श्रीरामपूरातून चांगले खेळाडू निर्माण व्हावेत - अंजूम शेख शाळा क्रमांक पाचच्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संपन्न.

श्रीरामपूर (प्रतिनिधी )  विद्यार्थी जीवनामध्ये खेळांना अतिशय महत्व असून श्रीरामपूर शहरातून क्रीडाक्षेत्रातील चांगले खेळाडू निर्माण व्हावेत. मुलांमधील क्रीडा गुणांना उत्तेजन देण्यासाठी क्रीडा महोत्सव आवश्यक असून नगर पालिका शाळा क्रमांक पाच शिक्षणाच्या सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. खेळाडू व खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मी सर्वतोपरी मदत करीन असे प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष तथा नगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक हाजी अंजूमभाई शेख यांनी केले.
पालिकेच्या परमवीर शहीद अब्दुल हमीद नगरपालिका डिजिटल उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन नगरसेवक अंजुमभाई शेख, ताराचंद रणदिवे, मुक्तार शहा, नगरसेविका समीना शेख, जायदाबी कुरेशी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रज्जाक पठाण, कलीम कुरेशी, ॲड शफी अहमद शेख, अॅड. कलीम शेख, शिक्षण मंडळाचे लिपिक किशोर त्रिभुवन, आदींच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सोहेल बारूदवाला,  डॉ. तोफिक शेख, फिरोज पोपटीया, जमील शहा, शाहरुख बागवान, साबिर मिस्तरीअमिन शेख, बाळासाहेब सरोदे, तरन्नुम मुनीर शेख, युनूस सत्तार शेख, हाजी इब्राहिम शाह पोस्टमन आदींसह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पूर्वी शहरातील सर्व नगरपालिका व खाजगी शाळांच्या क्रीडा स्पर्धा घेतल्या जात होत्या. मात्र गेल्या काही वर्षापासून या स्पर्धा बंद झाल्यामुळे शहरातील विविध शाळांतील खेळाडूंना प्रोत्साहन व उत्तेजन मिळणे दुरापास्त झाले होते. यासाठी शाळा क्रमांक पाचच्या शाळा व्यवस्थापन समितीने पुढाकार घेऊन शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळा पातळीवर क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले. या महोत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे. वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये धावणे , लिंबू चमचा शर्यत,  स्लो सायकलिंग, गोळाफेक, उंच उडी, लांब उडी आणि सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये कबड्डी, खोखो, लंगडी, संगीत खुर्ची आदि खेळांच्या स्पर्धा घेतल्या गेल्या. शाळा व्यवस्थापन समितीतर्फे विजेत्या सर्व मुलांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक तथा शिक्षक बॅंकेचे संचालक सलीमखान पठाण यांनी केले. सूत्रसंचालन आसिफ मुर्तुजा तर आभार फारुक शहा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एजाज चौधरी, युवराज पाटील, सुयोग सस्कर, यास्मिन शेख तसेच वहिदा सय्यद, नसरीन इनामदार, शाहीन शेख, आसमा पटेल निलोफर शेख, बशीरा पठाण, मिनाज शेख, सदफ शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget