Latest Post

जिवानवश्यक वस्तू विक्रेत्यांनी वस्तूंचे दरपत्रक लावावे
बुलडाणा - 15 एप्रिल
कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यात 1973 चे कलम 144 अन्वये जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील होणारी नागरिकांची गर्दी कमी करणे आवश्यक आहे.  या उपायोजनांचा एक भाग म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये तरतूदींनुसार जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी जिल्ह्यात सार्वजनिक स्थळी थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर कायम मास्क न वापरणे, दुकानदार, फळे व भाजीपाला विक्रेते, सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रेते व ग्राहक यांनी सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन न करणे, किराणा व जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांनी दरपत्रक न लावणे आदी गुन्ह्यांविषयी दंड लागू केला आहे.
         जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा सदर आदेशाची अवज्ञा करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना ही आपत्ती व्यवसथापन कायदा 2005, साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंडसंहीता कलम 188 नुसार दंडनिय कारवाईस पात्र असणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.
असे आहे दंड
सार्वजनिक स्थळी उदा. रस्ते, बाजार, रूग्णालय, कार्यालय आदी ठिकाणी थुंकणे हा गुन्हा करताना प्रथम आढळल्यास 500 रूपये दंड, दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. चेहऱ्यावर सार्वजनिक स्थळी मास्क अथवा रूमाल न वापरणे असे करताना प्रथम आढळल्यास 500 रूपये दंड व दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई होणार आहे. तसेच दुकानदार, फळे व भाजीपाला विक्रेते व ग्राहक यांनी सामाजिक अंतर न राखणे हा गुन्हा पहिल्यांदा केल्यास 500 रूपये दंड प्रति ग्राहक अथवा व्यक्ती, 1500 रूपये दंड आस्थापना मालक अथवा दुकानदार, विक्रेता यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे. तसेच दुसऱ्यांदा केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.किराणा अथवा जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांनी वस्तूंचे दरपत्रक न लावल्यास असे पहिल्यांदा आढळल्यास 5000 रूपये दंड व दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. दंडाची रक्कम ही स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस विभाग वसूल करणार आहे.

अहमदनगर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील उपाययोजना आणखी कडक करण्यात आल्या असून आता खासगी वाहनांना पूर्णत: पेट्रोलबंदी करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक किराणा सामान व दूध विक्रीचा कालावधी कमी करण्यात आला आहे. याशिवाय प्रतिबंधात्मक आदेशांना ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घेतला आहे. देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्याने सर्व आस्थापना, दुकाने बंद करण्याचे, तसेच वाहनांना रस्त्यावर प्रतिबंध करण्यात आला होता. शाळा-महाविद्यालये, सेतू केंद्र, तसेच इतर आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले होते. परंतु आता लॉकलाऊनमध्ये वाढ झाल्याने या आदेशांना आता ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील महानगरपालिका, सर्व नगरपालिका, नगरपंचायत व अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये सर्व खासगी वाहनांना प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्ह्यातील भरणारे मोठे भाजीबाजारही बंद राहतील. याशिवाय सर्व सेतू, महा- ई-सेवा केंद्र, आधार केंद्र, तसेच सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदविण्याचे कामकाज बंद राहील. ज्या नागरिकांना दाखले अत्यावश्यक आहेत त्यांनी या दाखल्याकरिता आवश्यक लागणारी कागदपत्रे स्कॅन करुन संबंधीत कार्यालयाच्या ई-मेलवर पाठविण्यात यावीत. त्यामुळे सर्व नागरिकांना आॅनलाईन पध्दतीने दाखले वितरीत करण्यात येतील.जिल्ह्यातील सर्व सरकारी शाळा, खासगी शाळा तसेच महाविद्यालय व आयुक्त, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था, अंगणवाड्या, कोचिंग क्लासेस ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेशात म्हटले आहे.

बुलडाणा - 14 एप्रिल
आज जिल्हा प्रशासनाला प्राप्त स्वेब नमुन्यात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णां मध्ये 3 रुग्ण हे मलकापूरचे असून ते यापूर्वी सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील आहेत.
तर एक रुग्ण हा बुलडाणा येथील असून तो दिल्ली वरून परतलेला असल्याची माहिती आहे.बुलडाणा जिल्ह्यातील आधीच्या कोरोना बाधित रुग्णाच्या निकट संपर्कातील 4 व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या 21 झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुमन रावत चंद्रा यांनी दिली आहे.
       मागील 4 दिवसांपासून जवळपास 50 रिपोर्ट प्रलंबीत होते ते सर्व निगेटिव्ह आले होते. परंतु परवा आणि काल जे स्वॅब नव्याने पाठविले होते, त्यांचा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. मलकापूरच्या एकुण स्वॅबपैकी नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीष रावळ कोरोना निगेटिव्ह निघालेले आहेत. शिवाय मलकपूरच्या कोरोना रुग्णाला तपासणार डॉक्टरसुद्धा निगेटिव्ह आहेत.परंतु संबंधीत कोरोना संसर्गीताच्या कुटूंबातील तीन जण पॉझिटीव्ह निघाल्याची माहिती आहे. तर बुलडाणा शहरात कोरोना संसर्गीताची एकाने वाढ झाली आहे. संबंधीत नवीन कोरोना रुग्ण जौहर नगर येथील रहिवाशी असून त्याचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला होता पण दुसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे.एकूण रुग्ण संख्या 21 वर पोचल्याने बुलडाणा जिल्हा रेड झोन ठरत असून मलकापूरसाठीही ही धोक्याची घंटा आहे. एकट्या मलकापूरमध्ये एकुण चार रुग्ण झाले आहेत.आता बुलडाणा एकुण 6 (एक मृत), मलकापूर 4, शेगांव 3, चिखली 3, खामगांव ग्रामीण (चितोडा) 2, देऊळगांवराजा 2 आणि सिंदखेडराजा 1 असे एकुण 21 जण जिल्ह्यात कोरोना बाधित.

शिर्डी। जितेश लोकचंदानी निवासी संपादक
 देशात कोरोना मुळे मोठी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, देशभर लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे, अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवा सोडून सर्व बंद आहे, दारू दुकाने व परमिटरूम, बियरबार सुद्धा बंद आहेत, मात्र काही बियरबार वाल्यांनी मोठा विनापरवाना अवैध साठा करून ठेवला असून ते दामदुपटीने विक्री करत आहेत ,
अशा बिअरशॉपी, वाईन्स, परमिटरूम यांच्यावर जिल्हा दारूबंदी व  उत्पादक शुल्क अधिकारी व पोलिसांनी  अधिक कडक पहारा सुरु केला आहे, यातूनच जिल्हा दारूबंदी व उत्पादन शुल्क पोलिसांनी गुप्त माहिती मिळताच निमगाव कोऱ्हाळे हद्दीतील आनंद बिअर शॉपी वर धाड टाकली व या शॉपी पाठीमागील बाजूस असलेल्या पत्र्याच्याशेड गोडाऊन मधून  लाखो रुपये किमतीचे बियरचे बॉक्स  होते,  ते जप्त करण्यात आले, यामुळे शिर्डी व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे, विशेष म्हणजे  या बिअर शॉपी जवळच शिर्डी पोलीस स्टेशन आहे, मात्र या पोलिस स्टेशनला या गोष्टीची काहीही खबर नसताना जिल्हा दारूबंदी व उत्पादन शुल्क पोलिसांना मात्र ह्या गोष्टीची माहिती मिळते व हे जिल्हा दारूबंदी व उत्पादन शुल्क अधिकारी व पोलिसकर्मचारी शिर्डीत येऊन या बियर शॉपी च्या गोडाऊन मध्ये धाड टाकून अवैध  साठा केलेली बियर जप्त करतात शिर्डी पोलीस स्टेशन मात्र या प्रकाराबाबत अनभिन असते, या गोष्टीबद्दल शिर्डी करांमधून मोठी उलट-सुलट चर्चा सुरू आहे, जिल्हा पोलीस कारवाई करतात मात्र शिर्डी पोलिसांना काही माहीत नाही, असे कसे होऊ शकते ।यामध्ये काहीतरी गौडबंगाल असल्याशिवाय असे होणार नाही, अशी चर्चा आता शिर्डी करांमधून होऊ लागली आहे,
 सध्या या लॉकडाऊन काळात दारू दुकाने बंद आहेत, दारू विक्री करणे, यास परवानगी नाही, मात्र काही बिअरबार वाल्यांनी ,   वाईन्स दुकानवाल्यानी,  जवळच्या गोडाउन मध्ये अवैध साठा करून बिअर, दारू या काळात दुप्पट ,तिप्पट रक्कम घेऊन विक्री केली जाते ,हे जिल्हा दारूबंदी व उत्पादन शुल्क पोलिसांना समजल्यानंतर या पोलिसांनी त्वरित कारवाई करत संशयित अशा ठिकाणी धाडी टाकल्या,  त्यात या आनंद बिअर शॉपी वर धाड टाकली असता या बिअर शॉपी च्या पाठीमागील बाजूस  पत्र्याच्या शेड गोडाउन मध्ये असलेल्या  24 लाख 39 हजार 72 रुपये किमतीचे किंगफिशर, कॅनोन, बडवायझर अशा विविध कंपन्यांच्या बियर व विविध कंपनीचे वाईन्स च्या छोट्या, मोठ्या।अश्या एकूण 964 बाटल्यांच्या बॉक्सचा  साठा करून ठेवलेला होता , तो या गोडावूनमधून जप्त करण्यात आला, व एका ट्रकमध्ये  भरून तो नगर कडे रवाना करण्यात आला, या गोडाऊन चे मालक व बिअर शॉपी चे  मालक योगेश नंदकुमार कडलक  यांच्यावर  गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली,
मा, राहुल द्विवेदी , जिल्हाधिकारी अहमदनगर, व राज्य दारूबंदी उत्पादन शुल्क विभागीय उपायुक्त प्रसादजी सुर्वे तसेच या खात्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक पराग नवलकर, कोपरगाव चे निरीक्षक घोरतळे ,निरीक्षक संजय सराफ अनिल पाटील, अजित बडदे भाऊसाहेब भोर ,निहाल शेख, राजेंद्र कदम ,विलास कंठाळे प्रवीण साळवे, पांडुरंग गदादे, आदींच्या पोलीस अधिकारी व पोलिसांच्या साह्याने या बिअर शॉपी वर धाड टाकण्यात आली व कारवाई करण्यात आली, जिल्ह्यात ही मोठी कारवाई समजली जाते ,मात्र या बिअर शॉपी पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या शिर्डी पोलीस स्टेशनला मात्र याची काहीच माहित नव्हती याबद्दल नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू आहे ,जिल्हा दारूबंदी उत्पादनशुल्क पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे शिर्डी व परिसरातून अभिनंदन होत आहे मात्र शिर्डी पोलिसांबद्दल शिर्डी करांच्या मनात आता वेगळी चर्चा ऐकायला मिळू लागली आहे , लॉकडाऊन देशात सुरू झाल्यापासून सर्व दारूधंदे बिअर शॉपी बंद आहेत, मात्र तरीही ही अनेक ठिकाणी रानात ,आडबाजूला काही लोक दारू ,बिअर घेऊन पार्टी करताना दिसतात, जर सर्वत्र दारूधंदे बिअर शॉपी, वाईन्स बंद आहेत, मग हे दारु, बियर या लोकांना कुठून मिळते ।हा प्रश्न मोठा असून अशा परवानगी नसतानाही साठा करून ठेवलेल्या बियर व विविध प्रकारच्या दारू च्या बाटल्या हे दारूविक्रीते, मालक दुप्पट ,तिप्पट रक्कम घेऊन लोकांना गुपचूपपणे विकतात, असा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी हा प्रकार सध्या गुपचुपपणे सुरू असून त्यावर जिल्हाधिकारी व जिल्हा  पोलीस अधीक्षक यांनी विशेष लक्ष घालण्याची गरज असल्याचे नागरिक बोलत आहेत,
 लॉक डाऊन काळात लोकांना ताज्या भाज्या अनेक अत्यावश्यक गोष्टी मिळत नाही, तरी सर्व सामान्य माणूस कोरोणाचा मुकाबला करण्यासाठी लॉक डाऊन चे नियम पाळत घरात आहेत ,मात्र काही लोक या लॉक डाऊन चा नियम तोडून दारू, बियर गुपचुप दाम दुप्पट पैसा कमवण्यासाठी विक्री करत आहेत व काही लोक हे बिअर किंवा दारू दाम दुप्पट रक्कम देऊन आडबाजूला किंवा निवांत स्थळी ,आड बाजूला जाऊ पर्टी करतात, हे चुकीचे असून यावर यावर आता अधिक लक्ष देणे गरजेचे आहे, जिल्हा दारूबंदी व व उत्पादन शुल्क पोलिसांनी अधिकाऱ्यांनी जिल्ह्याभर अशी मोहीम सुरू केली आहे  शिर्डीत या जिल्हा पोलिसांनी आनंद बिअर शॉपीवर धाड टाकून हे सिद्ध केले आहे हे मात्र हाकेच्या अंतरावर असणारे शिर्डी पोलीस स्टेशन व येथील पोलिस अधिकारी कर्मचारी यांना या गोष्टीबद्दल किंवा या प्रकाराबद्दल काहीच माहित नाही, हे विशेष आहे ,यात काहीतरी गौडबंगाल असल्याचे शिर्डीकर बोलताहेत ,इतर वेळी असे प्रकार सर्रास सुरूच असतात, मात्र सध्या देश तर भयानक परिस्थितीतून जात असताना व  लॉकडाऊनची परिस्थिती येथे असताना हे सर्व नियम पायदळी तुडवून जर असा प्रकार येथे होत असेल तर मग शिर्डी पोलीस काय करत आहेत, असा सवाल शिर्डी करांमधून आता उपस्थित होत आहे,

चौकट
शिर्डी व परिसरात विविध कंपन्यांचे गुटखा अवैधरित्या साठा करून काही व्यापा-यांनी ठेवला असून या गुटखा विक्रेते व व्यापारी यांचीही पोलिसांनी गुप्त माहिती काढून शोध लावून या अवैध गुटखा साठा करणाऱ्या होलसेल व किरकोळ गुटखा व्यापारी यावर धाडी टाकाव्या व कडक कारवाई करावी,
 राज्यात गुटखा बंदी असताना येथे गुटखा विकला जातो, सध्या तर लॉक डाऊन आहे, इतर राज्यातून चोरून येणारा गुटखा बंद आहे, मात्र अवैध करून ठेवलेला त्यांचा साठा अद्यापही जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहे, त्यामुळेच तिप्पट ,चार पट रक्कम घेऊन विविध कंपन्यांचे गुटखे येथे विकले जातात ,गुपचूपपणे या गुटख्याची विक्री होत आहे, शिर्डी परिसरातही चुपचाप पणे गुटके मिळतात, हे गुटखे कुठून आले व यांचा साठा कोठे आहे ।कोण होलसेल विक्रेते आहे यांची गुप्त माहिती काढून धाडी टाकून अशांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे ,असे आता शिर्डी करांमधून बोलले जात आहे व जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार हे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत ते नक्कीच या गोष्टीकडे लक्ष देतील असे शिर्डीकर यांचे मत आहे,

सावळीविहीर। राजेंद्र गडकरी।            
सावळीविहीर व परिसरात भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली,
  सध्या देशात ,राज्यात  कोरोनामुळे मोठी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे, एकविस दिवसाचा आज लॉकडाऊन संपत असला तरी परत तीन मे पर्यंत हा लॉक डाऊन वाढवण्यात आला आहे, अशा लॉक डाऊन च्या काळात भारतरत्न डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांची  129 वी जयंती आज आली असल्याने येथे या।काळात लॉकडाऊनचे नियम पाळत प्रत्येकाने ही जयंती आप आपल्या घरात साजरी केली, व या महामानवाला अभिवादन करण्यात आले ,
अनेकांनी आपल्या घरावर निळ्या गुढी उभारून व घरातल्या घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करून या महामानवला अभिवादन केले, तसेच येथील जी,प, शाळेजवळील डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपूर्णकृती  पुतळ्याला ग्रामपंचायत च्या वतीने लॉक डाऊन चे नियम पाळत व सोशल डिंस्टन्स ठेवत ,बाळासाहेब जपे, संतोष आगलावे, सोपान पवार ,अनिल वाघमारे,  सुरेश वाघमारे, आदींनी पुष्पहार अर्पण करत साध्या पद्धतीने जयंती साजरी केली ,या परिसरात डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपूर्णाकृती पुतळ्याजवळ व परिसरात हारांनी सजावट करण्यात आली होती , लॉकडॉऊन काळात ही  जयंती आल्यामुळे सर्वत्र साध्या पद्धतीने व दरवर्षीपेक्षा यावर्षी मिरवणूक किंवा मोठा गाजावाजा न करता सर्वांनी आपापल्या घरात राहून ही जयंती साजरी केली, सावळीविहीर येथे  कालच एका रिक्षांमधून स्पीकरवर गावामध्ये विश्वरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कोणीही मोठ्या संख्येने घराबाहेर पडू नये, प्रत्येकाने आपापल्या घरी डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी ,लॉक डाऊन चे नियम पाळावेत, दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या, त्या सूचनेप्रमाणे आज सर्वांनी आपल्या घरातच डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली ,
तसेच बुद्धविहारांमध्ये बौद्धाचार्य गौतम गोडगे ,सुशिल पवार, अशोक जाधव, आदींनी आपल्या तोंडाला मास्क बांधून व सोशल डिस्टंन्स पाळत गर्दी न करता, डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून साध्या पद्धतीने जयंती साजरी केली ,तसेच नुकतीच गेल्या शनिवारी महात्मा ज्योतिराव फुले जयंती होती, त्यानिमित्त बुद्धविहार येथे श्री महात्मा ज्योतिराव फुले यांनाही त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून ही जयंती साजरी करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले होते,     महामानव विश्वरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त  गरजूंना या लॉक डाऊन काळात हातभार लागावा म्हणून आपापल्या परीने मदत करण्यात आली, कोठेही लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले नाही,
सावळीविहीर परिसरातील निमगाव, निघोज, सावळीविहिर खुर्द, रुई, कोहकी ,अशा  गावांमध्येही या लॉकडाऊन काळात साध्या पद्धतीने व घराघरात डॉ, बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली, व अभिवादन करण्यात आले.

अहमदनगर (प्रतिनिधी) कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागात राहणारी महिला कोरोनाशी झुंज देत असताना अखेर मंगळवारी पहाटे तिने अखेरचा श्‍वास घेतला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी याबाबत माहिती दिली. यामुळे जिल्ह्यातील दोघांचा कोरोमुळे बळी गेला आहे. तर जिल्ह्यात उपचार घेणारी पहिली व्यक्ती मृत्यूमुखी पडली आहे.मागील आठवड्यात श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धन येथील एका तरूणाला कोरोनामुळे जीव गमवावा लागला. आता या महिलेच्या मृत्यूमुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 28 जणांना लागण झाली आहे. गेल्या शुक्रवारी कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागातील या 60 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली असल्याचे आढळून आले होते. त्या आधीच तिला ग्रामीण रुग्णालयात न्यूमोनियाची उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आल्यानंतर या महिलेस नगर येथील बूथ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी तिला जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज सकाळी जिल्हा रुग्णालयातील महिलेचा मृत्यू .

श्रीरामपूर : नेवासा येथे सोमवारी एक कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आला. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या श्रीरामपूर शहरातील नऊ जणांना नगर येथील सिव्हिल रुग्णालयात दुपारी हलविण्यात आले. संबंधित कोरोनाग्रस्त रुग्णाची तपासणी करणारे दोन जण हे वैद्यकीय क्षेत्रातील असल्याने श्रीरामपूरमध्ये एकच धास्ती निर्माण झाली आहे.नगर जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नगर शहरानंतर जिल्ह्यातील नेवासे, संगमनेर, राहता, कोपरगाव व श्रीरामपूर तालुक्यात रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात ग्रामीण भागातही एका रुग्णाचा कोरोनाच्या संसगार्मुळे पुणे येथील ससून रुग्णालयात मृत्यू झाला होता.नेवासे येथे सोमवारी एक रुग्ण मिळून आला. सोमवारी त्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला. मात्र या रुग्णाचा श्रीरामपूर येथील नऊ जणांशी संपर्क झाल्याची माहिती आहे. खोकला आल्यामुळे या रुग्णाने शुक्रवार व शनिवार या दोन दिवशी श्रीरामपूर येथे दोन वैद्यकीत तज्ज्ञांकडून तपासणी करून घेतल्याची माहिती आहे. त्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या त्या दोघांसह नऊ जणांना नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget