. माणसांत देव आहे, असे ठाकरे यांनी म्हटले. त्यानंतर, राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या दोन पोलिसांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच, गृहमंत्र्यांनीही शोक व्यक्त केला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मृत्यु झालेल्या पोलीस कुटुंबाबद्दल संवेदना व्यक्त केली. तसेच, या पोलीस कुटुंबीयास ५० लाख रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी देण्याचंही घोषित केलंय.


मुंबई : राज्यात करोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत असला तरी, या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही काही प्रमाणात दिलासा देणारी आहे.मुंबईतील ३१ पत्रकारांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यांचे चाचणी अहवाल दुसऱ्यांदा निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. यासंदर्भात मुंबई महापालिकेनं ही माहिती दिली. दरम्यान, या सर्व रुग्णांना १४ दिवस होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.मुंबईत करोनाचे अनेक हॉटस्पॉट तयार होत आहेत. येथील प्रत्येक घटना-घडामोडींची माहिती मुंबईकरांपर्यंत पोहचवण्यासाठी धडपडत असणाऱ्या विविध माध्यमांमधील पत्रकार आणि कॅमेरामन्सनाही करोना साथीने गाठले. माध्यम प्रतिनिधींसाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या व्यापक तपासणी मोहिमेनंतर त्यांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यात मुंबईतील पत्रकार व कॅमेरामन्स मिळून ५३ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.त्यातील ३१ पत्रकारांचे चाचणी अहवाल दुसऱ्यांदा निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. या सर्वांना १४ दिवस होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे.दरम्यान, शीवमधील प्रतीक्षा नगर येथील प्रेस एन्क्लेव्हमधील दोन पत्रकार करोनावर मात करून घरी परतल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यात आलं. या दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आले होते.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget