Latest Post

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेतर्फे जिल्हा भरात 10 ते 15 फेब्रुवारी दरम्यान उर्दू सप्ताह मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. याची सांगता आज शनिवारी 15 फेब्रुवारी उर्दू दिनी शहरात उर्दू जुलूस काढून करण्यात आली. या उर्दू जुलूस मध्ये शहरातील नऊ उर्दू माध्यमाच्या शाळांचे तीन हजार विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक सहभागी झाले होते. खासदार गोविंदराव आदिक उर्दू हायस्कूलच्या प्रांगणात समारोपाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी शाळेचे स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष अॅड. जयंत चौधरी होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक मुक्तार शहा. कलीमभाई कुरेशी, रज्जाकभाई पठाण, हाजी जलील काझी, विषय तज्ञ शाहीन अहमद,मुख्याध्यापिका जबीनखान, परवीन शेख, जैद मिर्झा, नसीम शेख, मोहम्मद ईमदादुल्लाह, नाझिया शेख, मजीद बागवान, अस्मा शेख तसेच मोहम्मद उमर बागवान, वसीम अहमद,मुद्दस्सर सय्यद,अल्ताफ शाह,एकबाल काकर, फिरोज पठाण, मोहम्मद आसिफ आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना अहमदनगर जिल्हा साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष, शिक्षक बँकेचे संचालक व नगरपालिका शाळा क्रमांक पाच चे मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांनी सांगितले की उर्दू साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी अहमदनगर जिल्ह्यात ऊर्दू सप्ताह साजरा करण्यात येतो. देशभरात असा सप्ताह साजरा करणारी अहमदनगर उर्दू साहित्य परिषद ही एकमेव संस्था आहे. यावर्षी जिल्ह्यातील 87 शाळांनी या उर्दू सप्ताहामध्ये सहभाग घेतला. वेगवेगळे कार्यक्रम व स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये उर्दू भाषेचे महत्व व इतिहास, गीत, गजल गायन, हस्ताक्षर स्पर्धा, प्रश्नमंजुषा, उर्दू जुलूस असे कार्यक्रम जिल्हाभर घेण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील 15000 उर्दू विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. पुढील महिन्यांमध्ये राज्यस्तरीय ऊर्दू शिक्षण परिषद श्रीरामपूर येथे घेण्यात येणार असून सर्वसहभागी शाळांना सन्मानचिन्ह व गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 नगरसेवक मुक्तार शहा यांनी उर्दू साहित्य परिषदेच्या सर्व उपक्रमांना शुभेच्छा देऊन उर्दू भाषेची गोडी ही मनावर भुरळ पाडणारी असून ही गोडी वाढावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. अॅड. जयंत चौधरी यांनी व्हाट्सअप च्या एका मेसेजवर जिल्हाभरांमध्ये हा सप्ताह साजरा झाला, ही एक फार मोठी बाब असून याच पद्धतीने उर्दु शाळांमधून वेगवेगळे कार्यक्रम घेऊन चांगले व दर्जेदार विद्यार्थी घडविण्याचे आवाहन त्यांनी केले . उर्दू सप्ताहमध्ये सहभागी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांचा साहित्य परिषदेतर्फे सत्कार करण्यात आला. शहरातील विविध मार्गावरून हा जुलूस नगरपालिका परमवीर शहीद अब्दुल हमीद नगर पालिका शाळा क्रमांक पाच च्या प्रांगणात विसर्जित झाला. रस्त्यात ठिकठिकाणी जूलूसचे स्वागत करण्यात आले. उम्मती फौंडेशनतर्के जुलूस मधील सहभागी विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप सोहेल बारूदवाला व त्यांच्या सहकार्‍यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकबाल काकर, मोहम्मद आसिफ, उमर बागवान, वसीम अहमद आदींनी केले. आभार अल्ताफ शाह यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच एजाज चौधरी,  साबिर शाह,  अरबाज पठान, शाहनवाज,  युवराज पाटील, सुयोग सस्कर, शहजाद शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.

