सावळीविहीर। राजेंद्र गडकरी।
सावळीविहीर व परिसरात भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली,
सध्या देशात ,राज्यात कोरोनामुळे मोठी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे, एकविस दिवसाचा आज लॉकडाऊन संपत असला तरी परत तीन मे पर्यंत हा लॉक डाऊन वाढवण्यात आला आहे, अशा लॉक डाऊन च्या काळात भारतरत्न डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती आज आली असल्याने येथे या।काळात लॉकडाऊनचे नियम पाळत प्रत्येकाने ही जयंती आप आपल्या घरात साजरी केली, व या महामानवाला अभिवादन करण्यात आले ,
अनेकांनी आपल्या घरावर निळ्या गुढी उभारून व घरातल्या घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करून या महामानवला अभिवादन केले, तसेच येथील जी,प, शाळेजवळील डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपूर्णकृती पुतळ्याला ग्रामपंचायत च्या वतीने लॉक डाऊन चे नियम पाळत व सोशल डिंस्टन्स ठेवत ,बाळासाहेब जपे, संतोष आगलावे, सोपान पवार ,अनिल वाघमारे, सुरेश वाघमारे, आदींनी पुष्पहार अर्पण करत साध्या पद्धतीने जयंती साजरी केली ,या परिसरात डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपूर्णाकृती पुतळ्याजवळ व परिसरात हारांनी सजावट करण्यात आली होती , लॉकडॉऊन काळात ही जयंती आल्यामुळे सर्वत्र साध्या पद्धतीने व दरवर्षीपेक्षा यावर्षी मिरवणूक किंवा मोठा गाजावाजा न करता सर्वांनी आपापल्या घरात राहून ही जयंती साजरी केली, सावळीविहीर येथे कालच एका रिक्षांमधून स्पीकरवर गावामध्ये विश्वरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कोणीही मोठ्या संख्येने घराबाहेर पडू नये, प्रत्येकाने आपापल्या घरी डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी ,लॉक डाऊन चे नियम पाळावेत, दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या, त्या सूचनेप्रमाणे आज सर्वांनी आपल्या घरातच डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली ,
तसेच बुद्धविहारांमध्ये बौद्धाचार्य गौतम गोडगे ,सुशिल पवार, अशोक जाधव, आदींनी आपल्या तोंडाला मास्क बांधून व सोशल डिस्टंन्स पाळत गर्दी न करता, डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून साध्या पद्धतीने जयंती साजरी केली ,तसेच नुकतीच गेल्या शनिवारी महात्मा ज्योतिराव फुले जयंती होती, त्यानिमित्त बुद्धविहार येथे श्री महात्मा ज्योतिराव फुले यांनाही त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून ही जयंती साजरी करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले होते, महामानव विश्वरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गरजूंना या लॉक डाऊन काळात हातभार लागावा म्हणून आपापल्या परीने मदत करण्यात आली, कोठेही लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले नाही,
सावळीविहीर परिसरातील निमगाव, निघोज, सावळीविहिर खुर्द, रुई, कोहकी ,अशा गावांमध्येही या लॉकडाऊन काळात साध्या पद्धतीने व घराघरात डॉ, बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली, व अभिवादन करण्यात आले.
Post a Comment