उपद्रवी माकडामुळे झालेला वाद पोहोचला ठाण्यात, अन विष घेऊन एकाची आत्महत्या,शव आणून ठेवला ठाण्यात

बुलडाणा : उपद्रवी माकडाचा उच्छाद परस्परांच्या वादालाच नव्हे तर वादानंतर पोलिस तक्रारीच्या नैराश्यातून एका फिर्यादीच्या आत्महत्येला कारणीभूत ठरला आहे. 26 नोव्हेंबरला ठाण्यात विष प्राशन केल्या नंतर 30 नोव्हेंबरच्या रात्री सदर व्यक्तीचा खामगांव येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना जळगाव जामोद पोलिस ठाण्यातील आहे.

        या बाबत पोलिस सुत्रानुसार, बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद ठाणा हद्दीत आसलगाव येथील ताई उखर्डा भोंबे ह्या 26 नोव्हेंबरला आपल्या घरावर उच्छाद घालणाऱ्या उपद्रवी माकडाला हुसकावून लावण्यासाठी घरावर चढल्या. त्या माकड हाकलून लावत असतांना आरोपी पुरुषोत्तम नारायण भोंबे याने महिलेला "वेश्या" संबोधून अश्लील शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार ताई भोंबे यांनी जळगाव जा. पोलिसात केल्यावरून आरोपीविरुद्ध कलम 294, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पुरुषोत्तम नारायण भोंबे यांनी देखील ताई भोंबे विरोधात तक्रार दिली आहे.आरोपी ताई उखर्डा भोंबे, संतोष उखर्डा भोंबे, उखर्डा भोंबे यांनी संगणमताने आईला मारहाण तसेच शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी 26 नोव्हेंबरला सदर तिनही आरोपीविरुद्ध कलम 294, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र आपली तक्रार पोलिस नोंदवित नाहीत, असे  पुरुषोत्तम भोंबे यांना वाटत होते. त्यामूळे त्यांनी या नैराश्यातून त्याच वेळी ठाण्याच्या आवारात विष प्राशन केले.हे समजताच पोलीसाने त्यांना दवाखान्यात दाखल केले व पुढील उपचारासाठी त्यांना खामगांवला नेण्यात आले.तेथे उपचार सुरु असताना रात्री त्यांचा मृत्यु झाला.सदर माहिती त्यांच्या नातेवाइकांना मिळताच आज शव घेऊन ते ठाण्यात दाखल झाले व या घटनेला कारणीभूत पोलिसांवर कार्रवाई करण्याची मागणी करू लागले.उपविभागीय पोलिस अधिकारी गिरीश बोबडे,ठानेदार सुनील जाधव यांनी संतप्त लोकांची समजूत काढली व त्यांना लेखी मध्ये योग्य ती कार्रवाई करण्याचा पत्र देण्याची प्रक्रिया सुरु आहे.

चौकशी करण्यात येईल! बोबडे
ऑनलाइन गुन्हा दाखल करण्यास थोडा वेळ लागतो अशात जर विज पुरवठा खंडित झाला तर आपण समजू शकता ही तांत्रिक अडचन आहे.पुरुषोत्तम भांबे यांच्या मृत्यु प्रकारणाची सखोल चौकशी मी स्व:ता करणार आहे वे जे कोणी दोषी अढळला तर त्याच्यावर निश्चितपणे कार्रवाई करण्यात येणार अशी प्रतिक्रिया एसडीपीओ गिरीश बोबडे यांनी पत्रकारांना दिली आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget