अहमदनगर (प्रतिनिधी )-दिनांक-२०/०३/२०२० रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक श्री दिलीप पवार, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुप्त बातमी दारा मार्फत खात्रीशिर माहीती मिळाली की, बेलगाव ता-कर्जत येथील ईश्वर गणा भोसले हा त्याच्या मुलांसह चार मोटार सायकल घेवुन कोठेतरी दरोडा टाकण्याच्या तयारीने आज संध्याकाळी १९.०० वा चे सुमारास नगर सोलापुर रोडने येणार आहेत. आता लागलीच नगर सोलापुर रोडवरील वाळुज गावाचे शिवारात गायकवाड फार्म जवळ जावून सापळा लावल्यास मिळून येतील अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी कार्यालयात हजर असलेले सपोनि/ संदिप पाटील, सफौ/मोहन गाजरे, पोहवा/दत्ता हिंगडे, फकिर शेख, संदिप घोडके, विजयकुमार वेठेकर, बबन मखरे, पोना/सुनिल चव्हाण, अण्णा पवार, भागीनाथ पंचमुख, दिनेश मोरे, विश्वास बेरड, सचिन अडबल, संदिप पवार पोकाँ/ योगेश सातपुते, मयुर गायकवाड, रविंद्र धुंगासे, सागर सुलाणे, जालिधर माने, मच्छिद्र बर्डे, कमलेश पाथरुड, मेघराज कोल्हे, ज्ञानेश्वर शिंदे, संदिप चव्हाण, रणजित जाधव, रोहीदास नवगिरे, चालक पोहवा/ बाळासाहेब भोपळे, पोकॉ/ सचिन कोळेकर यांना कळवुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करणेबाबत आदेश दिले. त्यानुसार पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी दोन पंचांसह स्थानिक गुन्हे शाखा येथुन निघुन नगर सोलापुर रोडने गायकवाड फार्म जवळ जावुन सापळा लावला असता काही वेळातच अधिकारी व कर्मचारी यांनी सावध होवुन एकाच वेळी रस्तयावर येवुन रुई कडुन नगर कडे येणा-या मोटार सायकल स्वारांना बॅटरीचा उजेड दाखवुन थांबविण्याचा इशारा केला असता ते न थांबता पुढे जावु लागल्याने त्यांना पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी यांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यांचेकडील हत्यारांचा वापर करुन अटकाव करण्यास मज्जाव केला म्हणुन पोलीस स्टाफ यांनी सौम्य बळाचा वापर करत असताना एक ईसम हा तेथुन अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला सदर वेळी एकुण सात आरोपीत व चार मोटार सायकली तसेच दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहीत्य एक तलवार, दोन कटावणी, एक सुरा, दोन लाकडी दांडके, वायर रोप कटर, मिरची पुढ असा एकुण २,७४,७००/- रुपये कि चा मुददेमाल ताब्यात घेतला. ताब्यत घेण्यात आलेल्या आरोपीत यांची नांवे १. अटल उर्फ अतुल उर्फ योगेश ईश्वर भोसले वय-२३ रा- बेलगाव शिवार ता-कर्जत अहमदनगर, २. सोन्या उर्फ लाल्या उर्फ राजेंद्र इश्वर भोसले, वय-२५, रा- सदर, ३.पल्या उर्फ जमाल इश्वर भोसले, वय-२०, रा-सदर, ४. संदिप ईश्वर भोसले, वय-२२, रा- सदर, ५. मटक उर्फ नवनाथ इश्वर भोसले, वय-१९, रा-सदर , ६. इश्वर गणा भोसले, वय-५२, रा-सदर, ७. जितेंद्र संसार भोसले, वय-३०, रा-रुड नालकोल ता-आष्टी, जि-बीड अशी असून फरार झालेल्या आरोपीत याचे नांव ८. नाज्या नेह-या काळे उर्फ सोमीनाथ दिलीप काळे रा-घुमरी, ता-कर्जत, अहमदनगर असे आहे. नमुद आरोपीत यांचे विरुदध पोलीस नाईक सुनिल सिताराम चव्हाण नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नगर तालुका पोलीस ठाणे येथे भा दं वि क ३९९,४०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन पुढील कार्यवाही नगर तालुका पोलीस ठाणे हे करीत आहेत. सदरची कारवाई मा. श्री सागर पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अ.नगर व श्री. अजित पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.
Post a Comment