साकुरी/कोरोणा आजाराच्या पाश्र्वभूमीवर संचारबंदी व लाॅकडाउन व शिर्डी शहरातील बंद असलेल्या साईबाबा मंदिर यामुळे संगळे व्यवसाय जवळपास बंद पडलेले आहेत शिर्डी नगरपंचायत कार्यश्रेत्रात मोठ्या प्रमाणावर शिर्डी नगर पंचायत च्या मालकीची विविध काॅम्पलेक्स मध्ये विविध प्रकारचे व्यवसाय करण्यासाठी गाळे बांधुन दिले आहे मात्र अडचणी त आलेली बाजारपेठ यामुळे उपजिवीका चालवणे अवघड झाले आहे अशा वेळी महाराष्ट्र शासनाने धोरणात्मक निर्णय घेवून सहा महिने भाडे आकारणी करु नये अशी मागणी भाजपचे अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकारिणी सदस्य व राहता तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते बाळासाहेब काशिनाथ गाडेकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे केली आहे
अगोदरच वाढलेले गाळ्याचे भांडे होत नसलेला व्यापार साईभक्त भाविकांची नसलेली गर्दी अशी संकटाची मालीका सुरू असताना १३मार्च रोजी बंद झालेले साई मंदीर कोरोणाच्या महामारी. मुळे असलेली संचारबंदी व लाॅकडाउन वाढत असलेल्या या आजाराने बाजारपेठेत जवळपास सहा महिन्यांत तरी पुर्व पदावर येईल अशी खात्री दिसत नसल्याने राज्यसरकारने ज्या ज्या महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायत बाजारसमिती या माध्यमातून भव्य काॅम्पलेक्स बांधुन गाळे भाडे तत्वावर दिली आहे त्याच्या साठी जलदगतीने युद्ध पातळीवर निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे
Post a Comment