Latest Post

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा वेळापत्रकानुसार दिनांक ०३ मार्च ते २३ मार्च २०२० पर्यंत मंडळामार्फत आयोजित करण्यात आली आहे. त्यातील दिनांक २१ मार्च २०२० अखेरची लेखी परीक्षा संपन्न झालेली आहे. मात्र राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत खबरदारी  घेण्यासाठी राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालये यांना दिनांक ३१ मार्च, २०२० पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण व किडा विभाग,मंत्रालय, मुंबई-३२ यांनी जाहिर केल्यानुसार सोमवार, दिनांक २३ मार्च २०२० रोजी सकाळी ११.०० ते १.०० यावेळी आयोजित करण्यात आलेली  सामाजिक शास्त्रे, पेपर-२ (भूगोल) या विषयाची लेखी परीक्षा व त्यापुढील
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली कार्यशिक्षण विषयांची परीक्षा, आऊट ऑफ टर्नच्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात येत आहेत.सदर परीक्षांबाबतचे सुधारित नियोजन मंडळामार्फत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे.

श्रीरामपूर  बेलापूर  ( प्रतिनिधी  )- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या अवाहनाला श्रीरामपूर तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असुन रस्ते ओस पडले होते पोलीस महसुल कर्मचार्या व्यतिरीक्त कुणीही रस्त्यावर फिरकताना दिसत नव्हते कोरोनाचा फैलाव होवू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजीनी जनता कर्फ्यूची घोषणा केली होती श्रीरामपूर  शहर बेलापूर  व परिसरात सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता नेहमीच वाहने नागरीकांच्या गर्दीने फुलुन जाणारे
रस्ते ओस पडले होते सर्वत्र शांतता व शुकशुकाट जाणवत होते सर्वाच्या आयुष्यातील हा पहीलाच क्षण असेल ज्या दिवशी शभंर टक्के नागरीकांनी पंतप्रधान मोदीजीचे आदेश पाळत स्वतःला घरात डांबुन घेतले बेलापूरातही जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे काँ .निखील तमनर बाळासाहेब गुंजाळ पोपट भोईटे आदिनी सकाळ पासुनच बेलापूर गाव व परिसरात गस्त सुरु ठेवली गावातील रस्त्यावर पोलीसा
व्यतिरिक्त कुणीही दिसत नव्हते  सर्व दुकाने हाँटेल्स बंद असताना पोलीस मात्र कशाचीही पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत होते याची जाण ठेवुन बेलापूरातील पत्रकारांच्या वातीने पोलीसांना नाष्टा व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती उपविभागीय अधिकारी अनिल पवार तहसीलदार प्रशांत पाटील डी वाय एस पी राहुल मदने पोलीस निरीक्षक  श्रीहरी बहीरट हे आपल्या ताफ्यासह गस्त घालत होते

अहमदनगर (प्रतिनिधी )-दिनांक १५/०३/२०२० रोजी सायंकाळी ०६/४५ वाजेचे सुमारास भोजडे ता.कोपरगाव जि.अ.नगर येथे सुरेश शामराव गिरे हे त्यांचे राहते घरी भोजडे शिवारातील त्यांचे कुंटुंबासह बसलेले असतांना एक पांढरे रंगाची स्विफ्ट कार व एक काळे रंगाची पल्सर मोटारसायकल अशा गाडया त्यांच्या घरासमोर येवुन थांबल्या. स्विफ्ट कार मधुन ४ लोक व पल्सर मोटारसायकलवर १) रवि आप्पासाहेब शेटे २)विजु खर्ड व अनोळखी इसमांनी येवुन सुरेश गिरे यांचे दिशेने पिस्तुल मधुन अंधाधुंद गोळीबार करण्यास सरुवात केल्याने सुरेश गिरे हे जिव वाचविण्यासाठी घराचे पाठीमागे पळु लागल्याने रवि शेटे, विजु खर्ड व त्यांचे सोबतचे अनोळखी साथीदार मारेक-यांनी सुरेश गिरे यांचा पाठलाग करुन त्यांचेवर गावठी कटयाने गोळीबार करुन हातातील
कोयत्याने तोंडावर व शरीरावर इतर ठिकाणी गंभीर वार करुन सुरेश गिरे यांना जिवे ठार मारुन त्यांचा निघृण
खुन करुन मारेक-यांनी आणलेल्या वाहनांवर निघुन गेले वगैरे मजकुराची फिर्याद फिर्यादीश्री शामराव भिमराव
गिरे रा.भोजडे ता.कोपरगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोपरगाव तालुका पोस्टे गु.रजि.नं. १८८/२०२०
भा.द.वि.क.३०२,४५२, १४३,१४७,१४८,१४९ सह आर्म अॅक्ट ३/२५,४/२५,७/२५, २७ प्रमाणे दिनांक
१६/०३/२०२० रोजी दाखल करण्यात आला आहे 
सदर गुन्हयाचा तपास मा. पोनि. श्री दिलीप पवार, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा हे करीत
असताना यापुर्वी सदर गुन्हयामध्ये मिळालेल्या माहीतीच्या आधारे गुन्हयातील आरोपीत नामे १) नितीन सुधाकर
अवचिते, रा. तळेगाव स्टेशन, वाघेला पार्क, ता मावळ, जि. पुणे, २) शरद मुरलीधर साळवे, रा. काळेवाडी,
पिंपरी चिंचवड, ता हवेली, जि. पुणे, ३)रामदास माधव वलटे, रा. दहेगाव बोलका, ता कोपरगाव जि. अ.नगर
४) आकाश मोहन गिरी, रा. खराबवाडी, चाकण, ता खेड जि. पुणे यांना ताब्यात घेवुन अटक केलेले आहे.
दरम्यान सदर गुन्हयाचा तपास चालु असताना मा पोलीस निरीक्षक श्री दिलीप पवार यांना गुप्त बातमीदार यांचे
मार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील मुख्य सुत्रधार आरोपीत नामे १. रवि शेटे व २. विजय खर्ड असे
दोघेही धुळे जिल्हयामध्ये लपुन बसलेले आहेत सदरची माहीती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेतील
स.पो.नि.देशमुख, पो.स.ई.गणेश इंगळे, सहा फौज. नानेकर, पोहेकॉ/बाळासाहेब मुळीक, मनोहर गोसावी,
दत्तात्रय गव्हाणे, रविंद्र कर्डीले, राम माळी, शंकर चौधरी, संतोष लोढे, शिवाजी ढाकणे, प्रकाश वाघ, सागर
ससाणे, राहुल सोळंके, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, बबन बेरड अशा पथकाने धुळे येथे जावुन मौजे गरतड
येथून सापळा रचुन गुन्हयातील आरोपीत यांना ताब्यात घेतले त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी
त्यांची नांवे १) रविंद्र आप्पासाहेब शेटे वय-३९,रा.रामवाडी संवत्सर ता.कोपरगाव २) विजय बाळासाहेब
खर्डे वय-३१ रा.पढेगाव चौकी,संवत्सर ता.कोपरगाव जि.अ.नगर असे असल्याचे सांगितले.
त्यांचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने अधिक विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, नमुद गुन्हा
करण्यासाठी आम्ही पुणे जिल्हयामधुन आमचे ईतर साथीदार यांना बोलावून घेवुन त्यांना पैशांचे आमिष
दाखवून त्यांचे मदतीने सुरेश शामराव गिरे याचा खुन केलेला आहे. सदरचा गन्हा करणेसाठी आम्हाला तसेच
आमचे ईतर साथीदार यांना राहण्यासाठी, जेवणासाठी, गुन्हयात वापरलेले हत्यारे तयार करणेसाठी तसेच खुन
केलेनंतर आम्हा सर्वाना भोजडे या गावातुन पळुन जाणेसाठी वाहने आरोपीत नामे ३) अमोल सोपानराव मते
वय-३३ वर्षे, रा.लाडगाव रोड, दुर्गा नगर वैजापुर ता.वैजापुर जि.औरंगाबाद, ४) साईनाथ वाल्मिक मते, वय-
३० वर्षे, रा-पारेगाव रोड, बाजीराव नगर, येवला, ता-येवला, जि-नाशिक ५) रविंद्र जालिंदर मगर, वय-२५
वर्षे, मुळ रा-संवत्सर रेल्वे स्टेशन, दशरथवाडी, ता-कोपरगाव, जिल्हा- अ. नगर, सध्या रा- हजार रुमच्या
पाठीमागे, वाघ वस्ती, शिर्डी, ता-राहाता, जि- अ-नगर, ६) लोकेश राय्यप्पा मुद्दापुर, वय-२६ वर्षे, रा- बावाजी
नाणेकर यांची चाळ, चाकण-तळेगाव रोड, देवयानी हॉटेलच्या मागे, ता-खेड, जि-पुणे, ७) सुनिल पंढरीनाथ
नागवे, वय- २९ वर्षे, मूळ रा. सोमठाणा, ता-बदनापूर, जि- जालना, ह. रा. सर्वत्सर, ता- कोपरगांव यांनी
मदत केलेली आहे असे सांगितले. त्यानंतर सदर पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी मिळुन वर नमुद
आरोपीत यांना लागलीच वेगवेगळ्या ठिकाणावरुन ताब्यात घेतलेले आहे. त्या सर्वाकडे विचारपुस केली
असता त्यांनी नमुद गुन्हयाकामी यातील मुख्य आरोपीत नामे १) रविंद्र आप्पासाहेब शेटे वय-३९,रा.रामवाडी
संवत्सर ता.कोपरगाव २) विजय बाळासाहेब खडे वय-३१ रा.पढेगाव चीकी,संवत्सर ता.कोपरगाव जि.अ.नगर
यांना मदत केली असल्याचे सांगीतले आहे. 
सदर गुन्हयामध्ये यापुर्वी अटक करण्यात आलेले आरोपीत तसेच आज रोजी ताब्याता घेण्यात आलेले
आरोपीत यांचे कडे गुन्हयाचे अनुषंगाने सखोल विचारपुस केली असता सदरचा गुन्हा हा करणेसाठी सर्व
आरोपीत यांनी दिनांक०१/०३/२०२० रोजी पासुन दिनांक १५/०३/२०२० रोजी पावेतो वेळोवळी शिर्डी, पुणतांबा
फाटा, लौकी दहीगांव, वैजापूर, संवत्सर या ठिकाणी असलेल्या हॉटेल्स तसेच आरोपीत यांचे राहते घरे
याठिकाणी मिटींग घेवुन खुनाचा कट रचुन गुन्हा केला असलेचे तपासात निष्पन्न झालेले आहे . तसेच सदरचा
गुन्हा करणेसाठी कोपरगांव पो.स्टे. गुरनं. ७२/२०१२, भादवि कलम ३०२, २०१ या गुन्ह्यात येरवडा मध्यवर्ती
कारागृह पुणे येथे शिक्षा भोगत असलेला व पॅरोल रजेवर कोपरगांव येथे आलेला आरोपी नामे ८) किरण
आप्पासाहेब शेटे, रा.रामवाडी, संवत्सर, ता- कोपरगांव (सध्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे)
यानेदेखील मदत केलेली असुन खुन करण्यासाठी सक्रीय सहभाग नोदविला असल्याचे निषन्न झालेले आहे
वरील सर्व आरोपीत क्र १ ते ७ यांना ताब्यात घेवुन दिनांक २१/०३/२०२० रोजी अटक करण्यात
आलेली असुन गुन्हयाचा पुढील तपास हा मा पोलीस निरीक्षक श्री दिलीप पवार स्था गु शा हे करीत आहेत.
नमुद गुन्हयातील मुख्य आरोपीत नामे रविंद्र आप्पासाहेब शेटे याचेवर दाखल असलेले गुन्हे
१) कोपरगाव पोस्टे गु.रजि.नं 1७२/२०१२ भा.द.वि.क. ३०२ वगैरे सदर गुन्हयातील आरोपी हा २०१२ पासुन फरार होता. आरोपी विजय बाळासाहेब खर्डे याचेवर असलेले दाखल गुन्हे
१) कोपरगाव तालुका पोस्टे गु.र.नं ११२३/१४ भा.द.वि.क. ३७९
२) कोपरगाव तालुका पोस्टे गु.र.नं. ११७०/१४ भा.द.वि.क. ३७९
सदरची कारवाई मा.श्री.सागर पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. दिपाली काळे-
कांबळे सो., अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व श्री. सोमनाथ वाकचौरे साहेब, उप विभागीय पोलीस
अधिकारी, शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व
कर्मचारी यांनी केलेली आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी )-दिनांक-२०/०३/२०२० रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक श्री दिलीप पवार, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुप्त बातमी दारा मार्फत खात्रीशिर माहीती मिळाली की, बेलगाव ता-कर्जत येथील ईश्वर गणा भोसले हा त्याच्या मुलांसह चार मोटार सायकल घेवुन कोठेतरी दरोडा टाकण्याच्या तयारीने आज संध्याकाळी १९.०० वा चे सुमारास नगर सोलापुर रोडने येणार आहेत. आता लागलीच नगर सोलापुर रोडवरील वाळुज गावाचे शिवारात गायकवाड फार्म जवळ जावून सापळा लावल्यास मिळून येतील अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी कार्यालयात हजर असलेले सपोनि/ संदिप पाटील, सफौ/मोहन गाजरे, पोहवा/दत्ता हिंगडे, फकिर शेख, संदिप घोडके, विजयकुमार वेठेकर, बबन मखरे, पोना/सुनिल चव्हाण, अण्णा पवार, भागीनाथ पंचमुख, दिनेश मोरे, विश्वास बेरड, सचिन अडबल, संदिप पवार पोकाँ/ योगेश सातपुते, मयुर गायकवाड, रविंद्र धुंगासे, सागर सुलाणे, जालिधर माने, मच्छिद्र बर्डे, कमलेश पाथरुड, मेघराज कोल्हे, ज्ञानेश्वर शिंदे, संदिप चव्हाण, रणजित जाधव, रोहीदास नवगिरे, चालक पोहवा/ बाळासाहेब भोपळे, पोकॉ/ सचिन कोळेकर यांना कळवुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करणेबाबत आदेश दिले. त्यानुसार पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी दोन पंचांसह स्थानिक गुन्हे शाखा येथुन निघुन नगर सोलापुर रोडने गायकवाड फार्म जवळ जावुन सापळा लावला असता काही वेळातच अधिकारी व कर्मचारी यांनी सावध होवुन एकाच वेळी रस्तयावर येवुन रुई कडुन नगर कडे येणा-या मोटार सायकल स्वारांना बॅटरीचा उजेड दाखवुन थांबविण्याचा इशारा केला असता ते न थांबता पुढे जावु लागल्याने त्यांना पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी यांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यांचेकडील हत्यारांचा वापर करुन अटकाव करण्यास मज्जाव केला म्हणुन पोलीस स्टाफ यांनी सौम्य बळाचा वापर करत असताना एक ईसम हा तेथुन अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला सदर वेळी एकुण सात आरोपीत व चार मोटार सायकली तसेच दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहीत्य एक तलवार, दोन कटावणी, एक सुरा, दोन लाकडी दांडके, वायर रोप कटर, मिरची पुढ असा एकुण २,७४,७००/- रुपये कि चा मुददेमाल ताब्यात घेतला. ताब्यत घेण्यात आलेल्या आरोपीत यांची नांवे १. अटल उर्फ अतुल उर्फ योगेश ईश्वर भोसले वय-२३ रा- बेलगाव शिवार ता-कर्जत अहमदनगर, २. सोन्या उर्फ लाल्या उर्फ राजेंद्र इश्वर भोसले, वय-२५, रा- सदर, ३.पल्या उर्फ जमाल इश्वर भोसले, वय-२०, रा-सदर, ४. संदिप ईश्वर भोसले, वय-२२, रा- सदर, ५. मटक उर्फ नवनाथ इश्वर भोसले, वय-१९, रा-सदर , ६. इश्वर गणा भोसले, वय-५२, रा-सदर, ७. जितेंद्र संसार भोसले, वय-३०, रा-रुड नालकोल ता-आष्टी, जि-बीड अशी असून फरार झालेल्या आरोपीत याचे नांव ८. नाज्या नेह-या काळे उर्फ सोमीनाथ दिलीप काळे रा-घुमरी, ता-कर्जत, अहमदनगर असे आहे. नमुद आरोपीत यांचे विरुदध पोलीस नाईक सुनिल सिताराम चव्हाण नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नगर तालुका पोलीस ठाणे येथे भा दं वि क ३९९,४०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन पुढील कार्यवाही नगर तालुका पोलीस ठाणे हे करीत आहेत. सदरची कारवाई मा. श्री सागर पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अ.नगर व श्री. अजित पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.

बुलडाणा - 20 मार्च 
बुलडाणा डीएफओ संजय माळी यांनी एका धाडीत अवैध सागवनची तस्करी करतांना एका वाहनाला पकडले होते या प्रकरणात चौकशी अंति स्पष्ट झाले की सदर सागवनचे लाकुड गुम्मी वर्तुळचे वनपाल वामन पावर यांचे असून विना परवाना कटाई करुण त्याची वाहतुक केली जात होती,या मुळे वनपाल पवार यांना डीएफओ माळी यांनी एका आदेशानुसार निलंबित केले आहे.या कारवाही मुळे विभागात अशा प्रकारे गैरकृत्य करणाऱ्यांचे धाबे दनानले आहे.
        बुलडाणा डीएफओ संजय माळी यांना गुप्त माहिती मिळाली त्यांनी आपल्या सोबत बुलडाणा आरएफओ गणेश टेकाळे यांना घेऊन चिखली जवळील अनुराधा कॉलेज समोर 8 मार्चच्या रात्री 8 वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या एका टाटा मैजिक वाहनाला थांबवून त्याची झळती घेतली असता त्यात बाभळीचा जळतन व सागवनचे कापलेले पाट्या मिळून आल्या सोबत या वाहनात वनपाल पवारचा बैग व त्यांचा जवळचा नातेवाईक सुद्धा बसलेला होता. या प्रकरणी धाड येथील वाहन चालक शेख अबरार याच्या विरुद्ध वन गुन्हा दाखल करून पुढील चौकशीत असे निष्पन्न झाले की वनपाल वामन पवार यांनी आपल्या कर्तव्यात निष्काळजीपणा केला म्हणून  त्यांना डीएफओ संजय माळी यांनी गुम्मी वर्तुळचे वनपाल वामन एच.पवार यांना 19 मार्च पासून तात्काळ प्रभावाने निलंबित केले व निलंबन काळात त्यांचा मुख्यालय सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) मेहकर राहणार आहे.

जप्ती न दाखवता घरी चालला होता सागवन
कोणतीही कारवाही केल्यानंतर पकडलेल्या मुद्देमालांचा जप्ती पंचनामा केला पाहिजे परंतु या प्रकरणात काही वेगळाच झाला.20-25 दिवस अगोदर वनपाल वामन पवार यांनी दुधा शिवारात बबन ताठे यांच्या शेतात अवैधरित्य कापलेले 3-4 सागाचे झाड पकडले व विना पंचनामा व कोणताही वन गुन्हा दाखल ना करताच वनपाल पवार यांनी सदर झाडे सुरेश कळस्कर मिस्त्री यांच्या रंधा मशीनवर आणून कापला व ढालसांवगी येथील शासकीय निवासात नेऊन ठेवला व काही दिवसा नंतर आपल्या घरी चिखलीला नेत असतांना सदर लाकुड पकडल्या गेला.

10 लोकांचे घेण्यात आले बयान
अवैधपने सागवन घेऊन जाणाऱ्या वाहनाला पकडल्या नंतर वन विभागाने चालकावर गुन्हा दाखल केला व नंतर वनपाल वामन पवार सह 10 लोकांचे बयान घेण्यात आले यात  चालक शेख अबरार,सुरेश कळस्कर मिस्त्री,शेतकरी बबन ताठे,ऑटो चालक परशु ताठे,हाजी नसीम,अशफाक सौदागर,सय्यद अफरोज़ व इतर यांचे बयान घेण्यात आले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहरात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशाचा अवमान भंग करुन कोरोना' संसर्ग दक्षतेसाठी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतानाही दुकाने सुरूच ठेवणाऱ्या काही व्यापायांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने आदेशाचा भंग करणाऱ्या मध्ये खळबळ उडाली आहे.श्रीरामपूर शहरात शिवाजी
रोडवर असलेले समाधान सुपारी हे दुकान उघडे ठेवले म्हणून व्यापान्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोका रविंद्र कोकणी यांच्या फिर्यादीवरुन आरोपी अमोल दिलीप लुकड,वय ३५ रा. बेलापूर यांच्याविरुद्ध भादवि कालम १८८ प्रमाणे गुरनं.२२४ दाखल करण्यात आला.फिर्यादीत म्हटले आहे की, १९ मार्च ४ च्या सुमारास
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचेकडील आव्ययमक/कार्या ११ अ/२१०/२०२० दि.१९ /३/२०२० प्रमाणे अन्वये
पारीत झालेल्या आदेशाचे उलंघन व अवमान करुन त्याचे ताव्यातील समाधान सुपारी दुकान उघडे ठेवून चालविताना मिळून आला आहे. तर दुसन्या घटनेत सफी राजगुरु यांच्या फिर्यादीवरुन प्रशांत शामराव गोटवे,रा. नॉर्दनअब्राच, मोरगे वस्ती याच्याविरुद्ध भादवि कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. मेनरोडवरील गांधी चौकात जयमातादी जकींग हाऊस उघडे ठेवले होते तर पोका प्रसाद इंगळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी
हारुमल जयशनमल वलेशा, वय ५८ रा. लक्ष्मीनारायणनगर, वार्ड नं.१, श्रीरामपूर यांच्याविरुद्ध कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाजी रोडवर गिरमे चौकाजवळ शिवाजी केक शॉप हे दुकान सुरू ठेवले होते.
पोका रविंद्र कोकणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुनील रावसाहेब शेळके, रा. वार्ड नं. ७, मोरगे वस्ती याच्याविरुद्ध कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. काळाराम मंदिर रोडवरील यश केक शॉपी हे दुकान उघडे ठेवले होते. पोका प्रसाद इंगळे यांच्या फिर्यादीवरुन प्रकाश रमेश शिरसाठ, रा. बेलापूर रोड,
श्रीरामपूर याच्याविरुद्ध कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने प्रकाश फर्निचरहे दुकान उघडे ठेवले होते. सफो देवीदास राजगुरु यांच्या फिर्यादीवरून आरोपी विलास  हिरालाल चुडिवाल, वय ५६,
रा. वार्ड नं. ७, चौधरी वस्ती याच्याविरुद्ध कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. बेलापूर रोडवरील पिटर इंग्लड दुकान उपडे ठेवले होते. पोका तुषार गायकवाड यांच्या - व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या
- आदेशाचा अवमान करन दकाने उघडे ठेवून चालविताना मिळून आल्याने हे गुन्हे दाखल करण्यात
आले. अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दिपाली काळे, डिवायएसपी : राहुल मदने, यांच्या मार्गदर्शनाखाली आदेशाचा भंग करणाऱ्या व्यावसायिकांवर अशाच प्रकारची कारवाई केली जाईल, . असे पोनि बहिस्ट यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह जिल्हाधिकारी व प्रशासन गर्दी करू नका, आदेशाचे पालन करा, असे आवाहन करत असतानाही काही दुकानदार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा
अवमान करत दुकाने उघडे ठेवतात.याबहल सुश नागरिक व व्यापाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले असून सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने कोरोना व्‍हायरसचा प्रतिबंधात्‍मक उपाय म्‍हणून श्री साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्‍यात आले असून संस्‍थानच्‍या सर्व विभागांंनी स्‍वच्‍छतेची कामे मोठया प्रमाणात हाती घेतली आहे.

संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी समाधी मंदिर व मंदिर परिसरात समक्ष भेट देवुन स्‍वच्‍छता विषयक कामाचा आढावा घेतला. याप्रसंगी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे व सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. श्री साईबाबा समाधी मंदिर कळसापासून धुवून स्‍वच्‍छ करण्‍यात आले. तसेच व्‍दारकामाई, चावडी, गुरुस्‍थान, हनुमान मंदिर, गणपती, शनिदेव व महादेव मंदिरांसह दर्शनरांग, प्रशासकीय इमारत, पिंपळवाडी रोडलगतचे शेड, १६ गुंठेतील सभामंडप, लेंडीबाग हे सर्व ठिकाणे धुवून स्‍वच्‍छ करण्‍यात आलेले आहे. गर्दी नसल्‍यामुळे पहिल्‍यांदाच ही संधी मिळाली असून याठिकाणी विद्युत, बांधकाम, पाणी पुरवठा व मेकॅनिकल आदि विभागांनी आपल्‍याशी संबंधीत मेंटन्‍सची कामे हाती घेतली आहे. 

संस्‍थानच्‍या सर्वात मोठया साईआश्रम भक्‍तनिवासस्‍थानमध्‍ये पेस्‍ट कंट्रोलचे काम पुर्ण झाले असून संपूर्ण १५३६ खोल्‍या, टेरेस, परिसर लिक्‍वीड सह धुण्‍यात येत आहे. तेथील चादरी, बेडशिट, उशी कव्‍हर आदी धुवून स्‍वच्‍छ करण्‍यात येत आहे. साईआश्रम परिसरातील झाडे-झुडपे ही धुण्‍यात आली असून झाडांची कटींग ही करण्‍यात आलेली आहे. या संपूर्ण परिसरात प्रतिबंधात्‍मक औषध फवारणी करण्‍यात येते आहे. याबरोबरच नविन भक्‍त‍निवासस्‍थान ५०० रुम, व्‍दारावती भक्‍तनिवासस्‍थान, बस स्‍थानक येथील दोन मजले आदी ठिकाणी ही स्‍वच्‍छता करण्‍यात येत आहे. याठिकाणी विद्युत, बांधकाम, पाणी पुरवठा व मेकॅनिकल आदि विभागांनी आपल्‍याशी संबंधीत मेंटन्‍सची कामे हाती घेतली आहे.

संस्‍थानच्‍या वतीने सुमारे ७ एकर परिसरात उभारण्‍यात आलेले भव्‍य असे श्री साईप्रसादालय हे पहिल्‍यांदा बंद ठेवण्‍यात आल्‍यामुळे या ठिकाणाच्‍या परिसरासह किचन, मशिनरी, भोजन हॉल, भोजनासाठी वापरण्‍यात येणारी ताटे, ग्‍लास आदिंची ही स्‍वच्‍छता करण्‍यात येत आहे. तसेच या संपूर्ण परिसरात प्रतिबंधात्‍मक औषध फवारणी करण्‍यात येत आहे. संस्‍थानच्‍या सर्वच विभागांनी स्‍वच्‍छतेचे कामे हाती घेतले असून स्‍वच्‍छता विभागाचे विभाग प्रमुख अशोक वाळुंज यांच्‍यासह सर्व स्‍वच्‍छता कर्मचारी याकामी विशेष परिश्रम घेत आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget