गुटखा बंदीचा आंदोलन,अधिकारी कार्यालयातुन गायब,अन्न व औषध कार्यालयाची खुर्चीला दिले निवेदन
बुलडाणा- 2 डिसेंबर
अवैध पद्धतीने गुटखा विक्री व साठवणूक केली जात आहे. गुटखा तस्करांचे हे कृत्य सर्रास शासकीय नियमाची पायमल्ली करणारे आहे अवैध गुटखा विक्री थांबवावी याबाबत प्रशासनाला निवेदन देवून ही कारवाई झाली नसल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या विरोधात निषेध नोंदवून बुलडाणा जिल्ह्यातील गुटखा तस्करांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी ही मागणी घेऊन आज सामाजिक कार्यकर्ता समीर खान यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत अन्न व औषध प्रशासनाच्या बुलडाणा कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले.
बुलडाणा जिल्ह्यात प्रशासनाच्या नजरेखाली पानटपऱ्या,शाळा,कॉलेज परिसर,सार्वजनिक स्थळ,किराणा दुकान तथा हॉटेलसह आदी ठिकाणी सर्रासपणे राज्यात प्रतिबंधित नजर,विमल,गोवा सह सुगंधित तंबाखू व गुटख्याची सरर्स विक्री सुरू आहे.बुलडाणा जिल्ह्यातील अवैध गुटखा तस्कर खामगाव,मलकापुर,डोणगांव,मेहकर, चिखली येथून संपूर्ण जिल्ह्यात गुटखा सर्व ठिकाणी पोहचुन देत आहे त्या मुळेच बुलडाणा जिल्ह्यात खुलेआम गुटखा विक्री होत आहे. विशेष म्हणजे जिल्हा ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयासमोर खुलेआम गुटखा विक्री होत आहे. गुटख्यामुळे अनेक नागरिकांचे कर्करोगाचा आजार होऊन जीव गेलेला आहे व त्यांचे संसार उघड्यावर आले आहे.तर नवीन पिढी गुटक्याच्या आहारी जात आहे. काही अवैद्य गुटखा तस्करी करणाऱ्यांची नावे अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आली असूनही त्यांचे विरुद्ध कोणती ही कारवाई करण्यात आली नाही.खामगावातील मुख्य गुटखा तस्करावर अन्न व औषध कायद्या अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. तसेच बुलडाणा शहरातला अवैध गुटखा बंद करण्यात यावी, या मागणीसाठी आज सोमवारी सामाजिक कार्यकर्ता समीर खान यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत एक दिवसीय धरणे आंदोलन केले व निवेदन देण्यासाठी अन्ना व औषध प्रशासनाचे कार्याल्यात गेले तर तिथे संबंधित अधिकारी उपस्थित नव्हते. यावेळी कार्यालयात घोषणा देत अधिकाऱ्याच्या रिकामी खुर्चीला निवेदन सादर करण्यात आले.दोन दिवसात अवैध गुटख्या वर कार्रवाई नाही केली तर अन्न व औषध प्रशासन कार्यालयच्या समोर गुटखा जाळुन आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे.