बेलापूर ( प्रतिनिधी )- मार्क वाढवुन देण्यासाठी विद्यार्थीनी कडे शरीर सुखाची मागणी करणार्या नराधम प्राध्यापका विरूध्द अखेर विनयभंग तसेच अँट्राँसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आसुन शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणार्या या घटनेचा सर्वच स्तरातुन तिव्र संताप व्यक्त केला जात आहे येथील बारावीच्या वर्गात शिकणार्या एका विद्यार्थीनी कडे बाबुराव पांडुरंग कर्णे रा श्रीरामपूर या नराधम शिक्षकाने शरीर सुखाची मागणी केली यामुळे ती विद्यार्थीनी घाबरली घरी ती रडत असाताना पालकांनी तिला विश्वासात घेवुन विचारले असता बाबुराव कर्णे या प्राध्यापकाने मार्क वाढवुन देण्यासाठी शरीर सुखाची मागणी केली असुन मागणी पुर्ण केली तर
आयुष्य बरबाद होते अन पुर्ण केली नाही तर वर्ष बरबाद होते काय करावे हे त्या विद्यार्थीनीला समजेना त्यामुळे ती फार घाबरली ही घटना गावात समजताच ग्रामस्थ पालक वर्गातुन तिव्र संताप व्यक्त झाला सकाळी १० वाजताच ग्रामस्थ शाळेत जमा झाले सदर शिक्षकाला निलंबीत करा त्याच्यावर गुन्हा दाखल करा त्याला गावकर्याच्या ताब्यात द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली त्या वेळी काहींनी वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे शाब्दिक चकमकी पण झाल्या चार पाचशे ग्रामस्थ घोषणा देत शाळेतुन पोलीस स्टेशनला गेले त्या ठिकाणी अनेकांनी आपल्या भाषणातुन चिड व्यक्त केली त्यानंतर पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट तेथे आले ग्रामस्थांचा त्या शिक्षका बद्दल रोष लक्षात घेवुन त्यांनी संबधीतावर कारवाई करण्याचे अश्वासन देवुन गाव बंद ठेवु नका ठोस कारवाई करतो असे अश्वासन दिले त्यानंतर बाबुराव पांडूरंग कर्णेयाचे विरुध्द भादवि कलम ३५४ अ तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याबद्दल अँट्राँसिटी अँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
Post a Comment