Latest Post

श्रीरामपूर  ( प्रतिनिधी  )-मोबाईलवरील व्हाँटसअप वर चुकीचा संदेश पसरवुन दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करणार्या  मनोज चिंतामणी याच्या विरुध्द श्रीरामपूर  तालुक्यात  पहीला गुन्हा दाखल झाला  आहे         या बाबतची फिर्याद श्रीरामपूर  येथील अँड . समिन अजिज बागवान वय- 35,धंदा-वकिली रा.संजय हौसिंग सोसायटी संजय नगर,वॉर्ड नं-2,श्रीरामपूर जि-अहमदनगर यांनी दिली असुन त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की
मी वरील ठिकाणी आई,वडील,पत्नी व मुलासह राहत असून वकिली व्यवसाय करून उपजीविका भागवितो.मी माझा मोबाईल नंबर  आज सकाळी 10:15 वा चे सुमारास नेट चालू केले असता श्रीरामपूर विचार मंच या ग्रुप वरील मेसेजेस बघत असता मनोज चिंतामणी यांनी त्यांचे मोबाईल . वरुन एक पोस्ट फॉरवर्ड केल्याचे माझ्या वाचनात आले सदर ग्रुप मधे 220  विविध धर्माचे सदस्य आहेत  सदर ग्रुप वर केवळ एका  धर्मा बद्दल चुकीचा व  लोकांची बदनामी  होईल तसेच  दोन समाजात  तेढ़ निर्माण  होईल असा मजकुर पाठविण्यात आला होता 
 त्यामध्ये सर्वाना विनंती करण्यात आलेली होती की 'आपल्या गल्लीत टरबूज,खरबूज,अंगुर,कांदे, बटाटे, लसूण,अद्रक,भाजीपाला साठी टेम्पो किंवा गाडी घेऊन काही लोक येत आहेत. कृपया त्यांच्या कडून काही खरेदी करू नका.असा चुकिचा सदेश प्रसारित केला होता
या आणि अशा आशयाचा अन्य मजकुर असणार्या  या  मेसेजमुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते असे मला वाटते, तसेच ' ठराविक लोकांकडून भाजीपाला,तसेच कसलाही माल विकत घेऊ नका. तसे केल्यास..तुम्ही तुमचा मृत्यू विकत घेत आहात हे  लक्षात ठेवा' अशा आशयाचा मेसेज मनोज चिंतामणी या व्यक्तीने काल  ग्रुप वर फॉरवर्ड केलेला होता,
तरी माझी सदरील व्यक्ती नामे मनोज चिंतामणी या विरुद्ध कायदेशीर
भा द वी कलम 295आ नुसार फिर्याद आहे अँड समिन बागवान यांच्या फिर्यादी वरुन पोलीसांनी मनोज चिंतामणी यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला असुन कोरोनाच्या पार्श्वभुमीवर चुकीचे गैरसमज पसारविणारे संदेश पसरवु नये असे अवाहन केले जात असताना देखील अनेक फेक मेसेज संध्या व्हायरल होताना दिसत आहे  या फेक मेसेजमुळे  समाजात तेढ निर्माण होण्याची दाढ शक्यता असते  या बाबत श्रीरामपूर तालुक्यात पहीलाच गुन्हा दाखल झाल्यामुळे झटपट चुकीचे मेसेज पाठविणार्यांना एक प्रकारे चपराकच बसली आहे

शिर्डी - निवासी संपादक। जितेश लोक चंदानी।।  श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असून अशा देशातील प्रसिद्ध असणाऱ्या या शिर्डी तीर्थक्षेत्राच्या शहरात व परिसरात सध्या अवैद्य धंदे यांनी मोठा जोर पकडला आहे, सध्या कोरोना मुळे सर्वत्र लॉक डाऊनआहे, त्यामुळे सर्व अधिकृत दारूधंदे बंद असताना शिर्डी व परिसरात व जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनधिकृत दारूधंदे मात्र जोरात सुरू आहे, जर लॉकडाऊन च्या काळात अशी परिस्थिती जिल्ह्यात असेल तर मग इतर वेळी कशी परिस्थिती असणार ।याची साधी कल्पनाही करवत नाही, त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याला नवीन आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक अखीलेश कुमार सिंह यांच्यापुढे या अवैध धंद्यांना आळा घालण्याचे मोठे   आव्हान आहे.

अखिलेश कुमार हे मुंबई येथे पोलीस उपायुक्त होते, ते आयपीएस असून एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे ते नक्कीच या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन जिल्ह्यात तसेच प्रसिद्ध अशा शिर्डी व परिसरात असणारे अवैद्य धंदे यांना आळा
 घालतील व लवकर या अवैध धंदे यांचा बंदोबस्त करतील ,अशी शिर्डीकर व साई भक्तांना  अपेक्षा  आहे,
  । अहमदनगर जिल्हा राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा असा जिल्हा आहे ,राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रात हा जिल्हा राज्यात आघाडीवर आहे, मात्र तसा तो अवैध धंद्यातही आघाडीवर चालला आहे ,येथे  वाळू तस्करी ,अवैध दारू ,मटका, जुगार ,चोऱ्या ,मोठ्या प्रमाणात होत असतात व सारख्या सुरू आहेत ,सध्या जिल्ह्यात पोलीस अधीक्षक ईशू सिंधू हे लंडनला गेल्यामुळे येथे  प्रभारी पोलीस अधीक्षक पाटील साहेब होते, त्यांनी आपल्या परीने या अवैध धंद्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला, आता तर कर्तव्यदक्ष असे आयपीएस असणारे व मुंबईला चोख कर्तव्य बजावणारे प्रसिद्ध असे अखिलेश कुमार सिंह हे अहमदनगर जिल्ह्याला पोलीस अधीक्षक म्हणून लाभले आहेत, त्यामुळे जिल्ह्यावासियांना  त्यांच्याकडून अधिक अपेक्षा वाढली आहे ,जिल्ह्याप्रमाणे शिर्डी व परिसरात सध्या कोरोनामुळे लॉक डाऊन असल्याने सर्व बंद आहे ,अत्यावश्यक सेवा सोडता सर्व काही ठप्प आहे, सर्व अधिकृत परमिट रूम ,वाईन्स देशी दारू दुकाने बंद आहेत ,मात्र अनधिकृत दारू अड्डे मात्र सर्रास खेडोपाडी व शहरात गल्लोगल्ली चुपचाप पणे सुरु असून दामदुप्पट किमतीला दारू विक्री होत आहे ,लॉक डाऊन काळात संचारबंदी असतानाही जर असे घडत असेल तर संचारबंदी नसताना ,इतर वेळी या अवैध धंद्यांना मोठा ऊत येतो ,अवैध धंद्यातून मोठी कमाई करायची व गुंडगिरी करायची असा प्रकार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे, जिल्हा प्रमाणेच शिर्डी व परिसरात अवैध दारू, मटका, जुगार ,पाकीटमारी ,चोऱ्या तसेच मोटरसायकल चोरी, सोनसाखळ्या ओरबाडणे, रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या मालवाहतुक वाहने आडवून लुटणे ,असे प्रकार सुरू असतात, लॉकडाऊन काळात याला थोडा पायबंद बसला असला तरी कालच रात्री राहता शहरातील गजबजलेल्या ठिकाणी असणारे देशी दारूचे दुकान रात्री चोरट्यांनी फोडले, जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे स्वागत या चोरीने चोरट्यांनी केले आहे की काय असा प्रश्न नागरिकांना पडत आहे, त्यामुळे कर्तव्यदक्ष असणारे व नव्याने जिल्ह्याला मिळालेले पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी या जिल्ह्यात विशेषत शिर्डी व परिसरात विशेष लक्ष घालून येथील अवैध धंदे दारू ,मटका, जुगार, पाकीटमारी ,चैंनस्नेकींग,माल ट्रक लुटणे, चोऱ्या,अश्या प्रकारांना आळा घालावा व अवैध धंदे करणारे व त्यांना सपोर्ट करणारे यांचाही बंदोबस्त करावा, अशी मागणी जिल्ह्यासह शिर्डी कर व साई भक्तांन मधून होत आहे. 

राहाता (तालुका प्रतिनिधी)  राहाता शहरात मोकाट हिंडणार्‍या टोळक्यांचा बंदोबस्त करण्यासाठी राहाता पोलिसांच्या मदतीला शिघ्रकृती दलाची गाडी दाखल झाल्याने अनेकांनी त्याचा धसका घेतला आहे. तर पालिकेने शहरातील अनेक रस्ते बॅरिगेट लावून बंद केल्याने प्रथमच शहराचे रस्ते निर्मनुष्य दिसून आले.सर्वत्र लॉकडाऊन केले असताना राहाता शहरातील नागरीक मोठ्या संख्येने रस्त्यावर दिसत होते. पोलिसांना पाहून रस्ते बदलत होते. विना कामाचे टोळके मनसोक्त फिरताना दिसत होते. अपुर्‍या संख्याबळामुळे पोलिसांवरही मोठा ताण पडत होता. सदर बाब उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांना कळताच त्यांनी शनिवारी शिर्डी येथे कार्यरत असलेली शिघ्र कृती दलाची गाडीच शहरात तैनात करताच अनेकांना त्यांचा प्रसाद मिळाल्याने मोकाट फिरणार्‍यांनी घरचा रस्ता धरला. या तुकडीबरोबर पोलीस निरीक्षक सुभाष भोये, व सहा. पोलीस निरीक्षक श्री. कंडारे हे स्वतः गस्तीवर आहेत.मोकाट व बिगर कामाचे फिरणार्‍यांना आळा घालण्यासाठी राहाता पालिकेनेही कंबर कसली असून शहरातील कोपरगाव नाका ते शनी चौक रस्ता, पिंपळस रस्ता, शिवाजी चौकातील चितळी रस्त्याची एक बाजू, राबियानगर रस्ता तसेच बाजारतळ ते साकुरी रस्ता हे प्रमुख वर्दळीचे रस्ते पालिकेने बॅरिगेट लावून काही दिवसांसाठी बंद करण्यात आले. यामुळे गर्दी कमी होणार आहे.किराणा दुकानदारही सहकार्यासाठी पुढे आले असून किराणाच्या नावाखाली नागरीक रस्त्यावर येत होते. किराणा संघटनेने सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंतच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने आणखी मदत झाली.त्याचप्रमाणे सर्वच परीसरात भाजी विक्रेत्यांचे जथ्थेच्या जथ्थे दिसून येतात. त्यांनाही पालिकेने विशिष्ट वेळ द्यावी. तेही दिवसाआड दिल्यास रोज भाजी खरेदी करायला येणार्‍यांवर आळा बसून लॉकडाऊनला मदत होईल.
लॉकडाऊनबाबत तहसीलदार, गटविकास अधिकारी व पोलीस अधिकारी यांनी एकत्र येऊन तालुक्यात कडक लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला. स्वतः तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, व पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांनी दोन तास राहाता शहरातील मुख्य रस्त्यावर थांबून त्यांनी परिस्थीती जाणून घेत कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या. 

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव परिसरात एका फार्म हाऊसवर गोळीबार करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दोन परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. यातील काही आरोपींना अटक करण्यात आली आहे.शहरातील वॉर्ड नंबर 1 मधील दशमेशनगर येथील अमरप्रीतसिंग सरबजितसिंग सेठी यांनी दिलेल्या पहिल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तालुक्यातील खैरी निमगाव येथे शुक्रवारी रात्री मी शेतावर असताना अविनाश माकोणे, सागर धुमाळ व इतर अनोळखी तीन जण कारमध्ये तेथे आले. त्यांनी माझ्याकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. मी पैसे द्यायला नकार दिला. त्यावर त्यांनी कृष्णा सतिश दायमा व मला लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच सागर धुमाळ याने आपल्या जवळील बंदूक काढून मला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडली. परंतु मी त्याचा हात वर केल्याने कुणालाही गोळी लागली नाही.या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात अविनाश माकोणे, सागर धुमाळ व इतर तीन अनोळखी साथीदार या संशयितांविरुद्ध गु. र. नं. 96/2020 नुसार भादंवि. कलम 307, 324 तसेच आर्म अ‍ॅक्ट 3/27 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर दुसर्‍या फिर्यादीत सागर विजय धुमाळ यांनी म्हटले आहे की, मी व माझे मित्र अविनाश माकोणे, महेश बोरुडे, अंकुश देठे, प्रमोद कांबळे आम्ही सर्व शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास हॅपी सेठी याच्या फार्महाऊसवर गेलो होतो. तेथे मागील भांडणाच्या कारणावरून बोरुडे याच्या पोटाला सेठी याने चाकू मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता हॅपी सेठी याने व त्याच्या साथीदारांनी मला लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात माझ्या डाव्या हाताच्या बोटास दुखापत झाली आहे.त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सेठी व त्याचे साथीदार या संशयित आरोपींविरोधात गु. र. नं. 97/2020 नुसार भादंवि. कलम 307, 324, आर्म अ‍ॅक्ट 4/25 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्हीही गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक मसूद खान यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 प्रभागामधे जवळपास १२०० कुटंबाना (५००० माणसे)आहेत त्यामध्ये बहुतांश सामाजिक व आर्थिदृष्टया मागास आहेत, अनेक लोक बांधकाम क्षेत्रातील मजूर वर्ग आहे.  दि. ०१/०४/२०२० ते १०/०४/२०२० कालावधीत एक टाईम चे अन्न पाकिटे वाटप श्री दीपक बाळासाहेब चव्हाण, नगरसेवक प्रभाग १४, सौ वैशाली दीपक चव्हाण नगरसेविका प्रभाग १३ यांच्या व सहकारी मित्र संघटना यांच्या मार्फत करत आहे . लॉकडाऊन मुले उद्भवलेल्या या अडचणी च्या काळात नागरिकांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे. अन्न तयार करण्यासाठी प्रशस्त जागी मोठा मंडप उभारून तेथे दररोज नगरपालिकेच्या माध्यमातून निर्जंतकीकरण केले जाते. अन्न तयार करून त्यांचे पॅकिंग करण्यासाठी जवळपास ३०
स्वयंसेवकांची टीम तयार करण्यात आली आहे. डॉकटर च्या मार्गदर्शनानुसार त्यांना प्रत्येकी दोन कापडी मास्क, सानिटायझर देण्यात आले आहे. स्वयंपाक करताना सर्व स्वयंसेवक मधे योग्य अंतर ठेवन्यात येते. तयार झालेले अन्न हे फुडग्रेड फॉइल बॅग मधे पॅकिंग करण्यात येते.
                 दोन्ही प्रभाग मधे लोकसंख्या नुसार ११ भाग करण्यात आले आहेत. प्रत्येक भागातील प्रमुख कार्यकर्त्यां वर वाटपाची जबाबदारी देण्यात आली आहे. अन्न पाकिटे प्रत्येक प्रभागात पोहचवून तेथील स्वयंसेवक ही पाकिटे घरोघरी गरजू व्यक्ती पर्यंत पोहचवत आहे. सदर पाकिटे पोहचविताने योग्य ती आरोग्य काळजी हे स्वयंसेवक घेत आहे.
               
या संकटाच्या काळात नागरिकां साठी आपण काहीतरी केले पाहिजे या विचाराने हा अन्न पाकिटे वाटप कार्यक्रम करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी येथील साई अनुज केटरर्स चे अल्पेश झुरंगे यांनी मोफत अचारी सेवा देत आहे. पूर्ण मंडप व्यवस्था ही शाकीर भाई ही मोफत उपलब्ध करून दिली आहे. नगरपरिषद व ग्रामीण रुग्णालय यांचे सहकार्य लाभले आहे. भागातील खालसा ग्रुप , शिव सर्कल मित्र मंडळ, जयसेवा ग्रुप, जय बजरंग जय वडार ग्रुप, ओन्ली बजरंग ग्रुप, साई श्रद्धा मित्र मंडळ, अक्षय कॉर्नर मित्र मंडळ, सह्याद्री मित्र मंडळ, सहारा ग्रुप, सिधदीविनायक ग्रुप, श्रीराम मंडळ, जगदंबा प्रतिष्ठान, पावन गणपती मित्र मंडळ  यांचे विशेष सहकार्य मिळत आहे.

जनसेवा पतसंस्थेकडून पंतप्रधान निधीसाठी पाच लाखांची मदत ; संस्थेला ६७ लाखांचा नफा बेलापूर(वार्ताहर)* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील अग्रगण्य जनसेवा पतसंस्थेच्या वतीने "पंतप्रधान केअर फंडात" पाच लाख रुपयांचा निधी जमा केला आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुवालाल लुंकड यांनी दिली.
समाजाचा पैसा हा समाज आणि समृद्ध राष्ट्राच्या हितासाठी उपयोगात यावा या उदात्त हेतूने आजवर संस्थेने सतत सामाजिक व राष्ट्रीय कार्यासाठी मदतीचा हात देत पुढाकार घेतला आहे. यावेळीही ही परंपरा संस्थेने कायम ठेवली आहे.याचा संस्थेला आनंद व अभिमान आहे,असेही त्यांनी लुंकड यांनी सांगितले.
येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेचा  पाच लाखांचा  धनादेश संस्थेचे अध्यक्ष सुवालाल लुंकड व उपाध्यक्ष सुभाषचंद्र राठी यांच्या हस्ते  शाखाधिकारी विजयकुमार मंडल, लेखाधिकारी किशोर कुलकर्णी व रोखपाल दत्तात्रय काशीद यांच्याकडे पत्रकार प्रा. ज्ञानेश गवले व प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड यांच्या प्रमुख उपस्थितीत पंतप्रधान केअर फंड खात्यात जमा करण्यासाठी सुपूर्द करण्यात आला.
यावेळी संस्थेचे संचालक प्रकाशचंद्र कोठारी, प्रवीण लुंकड,अमित लुंकड, योगेश कोठारी, दीपक वैष्णव, संचालिका सौ. नंदाताई खंडागळे, सौ. सुवर्णा मुंडलिक,सल्लागार सुरेशचंद्र बाठिया, सचिन कोठारी, बन्सीकाका तागड ,सम्यक लुंकड ,व्यवस्थापक राहुल दायमा, फिरोज पठाण आदी  उपस्थित होते.
राष्ट्रसंत गोविंद देव गिरीजी यांच्या उपदेशानुसार सतत सामाजिक व राष्ट्रीय कार्यात अग्रेसर असलेल्या  गावपातळीवर काम करणाऱ्या जनसेवा पतसंस्थेचा आदर्श घेऊन सहकाराचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यातील अन्य संस्थांनीही या राष्ट्रीय आपत्तीत सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते हेरंब औटी यांनी केले आहे.
 संस्थेला गत आर्थिक वर्षी ६७ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असुन २२ कोटींच्या वर ठेवी ,१२ कोटींचे कर्जवितरण आणि १५ कोटी७३ लाखांची संस्थेने गुंतवणूक केली आहे
तसेच ४४ लाख ३७ हजारांची एन. पी. ए.तरतुद केली आहे.संस्थेने पारदर्शी कार्यातून  प्रगतीचा आलेख यंदाही कायम राखला आहे.

सावळीविहिर।। राजेंद्र गडकरी।।      साथीचे रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये व कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सध्या गावागावात जंत नाशक फवारणी सुरू आहे ,त्याच धर्तीवर सावळीविहीर येथे पुन्हा एकदा गावात जंतनाशक फवारणी करण्यात येत आहे,
   येथील सर्व सार्वजनिक ठिकाणा प्रमाणे शाळा व विशेष म्हणजे सर्व मंदिरे व  सभामंडप परिसरातही ही जंतनाशक फवारणी करण्यात आली आहे,   काही दिवसांपूर्वी येथे ग्रामपंचायतीमार्फत गावात फवारणी करण्यात आली होती व आता प्रवरा तर्फे ही फवारणी करण्यात येत असून त्यासाठी सावळीविहीर येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभत आहे,
    । सध्या देशात कोरोनाने  हाहाकार उडाला आहे ,त्यामुळे देशभर मोठे आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण सापडत आहे, शहरापासून ग्रामीण भागापर्यंत हे लोन पसरत चालले आहे ,त्यामुळे आता ग्रामीण भागातही मोठी दक्षता घेण्यात येत आहे, त्याचाच भाग म्हणून गावागावात जंतनाशक फवारणी करण्यात येत आहे, सावळीविहीर येथेही ही गेल्या आठवड्यात ग्रामपंचायतीमार्फत जंतनाशक फवारणी करण्यात आली होती ,आता प्रवरा तर्फे ही दुसऱ्यादां गावात फवारणी होत आहे, या जंतनाशक फवारणीसाठी ग्रामपंचायत चे सरपंच सौ, रुपाली संतोष आगलावे, उपसरपंच सौ वृषाली ओमेश जपे , सर्व सदस्य, तसेच या जनता फवारणीसाठी चंद्रकांत जपे ,विनोद भोसले व ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामसेवक खर्डे यांचे मोठे सहकार्य लाभत आहे,
   हि जंतनाशक फवारणी सावळीविहीर गावा प्रमाणे सावळीविहीर वाडी ,लक्ष्मीवाडी, कारवाडी व वस्त्यांवर तसेच खाणीवरील वसाहत ,इंदिरानगर, लक्ष्मी नगर वसाहत मध्ये गल्लोगल्ली जाऊन करण्यात यावी, अशी येथील नागरिकांनी मागणी केली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget