लोणी(प्रतीनिधी):राहाता तालुक्यातील लोणी या भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गावात गोळीबार झाला. या गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाला. रात्री झालेल्या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. फरदीन अब्बू कुरेशी (वय 18) हे मयत युवकाचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, फरदीन कुरेशी हा जेवण करण्यासाठी हॉटेलवर गेला होता. यावेळी मित्रांसोबत त्याचे वाद झाले. त्या वादातून कुरेशी याच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात कुरेशी हे गंभीर जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाला. हा गोळीबार नेमका कशामुळे झाला, याचा उलगडा होऊ शकला नाही.घटनेची माहिती मिळताच लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्यासह पोलिस फौजफाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र यामागचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. या घटनेमुळे नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील वाढत्या गोळीबाराच्या घटना या पोलीस प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू लागल्या आहेत.
Post a Comment