शिर्डी (जय शर्मा )
राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे अमोल किराणा स्टोअर्स मध्ये गुटख्याची होलसेल विक्री होत असलेल्या संशयावरून पोलीस व अन्नभेसळ अधिकार् यांनी धाड टाकली, मात्र त्या अगोदरच ही खबर लिक झाल्याने या अधिकाऱ्यांच्या हाती गुटखा ऐवजी प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिकपत्रवाळ्या हाती लागल्या, या छाप्याची बातमी सावळीविहीर व परिसरात पसरताच सर्वत्र चर्चेला उधाण आले होते, खोदा पहाडऔर निकल गये प्लास्टिक अशी परिस्थिती त्यामुळे झाली,
राहता तालुक्यातील सावळीविहीर येथे गावात कोठारी यांचे अमोल किराणा स्टोअर्स आहे, या दुकानात विविध कंपन्यांचे गुटखा विक्री केली जात असल्याचा संशय जिल्हा अन्नभेसळ प्रतिबंधात्मक अधिकाऱ्यांना होता, तसेच अहमदनगर पोलीस नियंत्रण कक्षाततूनही तसे आदेश देण्यात आले होते ,त्यावरून अन्न भेसळ अधिकारी व पोलीस यांनी रविवारी दुपारी येथे या अमोल किराणा स्टोअर्स दुकानांमध्ये छापा टाकला व दुकानांमध्ये तपासणी केली, मात्र या छाप्याची खबरआगोदरच लिक झाल्याचा संशय आता व्यक्त होत आहे, कुणीतरी ही खबर।लिक केल्यामुळे या शासकीय अधिकाऱ्यांच्या हाताला गुटखा लागला नाही ,पण या दुकानात प्लास्टिकच्या पिशव्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्या, प्लास्टिकला बंदी असताना प्लास्टिक पिशव्या दुकानात सापडल्याने तशी कारवाई करण्यात येत आहे ,मात्र ही खबर कोणी लिक केली याचा तपास होणे गरजेचे आहे, या अगोदर काही दिवसापूर्वीच या दुकानात छापा टाकण्यात आला होता, व त्यावेळी माल सापडला होता मात्र चिरीमिरी वर हे प्रकरण दाबून टाकण्यात आले ,अशी चर्चा आहे, यावेळी मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी प्रामाणिक व आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा छापा टाकला, परंतु कुणीतरी ही बातमी लिक केल्यामुळे अधिकाऱ्यांचा वेळ ,श्रम वाया गेले, अशीही नागरिकांत चर्चा होती, हा गुप्त छापा असताना ही खबर कोणी दिली, याची चौकशी होणे गरजेचे आहे, यात कोणता शासकीय कर्मचारी तर नाही ना।। अशी शंका व्यक्त होत आहे, तसेच सध्या लॉक डाऊन सुरू आहे, लॉक डाऊन काळात सावळीविहीर।बु।। ग्रामपंचायतहद्दीत सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत किराणा दुकान उघडे ठेवणे गरजेचे आहे, तसेच या काळात विनाकारण भाव वाढ करणे किंवा जादा भाव घेणे गुन्हाअसताना तरी काही लोकांकडून या आदेशाचे उल्लंघन होत आहे, या सर्व गोष्टींकडे पोलीस, स्थानिक प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहेत, पोलिसांचे एक दोन चक्कर होतात, जीप येते, परंतु नंतर मात्र येथे सर्व आलबेल सुरू होते, पोलीस जिपवरील स्पीकरचा आवाज ऐकताच सर्व आपली दुकाने पटापट बंद करतात, पोलीस गेले की परत उघडतात, यापुढे तरी कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे ,अशी नागरिकांची मागणी आहे.
Post a Comment