(शिर्डी प्रतिनिधि राजेंद्र गडकरी ) कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव सुरू असलेल्या लाॅकडाउन मुळे शेतकरी व सर्व सामान्य लोक मोठ्या प्रमाणावर अडचणी मध्ये आलेले आहे शेतकरी. लोकांना मोठा आधार ठरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुरदृष्टी कोणातुन नुकतीच सुरू झालेल्या पंतप्रधान सन्मान किसान योजनेअंतर्गत राहता तालुक्यातील जवळपास २०७४६पात्र शेतकरी लोकांच्या बॅन्क खात्यात दोन कोटी १४लाख रुपये जिल्हाधिकारी राहुल द्रविदी प्रांत अधिकारी गोविंद शिंदे माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे-पाटील. खा सदाशिव लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ग करण्यात आले आहे अशी माहिती राहता येथील तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली
शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ नियमीत पणे दिला जातो मात्र लाॅकडाउन काळात तातडीने या योजनेचा लाभ देण्यासाठी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना आधार ठरलेल्या या योजनेचा लाभापोटी प्रत्येकी दोन हजार रुपये थेट बँक खात्यात तातडीने वर्ग केल्यामुळे राहता तालुक्यातील शेतकरी बांधवांन मध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे त्या बरोबरच केन्द्र व राज्य सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी निराधार योजनेत समावेश असलेल्या ७४००लाभार्थीना ७९लाख तर इंदिरा गांधी निराधार योजनेतील श्रावणबाळ जेष्ठ नागरिक आदींसह असलेल्या पात्र १०६२९ पात्र लाभार्थी यांना १कोटी ७५लाख अशी जवळपास जानेवारी फेब्रुवारी पोटी १कोटी ८६लाख ८२हजाराची रक्कम त्यांच्या बॅंकांच्या खात्यात वर्ग देखील तात्काळ केली गेली आहे विविध योजनांचा लाभ लोकांना तात्काळ कसा देता येईल यासाठी देखील प्रयत्न केला गेला त्यामुळे या अडचणीच्या काळात सर्व सामान्य गरजु कुटुंबातील लोकांना हा मोठा आधार ठरला आहे यासाठी राहता तहसील कार्यालयात असलेल्या कर्मचारी सतिश पाटोळे अनिल फोफसे तुपे त्या विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या त्यामुळे जवळपास २०७४६शेतकरी लोकांना दोन कोटी १४लाख तर संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना यातील १८०२९लाभार्थीना १कोटी ८३लाख अशी चार कोटी रुपयांच्या भरीव लाभ राहता तालुक्यातील जनतेला मिळाला आहे यामुळे राहता तालुक्यातील जनतेत समाधानाचे वातावरण पसरले आहे.
Post a Comment