सावळीविहीर राजेंद्र गडकरी ।। सध्या कोरोनामुळे देशात लॉक डाऊन सुरू आहे, त्यामुळे सर्व काही बंद आहे, लोक घरात आहेत त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब महिलांना स्वयंपाकासाठी अडचण भासू नये म्हणून याकाळात केंद्र शासनाने उज्वला गॅस मोफत देण्याची घोषणा केली आहे, एप्रिल ,मे ,जून असे तीन महिने उज्वला गॅस या महिलांना मोफत मिळणार आहे, सध्या गावागावात महिलांना उज्वला गॅस मिळत आहे, मात्र उज्वला गॅस देणाऱ्या एजन्सी व गॅस कर्मचाऱ्यांकडून अनेक ठिकाणी लॉक डाऊन चे नियम मोडले जात आहेत, सावळीविहीर येथेही उज्वला गॅस देण्यासाठी संवत्सर येथून एका गॅस एजन्सीची सिलेंडर घेऊन मालवाहतूक पिकअप जिप येथे येते , या उज्वला गॅससाठी आगाऊ नोंदणी केल्यानंतर एक किंवा दोन दिवसांनी गॅस सिलेंडर दिले जाते, अनेक उज्वला गॅस घेणाऱ्या महिला ह्या ग्रामीण भागातल्या आहेत ,त्यांना अधिक माहिती नसते, त्या गॅस घेण्यासाठी हेलपाटे मारत असतात, त्यांना योग्य सल्ला ही दिला जात नाही, ही गॅस सिलेंडर जीप सावळीविहीर येथील बाजार तळावर येते, येथे दररोज ही सिलेंडरची जीप आल्यानंतर मोठी गर्दी होते, अनेक मोटरसायकली ,सायकली महिला-पुरुष, मुले येथे उज्वला योजनेचा गॅस सिलेंडर घेण्यासाठी जमा होतात, सध्या लॉक डाऊन सुरू आहे, संचारबंदी जारी आहे, त्यामुळे सर्वांना नियम सारखेच आहे, सोशल डिस्टंन्स ठेवून गॅस वितरित करणे गरजेचे आहे, येथे मात्र असे होत नाही, अनेकांच्या तोंडाला मास्क नसते, सोशल डिस्टंन्स पाळला जात नाही, येथे लॉक डाऊन च्या नियमाचा फज्जा उडत आहे, अनेकजण मोफत उज्वला गॅस सिलेंडर घेण्यासाठी चढाओढ करतात, येथे गर्दी होते, लॉकडाऊन चे नियम पूर्णतः पायदळी तुडवले जात आहे ,अनेकजण जीप चालका बरोबर गॅस सिलेंडरची नोंद करण्यासाठी धडपड करत असतो, त्यामुळे सामाजिक दूरी राहत नाही, अनेक जण गॅस सिलेंडर मिळेपर्यंत एकत्रित गप्पा मारताना दिसतात, येथे कोणीही कोरोना संदर्भात कोणतीही दक्षता घेताना दिसून येत नाही गॅस वितरण कर्मचाऱ्यांनी तरी याचे भान ठेवले पाहिजे व ग्राहकांना तसेच स्वतःही भाऊंचे नियमाचे आचरण केले पाहिजे, हे असेच अजून सुरू राहिले तर दुर्दैवाने मोठे संकट येथे निर्माण होऊ शकते, त्यामुळे या सर्वांवर कारवाई होणे गरजेचे आहे ,तसेच येथील उज्वला गॅस एजन्सी कडून एका गॅस सिलेंडरचे 740 रुपये घेण्याऐवजी 780 रुपये घेतले जातात, प्रत्येक सिलेंडर मागे 40 रुपये अधिक घेतले जातात, सिलेंडरचे हे वाहतूक भाडे घेत असल्याचे गॅस वितरण कर्मचारी सांगतात,अशी तक्रारही काही महीलां करत असुन यावर जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसिलदार यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे उज्वला गॅस धारक महिला बोलत आहेत.
Post a Comment