डॉलर देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणारी टोळी गजाआड,कोणी असे आमिष दाखवत असेल तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा-मुंबई पोलिस.

नवी मुंबई : रुपयांच्या बदल्यात कमी किमतीमध्ये डॉलर देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या टोळीतील पाच आरोपींना तुर्भे पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून दोन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. टॅक्सी व रिक्षाचालकांचीफसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.अटक केलेल्या आरोपींमध्ये युसुफ आमिर खान, मोहम्मद इब्राहिम अब्दुल कलाम शेख, शब्बीर शेख, आयरोद्दीन शेख उर्फ छोटू, सलमा युसूफ खान उर्फ मुस्कान यांचा समावेश आहे. आरोपी नवी मुंबई परिसरामध्ये टॅक्सी व रिक्षाचालकांची फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे. रिक्षा व टॅक्सीमधून प्रवास करताना चालकांना २० डॉलरची नोट द्यायचे. याची भारतीय बाजारपेठेमध्ये १४०० रुपये किंमत आहे. आमच्याकडे मोठ्या प्रमाणात डॉलर आहेत; परंतु ते चलनात आणता येत नाहीत. तुम्ही ते चलनात आणून दिलेत तर तुम्हाला १४०० रुपये किंमत असलेली २० डॉलरची नोट ७०० ते ८०० रुपयांमध्ये देऊ, असे सांगितले जात होते. चालकांना एक नोट देऊन त्यांच्या संपर्कात राहत होते. तुम्ही एक ते दोन लाख रुपये देऊन त्याच्या बदल्यात डॉलर घेतले तर तुमचा फायदा होईल, असे सांगितले जायचे. पैसे घेऊन नागरिक आले की, त्यांना बनावट डॉलर देऊन तेथून पळ काढायचे.तुर्भे पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये ७ डिसेंबरला याविषयी गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या पथकाने ८ डिसेंबरला युसुफ खान या आरोपीस अटक केली. त्याची चौकशी केली असता अजून चार जणांचा या टोळीमध्ये समावेश असल्याचे निदर्शनास आले. त्या सर्वांना शिळफाटा परिसरातून अटक केली आहे. आतापर्यंत दोन गुन्हे उघडकीस आले असून, अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या गुन्ह्याचा उलगडा करण्यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्यासोबत सहायक पोलीस निरीक्षक पवन नांदरे, पोलीस नाईक गणेश आव्हाड, नाना इंगळे, अनिता सणस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.फसवणुकीला बळी पडू नका रुपयांच्या बदल्यात कमी किमतीमध्ये डॉलर देण्याचे आमिष दाखविणारी टोळी सक्रिय आहे. अशाप्रकारे आमिष कोणी दाखविले तर त्याला बळी पडू नये.जर कोणी असे आमिष दाखवत असेल तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget