शिर्डी जय शर्मा-राहता तालुक्यात विशेषतः शिर्डी व परिसरात या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या काही किराणा, रेशन दुकानदारांकडून तसेच गॅस एजन्सी वाल्यांकडून सर्वसामान्यांची आर्थिक लुटमार होत असून शासकीय अधिकारी, पोलीस सुद्धा याकडे थातूरमातूर कारवाई करून दुर्लक्ष करीत आहेत, जर येत्या चोवीस तासाच्या आत या लोकांवर,या दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात आली नाही, तर प्रांताधिकारी शिर्डी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दैनिक साईदर्शन चे संपादक जितेश लोकचंदानी शिर्डी यांनी दिला आहे,कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वत्र लॉकं डाऊन सुरू आहे, त्यावश्यक सेवा सोडून सर्व बंद आहे, सर्वजण आपापल्या घरात आहेत, काम धंदा नसल्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब, मजदूर, कामगार यांना आर्थिक चणचण भासत आहे, अशा संकटकाळात रेशन दुकानदार मात्र शिधापत्रिकाधारकांना नियमात असतानासुद्धा मोफत प्रत्येकी पाच किलो तांदूळ देण्याऐवजी दोन किलो तांदूळ देत आहेत, किराणा दुकानदार किराणा मालाचे भाव अव्वाच्या सव्वा भाव लावीत आहे ,तसेच दुकानाची वेळ ठरवलेली असतानाही दुकान सुरू ठेवले जाते, काही दुकानात गुटखा होलसेल विक्री केली जाते, अशाच सावळीविहीरला एका किराणा दुकानात छापा टाकला असता अगोदर खबर।लीक झाल्याने गुटखा लंपास झाला, मात्र प्लास्टिक पिशव्या हाती सापडल्या, अशा घटना येथे घडताहेत, संवत्सरच्या एका गॅस एजन्सीवाल्याकडून सावळीविहीर येथील लोकांकडून 740 रुपयांऐवजी 780 रुपये उज्वला गॅस सिलेंडरचे घेतले जात आहेत, शिवाय लॉकडाऊन चे नियम पाळले जात नाही , बंदी असतानाही अनेक ठिकाणी रात्रीचे कूपनलिका खोदण्याचे काम अवैधरित्या परवानगी नसताना अनेक ठिकाणी सुरू असते ,अनेक जण भाजीपाला विक्रीच्या नावाने रस्त्याच्या कडेला बसून नियमभंग करतात मात्र या लोकांवर थातुरमातुर कारवाई अधून-मधून केली जाते, परत जैसे थे परिस्थिती निर्माण होते ,शिर्डी व परिसरात दारु, बियर साठा मोठ्या प्रमाणात असून जादा दराने विक्री होत आहे, सावळीविहीरला परमिट रूम फोडण्यात आले,बियरसाठा शिर्डीला पकडण्यात आला ,राहत्याला देशी दारू दुकान फोडले ,मात्र थातुरमातुर कारवाई झाली ,होलसेल गुटखा विक्री करणारे दुकानदार, किराणामाल अव्वाच्या सव्वा किमतीला विकणारे व वेळेचे बंधन न पाळणारे किराणा दुकानदार ,शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ असतानाही त्यात गफला करणारे रेशन दुकानदार, व उज्वला गॅस सिलेंडरचे जादा पैसे घेणारे गॅस एजन्सी वाल्यांकडून ग्राहकांची होणारी आर्थिक लूट त्वरित थांबवावी व अशा सर्वांची गुप्त पद्धतीने चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी ,जर 24 तासाच्या आत या लोकांवर गुप्त पद्धतीने चौकशी करून कडक कारवाई झाली नाही तर प्रांताधिकारी कार्यालय, शिर्डी यांच्या समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दैनिक साईदर्शन चे संपादक जितेश लोकचंदानी यांनी दिला आहे.
Post a Comment