बेलापूर ( प्रतिनिधी )- बेलापूर श्रीरामपूर रस्ता हा कचरा डेपो बनला असुन कचर्या बरोबरच मृत जनावरे देखील या ठिकाणी आणुन टाकल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असुन असे प्रकार करणार्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे श्रीरामपूर बेलापूर रस्त्यावर इतर ठिकाणाहुन ओला सुका कचरा आणून टाकला जात आहे त्यामुळे रस्त्याने ये जा करणारांना नाक दाबुनच रस्ता पार करावा लागत आहे त्यातच आणखी भर पडली आहे ती मृत जनावरांची मृत झालेली जनावरे रसवंती गृहांच्या पुढे असणार्या मोकळ्या जागेत टाकली जातात त्यामुळे अतिशय दुर्गंधी सुटलेली असते श्रीरामपूर बेलापूर रस्ता नेहमी गजबजलेला असतो बेलापूरचे नागरीक देखील सतत या रस्त्याने ये जा करत असतात परंतु अशी घाण उघड्यावर टाकणाराला कुणीही जाब विचारण्याची हिंमत केली नाही दिवसेंदिवस हे प्रकार वाढतच चालले असुन या प्रकारामुळे हा रस्ता कचरा डेपोच बनला आहे वन खात्याने अपार मेहनत घेवुन रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली ऐन उन्हाळ्यात ते जगविले परंतु काही लोकांनी ते वृक्ष पेटवुन दिले व वाळल्यानंतर तोडून नेले या बाबत देखील नागरीकांनी आवाज उठविणे गरजेचे आहे या ठिकाणी कचरा टाकू नये असे फलक बेलापूर ग्रामपंचायतीच्या वतीने जागोजागी लावण्यात आलेले आहेत तरी देखील काही लोक त्या फलका जवळच कचरा मेलेली जनावरे टाकत आहे ही खेदाची बाब आहे बेलापूरचे नागरिक दररोज या रस्त्याने ये जा करतात त्यांना कुणाला अशा प्रकारे कचरा टाकणारा आढळल्यास बेलापूर ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा राधाताई बोंबले सरपंच बेलापूर बु "
Post a Comment