राहुरी (प्रतिनिधी) राहुरी तालुक्यातील एका शिक्षण मंडळाशी संबंधित असलेल्या एका शाळेत काल व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशीच शिक्षक-शिक्षिकेच्या घडलेल्या ‘नाजूक’ प्रकरणामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शाळेला टाळे ठोकून संताप व्यक्त केला. दरम्यान, वरिष्ठांनी या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेऊन मुख्याधिकार्‍यांसह संबंधित शिक्षक आणि शिक्षीकेची बदली केली आहे.या शिक्षक प्रेमीयुगुलावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.ही घटना व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशीच झाल्याने याबाबत चर्चेला उधाण आले आहे. घटनेची माहिती समजताच नगरपालिकेच्या तीन नगरसेवकांनी शिष्टाई करून पोलीस अधिकार्‍यांच्या मध्यस्थीने शाळेचे टाळे उघडण्यास सांगितले. या शिक्षण मंडळाच्या शाळेत गेल्या महिन्याभरापासून शिक्षक व शिक्षिकेमध्ये नको ते प्रकार घडत असताना शाळेतील विद्यार्थ्यांनी दैनंदिन शाळेच्या दुपारच्या सुट्टीत होत असलेला हा ‘आँखो देखा हाल’ काही पालकांना सांगितला. त्यावर या घटनेबाबत काल शुक्रवार दि.14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजे दरम्यान संतप्त पालकांनी शाळेत येऊन टाळे ठोकले. या प्रकरणामुळे परिसरात सर्व नागरिक व महिलांनी गर्दी केली. शाळेला टाळे ठोकल्याने सर्वच विद्यार्थी शाळेच्या बाहेरच ताटकळत उभे होते.ही घटना समजताच राहुरी नगरपालिकेचे नगरसेवक दिलीप चौधरी, सूर्यकांत भुजाडी, नंदकुमार तनपुरे, टाकळीमिया येथील सुरेश निमसे आदींनी धाव घेत प्रकरणाचे गांभीर्य समजावून घेत गटशिक्षण अधिकारी सुलोचना पटारे, पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांना पाचारण केले. उपस्थितांनी शाळेला टाळे ठोकणार्‍या पालकांची समजूत काढून शिक्षण अधिकारी पटारे यांनी या शिक्षक व शिक्षिकेवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने या प्रकरणावर तात्पुरता पडदा टाकण्यात आला आहे. दरम्यान या संबंधित शिक्षक आणि शिक्षिकेची बदली करण्यात आली आहे. तसेच मुख्याध्यापकांवरही दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेऊन त्यांचीही बदली करण्यात आली आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी) पकडलेला वाळुचा ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी राहुरी तालुक्यातील लाख गावच्या तलाठ्याला 20 हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. परशुराम गोरक्षनाथ सूर्यवंशी (वय- 46 सजा- लाख ता. राहुरी, रा. मुसळवाडी ता. राहुरी) असे पकडलेल्या तलाठ्याचे नाव आहे.सूर्यवंशी याने 2 ऑगस्ट 2019 रोजी एक वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला. तो राहुरी तहसील कार्यालयात आणून लावला. तेव्हा पासून पकडलेला ट्रॅक्टर तहसिलच्या आवारातच उभा होता. ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी सूर्यवंशी याने ट्रॅक्टर मालकाकडे 40 हजार रूपयांची मागणी केली. तडजोडीअंती 20 हजार रूपयांची मागणी करून टॅक्टर सोडून देण्याचे ठरले.याबाबत ट्रॅक्टरच्या मालकाने नगरच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. शुक्रवारी (दि. 14) प्रवरा नदीच्या किनारी जातप गावच्या शिवारात तक्रारदार यांच्यकडून 20 हजार रूपयांची लाच घेताना सूर्यवंशी याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक हरीष खेडकर, पोलीस निरीक्षक श्याम पवरे, पोलीस निरीक्षक दीपक करांडे यांनी केली.

बुलढाणा - 14 फेब्रूवारी
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी 13 फेब्रुवारी रोजी बुलडाणा येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयाची अचानक पाहणी करुन जप्त केलेला गुटखा तपासन्याचे आदेश दिले होते त्यानुसार आज शुक्रवारी सकाळ पासून बुलडाणा पोलीसाने आपले काम सुरु करत जप्त करण्यात आलेल्या गुटख्याचे एकुन एक बैग व त्यामधील पाकीट खोलून मोजनी सुरू केली जे रात्री 9 वाजे पर्यंत सुरु होती.जप्त करण्यात आलेला गुटखा गोदामातून चोरी गेल्याची बातमी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांना लागताच त्यांनी हे पाऊल उचलले. 
      बुलढाणा येथील अन्न व औषध प्रसासन कार्यालयाची कार्यप्रणाली मागील काही महिन्या पासून संशयास्पद व विवादित आहे. राज्यात गुटख्यावर प्रतिबंध असल्यानंतर ही जिल्ह्यात सरेआम तो उपलब्ध होता आणि या विभागाच्या मेहेर नजर खालीच जिल्ह्यात मोठे गुटखा माफिया तयार झालेत आणि बुलढाणा जिल्हा हा अवैध गुटक्याचे माहेरघर म्हणून ओळखले सुद्धा जाऊ लागले. मागील दोन महिन्यात एक नव्हे तर दोन वेळी बुलडाणा अन्न व औषध प्रशासन कर्यालयाच्या गोदामातून जप्त केलेला गुटखा चोरी गेला आहे. ही घटना जरी चोरीची असली तरी तेव्हडीच संशयास्पद सुद्धा आहे. या घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिनांक 13 फेब्रुवारी रोजी बुलडाणा येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयाची पाहणी केली व गोदामातुन गुटखा चोरी प्रकरणी त्यांनी पोलीसांना यासंदर्भात तात्काळ पंचनामा करून कारवाई करण्याचे निर्देश दिले तसेच पोलीसांकडून संपूर्ण कारवाई होईपर्यंत सदर कार्यालयाला सील लावावे व जप्त करून ठेवण्यात आलेल्या गुटखा गोडावून वर पोलीसांची तैनाती ठेवावी असे निर्देष दिले होते.या नंतर पोलीसाने हा कार्यालय आपल्या ताब्यात घेतला व आज साकाळी ठानेदार प्रदीप सालूंके आपल्या स्टॉफ सह एपीआई पवार, पीएसआई अमित जाधव आणि इतर 15 ते 20 कर्मचारी यांनी साठवून ठेवलेल्या गुटख्याची झडती घेणे सुरू केले. संध्याकाळ होत असतांना एसडीपीओ रमेश बरकते सुद्धा हजर झाले.वृत्त लिहेपर्यंत रात्री उशिरा ही कारवाई सुरूच होती.जिल्ह्यात मागील काही महिन्यात किती कारवाया झाले व त्यात किती गुटखा पकडला व प्रत्यक्षात किती गुटखा मिळून आला याची वजा बेरीज सुरु होती.आता पोलिसच्या अहवालात काय समोर येईल याच्यावर सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

संगमनेर | प्रतिनिधी गावठी बनावटीचे पिस्तुल व 38 जिवंत काडतुसे बाळगणार्‍या तिघांना शहर पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर रायतेवाडी शिवारात करण्यात आली.दिलीप कोंडीबा खाडे (वय 28, रा. म्हस्के बुद्रुक ता. शिरुर, जि. पुणे), बाबाजी बबन मुंजाळ (वय 27, रा. डोंगरगाव ता. शिरुर, जि. पुणे), दयानंद मारुती तेलंग (वय 33, रा. टाकळीहाजी, ता. शिरुर) असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.हे तिघे जण त्यांच्या ताब्यातील स्कॉर्पिओ चारचाकी वाहन क्रमांक एम. एच.14 ए. व्ही. 3600 मधून प्रवास करत होते. दरम्यान शहर पोलिसांनी रायतेवाडी शिवारात त्यांचे वाहन अडवून त्यांना पकडले.त्यांच्याजवळ एक गावठी पिस्तुल व 38 जिवंत काडतुसे मिळून आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे करत आहे.

बुलडाणा - 13 फेब्रूवारी
मागील दोन महिन्यात एक नव्हे तर दोन वेळी बुलडाणा अन्न व औषध प्रशासन कर्यालयाच्या गोदामातून जप्त केलेला गुटखा चोरी गेला याची गंभीर दखल घेत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आज 13 फेब्रुवारी 2020 रोजी स्वत: बुलडाणा येथील प्रशासकीय इमारतीत असलेल्या सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन कार्यालयाची पाहणी करीत संपूर्ण विभागाची झाडाझडती घेतली. 
       यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी आता पर्यंत कारवाईमध्ये जप्त करून ठेवलेल्या गुटखा गोदामची ही पाहणी केली व आता पर्यंत किती कारवाया केले व किती गुटखा जप्त केला याची संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.तसेच याबाबतची संपूर्ण तपशील सादर करण्याचा सूचना त्यांनी संबंधीतांना दिल्या.जप्त गुटखा प्रकरणी तपशील सादर न केल्यास संबंधीतांवर कठोर कारवाई करण्याची तंबीही पालकमंत्री यांनी दिली.गोदामातुन गुटखा चोरी प्रकरणी त्यांनी पोलीसांना यासंदर्भात तात्काळ पंचनामा करून कारवाई करण्याचे निर्देश दिले. यावेळी गोदामात 22 लाख रूपयांचा गुटखा व सुगंधीत तंबाखू असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.पोलीसांकडून संपूर्ण कारवाई होईपर्यंत सदर कार्यालयाला सील लावावे व कारवाई पुर्ण होईपर्यंत गुटखा गोडावून, सहाय्यक आयुक्त कार्यालयात पोलीसांची तैनाती ठेवावी. संपूर्ण प्रशासकीय इमारतीला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही यावेळी पालकमंत्री यांनी दिले.  याप्रसंगी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.पालकमंत्री डॉ.शिंगणे यांची ही अनअपेक्षित भेटीमुळे संपूर्ण प्रशासकीय इमारतीत असलेले सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी घाबरले होते.

शिर्डीत गुरुवारी रात्रि सर्व शांत झोपेत असतान्ना पिम्पलवाडि रोड होटेल संजीवनी समोर शिर्डी येथील माजी नगरसेवक राजेंद्र शिन्दे याण्चा मूलगा श्रीकांत राजेंद्र शिंदे याने विठल मोरे राहनार येवला हल्ली राहनार शिर्डीतिल कुप्रसिद्ध ठिकान  कालिका नगर येथील विठल साहेबराव मोरे याला इनोवा mh17 1100  ह्या गाड़ीने उडविले प्रथम आलेल्या माहीतीतुन हत्या झाली आहे असे  उघड़ झाले आहे  परंतु हे खरे आहे की खोटे आजूण स्पष्ट झाले नाहि कारण पोलिस आजुन तपास करित आहे थोड्याच वेळात निष्पन्न होईल मात्र याची उलट सुलट चर्चा साध्या शिर्डीत सुरु आहे

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget