सावळीविहीर। राजेंद्र गडकरी- सध्या देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आला आहे,त्यामुळे राज्यात व राहता तालुक्यात या लॉकडाऊन मुळे अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद आहे, अशा परिस्थितीत सर्वजण घरात बसून आहेत, मात्र अश्या आपत्तिजनक परिस्थितीत गोरगरीब सर्वसामान्यांना उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर आला आहे त्यात दिव्यांग (अंध ,अपंग) नागरिकांचा प्रश्न तर गंभीर बनला आहे ,त्यामुळे अशा गरजू दिव्यांगांना मदत करण्यासाठी शिर्डी व परिसरातील काही तरुण एकत्र आले असून त्यांनी पुढाकार घेत व राहता तालुक्यातील समदृष्टी समता विकास अनुसंधान मंडळ (सक्षम) या दिव्यांग संघटनेच्या मार्गदर्शनाने राहता तालुक्यातील दिव्यांगांना राष्ट्रीय कर्तव्य म्हणून लोकवर्गणीतून साधारण दीड महिना पुरेल एवढा किराणा देण्यात येत आहे, नुकताच सावळीविहीर येथे कुमारी वर्षाताई राजेश पाचोरे यांना ही मदत करण्यात आली ,
राहता तालुक्यातील विविध दिव्यांगांना ही प्रत्येकाच्या घरी जाऊन लॉक डाऊन चे नियम पाळत सर्वांना मदत दिली जात आहे, तसेच या मदतीचा कोणताही गाजावाजा केला जात नाही तसेच कोणताही फोटो काढून प्रसिद्धीला देण्यात येत नाही, सध्या देशात, राज्यात कोरोना मुळे मोठी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा परिस्थितीत एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे, गरजू दिव्यांग बंधू-भगिनींना तर मदतीची सध्याच्या काळात मोठी गरज आहे, हे ओळखूनच आम्ही समदृष्टी क्षमता विकास अनुसंधान मंडळ (सक्षम) या दिव्यांग संघटनेच्या मार्गदर्शनातून राहता तालुक्यातील दिव्यांगांना लोकवर्गणीतून घरोघर जाऊन ही मदत या राष्ट्रीय आपत्तीमध्ये राष्ट्रीय कर्तव्य म्हणून व राष्ट्रीय भावनेतून करत आहे, त्यासाठी योगेश गोंदकर, प्रकाश गोंदकर,पंकज दुशिंग, चेतन भडांगे ,सौरभ भडांगे आदी परिश्रम घेत आहेत ,अशी माहिती सचिन भैरवकर यांनी दिली, अशा संकटसमयी दिव्यांगाना मदत करून मोठा हातभार लावतअसल्याबद्दल या तरुणांचे शिर्डी व परिसरांमधून मोठे कौतुक होत आहे
Post a Comment