Latest Post

शिरसगाव[वार्ताहर]श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दिपाली प्रमोद काळे यांना कला,चित्रपट व गृहखात्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल वर्ल्ड पार्लमेंट इंटरनेशनल अवार्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार जागतिक संविधान संसदीय संघ श्रीरामपूर मुख्यालय अध्यक्ष दत्ता विघावे,सचिव भाऊराव माळी,सदस्य बी आर चेडे,भीमराज बागुल,यांनी डॉ दिपाली काळे यांना कार्यालयात प्रदान केला.डॉ काळे यांचे सर्व क्षेत्रात योगदान असते.त्यावेळी डॉ काळे यांनी या उपक्रमाचा गौरव केला.समाजात एकोपा शांतता ठेवावी आदी अनेक उपक्रम यात आहेत.यावेळी डॉ दिपाली काळे यांनी निर्भयासारखे,लहान बालकांवर होणारे वाढते अत्याचारास आळा,पायबंद घालणेसाठी समाजात,महिला बालके,मुली यांना योग्य वेळी प्रबोधन करण्याची गरज आहे अशी चिंता व्यक्त केली.त्यासाठी डॉ दिपाली काळे ह्या पुढाकार घेऊन जागृती निर्माण करणेसाठी विविध शिबिरे घेऊन अगदी पहिलीच्या वर्गापासून बालकअवस्थेतील मुलीना शिबिराव्दारे,विविध संघटना माध्यमातून व स्वत: उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.त्याचे प्रमुख कारण म्हणजे जास्त अत्याचार हे लहान,अज्ञान बालक मुलीमध्ये नातेवाईक,त्यांचे मित्रमंडळ यामुळे व चोकलेट सारखे पदार्थ दाखविले की बालक मुली हे अज्ञान असल्याने अत्याचारास बळी पडतात.असे असल्याचे निदर्शनास येत आहे.लवकरच त्या संदर्भात महिला,मुलीना प्रबोधन करण्यासाठी व अन्याय अत्याचार कमी होणेसाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ दिपाली काळे यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर पदाधिकारी यांचेशी चर्चा करताना सांगितले.डॉ प्रमोद काळे हेही आरोग्याचे गंभीर आजारावर मात करणेसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणार आहेत.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- पोलीस दिनाचे औचित्य साधुन पोलीसांचा सन्मान करणारे बेलापूरगाव हे पहीले गाव असुन पोलीस पत्रकार व ग्रामस्थ यांच्यात विचारांची सांगड असल्यास कुठलीच समस्या उद्भवणार नाही असे मत उपविभागीय पोलीस अधीकारी राहुल मदने यांनी व्यक्त केले .        पोलीस दिनाचे औचित्य साधुन बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच पत्रकार दिनाचे औचित्य साधुन पत्रकारांचा सन्मान तिळगुळ वाटप व वृक्षारोपनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . त्या वेळी ते बोलत होते  .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खटोड पतसंस्थेचे चेअरमन व उपसरपंच रविंद्र  खटोड हे होते . कार्यक्रमास पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट ,वहातुक शाखेचे पोलीस निरीक्षक योगेश देशमुख, पत्रकार अशोक गाडेकर ,जी प सदस्य शरद नवले उपस्थित  होते  श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट म्हणाले की समाजातील सुशिक्षित व सुसंस्कृत माणसांनी स्वतःला शिस्त लावली तर पोलीसांचे काम फार कमी होईल. परतु सुशिक्षित व्यक्तीच समजत असतानाही चुकीची कामे करतात हे दुर्दैव आहे. संयम बाळगा , अहंकार बाजुला ठेवा .माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागले तर सर्व समस्या सुटतील अन पोलीसांचेही काम कमी होईल . असेही ते म्हणाले वहातुक शाखेचे पोलीस निरीक्षक योगेश देशमुख वहातुकीचे नियम पाळा आपल्या चुकीमुळे ईतरांना त्रास अपाय होईल .असे काम करु नका .वहान चालाविताना मोबाईलवर बोलणे टाळा . गाडीचा वेग मर्यादित ठेवा असेही ते म्हणाले या वेळी जि प सदस्य शरद नवले , पत्रकार अशोक गाडेकर , ज्ञानेश गवले  ,विष्णुपंत डावरे आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले  पोलीस दिनानिमित्त हवालदार अतुल लोटके ,पोलीस नाईक गणेश भिंगारदे, पोलीस हवालदार लोंढे ,बाळासाहेब गुंजाळ ,नीखील तमनर , पोपट भोईटे,  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजगुरु  ,वाकचौरे , साळवी  ,हवालदार गुंड , गिरी , लगड , शिरसाठ आदि पोलीसांचा सन्मान करण्यात आला . पत्रकार दिनानिमित्त  प्रा . ज्ञानेश गवले , अशोक गाडेकर ,देविदास देसाई नवानाथ कुताळ, दिलीप दायमा, गोविंद साळुंके ,दिपक क्षत्रीय, अरविंद शहाणे ,सुहास शेलार, विष्णुपंत डावरे, सतिष काळे, अतिष देसर्डा आदिंचा  शाल व गीता ग्रंथ देवुन सत्कार करण्यात आला सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण झालेले भुषण सोमाणी यांचा सत्कार करण्यात आला  ईस्काँनचे किरण गागरे यांच्या वतीने भगवत् गीता ग्रंथ सप्रेम भेट देण्यात आले  या वेळी प्रा अशोक बडधे महेश ओहोळ अमोल गाढे अशोक गवते  तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश कुर्हे ,  गोविंद खरमाळे ,  अकबर टिन, मेकरवाले लहानु नागले ,मोहन सोमाणी आदि उपस्थित होते का कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन देविदास देसाई यांनी केले तर बाळासाहेब गुंजाळ यांनी आभार मानले.

मालेगाव | प्रतिनिधी मालेगाव शहरात पुन्हा गुंडांनी पुन्हा डोके वर काढले असून काही दिवसा पूर्वी एका नगरसेवकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना ताजी असतांना आज गोळीबाराने पुन्हा मालेगाव शहर हादरले आहे .शहरातील भायगाव शिवारातील संविधान नगरमध्ये आज दुपारी अज्ञाताने घरात घुसून एका महिलेवर थेट गोळीबार केला त्यात ज्योती भटू डोंगरे ही महिला जागीच ठार झाली.गोळीबार केल्यानंतर मारेकरी फरार झाला.घटनेची माहिती मिळताचअप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपाधीक्षक शशिकांत शिंदे यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.महिलेवर गोळीबार का करण्यात आला याचा पोलीस तपास करीत आहे.१५ दिवसात दिवसा ढवळ्या गोळीबाराच्या २ घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडून भीती पसरली आहे

अहमदनगर (प्रतिनिधी)  वाळू वाहतूक करणारा डंपर पकडल्यानंतर चालकाकडून पैसे घेऊन सोडून दिल्याचा आरोप असणारे आणि गांजा प्रकरणातील अटक केलेला आरोपी पसार झाल्या प्रकरणी चौघां जणांवर प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी गुरूवारी निलंबनाची कारवाई केली. प्रभाकर भांबरकर, राहुल खरात, राजेश जाधव, किरण बारवकर यांचे निलंबन करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांची नावे आहेत, अशी माहिती कोतवालीचे निरीक्षक विकास वाघ यांनी सांगितले.शहर पोलीस उपाधीक्षक संदिप मिटके यांच्या पथकाने बेकायदेशीर गांजा वाहतूक करणारे दोघांना ताब्यात घेतले होते. मात्र त्यातील एक आरोपी जिल्हा रूग्णालयात उपाचारासाठी दाखल केला होता. तो पोलीस बारवकर यांच्या ताब्यातून पसार झाला. तसेच अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर कोतवालीच्या प्रभाकर भांबरकर, राहुल खरात, राजेश जाधव यांनी पकडला होता. तो डंपर पैसे घेवून सोडून दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या दोन्ही प्रकरणाची प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी गंभीर दखल घेतली. या दोन्ही प्रकरणात दोषी असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांवर त्यांनी निलंबनाची कारवाई केली. त्यानुसार या कर्मचार्‍यांचे आज रात्री उशिरा निलंबनाबाबत आदेश दिले आहेत.

शिर्डी -  श्री.गेणू हे श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाकरीता शिर्डी येथे आले होते. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यांनी त्‍यांचे स्‍वागत करुन सत्‍कार केला. यावेळी संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मॉरिसशचे श्री.जी.ए.गणू, स्‍टर्लिंग प्रकाशनचे अध्‍यक्ष श्री.सुरेंद्र के.घई, राकेश जुनेजा आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना श्री.गेणू म्‍हणाले, मॉरिशस या देशात सुमारे ६० टक्‍के हिंदु लोक वास्‍तव्‍य करतात. तसेच मॉरिशसमध्‍ये सुमारे ५ ते ६ श्री साईबाबांची छोटी- छोटी मंदिरे असून या‍ ठिकाणी भाविक बाबांच्‍या दर्शनाकरीता गर्दी करतात. यामुळे आम्‍ही गंगा लेख येथे श्री साईबाबांचे भव्‍य मंदिर बांधण्‍याचे ठरवले असून यासाठी जागाही निश्चित करण्‍यात आली असल्‍याचे सांगून आज श्री साईबाबांच्‍या दर्शन घेवून अतिशय आनंद झाला असल्‍याचे ही श्री.गेणू यांनी सांगितले.

बेलापुर (-प्रतिनिधी )- शिवसेना खा.संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे  मारून  प्रतिमा दहन केली.               छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांच्याकडे छञपतीचे वंशज असल्याचे पुरावे मागणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात भारतीय जनता पार्टी,शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेलापूर विभाग,छत्रपती तरुण मंडळाच्या कार्यकत्यांनी खा संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडो मारो मारून प्रतिमेचे दहन केले.या वेळी  विष्णुपंत डावरे,भाजपा बेलापूर शहर अध्यक्ष प्रफुल्ल डावरे,संघटन सरचिटणीस पुरुषोत्तम भराटे चिटणीस राकेश कुंभकर्ण युवा मोर्चा अध्यक्ष धनंजय (पप्पु) पोळ  ,राहुल माळवदे,रोहित शिंदे,विकि माळवदे,प्रुथ्वीराज कोळसे,अमोल खैरे,महेश कुंभकर्ण,शुभम् भराटे, स्वप्निल खैरे,सचिन काळे,मनोज माळवदे,अनिकेत भडके,किरण माळवदे,प्रतिक भराटे, तुषार पवार,विकास बोरूडे, सागर ढवळे,प्रकाश जाजु, प्रशांत ढवळे, भास्करराव कोळसे प्रभाकर ढवळे यांच्या सह कार्यकर्त्यांनी खा,राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले

बुलडाणा - 16 जानेवारी
बुलढाणा कारागृहात आज रात्री एका न्यायालयीन बंदिचा मृत्य झाला असून त्यांचा शव पोस्टमार्टम साठी अकोला येथील मेडिकल कॉलेजला रवाना कण्यात आला आहे.
      बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील वार्ड नम्बर 14 मध्ये राहणारे 60 वर्षीय मृतक शालिकराम पांडुरंग उम्बरकर यांच्यावर नांदुरा ठाण्यात वर्ष 2017 मध्ये शेजारी राहनारी एका अल्पवायीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप असल्याने बलात्कार व पोक्सो कायद्या नुसार गुन्हा दाखल झाला होता.आरोपीला नांदुरा पोलीसाने अटक केली व तेव्हां पासून ते न्यायालयीन कस्टडी मध्ये बुलडाणा कारागृहात होते.काल 15 जानेवारीला आरोपी उम्बरकर यांची तब्यत बिघडल्याने त्यांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल कण्यात आले व रात्री त्यांचा निधन झाला.आज दुपारी मा. न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे,उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते,ठानेदार शिवाजी कांबळे,जेलर भामरे नायब तहसीलदार अमरसिंह पवार,पीएसआई करुणाशील तायडे,अमित जाधव यांच्या उपस्थितीत पंचनामा करुण शव पोसटमार्टम साठी अकोला मेडिकल कॉलेज ला पाठविन्यात आले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget