Latest Post

 दरोडेखोरांच्या टोळीतील ३जण जेरबंद
अहमदनगर - संगमनेर येथे दुकान बंद करून सरफा हा सोन्या-चांदीच्या दागिन्यांची बँग घेऊन जात असताना, त्याच्याकडील ती बँग बळजबरीने चोरुन नेत असतना मदतीसाठी आलेल्याची गोळी घालून खून करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळी स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी (दि.९) जेरबंद केली. दरोडेखोरांच्या टोळीतील तिघांना पकडण्यात आले असून अन्य तिनजण फरार झाले आहेत.आरोपी गणेश राजेंद्र गायकवाड (वय ३३, रा.घुलेवाडी एरिगेशन काँलनी, ता.संगमनेर), याला घुलेवाडी येथे सापळा रचून पकडले. त्याच्या कडे चौकशी केली असता, त्याने आरोपी दीपक विनायक कोळेकर (वय ३४, रा.सिडको त्रिमूर्ती, नाशिक, ह.मु.बुधवार पेठ पाण्याच्या टाकीजवळ, नाईकवाडी, नाशिक), आरोपी भरत विष्णु पाटील (वय २६, रा.पचवंटी गंगा, नाशिक) याची माहिती दिली. त्यानुसार एलसीबी पथकाने नाशिक शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन त्याचा पाठलाग करून पकडले. उर्वरित आरोपी अविनाश जगन्नाथ मारके (रा.घुलेवाडी, ता.संगमनेर), समाधान कुंडलीक गोडसे (रा.परीते सोलापूर ह.मु.वाघोली, पुणे) व निलेश (पूर्ण नाव माहीत नाही) याचा मुंबई, कर्जत (रायगड), पुणे, सोलापूर येथे जाऊन पोलिसांनी तपास केला परंतु ते मिळून आले नाहीत.एलसीबीचे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि संदीप पाटील, शिशिरकुमार देशमुख, पोहेकाँ मनोज गोसावी, दत्तात्रय हिंगडे, पोना सुनील चव्हाण, शंकर चौधरी, आण्णा पवार, संतोष लोंढे, सचिन अडबल, संदिप कर्डीले, विशाल दळवी, दीपक शिंदे, रवी सोनटक्के, विनोद मासाळकर, मेघराज कोल्हे, संदीप घोडके, ज्ञानेश्वर शिंदे, राहुल सोळुंके, चापोना बबन बेरड, चापोकाँ सचिन कोळेकर, संभाजी कोतकर, बाळासाहेब भोपळे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

शिरसगाव[वार्ताहर]जागतिक संविधान व संसदीय संघ श्रीरामपूर मुख्यालय यांच्या वतीने आयोजित केलेल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मान्यवर सदस्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे टपाल तिकीटाचे अनावरण गिनीच बुक ऑफ रेकोर्ड होल्डर डॉ.बाळासाहेब मुंगसुळे,नगराध्यक्षा अनुराधा आदिक,डब्लूसीपीए अध्यक्ष दत्ता विघावे,विष्णू वाघ,नगरसेवक राजेंद्र पवार आदींच्या हस्ते करण्यात आले.प्रास्तविक अध्यक्ष दत्ता विघावे,भाऊराव माळी यांनी केले त्यावेळी लवकरच स्व.खा.गोविंदराव आदिक यांच्या पोस्ट टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात येईल असे दत्ता विघावे यांनी सांगितले.सुनील पवार-धार्मिक सामाजी,क्रीडा,संगीता रामटेके-सामाजिक क्रीडा,बाबासाहेब जाधव-क्रीडा शिक्षण प्रशिक्षण,सौजन्या क्षीरसागर-शिक्षण व सामाजिक,दीपक राजगुरू-क्रिकेट समालोचक,सांस्कृतिक,ऐतिहासिक वस्तू संग्रह,कविता आटोळे-साहित्य सामाजिक,प्रिया मुपडे-आरोग्य,सामजिक,शकुंतला
सारडा-चित्रकारिता नक्षीकाम,मेहंदी,कलाकुसर,साहित्य,भाऊराव माळी-सामाजिक सांस्कृतिक,प्रा.शैलेंद्र भणगे,-साहित्य,शिक्षण सामाजिक,डॉ दादाराव म्हस्के,-कला,साहित्य,शिक्षण,संगीत,ऋषिकेश विघावे-शासकीय क्रिकेट ३२ सामन्यात पंचगिरी,जागतिक विक्रम,संजय कोळेकर-सामाजिक या मान्यवर व जागतिक संविधान व संसदीय सदस्यांना सन्मानार्थ पोस्टाचे टपाल तिकीट अनावरण करून सोबत सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.यावेळी सामजिक कार्यकर्ते प्रा.कैलास पवार पुणे यांची सदस्यपदी नियुक्ती प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.यावेळी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी या संस्थेमार्फत सुरु असलेल्या चांगल्या उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.प्रारंभी दिप्रज्वलन न करता मान्यवरांनी तुळशीरोपास जलसमर्पण करून वेगळा आदर्श दिला.कारण पर्यावरणास तुळशी झाडापासून ऑक्सिजन मिळत असल्याने तो एक फायदा आहे.व महत्व आहे.दि १५ फेब्रु.रोजी खासदार सुप्रिया सुळे,जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्रीताई घुले,नगर विकास मंत्री प्राजक्त तनपुरे,आदी मान्यवर श्रीरामपूर येथे विकास कामांचा शुभारंभासाठी येणार आहेत असेही नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी सांगितले.प्रमुख अतिथी डॉ बाळासाहेब मुंगसुळे,प्रा.डॉ दादाराव म्हस्के,विष्णू वाघ यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.यावेळी सदस्य बाबासाहेब चेडे,भीमराज बागुल,प्रा.कैलास पवार,सी के भोसले,अंबादास राउत,सुनील पवार,आदी मान्यवर उपस्थित होते.सूत्र संचालन प्रसन्ना धुमाळ व आभार प्रदर्शन भाऊराव माळी यांनी केले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) शहर व तालुक्यातील मतदान अधिकारी म्हणून काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांनी मतदार याद्यांचे पडताळणीचे काम नाकारून जिल्हा समन्वय समितीच्या निर्देशानुसार या कामावर बहिष्कार घातला होता. त्यामुळे प्रांताधिकारी अनिल पवार यांनी तालुक्यातील या बीएलओचे काम करणाऱ्या शिक्षकांना कारवाईच्या नोटिसा दिल्या होत्या. त्या नोटिशीला आज तालुक्यातील सर्व नियुक्त बीएलओ शिक्षकांनी तहसील कार्यालयामध्ये उपस्थित राहून लेखी उत्तर दिले. त्यामुळे तहसील कार्यालयामध्ये शिक्षकांची जत्रा भरली होती. यामध्ये महिला शिक्षकांची संख्याही लक्षणीय होती.
 केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या राज्यात मतदार याद्यांचे पडताळणीचे काम सुरू असून सदरचे काम 31 मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. यासाठी जिल्हाभरातील प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्त्या गावोगावी करण्यात आलेल्या आहेत. परंतु सदर कामामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे व हे काम खूप किचकट असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार इतर 12 खात्यातील लोकांनादेखील नियुक्‍त्या देण्यात याव्यात व शिक्षण हक्क कायद्यानुसार आम्हाला आमचे शैक्षणिक काम करू द्यावे यासाठी जिल्हा समन्वय समितीने जिल्हाभर या कामावर बहिष्कार घातला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील शिक्षकांनी देखील या कामावर बहिष्कार घातल्यामुळे प्रांताधिकार्‍यांनी 31 जानेवारी रोजी तालुक्यातील सर्व बीएलओ म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांना कामामध्ये हलगर्जीपणा व टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवून कारवाईच्या नोटिसा दिल्या होत्या. त्याला आज जिल्हा समन्वय समितीच्या निर्देशानुसार सर्व बीएलओ शिक्षकांनी तहसील कार्यालयात उपस्थित राहून वैयक्तिक खुलासे सादर केले. सदर खुलासामध्ये नोटीशीमध्ये दिलेले सर्व आरोप नाकारण्यात आले असून आरटीईनुसार शिक्षकांना फक्त निवडणूक, जनगणना व आपत्कालीन कामे करण्याची तरतूद आहे. तसेच सदरचे काम दीर्घकालीन असल्यामुळे अध्यापनाचे कार्य करणे अवघड होणार आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षक सोडून इतर खात्यातील कर्मचारी हे प्रत्येक गावात उपलब्ध आहेत. त्यांना हे काम द्यावे तसेच उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार सदरचे काम न करणाऱ्या शिक्षकांबाबत कोणत्याही प्रकारची सक्ती न करता काम न करणाऱ्या शिक्षकांवर कोणती कारवाई करू नये अशी मागणी या खुलासा मध्ये करण्यात आलेली आहे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने धुळे जिल्ह्यातील एका याचिकेवर याबाबत तीन दिवसापूर्वी निर्णय देताना शिक्षकांना या कामाची सक्ती करता येणार नाही असे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या आंदोलनाला बळ प्राप्त झाले असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्राथमिक शिक्षकांना या कामातून वगळले आहे .त्याप्रमाणे श्रीरामपूर व जिल्ह्यात सुद्धा अशाच प्रकारे प्राथमिक शिक्षकांना या कामातून मुक्त करून त्यांना ज्ञानदानाचे कार्य करू द्यावे अशी अपेक्षा सर्व बीएलओ शिक्षक, शिक्षिकांनी व्यक्त केली आहे. यावेळी श्रीरामपुर तालुका समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेलापूर(वार्ताहर)सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या प्रभु श्रीराम मंदिराच्या समितीचे विश्वस्त म्हणुन अहमदनगर जिल्ह्यातील ,श्रीरामपूर तालुक्यातील  बेलापूरचे भूमिपुत्र स्वामी गोविंददेव गिरी यांची केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे.
अयोध्येतील रामजन्मभूमी येथील मंदिर उभारणीचा मार्ग जवळपास पाचशे वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मार्गी लागला. लवकरच अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीच्या कामाला सुरुवात होणार आहे. या मंदिराच्या विश्वस्तांची घोषणा आजच केंद्र सरकारने केली. त्यात बेलापूर येथील  राष्ट्रसंत स्वामी पंडित गोविंददेव गिरि यांच्या नावाचा समावेश झाल्यामुळे बेलापूरात फटाके फोडुन मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला 
त्यांचा जन्म बेलापूर येथे १९४९ मध्ये व्यास परिवारात झाला.  ११ वी पर्यंत शिक्षण जे टी एस् हायस्कूल मधे झाले. कांची कामकोटीचे शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती यांचेकडून स्वामींनी अनुग्रह घेतला. तसेच स्वामी सत्यमित्रानंद महाराज यांच्याकडून संन्यास दिक्षा घेतली.भागवत, रामायण, महाभारत, श्रीमदभगवद्गीता आणि अन्य धर्मग्रंथांचे देश विदेशात प्रबोधन करून संपूर्ण आयुष्य राष्ट्रधर्म आणि अध्यात्मासाठी समर्पित केले आहे. स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक प. पू. पांडुरंग शास्त्री आठवले यांचे विद्यार्थी व प्रज्ञाचक्षु प. पू. मुकुंदकाका जाटदेवळेकर यांचे ते सहयोगी आहेत.त्यांच्या धार्मिक कार्याची केंद्र सरकारने दखल घेतली आहे.
त्यांच्या नियुक्तीने बेलापूरला थेट देशपातळीवर सन्मान मिळाला आहे. ही बातमी समजताच जिल्ह्यात ठिकठिकाणी आनंद व्यक्त करण्यात आला.त्याप्रीत्यर्थ पेठेतील बालाजी मंदिरापुढे फटाके वाजविण्यात आले.या वेळी पंडीत महेश व्यास रणजीत श्रीगोड  दिलीप दायमा दिलीप काळे रमेश बैरागी रवि कोळपकर ओमप्रकाश व्यास आदिसह नागरीक उपस्थित होते

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) राज्याचे महसूल मंत्री, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व जिल्ह्याचे सुपुत्र नामदार बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस असून शहरांमध्ये पहिल्यांदा त्यांना शुभेच्छा देणारे फलक मोठ्या प्रमाणावर झळकले आहेत. त्यामुळे तो शहरात एक चर्चेचा विषय झाला आहे. आमदार लहू कानडे यांच्या पुढाकाराने शहराच्या विविध भागांमध्ये नामदार बाळासाहेब थोरात यांना शुभेच्छा देणारे फलक लागले आहेत. यापूर्वीसुद्धा थोरात यांचे वाढदिवस जिल्ह्यात आणि संगमनेर मध्ये मोठ्या उत्साहात साजरे झाले आहेत. परंतु श्रीरामपुरात पूर्वी त्यांचे असे आणि एवढे फलक कधी लागले नव्हते. यापूर्वी बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे काँग्रेस पक्षात असताना माजी आमदार जयंत ससाणे व भाऊसाहेब कांबळे हे विखे गटाचे म्हणून संबोधले जात होते. कै. ससाणे यांनी दोन्ही नेत्यांशी वैयक्तिक संबंध चांगले ठेवलेले होते .तरीपण थोरातांच्या वाढदिवसाचे फलक कधीच श्रीरामपुरात लागले नाहीत.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी करण ससाणे यांना थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी बसवले मात्र विखे यांच्या दबावापोटी पंधरा दिवसातच त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. एवढेच नव्हे तर ससाणे गटाने लोकसभेला  सदाशिव लोखंडे यांचे उघडपणे काम केल्यामुळे  भाऊसाहेब कांबळे यांचा दारुण पराभव झाला. त्यानंतर विधानसभेच्या वेळी विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला मात्र ससाणे गटाने त्यांची साथ सोडून पुन्हा थोरात गटाशी समझोता केला व काँग्रेस पक्षाचे उमेदवार लहू कानडे यांचा हिरीरीने प्रचार करून त्यांना निवडून आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे वारे वाहत असून करण ससाणे यांना जिल्हा बँकेची उमेदवारी मिळणार आहे. जिल्हा बँकेत थोरात गटाचे वर्चस्व असल्यामुळे व पंचायत समितीमध्ये ससाणे गटाच्या वंदना मुरकुटे यांना साथ न देता विखे यांनी संगीता शिंदे यांना सभापती केल्याने सध्या ससाणे गट व विखे गटात दुरावा निर्माण झाला आहे. त्यामुळे देखील ससाणे गटाने थोरात गटाशीजवळीक साधली असल्याची चर्चा शहरांमध्ये आहे. आमदार लहू कानडे यांनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून बाळासाहेब थोरात यांचा विश्वास संपादन केला असून कानडे यांना उमेदवारी देण्यामध्ये थोरात यांचा प्रमुख सिंहाचा वाटा आहे. तसेच कानडे यांना निवडून आणण्यासाठी थोरात व आमदार सुधीर तांबे यांनी श्रीरामपूर मतदारसंघांमध्ये जातीने लक्ष घातले होते .त्यामुळे कानडे यांनी आपले नेते म्हणून थोरात यांचा वाढदिवस तालुक्यामध्ये दिमाखात साजरा करण्याचे ठरवून शहरासह तालुक्यात विविध गावांमध्ये देखील थोरात यांचे वाढदिवसाचे फलक लावले आहेत. बाळासाहेब थोरात एक शांत, संयमी व सुसंस्कृत नेतृत्व म्हणून राज्यात परिचित आहेत. त्यांचे नेतृत्व ससाणे व लहू कानडे यांनी मान्य केल्यामुळे श्रीरामपूरच्या विकासाला देखील आता थोरात यांचा हातभार लागेल. त्यांचे मामा कै. अण्णासाहेब शिंदे व रावसाहेब शिंदे यांच्यामुळे देखील थोरात यांचे श्रीरामपूर शी जुने ऋणानुबंध आहेत. त्यांचा शहरात चाहता वर्ग देखील आहे. त्याचबरोबर शहरातील थोरात यांना मानणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी आज त्यांचा वाढदिवस दिमाखात साजरा करण्याचे नियोजन केले आहे.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- बेलापूर  श्रीरामपूर रस्ता हा कचरा डेपो बनला असुन कचर्या बरोबरच मृत जनावरे देखील  या ठिकाणी आणुन टाकल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असुन असे प्रकार करणार्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे                श्रीरामपूर  बेलापूर रस्त्यावर  इतर ठिकाणाहुन ओला सुका कचरा आणून टाकला जात आहे त्यामुळे रस्त्याने ये जा करणारांना नाक दाबुनच रस्ता पार करावा लागत आहे त्यातच आणखी भर पडली आहे ती मृत जनावरांची मृत झालेली जनावरे रसवंती गृहांच्या पुढे असणार्या मोकळ्या जागेत टाकली जातात त्यामुळे अतिशय दुर्गंधी सुटलेली असते श्रीरामपूर  बेलापूर रस्ता नेहमी गजबजलेला असतो बेलापूरचे नागरीक देखील सतत या रस्त्याने ये जा करत असतात परंतु अशी घाण उघड्यावर टाकणाराला कुणीही जाब विचारण्याची हिंमत केली नाही दिवसेंदिवस हे प्रकार वाढतच चालले असुन या प्रकारामुळे हा रस्ता कचरा डेपोच बनला आहे वन खात्याने अपार मेहनत घेवुन  रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली ऐन उन्हाळ्यात ते जगविले परंतु काही लोकांनी ते वृक्ष  पेटवुन दिले व वाळल्यानंतर तोडून नेले या बाबत देखील नागरीकांनी आवाज उठविणे गरजेचे आहे          या ठिकाणी  कचरा टाकू नये असे फलक बेलापूर ग्रामपंचायतीच्या वतीने जागोजागी लावण्यात आलेले आहेत तरी देखील काही लोक त्या फलका जवळच कचरा मेलेली जनावरे टाकत आहे ही खेदाची बाब आहे बेलापूरचे नागरिक दररोज या रस्त्याने ये जा करतात त्यांना कुणाला अशा प्रकारे कचरा टाकणारा आढळल्यास बेलापूर  ग्रामपंचायतीशी संपर्क  साधावा     राधाताई बोंबले सरपंच  बेलापूर बु "

अहमदनगर (प्रतिनिधी) लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे व्हिडीओ (चाईल्ड पोर्नोग्राफी), फोटो, मजकूर समाज माध्यमावर टाकून प्रसिद्ध करून व्हायरल करणार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचा शोध सायबर पोलीस घेत आहेत. या गुन्ह्यांत जिल्ह्यातील तीन जणांना अटक करण्यात आली आहे.केतन बाळासाहेब मुंगसे (वय- 21 रा. वळदगाव, ता. श्रीरामपूर), नामदेव तुकाराम शेळके (वय- 59 रा. संगमनेर), सागर सुरेंद्र राऊत (वय- 29 रा. कुंभारगल्ली, जामखेड), अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी सायबर सेलचे पोलीस हवालदार अरुण सांगळे यांनी फिर्याद दिली आहे.सायबर क्राईमचे पोलीस निरीक्षक अरुण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोपींना अटक करण्याची कामगिरी झाली. गेल्या आठवड्यात राहुरीतील एक व भिंगारमधील एक अशा दोन तरुणांना अटक करण्यात आली होती. श्रीरामपूर, संगमनेर, जामखेडमधून तिघांना अटक करण्यात आली आहे. सायबर सेल जिल्ह्यातील 11 व्यक्तींचा शोध घेत आहे.समाजमाध्यमावर लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे व्हिडीओ (चाइल्ड पोर्नोग्राफी), फोटोची तांत्रिक माहिती नॅशनल क्राईम ब्युरोने संकलित केली आहे. एनसीआरबीकडून ही माहिती सायबरला मिळाली असून गेल्या पाच महिन्यात राज्यभरात 1700 अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये नगर जिल्ह्यातील 16 जणांच्या आयपी अ‍ॅड्रेसवरून अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याचे समोर आले आहे. यापैकी आत्तापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तर, बाकी 11 लोकांचा शोध सायबर सेल घेत आहे. इंजिनीअर, कर्मचारी अन् दुकानदार.श्रीरामपूरमधून अटक करण्यात आलेला तरुण इंजिनीअर असून एका ठिकाणी नोकरीला आहे. संगमनेरमधून 59 वर्षीय व्यक्तीला पकडण्यात आले असून, ही व्यक्ती एका साखर कारखान्यामध्ये नोकरीला आहे. जामखेडमधील दुकानदाराला पकडण्यात आले असून त्यांचे मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget