Latest Post

साकुरी/कोरोणा आजाराच्या पाश्र्वभूमीवर  संचारबंदी व लाॅकडाउन व शिर्डी शहरातील बंद असलेल्या साईबाबा मंदिर यामुळे  संगळे व्यवसाय  जवळपास बंद पडलेले आहेत शिर्डी नगरपंचायत कार्यश्रेत्रात मोठ्या प्रमाणावर शिर्डी नगर पंचायत च्या मालकीची विविध काॅम्पलेक्स मध्ये विविध प्रकारचे व्यवसाय करण्यासाठी गाळे बांधुन दिले आहे  मात्र अडचणी त आलेली बाजारपेठ यामुळे उपजिवीका चालवणे अवघड झाले आहे  अशा वेळी  महाराष्ट्र शासनाने धोरणात्मक निर्णय घेवून सहा महिने भाडे आकारणी करु नये अशी मागणी भाजपचे अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकारिणी सदस्य व  राहता तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते बाळासाहेब काशिनाथ गाडेकर  यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे केली आहे
    अगोदरच वाढलेले गाळ्याचे भांडे होत नसलेला व्यापार साईभक्त भाविकांची नसलेली गर्दी अशी संकटाची मालीका सुरू असताना  १३मार्च रोजी बंद  झालेले  साई मंदीर कोरोणाच्या महामारी. मुळे   असलेली संचारबंदी व लाॅकडाउन   वाढत असलेल्या या आजाराने बाजारपेठेत जवळपास सहा महिन्यांत तरी पुर्व पदावर येईल अशी खात्री दिसत नसल्याने  राज्यसरकारने ज्या ज्या महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत   ग्रामपंचायत  बाजारसमिती या माध्यमातून भव्य काॅम्पलेक्स बांधुन गाळे भाडे तत्वावर दिली आहे त्याच्या साठी जलदगतीने युद्ध पातळीवर निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे

नाशिक l प्रतिनिधी - जिल्ह्यात करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून रविवारी (दि.२६) सहा नवे करोना बाधित रुग्ण आढळले. त्यापैकी पाच रुग्ण एकटया येवला तालुक्यातील आहे.तर आदिवासी तालुका असलेल्या सुरगाण्यातही करोनाने शिरकाव केला आहे. या ठिकाणी अतिदुर्गम तलपाडा गावातील २४ वर्षीय तरुणाला करोनाची लागण झाली आहे.हा तरुण नाशिकमधील जिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवक असल्याचे समजते. हा रुग्ण शहरातील दिंडोरी रोडवरील आरटीओ कॉर्नर परिसरातील असल्याचे समजते. या रुग्णाच्या संपर्कात कोण-कोण आले असावे याबाबतची माहिती घेण्यास गती दिली जाणार आहे. यामुळे जिल्हयात करोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा आकडा १४९ वर पोहचला अाहे.करोनाचे हाॅटस्पाॅट ठरलेल्या मालेगावमध्ये सोमवारी एकही नवा करोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडला नाही. या ठिकाणी तीन रुग्ण करोनामुक्त झाले.एकीकडे हा दिलासा मिळाला असताना सहा नवे करोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यात पाच रुग्ण हे येवल्यातील असून एक सुरगाण्यातील आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यात करोनाचा फैलाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.येवल्यातील करोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या सहा झाली आहे. तर मालेगावमध्ये १२७, सुरगाणा एक अशी करोना बाधित रुग्णांची संख्या आहे. नाशिक शहरासह मालेगाव वगळून इतर तालुक्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 23 वर पोहोचली आहे.दरम्यान, सुरगाणा तालुक्यातील रुग्ण नाशिकमध्ये वास्तव्यास असून सुरगाणावासियांनी चिंता करण्याची गरज नाही. तसेच आरोग्य यंत्रणा या रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचारास सुरुवात करणार असून नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी असे आवाहन करण्यात आले आहे.

श्रीरामपूर : शहरातील बाजारतळावरील दोन किराणा दुकान चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री फोडले. या दुकानातून चोरट्यांनी ७० हजारांचा किराणा माल चोरून नेला आहे.बाजार तळावर नगरपरिषद शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये कांकरिया यांच्या शैलेश किराणा दुकानाचे मागील बाजूचे शटर कटावणीने वाकवून चोरट्यांनी दुकानातील सुमारे ४० हजाराचा किराणा माल चोरून नेला आहे. चोरट्यांनी सीसीटिव्ही कॅमेऱ्यावर कपडा टाकून चोरी केली. शुक्रवारी रात्री चोरी झाली आहे.श्रीरामपूर -संगमनेर रोडवरील महावीर पापडीवाल यांच्या संतोष किराणा या नावाने दुकान आहे. या दुकानाच्या मागील बाजूचे पत्रे चोरट्यांनी उचकटून आत प्रवेश केला. यावेळी त्यांनी दुकानातील तेल, तुपाचे बॉक्स, चणाडाळ, साखर, साबण असा सुमारे ३० हजाराचा माल चोरून नेला आहे. कांकरिया व पापडीवाल यांनी दोघांनी दुकान चोरी प्रकरणी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

मुंबई - कोरोनाने राज्य पोलीस दलातला रविवारी दुसरा बळी घेतला आहे. यात वाकोला पोलीस पाठोपाठ मुंबईतील ५३ वर्षीय पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेने पोलिसांमध्ये कोरोनाची दहशत वाढली आहे. राज्यभरात कर्तव्य बजावत असताना सर्वाधिक पोलीस कोरोनाच्या विळख्यात अडकत आहे. कोरोनाच्या लढाईत कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या दोन पोलिसांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर, गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली. तसेच, या पोलीस कुटुबीयांना ५० लाख रुपये देण्याची घोषणाही देशमुख यांनी केली. शनिवारी पहाटे चार वाजेपर्यंत राज्यभरात ९६ कोरोनाबाधित पोलिसांची नोंद झाली. यात १५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी ३ अधिकारी आणि ४ पोलीस यातून बरे झाले असून अन्य पोलिसांवर उपचार सुरु आहेत. यात सर्वाधिक फटका मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना बसताना दिसत आहे. त्यात, राज्य पोलीस दलातील दोन पोलिसांना कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले. त्यानंतर, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी जनेतशी संवाद साधला. त्यावेळी, देशभरात आज सर्व मंदिरे बंद आहेत, मग देव कुठंयं असा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर, तो देव आज डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांमध्ये आहे, तो देव यांच्या माध्यमातून आपलं काम करत आहेत. माणसांत देव आहे, असे ठाकरे यांनी म्हटले. त्यानंतर, राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या दोन पोलिसांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच, गृहमंत्र्यांनीही शोक व्यक्त केला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मृत्यु झालेल्या पोलीस कुटुंबाबद्दल संवेदना व्यक्त केली. तसेच, या पोलीस कुटुंबीयास ५० लाख रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी देण्याचंही घोषित केलंय.


मुंबई : राज्यात करोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत असला तरी, या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही काही प्रमाणात दिलासा देणारी आहे.मुंबईतील ३१ पत्रकारांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यांचे चाचणी अहवाल दुसऱ्यांदा निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. यासंदर्भात मुंबई महापालिकेनं ही माहिती दिली. दरम्यान, या सर्व रुग्णांना १४ दिवस होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.मुंबईत करोनाचे अनेक हॉटस्पॉट तयार होत आहेत. येथील प्रत्येक घटना-घडामोडींची माहिती मुंबईकरांपर्यंत पोहचवण्यासाठी धडपडत असणाऱ्या विविध माध्यमांमधील पत्रकार आणि कॅमेरामन्सनाही करोना साथीने गाठले. माध्यम प्रतिनिधींसाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या व्यापक तपासणी मोहिमेनंतर त्यांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यात मुंबईतील पत्रकार व कॅमेरामन्स मिळून ५३ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.त्यातील ३१ पत्रकारांचे चाचणी अहवाल दुसऱ्यांदा निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. या सर्वांना १४ दिवस होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे.दरम्यान, शीवमधील प्रतीक्षा नगर येथील प्रेस एन्क्लेव्हमधील दोन पत्रकार करोनावर मात करून घरी परतल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यात आलं. या दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आले होते.


शिर्डी राजेंद्र गडकरी। - सध्या कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी देशभर विविध प्रयत्न केले जात आहेत, शासन विविध प्रकाराने कोरोणाला आळा बसावा म्हणून प्रयत्नशील आहे, जो तो आपापल्या परिने त्यासाठी प्रयत्न करीत आहे, अशा परिस्थितीत येथील मानवता फाउंडेशन या सामाजिक संघटनेच्या  वतीने कोरोना व्हायरसचा शिरकाव गावात होऊ नये म्हणून सावळीविहीर व परीसरातील असणाऱ्या  गावांमध्ये  सॅनिटायझशंन करण्यात येत आहे, मानवता फाउंडेशनच्या वतीने सावळीविहीर परीसरातील सावळीविहीर बुद्रुक ,सावळीविहिर खुर्द, निमगाव, निघोज ,रुई,कोहकी, शिंगवे  तसेच वाड्या-वस्त्यांवर आवश्यक असे निर्जंतुकीकरण फवारणी करून करण्यात येत आहे ,त्यासाठी आवश्यक असे सोडियम हायक्लोराईड  संबंधित गावांना देण्यात येत आहे, ही फवारणी झाल्यानंतर गावात निर्जंतुंकीकरण होण्यासाठी प्रयत्न होणार आहे , मानवता फाउंडेशन या समाजिक संघटने मार्फत काही दिवसांपूर्वीच साईबाबा संस्थान सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी, शिरडी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तसेच राहता तालुक्यातल्या सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविका, आशा, यांना चांगल्या दर्जाचे मास्क दिले होते, आता या मानवता फाउंडेशन च्या वतीने सावळीविहीर परिसरातील गावात निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे,हा उपक्रम राबविण्यासाठी राहता पंचायत समितीचे गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी पुढाकार घेतला होता, या संकटसमयी अशा वेगवेगळ्या प्रकाराने मदत करून मानवता फाउंडेशन एक चांगले कार्य करत असल्याने या मानवता फाउंडेशनचे सावळीविहीर व परिसरातून अभिनंदन होत आहे, हा उपक्रम राबवण्यासाठी पं स, उपसभापती ओमेश जपे  , सा, वि ,बु।।चे सरपंच सौ,रूपाली आगलावे,सा वि खु।चे सरपंच सौ, सुजाता जमधडे, निघोज सरपंच गणेश कनगर, रूई सरपंच संदीप वाबळे ,शिंगवे सरपंच राहुल घाडगे ,निमगाव सरपंच सौ शिल्पा कातोरे यांच्याबरोबर सर्व ग्रामपंचायत ग्रामसेवक, उपसरपंच यांचे सहकार्य लाभले , हा उपक्रम राबवण्यासाठी मानवता फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. नितीन बारहाते, उपाध्यक्ष श्री. विनय गिरी, सचिव श्री. मोसीन शेख, खजिनदार अशोक गाडेकर, सौ. छायाताई देशपांडे,   डॉ. प्रदीप केंद्रे, डॉ. अनंतकुमार भांगे, डॉ. वृषाली लोखंडे, API नयना आगलावे, सौ. निलोफर शेख, ऍड. राजेश कातोरे, डॉ. सुभाष खकाळे, डॉ. किरण भोईटे, मनोज हजारे, सचिन काळोखे, सचिन शिरोळे, बाबा डांगे, विशाल गोसावी, गिरीश क्षीरसागर, श्री. चंदू बोरसे, दिलीप भारुड, महेश चव्हाण, निलेश उगले, महेश आगलावे, योगेश जपे, श्री. संतोष तांबे, नितीन पठारे, वाल्मिक गाडेकर, संतोष तांबे आदींनी विशेष परिश्रम घेतले

मुंबई | प्रतिनिधी -नॉन-कोविड रुग्णांसाठी डायलिसीस सेंटर, हृदयविकार, कर्करोगग्रस्तांसाठी उपचार सुरु करणे गरजेचे आहेत. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद करू नयेत. करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढलीच तर वरळी आणि गोरेगाव येथील प्रदर्शनांची मैदानांवर आपण रुग्णांची सोय करण्याचे कार्य करत आहोत. संकटावर मात करावयाची असून आत्मविश्वास महत्वाचा असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.ते आज राज्याला संबोधित करताना बोलत होते. ते म्हणाले राज्यातील नागरिकांनी सुरक्षित अंतर पाळले तरच करोनावर मात करणे शक्य होणार आहे. राज्यात कुन्हीही उपाशी राहणार नाही यासाठी सरकार बांधील आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. केंद्र सरकारसोबत वेळोवेळी बोलणे सुरु आहे.केंद्रीय पथकाने राज्यातील व्यवस्थेवर समाधान व्यक्त केले असल्याचे ते म्हणाले. राज्यामध्ये टाटा, अंबानी, इस्सार यांच्यासारख्या अनेक उद्योगपतींनी मदतीचा हात देत ठिकठिकाणी सामाजिक कार्य त्यांनी सुरु केले आहे.महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांना आपापल्या गावी पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण रेल्वे सुटणार नाही, गर्दी करायची नाहीये. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून लवकरच यावर निर्णय घेतला जाईल. राज्यात कुठल्याही फळांच्या वाहतुकीवर बंधने नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.बाजारसमित्या सुरु असून शेतकऱ्यांना मान्सूनपूर्व कामांमध्ये काहीही अडचण भासणार नाही याची काळजी कृषी विभागाकडून घेतली जात आहे. शिवभोजन थाळीच्या माध्यमातून दररोज एक लाखांपेक्षा अधिक थाळी गरिबांना दिल्या जात आहेत. दोन पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना त्यांना वीरमरण आले असल्याचे ते म्हणाले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget