बेलापूर (प्रतिनिधी )-- मोहंमद पैगंबरांची शिकवण ही मुस्लिम समाजापुरती मर्यादीत नसुन जगाला शांतता व प्रेमाचा संदेश देणारे ते पहीले संत होते त्यांची शिकवण आचरणात आणण्याची आवश्यकता असल्याचे मत जेष्ठ पत्रकार देविदास देसाई यांनी व्यक्त केले
बेलापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेत मोहंम्मद पैगंबर जयतीचे औचित्य साधुन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्ष पदावरुन ते बोलत होते कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक बँकेचे संचालक नाना बडाख माजी सरपंच भरत साळुंके अनिल पवार उपस्थित होते
जि प उर्दू शाळेच्या शिक्षकांनी वैयक्तिक खर्चातुन उभारलेल्या डिजीटल क्लासचे उदघाटन व मोहमंद पैगंबरांच्या जिवनावर आधारीत वक्तृत्व स्पर्धा तसेच नातीया स्पर्धेचे (गायन ) आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला पहीली ते चौथी व पाचवी ते सातवी अशा दोन गटात या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या वक्तृत्व स्पर्धेच्या पहील्या गटात प्रथम क्रमांक खतीजा पठाण द्वितीय इन्शा सय्यद तृतीय खतीजा सय्यद दुसर्या गटात प्रथम क्रमांक शिफा सय्यद द्वितीय जवेरीया शेख तृतीय मिस्बाह बागवान यांनी मिळवीला नातीया स्पर्धेच्या पहील्या गटात प्रथम क्रमांक इकरा कुरेशी द्वितीय सना काझी तर तृतीय क्रमांक अकसा बागवान यांनी मिळवीला दुसर्या गटात प्रथम क्रमांक सारा सय्यद द्वितीय क्रमांक अलीना बागवान तृतीय क्रमांक तलहा शेख यांनी मिळवीला या स्पर्धेचे परिक्षक म्हणून अल्ताफ शाह रुबीना खान यांनी काम पाहीले या वेळी शिक्षक बँकेचे संचालक नाना बडाख माजी सरपंच भरत साळुंके मोहसीन सय्यद अकबर टिनमेकरवाले आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी शाळेचे मुख्याध्यापक जलील शेख जावेद शेख सदस्या शिरीन शेख आकबर सय्यद मोहसीन शेख शकील शेख पालक संघाच्या अध्यक्षा शहेनाज शेख आसीफ बागवान अनवर बागवान आयेशा शेख यास्मीन शेख आजरा शेख महेरुन्निसा खान नसीबा बागवान महेजबीन बागवान आदिसह पालक शिक्षक उपस्थित होते या वेळी हैद्राबाद येथील घटनेचा बेलापूर मुस्लिम समाजाच्या वतीने तिव्र शब्दात निषेध करुन आरोपींनी लवाकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिस शेख यांनी केले तरतरन्नुम खान यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इकरा सय्यद व अल्फिया बागवान यांनी केले
Post a Comment