Latest Post

गंगापूर (प्रतिनिधी)- मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या श्रीरामपूर आणि गुरूधानोराचे दरोडेखोर व गंगापूर पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत पोलिसांनी हवेत गोळीबार केला. यावेळी दरोडेखोरांनी पोलिसांवर केलेल्या दगडफेकीमध्ये पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे हे जखमी झाले असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही घटना औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर भेंडाळ्याजवळ घडली.मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास महामार्गावर पाच दरोडेखोर घातक शस्त्रांसह दरोडा घालण्याच्या हेतूने फिरत असल्याची माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार गंगापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली महामार्गाकडे धाव घेतली. पोलिसांची चाहूल लागताच पाच दरोडेखोरांनी अंधाराचा फायदा घेत पोलिसांच्या पथकावर दगडफेक करून हल्ला चढवला. या वेळी पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांना दगडाचा मार लागल्याने ते जखमी झाले.
(पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे)
त्यामुळे सुरवसे यांनी त्यांच्या सर्व्हिस पिस्टलमधून दोन राउंड हवेत गोळीबार केल्यानंतर दरोडेखोरांनी मिळेल त्या दिशेने पळायला सुरुवात केली. त्यातील एक दरोडेखोर गंगापूरकडे जाणार्‍या अंतापूर शिवाराच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. इतर आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. या वेळी अटक केलेल्या दरोडेखोराचे नाव अमोल सोपान पिंपळे (19) असून त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या इतर साथीदारांची नावे दादा गोविंद साळुंके (रा. खोकर), साजन पवार (रा. टाकळीभान, ता. श्रीरामपूर), आदित्य शामराव पवार (गुरुधानोरा, ता. गंगापूर) व सागर अशी आहे. आरोपीकडून दोन चोरीच्या मोटारसायकल, एक सत्तूर, दोर असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये पोलिस निरीक्षक एम.डी सुरवसे यांच्यासोबत पीएसआय अर्जुन चौधर, पीएसआय रामहरी चाटे, पोहेका जितेंद्र बोरसे, विजय भिल्ल, भागचंद कासोदे, बंडू कुचेकर, चालक दत्तात्रय गुंजाळ व चालक शेख रिझवान इब्राहिम यांनी सहभाग घेतला.

बुलडाणा - 2 फेब्रूवारी
पोलीस महासंचालक यांच्या एका पत्रा मुळे संपूर्ण बुलडाणा पोलीस दल सद्या हादरलेला आहे,,त्याचा कारणी ही तसाच आहे,एका एपीआय वर कार्यवाही करत त्यांना निलंबन नाही तर सरळ सेवामुक्त करण्यात आले आहे.
     बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात कार्यरत एपीआय करुणाशील तायडे यांना सेवामुक्त करण्याचा आदेश राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या कडून 2 दिवस अगोदर बुलडाणा एसपी कार्यालायात धळकला आहे. या बाबत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्याशी माहिती घेतली  असता त्यांनी सेवामुक्तची कार्यवाहीचा दुजोरा देत ते म्हणाले की एपीआय तायडे बुलडाणा येण्या अगोदर ज्या ठिकाणी ते कार्यरत होते तिथे त्यांच्या वर सदर कार्यवाही प्रस्तावित होती.या बद्दल अधिक माहिती घेतली असता एपीआय करुणाशील तायडे हे नांदेड रेल्वे पोलीस मध्ये कार्यरत असतांना त्यांच्यावर काही आरोप होते त्याची कार्यालयीन चौकशी सुरु होती व शेवटी त्यांना सेवामुक्त करण्यात आले आहे.
     तर दूसरी कडे पोलीस दलात अशी चर्चा रंगत आहे की पोलीस विभागातील अंतर्गत वादा मुळे नांदेड येथे एका पीआई ने "चिंदी का सांप" करुण एपीआय करुणाशील तायडे यांचा बळी घेतला आहे.या कार्रवाई विरोधात तायडे गृह विभागात दाद मागणार असल्याचे कळते.

अहमदनगर - ३०७, ३५३, ३४ कलमान्वये दाखल गुन्ह्यातील फरारी आरोपीस पकडण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. शंकर अशोक पंडित (वय३४, रा.काटवन खंडोबा, अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर शहरातील पुणे बसस्थानक परिसरात ३०७,३५३,३४ कलमान्वये दाखल गुन्ह्यातील फरारी आरोपी शंकर पंडित येणार असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पो. उप.नि शिरसाट यांना मिळली. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार सापळा रचून पोना एस.जी.चव्हाण, गणेश धोत्रे, तागड, पोकाँ एस व्ही वाघेला, सुजय हिवाळे, संदीप थोरात आदिंच्या पथकाने मोठ्या शिताफीने आरोपी पंडित याला ताब्यात घेतले.

सिल्लोड,  : तालुक्यातील भराडी येथील ज्ञानविकास विद्यालयात अंतराळवीर कल्पना चावला यांच्या स्मुर्ती दिनानिमित्त शनिवारी माता पालक मेळावा घेण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. या मेळाव्याला जिल्हा परिषद सदस्या सौ .शिल्पाताई अशोक गरुड, लताबाई केरे यांच्यावरील चित्रपटाचे छायाचित्रकार प्रतीक कचरे, सहाय्यक दिगदर्शक संदीप सिद्धांम, श्रीनिवास चारी, भगवान केरे, सरपंच शारदाताई महाजन, पोलिस पाटील यमुनाबाई राकडे, अंगणवाडी पर्यवेकशिका सुनीता सनान्से, रुपाली सोनवणे, रोहिणी देशमुख, सायली गरुड, नलिनी देशमुख आदिंची प्रमुख उपस्थिती होती. मी काल ही संघर्ष केला, आजही माझा संघर्ष सुरूच आहे आणि पुढेही माझ्या जिवनात असाच संघर्ष सुरू असेल. प्रयत्नांना वयाचे कोणतेही बंधन नसते. त्यामुळे जिंकणे चिरतरुण आहे. एक मुंगी सुद्धा प्रचंड समुद्र पार करून जाऊ शकते आणि हे सामर्थ्य तुमच्यातही आहे, असा सल्ला उपस्थित विद्यार्थी व माता- पालक यांना पुढे बोलताना लताबाई केरे यांनी दिला.
  मेळाव्याचे प्रास्ताविक संगीता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन संजना साखला यांनी केले तर आभार अनिता टाकळकर यांनी मानले.
लताबाई केरेंवर चित्रपट
  पतीच्या उपचारासाठी लागणाऱ्या 5 हजार रुपयांसाठी वयाच्या 61 वर्षी सन 2013 मध्ये बारामतीत शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत लताबाई केरे धावल्या होत्या. अंगावर नऊवारी साडी, डोक्यावर पदर आणि कडाक्याच्या थंडीत अनवाणी पायांनी धावणाऱ्या लताबाई करे यांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांचावर आधारीत चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

           

बेलापूर  (प्रतिनिधी  )-  अशोकनगर तालुका श्रीरामपूर येथील रयत शिक्षण सस्थेचे भास्करराव गलांडे पाटील विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीच्या अध्यक्ष पदी सोपानराव राऊत यांची  बिनविरोध निवड करण्यात आली तर शालेय व्यवस्थापण समिति अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते श्री भागचंद नवगिरे यांची निवड करण्यात आली आहे या नियुक्तीचे पत्र शाळेचे मुख्याद्यापक मा. वाघमारे यांनी दिले  राऊत व नवगीरे यांच्या निवडी बद्दल   गोराने बाबा,पत्रकार देविदास देसाई  भारत वैरागळ, दादासाहेब कापसे, कृष्णा बडाख, संताजी ठोसर, सूरज दोडके, व शाळेचे सर्व शिक्षक वृंद आदिंनी अभिनंदन केले आहे .

बुलडाणा - 31 जानेवारी
वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजूराच्या लहान मुलाचा अपघाती निधन झाल्याची घटना काल 30 जानेवरीला दुपारी घडली आहे. अंगावरून रिक्षा गेल्याने बालकाचा उपचारा पूर्वीच दुर्दैवी निधन झाला.
     बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात अनेक भागात वीट भट्टया आहे.आपला व आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाह साठी अनेक मजूर आपल्या परिवारा सह वीट भट्टयावरच राहतात.राजुर गावा जवळ एका वीट भट्टीवर पुन्हई या गावातील किसन शिंदे काम करतो व त्याचा परिवार ही याच भट्टीवर राहतो.30 जानेवारीला दुपारी किसन शिंदेचा 6 वर्षीय मुलगा सुधीर हा माती वाहून नेणाऱ्या रिक्षात बसला होता व तोल जाऊन तो खाली पडला व रिक्षा त्याच्या अंगावरुन गेला,त्याला तात्काळ बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आनले पन डॉक्टरने त्याला मृत्यु घोषित केले. या प्रकरणी बुलडाणा शहर ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे.मोताळा तालुक्यात शासकीय नियमानना धाब्यावर बसवून सर्रास वीट भट्टे सुरु आहे आहे.तहसीलदार व खनिकर्म विभागाने या कडे लक्ष देने गरजेचे आहे.

बुलडाणा - 31 जानेवारी
वन्य प्राण्यांची शिकार करून त्याचा मांस विक्री केला जात आहे.एका ठिकाणी रानडुक्करचे मांस असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने वन विभागाच्या पथकाने धाड टाकून 2 लोकांना ताब्यात घेतले त्यांच्या कडून रानडुक्करचे मांस जप्त करण्यात आले आहे तर हे पथक कार्यवाही करत असतांना इतर 2 लोकांनी वन पथकाला लोटपाट करीत शिविगाळ केल्याची घटना आज 31 जानेवारीला ग्राम मोहेगांव येथे घडली आहे.
     मोताळा तालुक्यातील मोहेगांव येथील काही लोक रानडुक्करची शिकार करुण त्याचा मांस विकतात अशी गुप्त माहिती मिळाल्याने संजय एन.माळी उपवनसंरक्षक बुलडाणा, रंजित गायकवाड सहाय्यक वनसंरक्षक, (प्रादेशिक व कॅम्पा) बुलडाणा यांच्या मार्गदर्शनात आर.बी.कोंडावार वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) मोताळा, यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह 31 जानेवारीला मोहेगाव येथील अनिल मलचंद चव्हाण व दरबार भोंद पवार यांच्या राहत्याघरुन धाड टाकली असता घरातून वन्यप्राणी रानडुक्करचे मास आढळुन आले. सदर मास जप्त केलेले असुन आरोपी नामे अनिल मलचंद चव्हाण व दरबार भोंदु पवार दोन्ही रा.मोहेगाव यांच्या विरोधात  वन्यजिव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9,39,43,44,48,49,50,51
अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले.दोन्ही आरोपींना मा.न्यायालय, मोताळा समक्ष हजर केले असता दि. 3 फेब्रूवारी पर्यंत वनकोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास व्ही.डी. सानप, राजुर वर्तुळ अधिकारी करत आहेत. सदर कार्यवाहीत धनंजय पोटे, व्ही. डी. सानप, पी. पी. मुंढे,ए. एन. सपकाळ,एस. पी. कुशोड,एस. के. घुगे, अहीरे, संतोष जाधव व वाहन चालक यांचा समावेश होता. 

*शासकीय कामात अडथळा*

मोहेगांवात वन विभाग सदर कार्यवाही करीत असतांना संजय शंकर जाधव व सागर संतोष राठोड यांनी वन अधिकारी व कर्मचारी यांच्याशी आरेरावी व शिवीगाळ करीत लोटपोट केली व शासकीय कामात अडथळा आनला म्हणुन या दोघांच्या विरुद्ध पोलिस स्टेशन बोराखेडी येथे शासकिय कामी अडथळा निर्माण केल्याची फिर्याद दाखल केली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget