Latest Post

अहमदनगर (प्रतिनिधी) शेतातील मजुरीचे काम करणार्‍या मजुरांना मारहाण केल्याप्रकरणी शहरातील उद्योगपती राजेंद्र कांतीलाल चोपडा (रा. शेंडी ता. नगर) यांच्याविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, शहरातील उद्योगपती राजेंद्र चोपडा यांची नगर तालुक्यातील शेंडी (पोखर्डी) येथे शेत जमीन आहे. या शेतामध्ये शेती काम करण्यासाठी मजुर होते. एक महिला मजुर केलेल्या कामाचे पैसे मागण्यासाठी गुरुवारी (दि. 5) उद्योगपतीकडे पोखर्डी येथे गेल्या. केलेल्या कामाचे पैसेची मागणी त्या महिला मजुराने चोपडा यांच्याकडे केली.यावरून मजुराला चोपडा यांनी शिवीगाळ केली. चोपडा यांनी व त्यांच्या सोबत असलेल्या अन्य दोन साथीदारांनी त्या महिलेला काठीने मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. मारहाण झालेल्या महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी (दि. 07) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील करत आहेत.

बुलडाणा- 8 डिसेंबर
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यानातर्गत खेर्डा या गावात 7 डिसेंबरच्या साकाळी राहत्या घरी एका 45 वर्षीय दिव्यांग महिलेचं निर्वस्त्र अवस्थेत प्रेत आढळून आले होते. या प्रकरणी पोलिसांनी बलात्कार व मर्डरचा गुन्हा दाखल करुण घटनास्थळी कोणताच पुरावा नसतांना जळगांव जा. ठानेदार सुनील जाधव यांनी आपली कुशलतेने त्याच गावातील "रितेश देशमुख" नामक व्यक्तीला कालच अटक करुण आज न्यायालयात उभे केले असता आरोपीला येत्या 15 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावन्यात आली आहे.
      बुलडाणा जिल्ह्यातील  जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खेर्डा गावात शनिवारी सकाळच्या सुमारास एका 45 वर्षीय दिव्यांग महिलेचे घरातच निर्वस्त्र अवस्थेत प्रेत मिळून आले होते. महिलेच्या डोक्यावर वार करून खून करण्यात आले व महिलेवर बलात्कार झाल्याचे घटनास्थळी  वाटत होते दरम्यान घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी जळगाव जा. पोलिसांना दिल्या नंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व ठानेदार जाधव यांनी काही खुना शोधून आरोपीला शोधला व विशेष श्वानाला पाचारण केले तर श्वान ही त्याच व्यक्तीच्या घरा पर्यंत जावून पोहोचला होता. गुप्त माहिती आणि श्वानाने शेजारच्या घरात दिशा दाखविल्याने या प्रकरणी त्याच गावातील रितेश देशमुख नामक या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतलं.त्यानंतर आरोपीच्या पत्नीने पोलीस तपासा दरम्यान आपल्या पतीने रात्री लिलाबाईचा खून करून आल्याचं आपल्याला सांगितलं होतं. एवढंच नाहीतर त्याने स्वतःच्या हाताने कपडेही धुतले होते, अशी माहितीही तिने दिली.दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी घटनास्थळाला भेट देऊन खुनाची आणि आरोपीला अटक केल्याची माहिती माध्यमांना दिली होती. आरोपीने हत्या का केली या मागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचं ही त्यांनी सांगितलं. या प्रकरणात जळगांव जा. ठाण्यात आरोपी रितेश देधमुख विरोधात भादवीची कलम 302,376,452 अन्वय गुन्हा दाखल करुण आरोपीला रितेश देशमुखला स्थानिक न्यायालयात हजर केले असता आरोपीला 15 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.हादरुन टाकनारी या घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुनील जाधव हे करीत आहेत.

अहमदनगर(प्रतिनिधी ) नगर जिल्ह्यात पोलिस अधीक्षक म्हणून  ईशू सिंधू हजर झाल्यापासून त्यांनी सर्वच पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना नेहमीच सन्मानाची वागणूक दिली. सर्वसामान्यांना त्यांची न्याय मिळवून देण्यासाठी धडपड असते.  एक कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून त्यांची जिल्हाभर ख्याती निर्माण झाली. जिल्ह्याच्या कारभारात काम करत असताना  जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या रुपाने एक चांगला सहकारी मिळाला  असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.
जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू पुढील 20 महिने शिक्षणासाठी परदेशात जाणार असल्याने त्यांना शनिवारी (दि.7) निरोप देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, शहर पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, कोतवाली पोलिस ठाण्याचे पो.नि. विकास वाघ, कॅम्पचे पो. नि. प्रविण पाटील, नगर  तालुका पोलिस ठाणे पो.नि. रजपूत, एमआयडीसीचे  पो.नि आदींसह जिल्ह्यातील सर्व विभागीय पोलिस उपअधीक्षक, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर क्राईम, आर्थिक गुन्हे शाखा आदींसह विविध विभागातील कर्मचार्‍यांसह जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, उपपोलिस निरीक्षक व  पोलिस कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी 1 मार्च 2018 मध्ये जिल्ह्यात पदभार स्वीकारला होता. जिल्ह्यात 9 महिने यशस्वी कार्यकाळ सांभाळून आपल्या कार्याचा ठसा त्यांनी उमटवला. विविध सण उत्सव काळात चोख बंदोबस्त ठेवून शांतता ठेवली, गुन्हेगारांवर चांगलाच वचक निर्माण केला होता, असे प्रत्येक अधिकारी व  कर्मचार्‍यांनी आपल्या भाषणात सांगितले. 

बेलापूर  (प्रतिनिधी )- जनसुविधा योजनेअंतर्गत हिंदू स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळून   देखील  जिल्हा परिषद सदस्याच्या तक्रारी वरुन ते काम रद्द करुन इतरत्र वळविल्यामुळे  गावाचा विकास निधी दुसरीकडे जाणार असल्याचा आरोप बेलापूरच्या सरपंच राधाताई बोंबले व उपसरपंच रवींद्र खटोड यांनी केला आहे याबाबत प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात सरपंच राधाताई बोंबले व उपसरपंच रवींद्र खटोड यांनी पुढे म्हटले आहे की बेलापूर येथील हिंदू स्मशान भूमी च्या संरक्षक भिंतीच्या कामाकरिता नऊ लाख रुपये खर्चाच्या कामाचा  प्रस्ताव तयार करून त्यास ३ जानेवारी २०१९ रोजी जिल्हा परिषदेच्या वतीने  प्रशासकीय मान्यता घेण्यात आली होती त्यानंतर 28 मे २०१९ रोजी या कामास जिल्हा परिषदेने  तांत्रिक मान्यता देण्यात आली त्यानंतर बेलापूर  ग्रामपंचायतीने ई  निविदा काढण्यात ई निविदा प्रक्रिया पार पाडल्यानंतर 16 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायतीने  ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिला व सदर कामाकरिता जिल्हा परिषदेकडे निधीची मागणी करण्यात आली होती परंतु  २२ नोव्हेंबर रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी  जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांच्या पत्राचा संदर्भ देवुन ग्रामपंचायतीस पत्र पाठवून बेलापूर तालुका श्रीरामपूर येथील स्मशानभूमी  रक्कम नऊ लाख हे काम सुरू झाले नसल्यास सदर काम रद्द झाले बाबतचा प्रस्ताव तात्काळ या कार्यालयास सादर करावा असे पत्रात नमूद केले आहे या कामाबाबत बेलापूर ग्रामपंचायतीने सर्व प्रक्रिया पार पाडली असून केवळ जिल्हा परिषद सदस्यांच्या हेकेखोर पणामुळे हा निधी बेलापूर खूर्द येथे वळविणार असल्याचे पत्र जिल्हा  परिषदेने दिले आहे  या कामासाठी निधी उपलब्ध होऊ नये याकरिता जिल्हा परिषद सदस्यांनी प्रयत्न केल्याची बाब समोर येत असून केवळ सदस्याच्या आडमुठेपणामुळे  मुळे गावाला निधी मिळू शकत नाही याबाबत बेलापूर ग्रामपंचायतीने 3 डिसेंबर रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गट विकास अधिकारी यांना पत्र पाठवून या कामाबाबत सर्व प्रक्रिया पार पाडल्यामुळे तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी  बोंबले व खटोड यांनी केली आहे     [जनतेत सांगायचे विकास कामासाठी सर्वांच्या बरोबर आहे आणी दुसरीकडे गावाच्या विकास कामात अधिकार्यावर दबावआणून कामात खोडा घालायचा हे काम जि प सदस्य करत आसुन मागील सात वर्षात गावासाठी काय काम केले किती निधी आणला हे सदस्याने जाहीर करावे --सुधीर नवले संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती ]

हैदराबाद - संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी शुक्रवारी पहाटे पोलीस चकमकीत ठार झाले आहेत. चौघा संशयीतांना ठार केल्यामुळे देशातील अनेकांनी आनंद व्यक्त केला असून, हैदराबादमध्ये अनेकांनी मिठाई वाटली, पोलीस अधिकाऱ्यांवर फुले उधळली आणि अनेक महिलांनी पोलिसांना राख्याही बांधल्या. मात्र, ज्या 4 आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आलाय, त्यांच्या कुटुंबीयांना या घटनेचा मोठा धक्का बसलाय. हैदराबाद बलात्कार प्रकरणात पोलिसांनी मोहम्मद आरिफ (26), जोलू शिवा (20), जोलू नवीन (20), चिंताकुन्टा चेन्नाकेसवलू (20) या चार आरोपींना अटक केली आहे. त्यानंतर, न्यायालयाने या चौघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.  मात्र, पोलीस कोठडीत असतानाच हैदराबाद पोलिसांनी एनकाऊंटर करुन चारही आरोपींना ठार केले. हैदराबाद पोलिसांच्या धाडसी कारवाईनंतर बलात्कारपीडित महिलेच्या कुटुंबीयांनी आम्हाला न्याय मिळाला, अशी भावना व्यक्त केली आहे. मात्र, आरोपींच्या कुटुंबींयांनी आमच्यावर अन्याय झाल्याचं म्हटलंय. मोहम्मद आरिफच्या आईला बोलताच येत नव्हते. मात्र, आपल्या मुलाने हा गुन्हा केला असेल, तर त्याला सर्वात कडक शिक्षा देण्यात यावी, असे त्याच्या वडिलांनी आधीच म्हटले होते.चेन्नाकेशवुलूची पत्नी तर सतत रडत होती. ती म्हणाली की मी आता एकटी राहिली आहे. तिचा चेन्नाकेशवुलूशी अलीकडेच विवाह झाला होता. त्याला मूत्रपिंडाचा आजार होता. माझ्या नवऱ्याला काही होणार नाही आणि तो लवकरच घरी परतेल, असे मला सांगण्यात आले होते, पण आता काय करावे, मला सुचत नाही, असे तिने बोलून दाखविले. सिवा नावाच्या आरोपीची आई जोल्लू रामप्पा म्हणाली की, माझ्या मुलाने तो गुन्हा केलाही असेल. पण, त्यासाठी दिलेली शिक्षा खूपच भयंकर आहे. हे चारही संशयीत अतिशय गरीब कुटुंबातील होते. पण त्यांनी नंतर कष्टाने बऱ्यापैकी पैसा मिळविला. मात्र, दारू आणि इतर व्यसनांनी त्या चौघांचा नाश केला.पशुवैद्यकीय तरुणीवर 28 नोव्हेंबर रोजी या चार आरोपींनी सामुहिक बलात्कार केल्यानंतर त्या भयानक छळाने ती मरण पावली. पुरावा नष्ट करण्यासाठी या नराधमांनी तिचा मृतदेह जाळून टाकला होता. या घटनेमुळे देशभर संताप व्यक्त करण्यात आला आणि संसदेमध्येही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले.

अहमदनगर (प्रतिनिधी) जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू पुढील 20 महिने शिक्षणासाठी परदेशात जाणार आहेत. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे ते शिक्षण घेणार आहेत. ईशू सिंधू यांनी स्वतः या माहितीला दुजोरा दिला. त्यांच्या पत्नी बुलढाणाच्या जिल्हाधिकारी सौ. निरुपमा सिंधू या देखील त्यांच्याबरोबर शिक्षणासाठी असणार आहेत. अशी माहिती आहे.ईशू सिंधू आणि सौ. निरुपमा ह्या दोघा पती-पत्नीने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे शिक्षणासाठी केंद्र सरकारकडे अर्ज केला होता. त्याची दखल केंद्र सरकारने घेतल्याचे समजते. केंद्र सरकारने शिक्षणासाठी असलेला हा अर्ज मंजूर केला आहे. लवकरच याबाबत आदेश प्राप्त होऊन शिक्षणासाठी रवाना होईल, असे स्वतः ईशू सिंधू यांनी सांगितले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा  अभ्यासक्रम वीस महिन्यांमध्ये पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.सिंधू यांनी 1 मार्च 2018 मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. जिल्ह्यात 9 महिने यशस्वी कार्यकाळ संभाळून आपल्या कार्याचा ठसा उमटवला. लोकसभा, विधानसभा निवडणूक, विविध सण-उत्सव काळात चोख बंदोबस्त ठेवून कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही यांची दक्षता घेतली. अनेक सराईत गुंडावर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करून गुन्हेगारीला लगाम घातला. जळगाव येथील जैन प्रकारणात त्यांनी आपल्या कामगिरीची छाप पाडली होती.

बुलडाणा- 6 डिसेंबर
देशाला हादरवून टाकणारं हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी इनकाउंटर करुण खात्मा केला आहे.सदर इनकाउंटर शंबर टक्के बनावट असून ही हत्या आहे,पोलीसला अशा प्रकारे मारण्याचा अधिकार कोणी दिला? या घटनेवर आपला मत व्यक्त करताना असा प्रश्न व से संशय बुलडाणा येथील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.
    मागील काही दिवसा पूर्वी हैद्राबाद येथे एका माहिला डॉक्टरवर 4 लोकांनी बलात्कार करुण तीला जीवंत जाळुन दिला होता.सदर घटना उघडकिस आल्यानंतर संपूर्ण देशात आक्रोशाची लाट पसरलेली होती.
अश्यात आज हैद्राबाद पोलीसाने 4 ही आरोपींचा इनकाउंटर कल्याचे बातम्या सगळी कडे झळकू लागले.या इनकाउंटरवर लोकांचे अनेक प्रकारचे मत समोर येऊ लागले.या विषयी बुलडाणाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा मत जाणून घेतला असता तर ते म्हणाले की हैद्राबाद येथे जे बलात्काराची घटना घडलेली आहे त्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ही मागणी प्रत्येक देशवासीची होती,कोपरडी घटनेत अश्या लोकांना फाशीची शिक्षा देखील झालेली आहे,परंतु आज ज्या पद्धतीने आरोपींच्या इनकाउंटर ची बॉटम टीव्हीवर पाहिली असता मला हे सगळा संशयस्पद वाटला,आरोपींच्या हातात शस्त्र देऊन त्यांना मारून टाकला,पोलिसाला ही हत्या करण्याचा अधिकार कोणी दिला? आपल्याकडे न्यायालय आहे,आपला देश संविधानावर चालतो आणि त्यांना कोर्टाने शिक्षा भविष्यात दिली असती.एक जनभावना तैयार झाली होती की या प्रकारणातील आरोपींना गोळ्या घातल्या पाहिजे,त्यांना मारला पाहिजे परंतु आपल्या देशात अशा प्रकारचा कायदा नाही आहे,हे इनकाउंटर  शंभर टक्के बनावटी असल्याची शक्यता व्यक्त करत आ.गायकवाड पुढे म्हणाले की न्यायालय या इनकाउंटरवर निश्चित पणे लक्ष घालेल असा विश्वास ही त्यांनी शेवटी व्यक्त केला आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget