Latest Post

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहरात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशाचा अवमान भंग करुन कोरोना' संसर्ग दक्षतेसाठी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतानाही दुकाने सुरूच ठेवणाऱ्या काही व्यापायांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने आदेशाचा भंग करणाऱ्या मध्ये खळबळ उडाली आहे.श्रीरामपूर शहरात शिवाजी
रोडवर असलेले समाधान सुपारी हे दुकान उघडे ठेवले म्हणून व्यापान्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोका रविंद्र कोकणी यांच्या फिर्यादीवरुन आरोपी अमोल दिलीप लुकड,वय ३५ रा. बेलापूर यांच्याविरुद्ध भादवि कालम १८८ प्रमाणे गुरनं.२२४ दाखल करण्यात आला.फिर्यादीत म्हटले आहे की, १९ मार्च ४ च्या सुमारास
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचेकडील आव्ययमक/कार्या ११ अ/२१०/२०२० दि.१९ /३/२०२० प्रमाणे अन्वये
पारीत झालेल्या आदेशाचे उलंघन व अवमान करुन त्याचे ताव्यातील समाधान सुपारी दुकान उघडे ठेवून चालविताना मिळून आला आहे. तर दुसन्या घटनेत सफी राजगुरु यांच्या फिर्यादीवरुन प्रशांत शामराव गोटवे,रा. नॉर्दनअब्राच, मोरगे वस्ती याच्याविरुद्ध भादवि कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. मेनरोडवरील गांधी चौकात जयमातादी जकींग हाऊस उघडे ठेवले होते तर पोका प्रसाद इंगळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी
हारुमल जयशनमल वलेशा, वय ५८ रा. लक्ष्मीनारायणनगर, वार्ड नं.१, श्रीरामपूर यांच्याविरुद्ध कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाजी रोडवर गिरमे चौकाजवळ शिवाजी केक शॉप हे दुकान सुरू ठेवले होते.
पोका रविंद्र कोकणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुनील रावसाहेब शेळके, रा. वार्ड नं. ७, मोरगे वस्ती याच्याविरुद्ध कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. काळाराम मंदिर रोडवरील यश केक शॉपी हे दुकान उघडे ठेवले होते. पोका प्रसाद इंगळे यांच्या फिर्यादीवरुन प्रकाश रमेश शिरसाठ, रा. बेलापूर रोड,
श्रीरामपूर याच्याविरुद्ध कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने प्रकाश फर्निचरहे दुकान उघडे ठेवले होते. सफो देवीदास राजगुरु यांच्या फिर्यादीवरून आरोपी विलास  हिरालाल चुडिवाल, वय ५६,
रा. वार्ड नं. ७, चौधरी वस्ती याच्याविरुद्ध कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. बेलापूर रोडवरील पिटर इंग्लड दुकान उपडे ठेवले होते. पोका तुषार गायकवाड यांच्या - व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या
- आदेशाचा अवमान करन दकाने उघडे ठेवून चालविताना मिळून आल्याने हे गुन्हे दाखल करण्यात
आले. अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दिपाली काळे, डिवायएसपी : राहुल मदने, यांच्या मार्गदर्शनाखाली आदेशाचा भंग करणाऱ्या व्यावसायिकांवर अशाच प्रकारची कारवाई केली जाईल, . असे पोनि बहिस्ट यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह जिल्हाधिकारी व प्रशासन गर्दी करू नका, आदेशाचे पालन करा, असे आवाहन करत असतानाही काही दुकानदार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा
अवमान करत दुकाने उघडे ठेवतात.याबहल सुश नागरिक व व्यापाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले असून सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने कोरोना व्‍हायरसचा प्रतिबंधात्‍मक उपाय म्‍हणून श्री साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्‍यात आले असून संस्‍थानच्‍या सर्व विभागांंनी स्‍वच्‍छतेची कामे मोठया प्रमाणात हाती घेतली आहे.

संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी समाधी मंदिर व मंदिर परिसरात समक्ष भेट देवुन स्‍वच्‍छता विषयक कामाचा आढावा घेतला. याप्रसंगी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे व सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. श्री साईबाबा समाधी मंदिर कळसापासून धुवून स्‍वच्‍छ करण्‍यात आले. तसेच व्‍दारकामाई, चावडी, गुरुस्‍थान, हनुमान मंदिर, गणपती, शनिदेव व महादेव मंदिरांसह दर्शनरांग, प्रशासकीय इमारत, पिंपळवाडी रोडलगतचे शेड, १६ गुंठेतील सभामंडप, लेंडीबाग हे सर्व ठिकाणे धुवून स्‍वच्‍छ करण्‍यात आलेले आहे. गर्दी नसल्‍यामुळे पहिल्‍यांदाच ही संधी मिळाली असून याठिकाणी विद्युत, बांधकाम, पाणी पुरवठा व मेकॅनिकल आदि विभागांनी आपल्‍याशी संबंधीत मेंटन्‍सची कामे हाती घेतली आहे. 

संस्‍थानच्‍या सर्वात मोठया साईआश्रम भक्‍तनिवासस्‍थानमध्‍ये पेस्‍ट कंट्रोलचे काम पुर्ण झाले असून संपूर्ण १५३६ खोल्‍या, टेरेस, परिसर लिक्‍वीड सह धुण्‍यात येत आहे. तेथील चादरी, बेडशिट, उशी कव्‍हर आदी धुवून स्‍वच्‍छ करण्‍यात येत आहे. साईआश्रम परिसरातील झाडे-झुडपे ही धुण्‍यात आली असून झाडांची कटींग ही करण्‍यात आलेली आहे. या संपूर्ण परिसरात प्रतिबंधात्‍मक औषध फवारणी करण्‍यात येते आहे. याबरोबरच नविन भक्‍त‍निवासस्‍थान ५०० रुम, व्‍दारावती भक्‍तनिवासस्‍थान, बस स्‍थानक येथील दोन मजले आदी ठिकाणी ही स्‍वच्‍छता करण्‍यात येत आहे. याठिकाणी विद्युत, बांधकाम, पाणी पुरवठा व मेकॅनिकल आदि विभागांनी आपल्‍याशी संबंधीत मेंटन्‍सची कामे हाती घेतली आहे.

संस्‍थानच्‍या वतीने सुमारे ७ एकर परिसरात उभारण्‍यात आलेले भव्‍य असे श्री साईप्रसादालय हे पहिल्‍यांदा बंद ठेवण्‍यात आल्‍यामुळे या ठिकाणाच्‍या परिसरासह किचन, मशिनरी, भोजन हॉल, भोजनासाठी वापरण्‍यात येणारी ताटे, ग्‍लास आदिंची ही स्‍वच्‍छता करण्‍यात येत आहे. तसेच या संपूर्ण परिसरात प्रतिबंधात्‍मक औषध फवारणी करण्‍यात येत आहे. संस्‍थानच्‍या सर्वच विभागांनी स्‍वच्‍छतेचे कामे हाती घेतले असून स्‍वच्‍छता विभागाचे विभाग प्रमुख अशोक वाळुंज यांच्‍यासह सर्व स्‍वच्‍छता कर्मचारी याकामी विशेष परिश्रम घेत आहे.

लोणी : प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सहविजनिर्मिती प्रकल्पाला लागलेल्या आगीमध्ये पाच ते सहा कामगार होरपळले आहेत. त्यांच्यावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. शुक्रवारी सकाळी ११वाजेदरम्यान ही आग लागली. दोन ते आडीच तासानंतर १२ अग्नीशामक बबांच्या साह्याने या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.विखे पाटील कारखान्यासोबत करारकरून गँमन इंडिया या  खासजी कंपनीने प्रवरा रिन्योएबल एनर्जी लिमिटेड नावाचा सह उर्जा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पामध्ये शुक्रवारी सकाळी  सकाळी ११वाजेदरम्यान ३०० फूट उंचीवर काही कामगार वेल्डींगचे काम करत असताना वेल्डींगच्या ठिंणग्या खाली असलेल्या दगडी कोळसावर पडल्याने तो पेटला. त्यानंतर आजूबाजूला असलेल्या बॉयलर गॅसने पेट घेतल्याने आगीने उग्र रूप धारण केलेल्या कामगाराना बाहेर पडणे मुश्किल झाल्याने ते या आगीमध्ये होरपळले. तर एकाने जीव वाचविण्यासाठी ३०० फुटावरून उडी टाकल्याने त्याच्या हाताला दुखापत झाली.दरम्यान, संगमनेर शिर्डी राहाता राहुरी देवळाली प्रवरा, श्रीरामपूर कोपरगांव या ठिकाणाहून पाचारण केलेल्या अग्निशामक दलांनी तीन तासाच्या अथक परिश्रमानानंतर या आगीवर नियंत्रण मिळविले.

मुंबई : (१९ मार्च ) करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या एसटी प्रवासाच्या सवलत स्मार्ट-कार्ड योजनेला एक महिन्याची मुदतवाढ (३० एप्रिल पर्यंत)देण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री ,व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी दिली आहे.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली एसटीने आपल्या प्रवाशांना व कर्मचाऱ्यांना संभाव्य संसर्ग होऊ नये म्हणून, विविध उपाय योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बस स्थानकावरील अनावश्यक गर्दी कमी करण्याच्या हेतूने 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या एसटीच्या सवलत स्मार्ट -कार्ड ची मुदत ३१ मार्च ऐवजी एक महिना वाढवून 30 एप्रिल अशी करण्यात आली आहे .त्यामुळे स्मार्टकार्ड घेणाऱ्या ज्येष्ठांनी या 31 मार्च पर्यंत स्मार्ट कार्ड घेण्यासाठी घाई गडबड करू नये असे आवाहन मंत्री, अॅड. परब यांनी केले आहे.
सध्या एसटी महामंडळाच्या 250 आगारामध्ये तसेच महामंडळाने अधिकृतपणे नेमलेल्या खाजगी वितरका मार्फत ज्येष्ठ नागरिकांना आधार क्रमांकाशी संलग्न असलेली स्मार्ट कार्ड देण्यात येत आहेत. परंतु करोना विषाणूच्या संभाव्य संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आला असून १ एप्रिल नंतर उर्वरित ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड देण्याची ची व्यवस्था पूर्ववत करण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे .तोपर्यंत जुन्या पद्धतीनुसारच ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

श्रीरामपूर  ( प्रतिनिधी  )- कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासन विविध पातळीवर प्रयत्न करत असुन त्याचाच एक भाग म्हणून कार्डधारकांना तीन महीन्याचे धान्य एकाच वेळी देण्यात यावे अशी मागणी अहमदनगर  जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार  संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई  यांनी पुरवठा मंत्र्याकडे केली आहे   पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांना पाठविलेल्या निवेदनात देसाई यांनी पुढे म्हटले आहे की कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी शासनाने अनेक उपाय योजना सुरु केल्या आहेत गर्दीच्या ठिकाणी  एकत्र न येण्याचे अवाहन करण्यात आलेले आहे शासनाने कार्डधारकाना वितरीत करावयाचा धान्याचा कोठा एकाच वेळेस तिन महीन्याचा दिल्यास कार्डधारकाची दुकानात गर्दी होणार नाही तसेच दुकानदार टप्प्याटप्प्याने दुकानावर गर्दी होवु न देता वितरण करतील कारण धान्य दुकानात धान्य आल्यास कार्डधारक एकाच वेळेस गर्दी करतात एकाच वेळेस तीन महीन्याचे धान्य दिल्यावर दुकानावर जास्त गर्दी होणार नाही शासनाने या मागणीचा विचार करावा असेही निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर देविदास देसाई  रज्जाक पठाण मिनाताई कळकुंबे विश्वासराव जाधव बाळासाहेब दिघे कैलास बोरावके ज्ञानेश्वर  वहाडणे सुरेश उभेदळ बाळासाहेब देवखीळे सुरेश कोकाटे रावसाहेब भगत बाबा कराड भाऊसाहेब वाघमारे बजरंग दरंदले माणिक जाधव बाबासाहेब ढाकणे मुकुंद सोनटक्के आदिच्या सह्या आहेत

बेलापूर (प्रतिनिधी  )-माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार बेलापूर ग्रामपंचायत व बेलापूर पोलीस स्टेशन यांनी आवाहन करताच ग्रामस्थांनी तातडीने आपापली दुकाने बंद करून शासनाच्या आवाहनास प्रतिसाद दिला कोरोणा विरोधात लढण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर यानी जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व व्यवसायिकांनी आपापले व्यवहार बंद करावेत असे आवाहन केले होते या आवाहनानुसार बेलापूर ग्रामपंचायत तसेच बेलापूर पोलीस स्टेशन यांनी गावात दवंडी देऊन माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले होते  त्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यवसायिक यांनी तातडीने आपापली दुकाने बंद केली बेलापूर गावात केवळ दवाखाने मेडिकल किराणा दुकाने भाजीपाला व्यावसायिकांनी आपली दुकाने सुरू ठेवली होती बेलापूरच्या बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता नागरिकांनीदेखील चौकाचौकात गर्दी न करता दुरदर्शन संचासमोर बसणे पसंत केले

श्रीरामपूर (प्रतिनिधी )-कोरोना विषाणू संसर्गाचे जिल्ह्यात आतापर्यंत दोन बाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. वारंवार आवाहन करुनही सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी आता प्रशासनाने साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५मधील कलम ३० अन्वये विविध बाबींसाठी बंदी आदेश लागू केले आहेत. हे आदेश आजपासून लागू करण्यात आले असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडनीय
आणि कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे.जिल्हा कार्यक्षेत्रात सर्व प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रम, यात्रा, जत्रा, उत्सव, मिरवणूक, उरुस आदींना मनाई राहील. जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालय, लॉन्स, हॉटेल्स अथवा अन्य वास्तूंमधील मॅरेज हॉल तसेच अन्य विवाह स्थळांच्या ठिकाणांचा वापर करण्यास बंदी राहील. जिल्ह्यात कार्यशाळा, मेळावा, सभा, मोर्चा, आंदोलन, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग यांच्या आयोजनास बंदी राहील. मंदिर, मशिद, गुरुव्दारा, चर्च व इतर धार्मिक स्थळे नागरिकांच्या प्रवेशासाठी बंद राहतील. जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात असणारी दुकाने/सेवा आस्थापना, उपाहारगृहे/खाद्यगृहे/
खानावळी, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब/पब, क्रीडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालय, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा, संग्रहालय, व्हिडिओ पार्लर, ऑनलाईन लॉटरी सेंटर आदी बंद राहतील. जिल्ह्यातील सर्व परमिट रुम बिअरबार बंद ठेवण्यात येत आहेत. सर्व नागरिकांना विहीत कारणाशिवाय अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी येण्यास मनाई राहील.
यांना आदेशातून वगळले-शासकीय/निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे उपक्रम/आस्थापना, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, रुग्णालय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, दवाखाने, रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टॅण्ड, बसथांबे व स्थानके, विमानतळ व रिक्षा थांबे, अंत्यविधी (गर्दी टाळून), अत्यावश्यक किराणा सामान, दूध/दुग्धोत्पादने, फळे व भाजीपाला, औषधालय, पेट्रोलपंप, जीवनावश्यक वस्तू, विक्री/वितरीत करण्यास परवानगी राहील. परंतु येथेही गर्दी टाळण्याचे आवाहन आहे. दहावी, बारावी, तसेच राज्य शासन व केंद्र शासनाकडून घेण्यात येणाºया सर्व स्पर्धा परीक्षा विद्यापीठ/विश्व विद्यालयाच्या परीक्षा देणारे विद्यार्थी व संबंधित शैक्षणिक काम पाहणारी व्यक्ती, प्रसार माध्यमांचे (सर्व प्रकारची दैनिक/नियतकालिके/टीव्ही न्यूज चॅनेल) कार्यालय चालू राहतील.
कारवाईस पात्र -कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंडसंहिता (४५ ऑफ १९६०) च्या कलम १८८ नुसार दंडनिय, कायदेशीर कारवाईस व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व मुंबई पोलीस अधिनियम १९५१ कलम ४३ (१) मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget