बुलडाणा- 6 डिसेंबर
देशाला हादरवून टाकणारं हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी इनकाउंटर करुण खात्मा केला आहे.सदर इनकाउंटर शंबर टक्के बनावट असून ही हत्या आहे,पोलीसला अशा प्रकारे मारण्याचा अधिकार कोणी दिला? या घटनेवर आपला मत व्यक्त करताना असा प्रश्न व से संशय बुलडाणा येथील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.
मागील काही दिवसा पूर्वी हैद्राबाद येथे एका माहिला डॉक्टरवर 4 लोकांनी बलात्कार करुण तीला जीवंत जाळुन दिला होता.सदर घटना उघडकिस आल्यानंतर संपूर्ण देशात आक्रोशाची लाट पसरलेली होती.
अश्यात आज हैद्राबाद पोलीसाने 4 ही आरोपींचा इनकाउंटर कल्याचे बातम्या सगळी कडे झळकू लागले.या इनकाउंटरवर लोकांचे अनेक प्रकारचे मत समोर येऊ लागले.या विषयी बुलडाणाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा मत जाणून घेतला असता तर ते म्हणाले की हैद्राबाद येथे जे बलात्काराची घटना घडलेली आहे त्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ही मागणी प्रत्येक देशवासीची होती,कोपरडी घटनेत अश्या लोकांना फाशीची शिक्षा देखील झालेली आहे,परंतु आज ज्या पद्धतीने आरोपींच्या इनकाउंटर ची बॉटम टीव्हीवर पाहिली असता मला हे सगळा संशयस्पद वाटला,आरोपींच्या हातात शस्त्र देऊन त्यांना मारून टाकला,पोलिसाला ही हत्या करण्याचा अधिकार कोणी दिला? आपल्याकडे न्यायालय आहे,आपला देश संविधानावर चालतो आणि त्यांना कोर्टाने शिक्षा भविष्यात दिली असती.एक जनभावना तैयार झाली होती की या प्रकारणातील आरोपींना गोळ्या घातल्या पाहिजे,त्यांना मारला पाहिजे परंतु आपल्या देशात अशा प्रकारचा कायदा नाही आहे,हे इनकाउंटर शंभर टक्के बनावटी असल्याची शक्यता व्यक्त करत आ.गायकवाड पुढे म्हणाले की न्यायालय या इनकाउंटरवर निश्चित पणे लक्ष घालेल असा विश्वास ही त्यांनी शेवटी व्यक्त केला आहे.
Post a Comment