Latest Post

नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींच्या दया याचिकेवर राष्ट्रपतींचा निर्णय येणं अद्याप प्रतिसंख्येत आहे. मात्र, तिहार कारागृहात वातावरण काहीसं बदलेलं आहे. तिहार कारागृहातील निर्भया प्रकरणातील मुकेश सिंह, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि अक्षय कुमार ठाकूर या चौघांना फाशी देण्याबाबत कुणकुण लागली आहे. त्यामुळे या चौघांची झोप उडाली असून भीतीने त्यांनी अन्नपाणी खाणं सोडले आहे. चौघांची उडाली झोप; मारतात फक्त चक्करा निर्भया सामूहिक बलात्कारातील अक्षय, मुकेश आणि मंडोली कारागृहातून तिहार कारागृहात हलविलेला पवन हे तीन दोषींना तिहार कारागृहातील वॉर्ड नंबर - ३ मधील सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. तर चौथा आरोपी विनय याला जेल नंबर - ४ मध्ये ठेवण्यात आले आहे. य सर्वांची झोप उडाली आहे. फाशीची तारीख जवळ येत असल्याने यांच्या मानत भीती निर्माण झाली आहे. हे चौघे आपापल्या सेलमध्ये रात्र - रात्र जागून चक्करा मारत असतात. दोषींना औषाहध देण्यात आले नसून या चौघांना रक्तदाब योग्य राहील अशा पद्धतीचे द्रव आणि घन पदार्थ खाण्यास दिले जात आहेत. दया याचिकेवर अद्याप राष्ट्रपतींकडून अंतिम निर्णय येणे बाकी असून तिहार कारागृहात मात्र फाशीची जागा आणि इतर सामानाची तयारी सुरु झाली आहे. दोषींना १६ डिसेंबर अथवा २९ डिसेंबर (ज्या दिवशी निर्भयाचा मृत्यू झाला) या दिवशी फाशी दिली जाऊ शकते. बक्सर कारागृहातून मागवणार फास बिहार येथील बक्सर मध्यवर्ती कारागृहात फाशीसाठी लागणाऱ्या फास बनविण्याची तयारी सुरु आहे. बक्सर कारागृहातील कैदी हा फास तयार करीत आहेत. २०१३ साली संसदेवरील हल्ल्यातील दोषी मोहम्मद अफजल गुरूला फाशी देण्याचा फास याच कारागृहातून बनविण्यात आला होता आणि नवी दिल्लीच्या तिहार तुरुंगात पाठविण्यात आले होते. यावेळी निर्भयाच्या दोषींसाठी ‘फांसी का फंदा' तयार केला जात असल्याची चर्चा सुरु आहे.उत्तर प्रदेशातून मागवले जाऊ शकतात जल्लाद अधिकाऱ्याने म्हणणे आहे की, तसेही फाशी देण्यासाठी जल्लादाची काही गरज नाही. मात्र, गरज पडल्यास उत्तर प्रदेशातून, महारष्ट्रातू अथवा बंगला येथील जल्लाद बोलावले जाऊ शकतात.

नवी मुंबई : रुपयांच्या बदल्यात कमी किमतीमध्ये डॉलर देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या टोळीतील पाच आरोपींना तुर्भे पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून दोन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. टॅक्सी व रिक्षाचालकांचीफसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.अटक केलेल्या आरोपींमध्ये युसुफ आमिर खान, मोहम्मद इब्राहिम अब्दुल कलाम शेख, शब्बीर शेख, आयरोद्दीन शेख उर्फ छोटू, सलमा युसूफ खान उर्फ मुस्कान यांचा समावेश आहे. आरोपी नवी मुंबई परिसरामध्ये टॅक्सी व रिक्षाचालकांची फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे. रिक्षा व टॅक्सीमधून प्रवास करताना चालकांना २० डॉलरची नोट द्यायचे. याची भारतीय बाजारपेठेमध्ये १४०० रुपये किंमत आहे. आमच्याकडे मोठ्या प्रमाणात डॉलर आहेत; परंतु ते चलनात आणता येत नाहीत. तुम्ही ते चलनात आणून दिलेत तर तुम्हाला १४०० रुपये किंमत असलेली २० डॉलरची नोट ७०० ते ८०० रुपयांमध्ये देऊ, असे सांगितले जात होते. चालकांना एक नोट देऊन त्यांच्या संपर्कात राहत होते. तुम्ही एक ते दोन लाख रुपये देऊन त्याच्या बदल्यात डॉलर घेतले तर तुमचा फायदा होईल, असे सांगितले जायचे. पैसे घेऊन नागरिक आले की, त्यांना बनावट डॉलर देऊन तेथून पळ काढायचे.तुर्भे पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये ७ डिसेंबरला याविषयी गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या पथकाने ८ डिसेंबरला युसुफ खान या आरोपीस अटक केली. त्याची चौकशी केली असता अजून चार जणांचा या टोळीमध्ये समावेश असल्याचे निदर्शनास आले. त्या सर्वांना शिळफाटा परिसरातून अटक केली आहे. आतापर्यंत दोन गुन्हे उघडकीस आले असून, अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या गुन्ह्याचा उलगडा करण्यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्यासोबत सहायक पोलीस निरीक्षक पवन नांदरे, पोलीस नाईक गणेश आव्हाड, नाना इंगळे, अनिता सणस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.फसवणुकीला बळी पडू नका रुपयांच्या बदल्यात कमी किमतीमध्ये डॉलर देण्याचे आमिष दाखविणारी टोळी सक्रिय आहे. अशाप्रकारे आमिष कोणी दाखविले तर त्याला बळी पडू नये.जर कोणी असे आमिष दाखवत असेल तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

राहाता (तालुका प्रतिनिधी)  राहाता पालिकेचे डास प्रतिबंधक फॉगिंग करताना चार जणांना डिझेल व पेट्रोलची अफरातफर करताना प्रभारी आयएएस महिला मुख्याधिकारी यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. 100 दिवसांत दोन लाख 16 हजार रुपयांची अफरातफर केल्याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.ही घटना राहाता शहरात जंगल प्रभागात बुधवारी 10 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक दीपक जग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादी वरून राहाता पोलिसांनी किरण बाळासाहेब थोरात, ललित सुनील निकाळे, अविनाश कैलास निकाळे, सागर राजू कासार या चार जणांना या अफरातफर प्रकरणी तसेच पालिकेचे वाहन घंटा गाडी विना परवानगी स्वत:च्या फायद्यासाठी वापरले म्हणून अटक केली.याबाबतची हकीगत अशी की राहाता पालिकेच्या डास प्रतिबंधक फॉगिंगचे टेंडर एका खाजगी कंपनीला दि 10 जानेवारी 2019 पासून दिले होते. त्यासाठी लागणारे डिझेल व पेट्रोल पालिका पुरवीत होती. विश्वसाने दररोज दिल्या जाणार्‍या पेट्रोल व डिझेलमधे अफरातफर करून टेंडर दिल्यापासून ते 11 डिसेंबर 2019 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत असे 100 दिवसांत डिझेलच्या दोन हजार लिटरचे 1 लाख 36 हजार रुपये व पेट्रोलच्या एक हजार लिटरच्या 80 हजार रुपयांची अशी एकूण 2 लाख 16 हजार रुपयाची अफरातफर केली. तसेच पालिकेच्या मालकीचे वाहन घंटा गाडी विना परवानगीने स्वत:च्या फायद्यासाठी त्याचा वापर केला. या प्रकरणी चौघा जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करन्यात आला असून चारही जणांना अटक करन्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.गेल्या तीन महिन्यापासून राहाता शहरात डेंग्यू मलेरिया, थंडी ताप या साथीच्या रोगाने संपूर्ण राहाता शहराला विळखा घातला असताना शहरात फॉगिंग करावी अशी मागणी केली जात होती; मात्र प्रत्यक्षात औषध फवारणी होत नव्हती. यामुळे शेकडो नागरीक आजारी पडले. हजारो रूपये दवाखान्यात उपचारावर खर्च करावे लागले. या प्रश्नी सर्वच नगरसेवकांनी तक्रारी करूनही पालिका प्रशासन लक्ष देत नव्हते. कधी तरी एखाद्या प्रभागात तात्पुरती फवारणी केली जात असे. मात्र त्यासाठी लागणारे डिझेल व पेट्रोल रोज पालीकेकडून घेतले जात होते.गेल्या आठ महिन्यांपासून पालिकेला मुख्याधिकारी नसल्याने येथे मनमानी कारभार सुरू होता. प्रभारी मुख्याधिकारी पालिकेकडे फिरकत नव्हते. या संधीचे पालिकेच्या काही अधिकारी व पदाधिकारी व ठेकेदार यांनी सोनं करून अनेक वेळी फवारणी न करता रोज डिझेल व पेट्रोल घेऊन अफरातफर केली. नुकत्याच पालिकेत मुख्याधिकारी म्हणून आलेल्या आयएएस महिला अधिकारी यांना संशय आल्याने त्यांनी या फॉगिंग करणार्‍या ठेकेदाराच्या माणसांवर लक्ष ठेवण्यासाठी एक गोपनीय पथक नेमले. सर्व माहिती व काय प्रकार होते हे लक्षात घेऊन सदर महिला अधिकारी यांनी बुधवारी 9:45 वाजेच्या सुमारास ज्या परिसरात औषध फवारणी सुरू होती तेथे पथकासह जाऊन ही चोरी पकडली. सदर कारवाईचे सर्व नगरसेवक व नागरीकांची स्वागत केले असून कर्तव्यदक्ष महिला अधिकारी असीमा मित्तल यांचे अभिनंदन केले आहे.

नाशिकमधील आयफोनच्या शोरूममधून ८० ते ८५ मोबाईल फोन आणि महागडी घड्याळे चोरून नेल्याची घटना ताजी असतानाच आज शहरातील भद्रकाली परिसरातील चौक मंडई येथे एटीएम फोडल्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून पोलीस तपास सुरु आहे.गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. अचानक वर्दळीच्या असलेल्या भद्रकाली परिसरात एटीएम फोडल्याच्या प्रकारामुळे चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांनाच आव्हान दिले आहे.घटनास्थळी पोलीस यंत्रणा दाखल झाली असून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपासाची चक्रे फिरविण्यात आली आहेत.

(शिर्डी प्रतिनिधि )                 शिर्डी हि साईबाबांच्या पावन स्पशनि पुनित झालेली
भूमी आहे. येथे देश विदेशांतून अनेक साईभक्त साई बाबांच्या दर्शनाला येतात. परंतु शिर्डीत
आल्यानंतर त्यांना खुपच वाईट अनुभव येतात. दररोज पोलीसांच्या कृपा आर्शिवादाने होत असलेली पाकीटमारी, चैन  स्नेकिन्ग ,लूटमार, जूगार, मटका व दहशत साई भक्तांना सहन ।
करावा लागत आहे. या सर्व गुन्हेगारांचे अवैध्य व्यवसाय उघड-उघडपणे चालतात. ह्याच
प्रकरणी अवैध्य व्यवसाय बंद होणेकामी मी वेळोवेळी तक्रार अर्ज दिलेले होते.तीन वेळेस उपोषणही केले होते परंतु न्याय मिळाला नव्हता.
 त्यानंतर  ही तक्रार  शिर्डितिल महिती अधिकार कार्यकर्ते व पत्रकार जितेश लोकचण्दाणी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे  केली होती त्याची दखल घेऊन मैल द्वारे मुख्यमंत्री व त्यांचे  पि ए  अजौय मेहता यांनी करवाई साठी ग्रहखात्या कडे वर्ग केले आहे तेव्हा प्रतीक्षा आहे प्रत्येक्ष कारवाई ची

बुलडाणा- 11 डिसेंबर
जिल्ह्यात सर्वप्रथम महिला जिल्हाधिकारी म्हणून येण्याचा मान डॉ. निरूपमा डांगे यांनी मिळविला होता. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा महिला जिल्हाधिकारी जिल्ह्याला मिळाल्या आहेत.  श्रीमती सुमन चंद्रा यांनी आज 11 डिसेंबर 2019 रोजी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.
        श्रीमती सुमन चंद्रा 2010 च्या महाराष्ट्र कॅडेर मधील आयएएस अधिकारी आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाल्यानंतर नंदुरबार येथे परिविक्षाधीन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी 2010 मध्ये कार्यभार सांभाळला. त्यानंतर 2012 मध्ये उस्मानाबाद येथे जिल्हा परिषदेच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचे कामकाज त्यांनी सांभाळले. सन 2014 मध्ये नवी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सुत्रे त्यांनी स्वीकारली. त्यानंतर 2017 मध्ये नवी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनच्या सह निवासी आयुक्त पदाचे त्यांनी कामकाज सांभाळले. त्यानंतर त्यांनी आज 11 डिसेंबर 2019 रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी पदाची सूत्रे प्र. जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्याकडून  स्वीकारली.
        जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांचा जन्म 10 मे 1984 रोजी उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी येथे झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठामधून मास्टर इन फिलॉसॉफी पदवी प्राप्त केली आहे. तसेच अमेरिकेतील
युनीर्व्हसिटी ऑफ कॅलीफोर्निया येथून पीएचडी पूर्वीची ‘प्री डॉक्टरेट’ पर्यावरणीय अभ्यासक्रमात मिळविली आहे. अशा उच्च विद्याविभूषित जिल्हाधिकारी जिल्ह्याला लाभल्या आहेत.
        जिल्ह्यामध्ये केंद्र व राज्य शासनाचे महत्वाकांक्षी योजना, उपक्रम, अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणे. शासनाच्या योजनांचा लाभ सामान्य नागरिकाला अत्यंत सहजतेने उपलब्ध करून देणे, नागरिकांना प्रशासनाच्या माध्यमातून शासनाच्या विविध येाजनांचा जास्तीत जास्त लाभ देवून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला. तसेच महत्वाकांक्षी सिंचन प्रकल्प असलेल्या जिगांवच्या निर्मितीवर विशेष लक्ष देवून हा प्रकल्प विनाअडथळा पुर्ण करण्याचा निश्चयही त्यांनी व्यक्त केला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उप जिल्हाधिकारी गौरी सावंत, उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे व अधिकारी उपस्थित होते.

नाशिक (प्रतिनिधी )नामदार छगन भुजबळ यांची भेट घेऊन छत्रपती युवा सेनेच्या वतीने दिले निवेदन
मराठा समाजावरील गुन्हे सरसकट मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
ना. छगन भुजबळ साहेब
छत्रपती युवा सेनेच्या वतीने आज नामदार छगन भुजबळ यांची संस्थापक-अध्यक्ष गणेश भाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली भेट घेण्यात आली
 यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात 58 मोर्चे काढण्यात आले होते त्यामध्ये अनेक बांधवांवर तरुणांवर गुन्हे दाखल झाले असून हे गुन्हे त्वरित मागे घ्यावे यासाठी आज नामदार छगन भुजबळ यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली
यावेळी भुजबळ साहेब म्हणाले की छत्रपती युवा सेनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीचा विचार करून लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांशी यावर चर्चा करून मराठा समाजातील मुलांचे गुन्हे मागे घेण्यात येतील असे आश्वासन संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.यावेळी रफिक तडवी मयुर दाते दीपक जाधव सतीश शिंदे उपस्थित होते

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget