Latest Post

राहुरी (प्रतिनिधी)- तालुक्यामध्ये प्रशासनाकडून आगामी काळातही कोरोना रुग्णांवर उपचार व तपासणीसाठी कोव्हीड केअर सेंटरची स्थापना केली जाणार आहे. तर सारी व कोरोना संशयित रूग्णांनाही उपचाराची व्यवस्था केली जाणार आहे. स्त्राव तपासणी राहुरीतच केली जाणार असून रूग्णांवर प्राथमिक उपचाराची व्यवस्था केली जाईल, अशी माहिती तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी दिली.राहुरी महसूल विभागात तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनात मेडिकल असोसिएशनची बैठक झाली. शहरातील अनेक खासगी डॉक्टरांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. खासगी डॉक्टरांचे पथक शासकीय डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून सहकार्य करण्यास तयार असल्याचे असोसिएशनच्या सदस्यांनी सांगितले.राहुरीमध्ये कोव्हीड केअर सेंटरची निर्मिती केली आहे. यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान केंद्र हे बाह्यरुग्ण विभाग तर बियाणे केंद्र हे स्टोअररूम म्हणून वापरण्यात येणार आहे. यासह महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सर्व विद्यार्थी निवास तसेच शेतकरी निवास भवनही कोव्हीड केअर सेंटर म्हणून वापरात आणले जाणार आहे. कोव्हीड केअर सेंटरमध्ये 600 जणांना उपचार सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सारी रोगाचा सर्व्हे सुरू असून खोकला, सर्दी असणार्‍यांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये तपासणीसाठी ठेवले जाणार आहे. रूग्णांसाठी एकच बेड असलेली स्पेशल रूम दिली जाणार आहे. कृषी माहिती केंद्रामध्ये केस पेपर काढणे व तपासणी करणे आदी कार्य शासकीय वैद्यकीय अधिकारी व खासगी डॉक्टरांची नेमणूक केलेली आहे.खासगी डॉक्टरांनी आठवड्यातून एक दिवस कोव्हीड केअर सेंटरमध्ये रुग्णसेवा देण्यासाठी होकार दर्शविला आहे. पूर्वी नगरला स्त्राव चाचणी केली जात होती. परंतु यापुढे राहुरीतच स्त्राव चाचणी केली जाणार असून अहवाल येईपर्यंत संशयित रूग्णांना एकाच रुममध्ये विद्यापीठातील विद्यार्थी निवासामध्ये ठेवले जाईल. अहवाल आल्यानंतर पॉझिटीव्ह आल्यास अभियंता इमारतीमध्ये ठेवले जाईल. तर निगेटीव्ह आल्यानंतर विद्यापीठात तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन विभागात 14 दिवसांसाठी ठेवले जाईल.पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रूग्णांसाठी राहुरी तालुक्यातील नेमलेल्या सेंटरमध्ये ऑक्सिजन व्यवस्था केली जाणार आहे. रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होणे किंवा त्रास होत असल्यास संबंधित रुग्णास नगर येथील सिव्हील हॉस्पिटलला नेण्यासाठी 24 तास अत्याधुनिक रुग्णवाहिका सेंटरपुढे उभी ठेवली जाणार आहे. यासह राहुरी प्रशासनाने आगामी काळातील अडीअडचणींमध्ये वाढ झाल्यास शासकीय अधिकार्‍यांच्या टास्क फोर्सची नेमणूक केली आहे.

सावळीविहीर। राजेंद्र गडकरी- सध्या देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आला आहे,त्यामुळे राज्यात व राहता तालुक्यात या लॉकडाऊन मुळे अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद आहे, अशा परिस्थितीत सर्वजण घरात बसून आहेत, मात्र अश्या आपत्तिजनक परिस्थितीत गोरगरीब सर्वसामान्यांना उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर आला आहे त्यात दिव्यांग  (अंध ,अपंग) नागरिकांचा प्रश्न तर गंभीर बनला आहे ,त्यामुळे अशा गरजू दिव्यांगांना मदत करण्यासाठी शिर्डी व परिसरातील काही तरुण एकत्र आले असून त्यांनी पुढाकार घेत व राहता तालुक्यातील समदृष्टी समता विकास अनुसंधान मंडळ (सक्षम)  या दिव्यांग संघटनेच्या मार्गदर्शनाने राहता तालुक्यातील दिव्यांगांना राष्ट्रीय कर्तव्य म्हणून लोकवर्गणीतून साधारण दीड महिना पुरेल एवढा किराणा देण्यात येत आहे, नुकताच सावळीविहीर येथे कुमारी वर्षाताई राजेश पाचोरे यांना ही मदत करण्यात आली ,
 राहता तालुक्यातील विविध दिव्यांगांना ही प्रत्येकाच्या घरी जाऊन लॉक डाऊन चे नियम पाळत सर्वांना मदत दिली जात आहे, तसेच या मदतीचा कोणताही गाजावाजा केला जात नाही तसेच कोणताही फोटो काढून प्रसिद्धीला देण्यात येत नाही, सध्या देशात, राज्यात कोरोना मुळे मोठी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा परिस्थितीत एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे, गरजू दिव्यांग बंधू-भगिनींना तर मदतीची सध्याच्या काळात मोठी गरज आहे, हे ओळखूनच आम्ही समदृष्टी क्षमता विकास अनुसंधान मंडळ (सक्षम) या दिव्यांग संघटनेच्या मार्गदर्शनातून राहता तालुक्यातील दिव्यांगांना लोकवर्गणीतून घरोघर जाऊन ही मदत या राष्ट्रीय आपत्तीमध्ये राष्ट्रीय कर्तव्य म्हणून व राष्ट्रीय भावनेतून करत आहे, त्यासाठी योगेश  गोंदकर, प्रकाश  गोंदकर,पंकज दुशिंग, चेतन भडांगे ,सौरभ भडांगे आदी परिश्रम घेत आहेत ,अशी माहिती सचिन भैरवकर यांनी दिली, अशा संकटसमयी दिव्यांगाना मदत करून मोठा हातभार लावतअसल्याबद्दल या तरुणांचे शिर्डी व परिसरांमधून मोठे कौतुक होत आहे

शिर्डी- जितेश लोकचंदानी-सध्या कोरोना मुळे जगात हाहाकार उडाला आहे , देशातही  कोरोनाने मोठी संकटकालीन परिस्थिती निर्माण झाली आहे , त्यामुळे सर्वत्र लॉक डाऊन सुरू आहे , अशा परिस्थितीत  देशातील  सर्व सरकारी अधिकारी कर्मचारी  आपला जीव धोक्यात घालून  अहोरात्र व सक्षमपणे  काम करत आहे,  असे असताना  राजकीय नेते व लोकप्रतिनिधी यांचे मग कामच काय । असा सवाल भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी केला आहे,
 एका पत्रकान्वये त्यांनी पुढे म्हटले आहे की , देशात सध्या कोरोना मुळे मोठी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा परिस्थितीत देशातील, राज्यातील सर्व शासकीय अधिकारी ,कर्मचारी ,शिपाई सर्व जो तो आपापल्या परीने या संकट समयी अहोरात्र कोरोणाचा मुकाबला करण्यासाठी झटत आहे ,स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहे व हा देश चालवत आहे ,जर सरकारी अधिकारी ,कर्मचारी सक्षम पणे हा देश चालवत असतील तर मग निवडून गेलेले लोकप्रतिनिधी यांचे काम तरी काय आहे।। हे लोकप्रतिनिधी व राजकीय नेते सध्या आपल्या घरात  शांतपणे बसून आहे, संकटसमयी त्यांना  ना आपल्या मतदार संघाची ,ना आपल्या राज्याची, ना देशाच्या नागरिकांची चिंता आहे,  फक्त निवडणुका पुरतेच  घरोघरी फिरणारे  वेगवेगळ्या वस्तू ,,पैसे वाटून  गोरगरिबांची  सेवा करतो असे  दाखवणारे  मात्र आता सध्या  कोठे आहेत । असा मोठा सवाल निर्माण होत आहे, आमदारकी आणि खासदारकीच्या निवडणुकीमध्ये तालुका अथवा जिल्हा विकास आघाडी स्थापन करून पक्ष बदलून अनेक प्रतिनिधी निवडणूक लढवतात .निवडणुकीच्या काळात प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचतात. विशेष म्हणजे बाहेरगावी असलेल्या मतदारांना सुद्धा मतदानासाठी अनेक युक्त्या वापरून घेऊन येतात .स्वतः निवडून येण्यासाठी वस्तू आणि पैसे वाटप करण्याचे गैरप्रकार निवडणूक काळात उघडकीस आलेले आहेत. निवडणुकीच्या काळात कायदा धाब्यावर बसवून अनेक उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आले आहे .ज्या पक्षाने वाढवले ,मोठे केले, अनेक पदे दिली त्या पक्षाला निवडणुकीमध्ये सोडचिठ्ठी दिल्याची अनेक उदाहरणे आहेत .चुकीचे वर्तन केले तरी या सर्व बाबी आम्ही जनहितासाठी करीत असल्याचा संबंधितांनी मुलामा दिला व निवडणुका लढवल्या . मग आज जागतिक संकट असलेल्या कोरोनाच्या काळात काहीच  जनहित करता येणार नाही का ?असा खडा सवाल श्री सुधीर भद्रे यांनी केला आहे .
 हाताच्या बोटावर मोजण्याइतके जे लोकप्रतिनिधी छान काम करत आहेत त्यांचे भारतीय जनसंसदने कौतुक करून आभार मानले आहेत. लॉकडाऊन मध्ये अनेक लोकांना अन्न नाही ,पाण्याची अडचण जाणवते आहे ,मजुरांना किमान वेतन नाही , शेतकरी ,मजूर ,काच -कागद -पत्रा गोळा करणारे इत्यादी अनेक समाजघटक जन्मापासून कधीही न अनुभवलेला लॉक डाऊन अनुभवत आहेत. आधीच जीवनाचा संघर्ष त्यांना कठीण जात होता ,त्यात कोरोनामुळे आभाळ फाटल्यासारखे वाटत आहे . अनंत अडचणी त्यांच्यासमोर उभ्या राहिल्या आहेत .अशा वेळी निवडून आलेल्या आमदार, खासदार व द्वितीय क्रमांकाची मते मिळविणाऱ्यांनी फक्त  स्वतःच्या कुटुंबाची काळजी न घेता सध्या निवडणुकीचा माहोल असल्याप्रमाणे प्रत्येक मतदार व त्याच्या कुटुंबाच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवाव्यात .यासाठी घराबाहेर येण्याची अजिबात आवश्यकता नाही ,कारण लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ता रुपी घट्ट जाळे शहरी आणि ग्रामीण भागात आहे .लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्यकर्त्यांना निवडणूक काळासारखे सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी आर्थिक , धान्य , सॅनिटायझर , पीपीई किट , अशा एक ना अनेक  स्वरूपात मदत करावी व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे लोकप्रतिनिधींची सुद्धा देशाला गरज असल्याचे सिद्ध करून द्यावे ।असे आवाहन सर्वश्री अशोक सब्बन, अॅड.कारभारी गवळी, कैलास पठारे, अशोक ढगे, विर बहादुर प्रजापती, बबलू खोसला सुनील टाक , भगवान जगताप व जिल्हाध्यक्ष श्री सुधीर  यांनी केले आहे.

शिर्डी ।राजेंद्र गडकरी /जय शर्मा-शिर्डी येथील संभाजीनगर मध्ये पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन पतीने तिला चाकूने भोसकून व स्वतःही गळफास घेऊन जीवन संपवले ,मात्र  पत्नी जबर जखमी झाल्याने आसपासच्या लोकांनी तीला शिर्डीच्या श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल दवाखान्यामध्ये उपचारार्थ दाखल केले,या प्रकाराने शिर्डी व परिसरात परिसरात खळबळ उडाली आहे, गेल्या काही दिवसापासून लॉक डाऊन मुळे शिर्डीच काय परंतु जिल्ह्यात शांतता वाटत असताना हा प्रकार शिर्डीत घडल्याने सर्वत्र मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे,
   यासंदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शिर्डी येथील संभाजीनगर भागात राहणारे कैलास दिवाकर ठोकळ याची पत्नी अनिता कैलास ठोकळ या दोघांचे आपापसात नेहमी भांडण होत होते, कैलास ठोकळ आपल्या पत्नीवर नेहमी चारित्र्याचा संशय घेत होता ,यातून त्यांचे नेहमी वादावादी होत होती, असेच 17। 4 । 20 20 रोजी रात्री कैलास व।पत्नी अनिता याच्यांत चारित्र्याच्या संशयावरून  दोघांत भांडण झाले ,त्यामुळे कैलास ठोकळचा मुलगा चंद्रकांत हा आपल्या घर मालकाला बोलण्यास जात असतानाच कैलास ठोकल्याने रागाच्या भरात चाकूने आपली पत्नी अनिता ठोकळ यांच्यावर वार केले, चाकूने अनिताला भोकल्यामुळे  ती जबर जखमी झाली, व खाली पडली, हे पाहताच स्वतः कैलास ठोकळ याने दोरीने आपला गळा आवळून स्वतःचे जीवन संपवले, पत्नी मात्र जबर जखमी झाल्याने व मुलाने चंद्रकांत आरडाओरड केल्याने आसपासचे लोक जमा होऊन या जखमी महिलेला शिर्डीचे श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे, या प्रकरणाचा शिर्डी पोलिस अधिक तपास करत आहेत, लॉक डाऊन काळाची ही घटना घडल्यामुळे व सर्व शिर्डीत कडकडीत बंद असल्याने व  अशी ही घटना येथे झाल्याने शिर्डी आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना अशोक सहकारी साखर कारखान्याने ईतर कारखान्या प्रमाणे आर्थिक मदत करावी तसेच सँनिटायझर किटचे वाटप करावे अशी मागणी बाजार समितीचे संचालक सुधीर नवले व ईतर शेतकऱ्यांनी केली आहे. या बाबत प्रसिध्दीला दिलेल्या निवेदनात नवले यांनी म्हटले आहे की कोरोना मुळे परिसरातील शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले शेतात तयार झालेला भाजीपाला तसेच द्राक्ष डाळींब  कांदा गहु मका आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तयार झालेला भाजीपाला द्राक्ष टरबुज खरबुज मातीमोल भावाने विकावे लागले अशोक कारखान्याने नेहमीच परिसरातील शेतकऱ्यांना  मदत केली आहे या संकट काळात अशोक सहकारी साखर कारखान्याच्या वतीने हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात यावा शेतकऱ्यांना ईतर कारखान्या प्रमाणे आपल्याही  कारखान्याने मदत करावी अशी मागणी बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले यांनी केली आहे या निवेदनावर सुधीर नवले यांच्यासह शिवाजी पा वाबळे प्रकाश नवले ,भाऊसाहेब वाबळे ,मधुकर अनाप ,शाम चव्हाण ,कारभारी कुताळ ,नामदेव बोंबले ,गोरक्षनाथ कुर्हे ,सविता मेहेत्रे  आदिच्या सह्या आहेत.

शिर्डी। जितेश लोकचंदानी-सध्या कोरोनामुळे  सर्वत्र लॉक डाऊन सुरू आहे ,लॉक डाऊन तीन मे पर्यंत वाढवण्यात आला आहे, अशा परिस्थितीत सर्व जण घरात आहेत, त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला अन्नधान्याची गरज आहे पिवळे व केसरी शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकाना मार्फत धान्य मिळणार आहे, मिळत आहे,  मात्र  ज्यांच्याकडे कोणतीच शिधापत्रिका नाही ,आशा वंचित कुटुंबांना सुद्धा कामगार तलाठी व ग्रामसेवक यांच्यामार्फत सर्वे करून त्यांना या तीन महिन्यासाठी तरी अन्नधान्य पुरवठा रेशन दुकाना मार्फत व्हावा,अनेक लोक परराज्यातून कामगार म्हणून जिल्यात आले आहे,त्यांनाही रेशनवर धान्य मिळणे गरजेचे आहे, यासाठी कार्यवाही करावी  अशा  सूचना शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी जिल्हाधिकारी यांना केल्या आहेत,
   खासदार सदाशिव लोखंडे यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांना एका पत्राने कळविले आहे की आपण शिर्डी विधानसभा मतदारसंघात सर्व तहसीलदार गट विकास अधिकारी, पोलीस निरीक्षक ,नगरपालिका नगरपंचायत यांचे कार्यकारी अधिकारी यांच्या बैठका घेऊन रेशन दुकाना मार्फत होणारा अन्नधान्य पुरवठा सुरळीत होतो की नाही यासंबंधी  चर्चा केली असता जिल्ह्यात सर्वत्र रेशनदुकाना मार्फत अन्नधान्य पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे समजते, मात्र ज्यांना पिवळे व केशरी रेशन कार्ड नाही अशा वंचित कुटुंबांना सुद्धा या लॉक डाऊन च्या संकटसमयी अन्नधान्य मिळावे ,त्यासाठी प्रत्येक गावातील कामगार तलाठी व ग्रामसेवक यांच्यामार्फत अशा कुटुंबांचा सर्वे होऊन त्यांना पत्र देऊन रेशन धान्य दुकाना मार्फत या वंचित कुटुंबांना धान्य पुरवठा केला जावा, असे म्हटले आहे तसेच हा धान्य पुरवठा रेशन दुकाना मार्फत होताना लॉक डाऊन चे नियम पाळले जावेत कुठे रेशन दुकानात गर्दी होता कामा नये, तसेच रेशन दुकानदाराकडून या काळात जर काळाबाजार उघडकीस आला तर त्यावर कठोर कारवाई करावी, असे खासदार सदाशिव लोखंडे यांनी म्हटले आहे,
चौकट
या लॉकडाऊनच्या काळात सर्व कुटूबांना पंतप्रधान अन्नधान्य योजनेमार्फत देण्यात येणारे प्रत्येकी पाच किलो मोफत तांदूळच येथे दिले जाणार आहे, मात्र नुकतेच केंद्र शासनाचे प्रधान गृहसचिव यांनी रेशनकार्ड धारकांना मोफत पाच किलो तांदूळ किंवा गहू असे द्यावयाचे आहे, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, मुख्यमंत्र्यांनीही तसे कालच सांगितले आहे ,मात्र गाव पातळीवर त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे,ज्याला तांदूळ किंवा ज्याला गव्हू लागतील त्यांना ते दिले पाहिजे, असे शिधापत्रिकाधारक बोलत आहेत,

शिर्डी ।जितेश लोकचंदानी। निवासी संपादक
सध्या देशात, राज्यात कोरोनामुळे लॉकंडाऊन सुरू आहे, या लॉक डाऊन  काळात  गोरगरीब सर्वसामान्य व गरजूंना  मदतीचा हात म्हणून अनेक ठिकाणी  अन्नदान,  जेवण, नाश्ता  व खाद्य पदार्थांचे वाटप  केले जात आहे,  मात्र  काही ठिकाणी  वाटप करताना फोटो काढून ते सोशल मीडियावर देऊन  त्याचा मोठा प्रचार केला जातो, त्यामुळे समाज  मनावर त्याचा विपरीत परिणाम होतो  आहे ,त्यावर बंधन येणे गरजेचे  आहे, किंवा अशा जाणीवपूर्वक या गोष्टीचा फायदा घेत सोशल मीडियावर फोटो टाकून प्रचार करणाऱ्या विरोधात कारवाई करावी अशी बिंदास न्यूज ला नुकतीच बातमी येऊन गेली
,या बातमीच्या वृत्ताचा दखल जिल्हाधिकारी यांनी घेऊन त्वरित आदेश काढत जर गोरगरिबांना याकाळात अन्नदान किंवा खाद्य पदार्थाची मदत करताना कोणी फोटो सोशल मीडियावर किंवा माध्यमाला प्रसिद्ध केला तर त्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे हा बिनधास्त न्यूज या बातमीचा इफेक्ट आहे, व जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांचे नागरिकांमधून निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन होत आहे
भयंकर अशा कोरोना विषाणूमुळे  सर्व जग हादरले आहे , कोरोनाचा संसर्ग देशात  वाढू नये  ,म्हणून देशात एकविस दिवसाचा लॉक डाऊन करण्यात आला, हा 21 दिवसांचा लॉकडाऊन 14 एप्रिल ला संपत आहे, त्यानंतरही लॉकडाऊनचा कालावधी 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आला आहे, सर्वत्र अत्यावश्यक सेवा सोडून बंद आहे ,त्यामुळे अनेक जण सर्व कामकाज बंद असल्याने घरात आहेत, गोरगरीब सर्वसामान्यांना काम धंदा नसल्यामुळे आर्थिक चंणचण मोठ्या प्रमाणात भासत आहे, ग्रामीण भागात हे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे गोरगरीब व गरजूंना अन्न ,जेवण खाद्य पदार्थाचे अनेक ठिकाणी  मदत म्हणून वाटप केले जात आहे, मात्र या खाद्य पदार्थांचे वाटप करताना फोटोसेशन व हे फोटो सोशल मीडियावर टाकून प्रचार करण्याच्या प्रकार मोठ्या प्रमाणात आता घडत आहे, त्यामुळे या फोटोसेशन वर बंदी आणावी किंवा असे करणार्‍यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे,
सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉक डाऊन आहे व 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढला आहे, त्यामुळे सर्वजण कामधंदा सोडून घरात आहेत, सर्व दुकाने बंद आहेत, अशा परिस्थितीत सर्वांना आर्थिक चणचण भासत आहे ,मात्र अशा गोरगरीब सर्वसामान्य माणसांना एक माणुसकीचा हात दाखवत अनेक दानशूर व्यक्ती वेगवेगळ्या प्रकाराने या संकट समयी सर्वसामान्य व गरजूंना मदत करीत आहेत, ही  मदत वेगवेगळ्या प्रकारची आहे ,ही चांगली गोष्ट आहे, व अशा वेळी  मानवतेच्या दृष्टिकोनातून  एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे ,मात्र काहीजण अन्न, जेवण ,नाष्टा व खाद्य पदार्थांचे वाटप करताना आपले फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकत असल्याने व त्याचा प्रचार मोठ्या प्रमाणात आता होऊ लागल्याने यावर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी बातमी बिंदास न्यूजला आली होती
 राजस्थानमधील अजमेर  येथील जिल्हाधिकारी शर्मा यांनी तसे आदेश काढले असून खाद्य पदार्थांचे वाटप करताना फोटो काढून ते जर सोशल मीडियावर टाकले तर अशा व्यक्तींवर भारतीय कायद्यान्वये कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे अजमेरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे ,असेच आता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात करण्याची गरज आहे, कोरोणामुळे सध्या राज्यात मोठे संकट निर्माण झाले आहे, अशा परिस्थितीत मदत करणे, एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे आहे, मात्र असे करताना विशेषता अन्नदान करताना फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकणे योग्य नाही ,अन्नदान किंवा मदत करण्यापेक्षा अनेक जण नुसता आपला प्रचार किंवा या प्रकाराचा जास्त बाऊ करण्यामध्ये पुढे आहेत, थोडेफार नावापुरते अन्नदान किंवा खाद्य पदार्थांचे वाटप करायचे व फोटो काढून ते सोशल मेडीयावर टाकून त्याचा मोठा गवगवा करायचा, असे प्रकार आता अनेक ठिकाणी होऊ लागली आहेत ,त्यामुळे त्याचा समाजावर विपरीत परिणाम होत आहे, म्हणून यापुढे तरी प्रत्येकाने मदत करताना विशेषता अन्नदान व खाद्यपदार्थ गरजूंना वाटप करताना, लॉक डाऊन चे नियम पाळत व त्याचे फोटो सोशल मीडियावर न देता ही मदत करावी ,अन्यथा जाणीवपूर्वक फोटो काढून सोशल मीडियावर टाकल्यानंतर व ते  उघडकीस आल्यानंतर  अशा व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी बिनधास्त न्यूजमध्ये देण्यात आली होती,
 या न्यूज चा परिणाम म्हणून माननीय जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांनी त्वरित दखल घेऊन जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन काळात कोणी अन्नदान किंवा खाद्यपदार्थ वाटप केले व त्याचे फोटो कडून ते सोशल मीडिया किंवा माध्यमांना प्रसिद्धीसाठी देऊन स्वतःच्या गवगवा केला तर अशा व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येईल असा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी  आदेश काढला आहे, यामुळे आता जिल्ह्यामध्येअसे फोटो सोशल मीडियावर टाकने कमी झाल्याचे दिसून येत आहे  गरिबांना मदत करणे गरजेचे आहे, मात्र त्याचा गवगवा नको असे नागरिकांचे म्हणणे आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget