Latest Post

नवी दिल्लीः तिहार तुरुंगात बंदिस्त असलेल्या निर्भयाच्या चार दोषींच्या सुरक्षेवर दररोज जवळपास 50 हजार रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावत फासावर लटवण्याचा आदेश दिल्यानंतर त्यांच्यावर एवढा खर्च करण्यात येत आहे. तुरुंगाच्या बाहेर 32 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले असून, फाशी देण्यासह इतर कामांवरही पैसे खर्च होत आहेत. सुरक्षा कर्मचाऱ्याची प्रत्येक दोन तासांनी शिफ्ट बदलली जात आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांना आराम मिळावा आणि चोख सुरक्षा व्यवस्था राबवावी, यासाठी जेल प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.चारही दोषींना तिहार तुरुंगातील जेल नंबर 3मध्ये वेगवेगळ्या सेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. प्रत्येक दोषीच्या बाहेर दोन सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. प्रत्येक दोन तासांनी या सुरक्षा कर्मचाऱ्यांना थोडी विश्रांती दिली जाते. शिफ्ट बदलल्यानंतर दुसरे सुरक्षा कर्मचारी त्यांच्याजागी पाठवले जातात. प्रत्येक कैद्यासाठी 24 तास आठ-आठ सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामाला लावण्यात आलं आहे. चार कैद्यांसाठी जवळपास 32 सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. ते 24 तासांत 48 तास शिफ्टमध्ये काम करत आहेत. या दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्याच्या आधी त्यांना इतर कैद्यांबरोबर ठेवण्यात येत होते. परंतु न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर ते कैदी आत्महत्या करू नये, तुरुंगातून पळून जाऊ नये,  यासाठी कैद्यांच्या सुरक्षेवर खर्च करण्यात येत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातूनही त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे.  1 फेब्रुवारीला होणार फाशीया दोषींना 1 फेब्रुवारीला फाशी देण्यात येणार असून, 30 जानेवारीला जल्लादला बोलावण्यात आलं आहे. जेणेकरून जल्लाद फाशी देण्याचं प्रात्यक्षिक करू शकेल. बुधवारी पवन आणि विनय या दोघांच्या कुटुंबीयांनीही तुरुंग प्रशासनाची भेट घेतली आहे.

नेवासा (का. प्रतिनिधी)- नेवासा-राहुरी तालुक्याच्या सिमेवर असलेल्या राहुरी तालुक्यातील मांजरी येथे सराफ दुकान असलेल्या सराफ व्यावसायिकाचा त्याच्या नेवासा तालुक्यातील खेडलेपरमानंद या गावी मंगळवारी सायंकाळी घरी परतत असताना चोरट्यांनी डोळ्यात मिरचीपूड टाकून लाखो रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने लुटल्या प्रकरणी काल सोनई पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याबाबत निखील बाळासाहेब आंबिलवादे (वय 21) धंदा-सराफ दुकान रा. खेडलेपरमानंद ता. नेवासा यांनी काल दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, मांजरी येथील त्यांचे ‘गुरुकृपा ज्वेलर्स’ हे दुकान सायंकाळी बंद करून 200 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 760 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असे 7 लाख 90 हजार 778 रुपये किंमतीचे दागिने चेनीच्या बॅगमध्ये भरुन त्यांच्याकडील स्कूटरवरून खेडलेपरमानंद येथे घरी परतत असताना पानेगाव ते खेडलेपरमानंद रस्त्यावर पानेगाव शिवारात सायंकाळी साडेसहा वाजता काळ्या रंगाच्या युनिकॉर्न गाडीवरील चालक व त्याच्याबरोबरील अन्य तीन अनोळखी चोरटे यांनी त्यांना रस्त्यात थांबण्यास सांगितले व पत्ता विचारण्याचा बहाणा केला.त्यांच्या डोळ्यात मिरचीची पुड टाकून फिर्यादीच्या पाठिवरील सोन्या चांदीच्या दागिन्यांची बॅग ओढून जबरीने चोरुन घेवून गेले. त्यानंतर बाळासाहेब आंबिलवादे यांनी जखमी अवस्थेत मांजरी येथील ओम मल्टीस्पेशालिटी दवाखान्यात उपचार घेतले व बुधवार दि. 22 रोजी रात्री पावणेआठ वाजता सोनई पोलीस ठाण्यात येवून फिर्याद दाखल केली.सोनई पोलिसांनी फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टर फर्स्ट 23/2020 भारतीय दंड विधान कलम 394, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे करत आहेत.चोरट्यांनी लुटलेले दागिने,ने (200 ग्रॅम- 7 लाख 60 हजार रुपये)- पावत्याप्रमाणे एकूण 200 ग्रॅम वजनाच्या दागिन्यांमध्ये सोन्याचे 3 नेकलेस, कानातील (इअरींग) जोड, कुडके पुडी, टॉपजोड, रिपेरिंगचे गंठण, लहान गंठण, डिस्को बाळ्यांची पुडी, फॅन्सी गोल रिंगांची पुडी, सटुबाई व बाळ्यांची पुडी, लहान बाळांच्या अंगठ्या, ठुशी, गोल व खरबुजे आकाराचे मिक्स मणी, डोरले, रेग्युलर जेन्टस्, लेडीज अंगठ्या, लेडीस पेन्डल्स इत्यादी. या सर्व दागिन्यांवर इंग्रजीत डीबीए असे शिक्के आहेत. सन 2019 मधील खरेदी पावत्याप्रमाणे प्रति ग्रॅम प्रमाणे सोन्याची किंमत असलेले.चांदी ( 760 ग्रॅम- 30 हजार 778 रुपये) पायातील जोडवी, कडे, वाळे, चांदीच्या सरी, बाहुटी, तोरडी (पैंजण), चांदीचे गणपती, लक्ष्मी, सरस्वतीच्या लहान मुर्त्या, चांदीच्या जोडव्याचे मध्यभागी आतील बाजूस इंग्रजीतून डीबीए असा छाप व पैंजणावर इंग्रजीतून डीजी-1 असा छाप असलेले दागिने.

औरंगाबाद /प्रतिनिधी ÷ फिरोज शेख ÷  आज दि रोज धावत्या स्कूल बस मध्ये मतिमंद मुली चा विनयभंग करून विडीऔकिल्प वायरल झाल्याची घटना औरंगाबाद येथे काही दिवस आगोदर घडली या घटनेनंतर पुर्ण महाराष्ट्र भर संताप व्यक्त करण्यात आला आहे पुर्ण औरंगाबाद शहर व ग्रामीण भागात पुर्ण शाळा , कॉळेज मध्ये जाऊन स्कूल बस चालक व मालक बस ची पहाणी करण्यात येत आहे व पुर्ण चालकांनी चारित्र्य पडताळणी करणे आवश्यक आहे या पुढे पुन्हा विद्यार्थीचा छळ होईल आशा घटना टाळण्यासाठी विविध उपयोजना करण्यास सूचना दिल्या व पुर्ण गाडी चे कागदपत्रे हे ही पुर्ण कमप्लेट ठेवावीत  तसेच आज बेगमपुरा पोलिस हद्दीत येणार्या ऑक्स्फर्ड व किड्स आय टी वल्ड होणाजी नगर येथे पोलिस उप निरीक्षक एस. सानप व आदी पोलिस कर्मचारी व  अक्षदा मॅडम खुडे   
तबरेज खान सर योगेश जाधव सर आदी मान्यवर व स्कूल बस चालक व मालक व पालक मोठ्या संख्येने  उपस्थित होते

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- मार्क वाढवुन देण्यासाठी विद्यार्थीनी कडे शरीर सुखाची मागणी करणार्या नराधम प्राध्यापका विरूध्द अखेर विनयभंग तसेच अँट्राँसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आसुन शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणार्या या घटनेचा सर्वच स्तरातुन तिव्र संताप व्यक्त केला जात आहे येथील बारावीच्या वर्गात शिकणार्या एका विद्यार्थीनी कडे बाबुराव पांडुरंग कर्णे रा श्रीरामपूर या नराधम शिक्षकाने शरीर सुखाची मागणी केली यामुळे ती विद्यार्थीनी घाबरली घरी ती रडत असाताना पालकांनी तिला विश्वासात घेवुन विचारले असता बाबुराव कर्णे या प्राध्यापकाने मार्क वाढवुन देण्यासाठी शरीर सुखाची मागणी केली असुन मागणी पुर्ण केली तर
आयुष्य बरबाद होते अन पुर्ण केली नाही तर वर्ष बरबाद होते काय करावे हे त्या विद्यार्थीनीला समजेना त्यामुळे ती फार घाबरली ही घटना गावात समजताच ग्रामस्थ पालक वर्गातुन तिव्र संताप व्यक्त झाला सकाळी १० वाजताच ग्रामस्थ शाळेत जमा झाले सदर शिक्षकाला निलंबीत करा त्याच्यावर गुन्हा दाखल करा त्याला गावकर्याच्या ताब्यात द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली त्या वेळी काहींनी वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे शाब्दिक चकमकी पण झाल्या चार पाचशे ग्रामस्थ घोषणा देत शाळेतुन पोलीस स्टेशनला गेले त्या ठिकाणी अनेकांनी आपल्या भाषणातुन चिड व्यक्त केली त्यानंतर पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट तेथे आले ग्रामस्थांचा त्या शिक्षका बद्दल रोष लक्षात घेवुन त्यांनी संबधीतावर कारवाई करण्याचे अश्वासन देवुन गाव बंद ठेवु नका ठोस कारवाई करतो असे अश्वासन दिले त्यानंतर बाबुराव पांडूरंग कर्णेयाचे विरुध्द भादवि कलम ३५४ अ तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याबद्दल अँट्राँसिटी अँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

श्रीरामपूर (प्रतिनिधी )  विद्यार्थी जीवनामध्ये खेळांना अतिशय महत्व असून श्रीरामपूर शहरातून क्रीडाक्षेत्रातील चांगले खेळाडू निर्माण व्हावेत. मुलांमधील क्रीडा गुणांना उत्तेजन देण्यासाठी क्रीडा महोत्सव आवश्यक असून नगर पालिका शाळा क्रमांक पाच शिक्षणाच्या सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. खेळाडू व खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मी सर्वतोपरी मदत करीन असे प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष तथा नगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक हाजी अंजूमभाई शेख यांनी केले.
पालिकेच्या परमवीर शहीद अब्दुल हमीद नगरपालिका डिजिटल उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन नगरसेवक अंजुमभाई शेख, ताराचंद रणदिवे, मुक्तार शहा, नगरसेविका समीना शेख, जायदाबी कुरेशी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रज्जाक पठाण, कलीम कुरेशी, ॲड शफी अहमद शेख, अॅड. कलीम शेख, शिक्षण मंडळाचे लिपिक किशोर त्रिभुवन, आदींच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सोहेल बारूदवाला,  डॉ. तोफिक शेख, फिरोज पोपटीया, जमील शहा, शाहरुख बागवान, साबिर मिस्तरीअमिन शेख, बाळासाहेब सरोदे, तरन्नुम मुनीर शेख, युनूस सत्तार शेख, हाजी इब्राहिम शाह पोस्टमन आदींसह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पूर्वी शहरातील सर्व नगरपालिका व खाजगी शाळांच्या क्रीडा स्पर्धा घेतल्या जात होत्या. मात्र गेल्या काही वर्षापासून या स्पर्धा बंद झाल्यामुळे शहरातील विविध शाळांतील खेळाडूंना प्रोत्साहन व उत्तेजन मिळणे दुरापास्त झाले होते. यासाठी शाळा क्रमांक पाचच्या शाळा व्यवस्थापन समितीने पुढाकार घेऊन शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळा पातळीवर क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले. या महोत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे. वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये धावणे , लिंबू चमचा शर्यत,  स्लो सायकलिंग, गोळाफेक, उंच उडी, लांब उडी आणि सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये कबड्डी, खोखो, लंगडी, संगीत खुर्ची आदि खेळांच्या स्पर्धा घेतल्या गेल्या. शाळा व्यवस्थापन समितीतर्फे विजेत्या सर्व मुलांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक तथा शिक्षक बॅंकेचे संचालक सलीमखान पठाण यांनी केले. सूत्रसंचालन आसिफ मुर्तुजा तर आभार फारुक शहा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एजाज चौधरी, युवराज पाटील, सुयोग सस्कर, यास्मिन शेख तसेच वहिदा सय्यद, नसरीन इनामदार, शाहीन शेख, आसमा पटेल निलोफर शेख, बशीरा पठाण, मिनाज शेख, सदफ शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले.

शिर्डी प्रतिनिधि पाथरीकरांनी साईबाबांचा  जन्मस्थान पाथरी येथे सांगून वादाला सुरुवात केली आहे साइबाबान्नि संपूर्ण हयातीत कधीच जातपात सांगितली नाही कधीच आपन कुठ जन्माला आलो असे कधीच कोनाला सांगितले नाही साईबाबाह्या संताने सर्वांना सर्वधर्मसमभाव शिकवण दिली त्यांच्या मुखातून कायम अल्ला मालिक अल्ला भला करेगा रामजी भला करेगा असे निघत असे अश्या सन्ताबाबत पाथरीकरांनी जे विष पेरले त्या विरोधात तमाम साइभक्ताण्णी नाराजगि व्यक्त केली पाथरीकरांनी आधी राष्ट्रपती यांना खोटे सांगितले त्यानंतर उद्धव ठाकरे यांना खोटेनाटे सांगून त्यांच्या तोंडून वदूण घेतले असता आजूणच वाद वाढत गेला त्याचा परिणाम शिर्डी बंद पर्यंत झाला शिर्डीच्या ग्रामस्थांनी शिर्डी बंद पुकारला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डीतील साईभक्त ग्रामस्थांना मुंबई येथे चर्चे साठी दुपारी मंत्रालयात बोलवले आहे त्यातून तोडगा निघनारच असल्याने व साइभक्तान्चे होत असलेले  हाल पाहून बंद असलेले व्यवहार  पुन्हा चालू करण्याचे एकमताने ठराव केला आहे परंतु आज होणाऱ्या बैठकीत जर तोडगा निघाला नाही  तर पुन्हा शिर्डीकर शांत बसणार नाहीत पुढच्या काळात ह्या पेक्षा अधिक  तीव्र आन्दोलन केले जाईल. आज मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत शिर्डीतील शिष्टमंडळ जाणार आहे ह्या शिष्टमंडळात  कैलासबापू कोते
कमलाकर कोते
विजय जगताप
नितिन उ, कोते
जगन्नाथ सु. गोंदकर
विजय तु. कोते
दत्तात्रय कोते
सुजित ज्ञा. गोंदकर
सुनिल भा. गोंदकर
रमेशभाऊ गोंदकर
दिपक वारूळे
शब्बीर सय्यद
प्रमोद गोंदकर
संजय शिंदे
सचिन पा.कोते
अभय शेळके
सुधाकर शिंदे
ज्ञानेश्वर गोंदकर
बाबासाहेब कोते
गणीभाई पठाण
दत्तात्रय गोविंद कोते
जितेश लोकचंदानी
मंगैश त्रिभुवन
अशोक बा.गोंदकर
प्रमोद आहेर
नवनाथ दिघे
महेंद्र शेळके
राजेंद्र भा.गोंदकर
रतिलाल लोढा
संदिप पारख
अशोक पवार
रविंद्र गोंदकर
सचिन शिंदे
विनायक रत्नपारखी
रमेश बिडये
पोपट शिंदे
हरिश्चंद्र कोते
सचिन चौगुले
सलिम पठाण
नसिर दारूवाले
सलिम शेख
गफार पठाण
गोपीनाथ गोंदकर
नितीन शेळके
अशोक खं.कोते
आप्पासाहेब कोते
विनायक कोते
राजेंद्र शिंदे
गणेश कोते
उत्तमराव कोते
एकनाथ गोंदकर
सुनील सो. बारहाते

*पंचक्रोशीतील शिष्टमंडळ*
राजेंद्र चौधरी
कैलास कातोरे
भानुदास कातोरे
गणेश आगलावे
संदिप वाबळे
फकीरा लोढा
शरद मते
विजय कातोरे
अशोक धनवटे
नितीन कापसे हे असतील आज होणाऱ्या बैठकीत सर्वांचे लक्ष लागले आहेत.

शिरसगाव[वार्ताहर]येथील ग्रामीण साहित्यिक प्रा.डॉ बाबुराव दत्तात्रय उपाध्ये यांना “विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान”चा महाराष्ट्र साहित्यरत्न पुरस्कार जाहीत झाला असून हा पुरस्कार रविवार दि ३० जानेवारी रोजी रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.श्रीरामपूर येथील बोरावकेनगरमधील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचा दुसरा वर्धापन दिन ३० जानेवारी रोजी श्रीरामपूर आगाशे सभागृह  येथे सकाळी १०-३० वा. आयोजित करण्यात आला आहे.त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संस्थापक साहेबराव घाडगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान उपाध्यक्ष डॉ राजीव रावसाहेब शिंदे,यांच्या अध्यक्षतेखाली विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.प्रतिष्ठान संस्थापक सुखदेव सुकळे लिखित”समर्पित प्रकाशयात्री”या चिंतनात्मक चरित्रग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.या ग्रंथात सुखदेव सुकळे यांनी आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड,डॉ बाबुराव उपाध्ये,माजी प्राचार्य टी इ शेळके,यांचा चरित्रात्मक शब्दवेध घेतलेला आहे.डॉ उपाध्ये यांनी ७ ओगस्ट १९८४ ते ३० जून २०१७ या ३३ वर्षे काळात रयत शिक्षण संस्थेच्या सातारा,पुणे,कर्जत,श्रीरामपूर शाखेत मराठी प्राध्यापक म्हणून काम केले.विविध वाड:मय प्रकारात ३० पुस्तके प्रसिद्ध असून त्यांना आतापर्यंत ३३ पुरस्कार मिळाले आहेत.ते पुणे विद्यापीठाचे मराठी विषयाचे एम फील/पी एच डी चे नार्गादर्शक होते.त्यांचे ८ अभ्यासकांनी पी एच डी व १७ अभ्यासकांनी एम फील पदवी प्राप्त केली.त्यांच्या जीवनावर आधारित ६ जीवनग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत.विविध नियतकालिकामध्ये ७५ शोधनिबंध लिहिले असून ते सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बहि:शाल शिक्षण मंडळाचे व्याख्याते म्हणून समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहेत,त्यांनी ६ ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.व ३००० व्याख्याने झाली आहेत.त्यांनी”आईची माया”ही कथा पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात होती.सध्या दोन संदर्भग्रंथ अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत.त्यांना पुरस्कार जाहिर झाल्याने अनेकांनी अभिनंदन केले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget