Latest Post

बुलडाणा - 24 फेब्रूवारी
देशभरात CAA, NRC व NPR या विधेयकाच्या विरोधात विविध आंदोलन सुरु असून आज शेकडो नागरिक या विधेयकाच्या विरोधात मोताळा ते बुलडाणा असा 25 किलोमीटरचा पायी मोर्चा काढून आपली भूमिका मांडली व आपल्या मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.या विधेयकाच्या विरोधात 25 किलोमीटर पायी मोर्चा देशात फक्त येथेच काढण्यात आला.
     मोताळा ते बुलडाणा एनआरसी विरोधात 25
किलोमिटरचा प्रवास करीत शेकडो लोकांनी तिरंगा पदयात्रा काढली. या तिरंगा पदयात्रेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची शेख मुक्तार शेख अबरार यांनी साकारलेली वेशभूषा लक्षवेधी ठरली.सुधारित नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदनी विरोधात दिल्लीतील शाहीन बाग येथे मागील दीड महिन्या पेक्षा जास्त काळापासून निदर्शने सुरू आहेत. याच धर्तीवर बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा व  बुलडाण्यातही शाहीन बाग आंदोलन कुल जमाती तंझीमच्या नेतृत्वात सुरू आहे. दरम्यान आज 24 फेब्रवारीला उपोषणाच्या 45 व्या दिवशी मोताळा ते  बुलडाणा असा 25 कि.मि ची सर्वधर्मीय तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा शहरात पोहचल्यावर जयस्तंभ चौकातील शाहीनबाग आंदोलनात सहभागी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
२४ फेब्रूवारी जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता कुल जमाती तंझीमच्या वतीने तिरंगा पदयात्रेचे आयोजन मोताळा येथील शाहीनबाग उपोषण मंडप ते बुलडाणा शाहीनबाग उपोषण मंडपादरम्यान करण्यात आले. राजूर घाटाच्या चढणीनंतर  शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथील तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करून जयस्तंभ चौक येथे मोर्चा पोहचल्यावर शाहीनबागच्या समोर याचे रूपांतर एका जनसभेत झाले. यावेळी कुल जमाती तंझीमच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आपली लढाई कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून केंद्र सरकारद्वारे पारित करण्यात आलेल्या एनआरसी, सीएए व एनपीआरच्या विरोधात आहे.
आपल्या आंदोलनामुळे कोणत्याही धर्माच्या नागरिकांना त्रास होऊ नये, याकडे सर्वांनी लक्ष द्यावे, असे आवाहन कुल जमाती तंझीमच्या वतीने करण्यात आले. या तिरंगा पदयात्रेत शेकडोच्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

महेश लोढा
 साईबाबांच्या पावन भूमि शिर्डी येथे  स्वच्छतेत हिंदुस्तानात तीसरा  व महाराष्ट्र राज्यात दूसरा क्रमांक पटकवनार्या शिर्डी नगरपंचायतच्या स्वीक्रुत नगरसेवक पदी शिर्डीतिल दान्शुर  रतीलाल (काका) लोढा यांचे  चिरंजीव महेश लोढा यांची व शिर्डी येथील समाज सेवक दीपक वारुळे यांच्या अर्धांगिनी एडवोकेट शीतल दीपक वारुळे यांची शिर्डी नगरपंचायतच्या स्वीक्रुत नगरसेवक पदी बिनविरोध  निवड करण्यात आली असल्याने शिर्डीत जल्लोष साजरा करण्यात आला
एडवोकेट शीतल दीपक वारुळे

अहमदनगर, दि.24 - 'सायेब, मागच्या काळात कर्जमाफीसाठी लईवेळा हेलपाटे मारावे लागले. यावेळी फक्त थम्ब (अंगठा) दिला, अन काम झालं. अगदी सुटसुटीत आहे!,' राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावच्या पोपटराव भानुदास मोकाटे यांची ही भावना. त्यांनी आज ती थेटपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचवली आणि या दोघांनीही, ही भावना म्हणजे या सरकारसाठी आशीर्वादच आहेत. आनंदात राहा आणि हे आशीर्वाद कायम असू द्या, असे त्यांना सांगितले.

            महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणासह प्रत्यक्ष कार्यवाहीची सुरुवात आज झाली. प्रातिनिधीक स्वरुपात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांतील याद्यांचे प्रसिद्धीकरण करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रालयातील इतर मंत्री तसेच अधिकारी यांनी त्यातील काही गावांतील पात्र लाभार्थीं यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला. अहमदनगर जिल्ह्यातील ब्राह्मणी (ता. राहुरी) आणि जखणगाव (ता. नगर) येथील शेतकर्‍यांना या संवादाची संधी मिळाली. नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राजाराम माने आणि जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे यावेळी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दुपारी एक वाजता या संवादास सुरुवात केली. राज्यात कर्जमुक्ती योजनेच्या कार्यवाहीत प्रथम क्रमांकावर असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी त्यांनी सर्वप्रथम संवाद साधला. सुरुवातीला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जिल्ह्यातील कोणत्या गावातून आलात, हे विचारले. त्यानंतर पोपटराव मोकाटे यांच्याशी सुरुवातीला उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी संवाद साधला. किती कर्ज होते? कशासाठी घेतले...अशी विचारणा केली. त्यावर पोपटरावांनी ऊसासाठी २८ हजार रुपये कर्ज घेतले. त्यावरील व्याजासह ३२ हजार रुपये झाल्याचे सांगितले. हे कर्ज माफ होणार असल्याने अतिशय आनंद आहे. प्रशासन आणि सरकारचं खरोखरंच आभार, असे त्यांनी सांगितले.

            पोपटरावांनी आभार मानताच मु्ख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आभार कसले... हे तर कर्तव्यच असल्याचे सांगितले आणि तुमचे आभाराचे शब्द म्हणजे आमच्यासाठी आशीर्वाद असल्याची भावना व्यक्त केली.

             बळीराजाला दुखावू नका, त्यांची कामे वेळेत पूर्ण करा

शिर्डी प्रतिनिधि श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्‍या नवनियुक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री.ए.के.डोंगरे, (भा.प्र.से.) यांनी सहपत्‍नीक श्री साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेवुन संस्‍थानचा पदभार स्विकारला.

प्रतिनिधी ।
            सावळीविहीर कारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिर्डी विमानतळा वर जाऊन  विविध विमानांच्या टेकअप व लँडिंग चा मनसोक्त  आनंद घेत तसेच तेथील स्वच्छतेचा आदर्श घेऊन स्वच्छतेचे धडे गिरवत संत गाडगे महाराज यांची आठवण काढत मनोमन स्वच्छतेची शपथ घेतली,
     सावळीविहीर कारवाडी येथील श्री हनुमान क्लास या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी पर्यंतच्या सुमारे पन्नास चिमुकल्या विद्यार्थ्यांची सहल नुकतीच शिर्डी जवळील काकडी येथील श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेली होती, नेहमी आकाशात दिसणारी विमाने, आता प्रत्यक्ष या विमानतळावर समक्ष बघण्याचा आनंद या विद्यार्थ्यांनी घेतला, तसेच दिल्ली, बेंगलोर आदी ठिकाणाहून आलेल्या 180 सिटर विमानांचे लँडिंग तसेच टेकअप बघण्याचा चा आनंदही या विद्यार्थ्यांनी यावेळी अनुभवला ,त्याचबरोबर या विमानतळावरील स्वच्छता, शिस्त, सुरक्षा याविषयी येथील अधिकारी वर्गाकडून जाणून घेत या विमानतळा प्रमाणेच नेहमीच स्वच्छता राखण्याची मनोमन शपथही या विद्यार्थ्यांनी यावेळी घेतली, या छोट्याशा चिमुकल्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेशात पाहून दूरदूरहून विमानाने आलेल्या  प्रवाशांनी व  जाणाऱ्या येणाऱ्या साईभक्तांनी या मुलांबरोबर फोटो काढले, हितगुज साधले ,मुलांना चॉकलेट, खाऊ देण्यात आला, यावेळी विमानतळावर जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती बाबासाहेब दिघे ,जिल्हा परिषद सदस्य आशाताई दिघे ,,पत्रकार राजेंद्र गडकरी , भाजयुमोचे   तालुका अध्यक्ष रावसाहेब एखंडे यांनी व विमानतळ अधिकाऱ्यांनी या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे यावेळी स्वागत व कौतुकही केले, ही सहल यशस्वी करण्यासाठी या शाळेचे शिक्षक संदीप घोलप सर सोमनाथ वाबळे सर, सोनम रा मॅडम आदींनी विशेष परिश्रम घेतले ,

एकरूखे (वार्ताहर)- पत्नीच्या चारित्र्यावर संयश घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी दांड्याने प्रहार करुन तिला जिवे ठार मारले. तसेच मृतदेह पोत्यात भरुन तो निर्जनस्थळी नेऊन त्यावर पेट्रोल टाकून तो पेटवून दिला. ही घटना शनिवारी रात्री राहाता तालुक्यातील एकरुखे येथे घडली. हे कृत्य केल्यानंतर पती सुनील जनार्धन लेंडे हा राहाता पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने स्वतःहून केलेल्या कृत्याची माहिती पोलिसांना दिली आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी)शहरातून जाणार्‍या-येणार्‍या प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटमार करणार्‍या टोळीला कोतवाली पोलिसांनी गजाआड केले आहे. कय्युम काझी कुरेशी (वय- 23 रा. बाबा बंगाली, नगर), सद्दाम मोहम्मद अली (वय- 23 रा. झेंडीगेट, नगर), मोईन बादशहा शेख (वय- 20 रा. भोसले आखाडा, नगर), मुसेफ नासीर शेख (वय- 20 रा. मुकुंदनगर) असे अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक व्हिस्टा कार, एक मांझा कार, सहा मोबाईल, चाकू असा 11 लाख, 46 हजार 500 रूपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget