राहता तालुक्यात मोफत तांदूळ वितरित करताना काही रेशन दुकानदारांकडून लाभार्थींची होते अडवणूक
शिर्डी ।जितेश लोकचंदानी । सध्या कोरोणाच्या पार्श्वभूमीवर राहता तालुक्यात शासनाच्या वतीने शिधापत्रिकाधारक लाभार्थींना प्रत्येक व्यक्तीला पाच किलो तांदूळ मोफत देण्यात येत आहे, मात्र अनेक रेशन दुकानांमधून अशा शिधापत्रिकाधारकांची अडवणूक करण्यात येत आहे, प्रत्येकी पाच किलो तांदूळ देण्याऐवजी दोन किंवा तीन किलो तांदूळ दिले जातात ,अश्या लाभार्थीकडून तक्रारी येत आहेत, यावर जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच राहाता तहसीलदारसाहेब यांनी अश्या रेशन दुकानदारांवर त्वरित कारवाई करावी ,अशी मागणी होत आहे,कोरोनामुळे सर्वत्र लॉक डाऊन सुरू आहे, सर्वत्र बंद असल्यामुळे कामधंदा नसल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना पोटापाण्याचा प्रश्न उद्भवू नये म्हणून शासनाने शिधापत्रिकाधारक लाभार्थींना मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सध्या राहता तालुक्यात होत आहे, एप्रिल ,मे, जून अशा तीन महिन्यासाठी लाभार्थींना मोफत तांदूळ मिळणार आहे व त्याचे वाटप सध्या सुरू आहे ,मात्र राहता तालुक्यातील काही ठिकाणी रेशन दुकानदारांकडून अश्या लाभार्थ्यांची अडवणूक केली जात आहे, अशाच सावळीविहीर येथील राजीव गांधी या रेशन दुकानदार वाल्याकडून निघोज येथील एका लाभार्थींना कुटुंबात पाच सदस्य असल्याने त्यांना नियमानुसार 25 किलो मोफत तांदूळ देणे गरजेचे असताना त्यांना फक्त दहा किलो तांदूळ दिले गेले ,अशी तक्रार लाभार्थी सौ सुवर्ण अनिल येेवले यांनी केली आहे ,तसेच रेशन दुकानातून पिवळे रेशन कार्ड असतानाही अन्नधान्य घेतल्यानंतर पावती देणे क्रमप्राप्त असतानाही पावती दिली जात नाही, असे ग्रामीण भागात प्रकार घडत असून अशांवर चौकशी करून कारवाई करावी, सावळीविहीर येथील राजीव गांधी या रेशन दुकानदारांवर सुमारे सात-आठ वर्षांपूर्वी जिल्हा पुरवठा अधिकारी नंदकुमार सूर्यवंशी हेअसताना लाभार्थींनी तक्रार केली होती व त्यावेळी असाच प्रकार घडला होता, आता परत हा प्रकार या रेशन दुकानदार वाल्याकडून होऊ लागला आहे ,त्यामुळे या रेशन दुकानदारावर कारवाई करावी, अशी मागणी रावसाहेब एखंडे यांनी केली आहे, तसेच गावागावात या रेशन दुकानदारांवर मोफत तांदूळ देतांना लक्ष ठेवण्यासाठी शासनाच्या आदेशान्वये कामगार तलाठी, ग्रामसेवक ,सरपंच , पोलिस पाटील आदींची कमिटी नेमून आशा रेशन दुकानांच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यात यावे , अनेक ठिकाणी रेशन दुकानात अन्नधान्य घेण्यासाठी लाभार्थी गर्दी करतात , रेशनदुकानदारही लॉक डाऊन चे नियम पाळत नाही , तरी अशा रेशन दुकानदारांवर लॉक डाऊन चे नियम पाळण्यासाठी सक्ती करावी , अन्यथा कडक कारवाई करावी ,अशी मागणी लाभार्थी व नागरिकांकडून कडून होत आहे.