बेलापूर (प्रतिनिधी )- जनसुविधा योजनेअंतर्गत हिंदू स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळून देखील जिल्हा परिषद सदस्याच्या तक्रारी वरुन ते काम रद्द करुन इतरत्र वळविल्यामुळे गावाचा विकास निधी दुसरीकडे जाणार असल्याचा आरोप बेलापूरच्या सरपंच राधाताई बोंबले व उपसरपंच रवींद्र खटोड यांनी केला आहे याबाबत प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात सरपंच राधाताई बोंबले व उपसरपंच रवींद्र खटोड यांनी पुढे म्हटले आहे की बेलापूर येथील हिंदू स्मशान भूमी च्या संरक्षक भिंतीच्या कामाकरिता नऊ लाख रुपये खर्चाच्या कामाचा प्रस्ताव तयार करून त्यास ३ जानेवारी २०१९ रोजी जिल्हा परिषदेच्या वतीने प्रशासकीय मान्यता घेण्यात आली होती त्यानंतर 28 मे २०१९ रोजी या कामास जिल्हा परिषदेने तांत्रिक मान्यता देण्यात आली त्यानंतर बेलापूर ग्रामपंचायतीने ई निविदा काढण्यात ई निविदा प्रक्रिया पार पाडल्यानंतर 16 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायतीने ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिला व सदर कामाकरिता जिल्हा परिषदेकडे निधीची मागणी करण्यात आली होती परंतु २२ नोव्हेंबर रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांच्या पत्राचा संदर्भ देवुन ग्रामपंचायतीस पत्र पाठवून बेलापूर तालुका श्रीरामपूर येथील स्मशानभूमी रक्कम नऊ लाख हे काम सुरू झाले नसल्यास सदर काम रद्द झाले बाबतचा प्रस्ताव तात्काळ या कार्यालयास सादर करावा असे पत्रात नमूद केले आहे या कामाबाबत बेलापूर ग्रामपंचायतीने सर्व प्रक्रिया पार पाडली असून केवळ जिल्हा परिषद सदस्यांच्या हेकेखोर पणामुळे हा निधी बेलापूर खूर्द येथे वळविणार असल्याचे पत्र जिल्हा परिषदेने दिले आहे या कामासाठी निधी उपलब्ध होऊ नये याकरिता जिल्हा परिषद सदस्यांनी प्रयत्न केल्याची बाब समोर येत असून केवळ सदस्याच्या आडमुठेपणामुळे मुळे गावाला निधी मिळू शकत नाही याबाबत बेलापूर ग्रामपंचायतीने 3 डिसेंबर रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गट विकास अधिकारी यांना पत्र पाठवून या कामाबाबत सर्व प्रक्रिया पार पाडल्यामुळे तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी बोंबले व खटोड यांनी केली आहे [जनतेत सांगायचे विकास कामासाठी सर्वांच्या बरोबर आहे आणी दुसरीकडे गावाच्या विकास कामात अधिकार्यावर दबावआणून कामात खोडा घालायचा हे काम जि प सदस्य करत आसुन मागील सात वर्षात गावासाठी काय काम केले किती निधी आणला हे सदस्याने जाहीर करावे --सुधीर नवले संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती ]
Post a Comment