Latest Post

बुलडाणा- 2 डिसेंबर
अवैध पद्धतीने गुटखा विक्री व साठवणूक केली जात आहे. गुटखा तस्करांचे हे कृत्य सर्रास शासकीय नियमाची पायमल्ली करणारे आहे अवैध गुटखा विक्री थांबवावी याबाबत प्रशासनाला निवेदन देवून ही कारवाई झाली नसल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या विरोधात निषेध नोंदवून बुलडाणा जिल्ह्यातील गुटखा तस्करांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी ही मागणी घेऊन आज सामाजिक कार्यकर्ता समीर खान यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत अन्न व औषध प्रशासनाच्या बुलडाणा कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले.
     
 बुलडाणा जिल्ह्यात प्रशासनाच्या नजरेखाली पानटपऱ्या,शाळा,कॉलेज परिसर,सार्वजनिक स्थळ,किराणा दुकान तथा हॉटेलसह आदी ठिकाणी सर्रासपणे राज्यात प्रतिबंधित नजर,विमल,गोवा सह सुगंधित तंबाखू व गुटख्याची सरर्स विक्री सुरू आहे.बुलडाणा जिल्ह्यातील अवैध गुटखा तस्कर खामगाव,मलकापुर,डोणगांव,मेहकर, चिखली येथून संपूर्ण जिल्ह्यात गुटखा सर्व ठिकाणी पोहचुन देत आहे त्या मुळेच बुलडाणा जिल्ह्यात खुलेआम गुटखा विक्री होत आहे. विशेष म्हणजे जिल्हा ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयासमोर खुलेआम गुटखा विक्री होत आहे. गुटख्यामुळे अनेक नागरिकांचे कर्करोगाचा आजार होऊन जीव गेलेला आहे व त्यांचे संसार उघड्यावर आले आहे.तर नवीन पिढी गुटक्याच्या आहारी जात आहे. काही अवैद्य गुटखा तस्करी करणाऱ्यांची नावे अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आली असूनही त्यांचे विरुद्ध कोणती ही कारवाई करण्यात आली नाही.खामगावातील मुख्य गुटखा तस्करावर अन्न व औषध कायद्या अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. तसेच बुलडाणा शहरातला अवैध गुटखा बंद करण्यात यावी, या मागणीसाठी आज सोमवारी सामाजिक कार्यकर्ता समीर खान यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत एक दिवसीय धरणे आंदोलन केले व निवेदन देण्यासाठी अन्ना व औषध प्रशासनाचे कार्याल्यात गेले तर तिथे संबंधित अधिकारी उपस्थित नव्हते. यावेळी कार्यालयात घोषणा देत अधिकाऱ्याच्या रिकामी खुर्चीला निवेदन सादर करण्यात आले.दोन दिवसात अवैध गुटख्या वर कार्रवाई नाही केली तर अन्न व औषध प्रशासन कार्यालयच्या समोर गुटखा जाळुन आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे.

बुलडाणा- 2 डिसेंबर
बुलडाणा अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या निवासस्थानातील प्रवेशद्वार समोरील दोन नाम फलकाची अज्ञात व्यक्तीने तोडफोड करून शासकीय मालमत्तेचे नुकसान तर केलेच आहे पण हा प्रकार म्हणजे अप्पर जिल्हाधिकारी दुबे यांना रेत माफियाकडून असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना 1 डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. प्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी दुबे यांनी या घटनेची लेखी तक्रार आज 2 डिसेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.या घटनेनंतर अप्पर जिल्हाधिकारी दुबे आपली सरकारी कारने कार्यालयात ना जाता ते सायकल ने जावून रेत माफियांना हे दाखवन्याचा प्रयत्न केला की मी अश्या धमक्याने घाबरणार नाही.
       
बुलडाणा येथे कार्यरत अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे हे बुलडाणा येथे कार्यरत झाल्या पासून त्यांनी वाळू माफिया विरोधात मोठ-मोठे करवाया करुण शासनाला मोठा महसूल मिळवून दिला आहे.रेत व गौणखनिज तस्करा मध्ये त्यांचा दरारा कायम आहे.ते कोणत्याही आमिष व दबावाला बळी ना पडता रात्री बे रात्री जिल्ह्यात फिरून विना रॉयल्टीचे वाळू घेऊन जाणारे वाहन पकडत असतात.बुलडाणा येथील सरकारी तलाव रोडवर संत चोखामेळा नावाचे अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांचे सरकारी निवासस्थान आहे. या निवास स्थानासमोरील प्रवेशद्वारावर त्यांच्या नावाचा व निवासस्थानाचा फलक होता. दोन दिवसापुर्वीच त्यांनी बुलडाणा तालुक्यातील चांडोळ व बुलडाणा शहर येथे अवैधरित्य साठवणुक केलेली रेतीवर कारवाई केली होती. याच कारवाईचा धसका घेत काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या निवासस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील दोन्ही नाम फलकाची तोडफोड केली. ही घटना आज सकाळी उघडकीस येताच त्यांनी या घटनेची तक्रार शहर पोलिसांत दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. विशेष म्हणजे मागील वर्षी 28 डिसेंबर 2018 रोजी सुध्दा त्यांच्या निवासस्थानाच्या मुख्य प्रवेशव्दाराची कडी बाहेरून बंद करण्यात आली होती.दरम्यान आज अप्पर जिल्हाधिकारी दुबे यांनी शासकिय वाहन न वापरता ते चक्क सायकलने व विना आपले अधिकृत शस्त्रचे जिल्हाधिकारी कार्यालय गाठून रेत माफियांना हे दाखवून दिला की ते अश्या धमक्याने घाबरणार नाही.

बेलापूर  (प्रतिनिधी  )-- मोहंमद पैगंबरांची शिकवण ही मुस्लिम समाजापुरती मर्यादीत नसुन जगाला शांतता व प्रेमाचा संदेश देणारे ते पहीले संत होते त्यांची शिकवण आचरणात आणण्याची आवश्यकता असल्याचे मत जेष्ठ पत्रकार देविदास देसाई  यांनी व्यक्त केले                                 
बेलापूर  येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेत मोहंम्मद पैगंबर जयतीचे औचित्य साधुन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्ष पदावरुन ते बोलत होते कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक बँकेचे संचालक नाना बडाख माजी सरपंच भरत साळुंके अनिल पवार उपस्थित  होते                   
जि प उर्दू शाळेच्या शिक्षकांनी वैयक्तिक खर्चातुन उभारलेल्या  डिजीटल क्लासचे उदघाटन व मोहमंद पैगंबरांच्या जिवनावर आधारीत वक्तृत्व स्पर्धा तसेच नातीया स्पर्धेचे (गायन ) आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धांचा बक्षिस  वितरण समारंभ  नुकताच संपन्न झाला  पहीली ते चौथी व पाचवी ते सातवी अशा दोन गटात या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या वक्तृत्व स्पर्धेच्या पहील्या गटात प्रथम क्रमांक खतीजा पठाण द्वितीय इन्शा सय्यद तृतीय खतीजा सय्यद दुसर्या गटात प्रथम क्रमांक शिफा सय्यद द्वितीय जवेरीया  शेख तृतीय मिस्बाह बागवान यांनी मिळवीला नातीया स्पर्धेच्या पहील्या गटात प्रथम क्रमांक इकरा कुरेशी द्वितीय सना काझी तर तृतीय क्रमांक अकसा बागवान यांनी मिळवीला  दुसर्या गटात प्रथम क्रमांक सारा सय्यद   द्वितीय क्रमांक अलीना बागवान  तृतीय क्रमांक तलहा शेख यांनी मिळवीला या स्पर्धेचे परिक्षक म्हणून अल्ताफ शाह रुबीना खान यांनी काम पाहीले  या वेळी शिक्षक  बँकेचे संचालक नाना बडाख माजी सरपंच भरत साळुंके  मोहसीन सय्यद अकबर टिनमेकरवाले आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी शाळेचे मुख्याध्यापक जलील शेख  जावेद शेख सदस्या शिरीन शेख आकबर सय्यद  मोहसीन शेख शकील शेख पालक संघाच्या अध्यक्षा शहेनाज शेख आसीफ बागवान  अनवर बागवान आयेशा शेख यास्मीन शेख आजरा शेख महेरुन्निसा खान नसीबा बागवान महेजबीन बागवान आदिसह पालक शिक्षक  उपस्थित  होते या वेळी हैद्राबाद येथील घटनेचा बेलापूर मुस्लिम समाजाच्या वतीने तिव्र शब्दात निषेध करुन आरोपींनी लवाकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली  कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिस शेख यांनी केले तरतरन्नुम खान यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इकरा सय्यद व अल्फिया बागवान यांनी केले

लोणी(प्रतीनिधी):राहाता तालुक्यातील लोणी या भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गावात गोळीबार झाला. या गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाला. रात्री झालेल्या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. फरदीन अब्बू कुरेशी (वय 18) हे मयत युवकाचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, फरदीन कुरेशी हा जेवण करण्यासाठी हॉटेलवर गेला होता. यावेळी मित्रांसोबत त्याचे वाद झाले. त्या वादातून कुरेशी याच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात कुरेशी हे गंभीर जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाला. हा गोळीबार नेमका कशामुळे झाला, याचा उलगडा होऊ शकला नाही.घटनेची माहिती मिळताच लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्यासह पोलिस फौजफाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र यामागचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. या घटनेमुळे नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील वाढत्या गोळीबाराच्या घटना या पोलीस प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू लागल्या आहेत.

बुलडाणा- 1 डिसेंबर
बुलडाणा जिल्ह्यातील आसलगांव येथे एका घराच्या गच्ची माकड आले असता त्यांना हाकलले असता ते शेजारच्या घरावर कुदल्याने झालेला वाद ठाण्यात पोहोचला व तेथे ठाणे अमलदाराने लवकर गुन्हा नोंदविला नाही व दमदाटी केली म्हणून पुरषोत्तम भोंबे यांनी जळगाव जा. पोलिस ठाणे परिसरात विष प्राशन केले, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला.मृतकाचे नातेवाईक प्रेत घेऊन ठाण्यात आले व जो पर्यंत दोषीवर कार्रवाई होत नाही तो पर्यंत प्रेत उचलनार नाही अशी ठाम भूमिका घेतली होती शेवटी पोलिस प्रशासनाने या प्रकरणी आत्महत्या करण्यास भाग पाडनारे 6 लोकांवर गुन्हा दाखल केला आहे तर आरोपी मध्ये ठाणे अमलदाराचा ही समावेश आहे.
       या प्रकरणी मृतकाचे काका
अरूण दशरथ भोंबे, रा. आसलगांव ता.जळगाव जा. यांनी ठाण्यात फिर्याद दिली की आम्ही दोघे भाउ असुन माझे लहान भावाचे नाव नारायन भोंबे आहे. त्याला एक मुलगा नामे पुरूषोत्तम भोंबे आहे. मी व माझे भाऊ यांचे एकत्र कुटूंब आहे. माझे घराचे समोर आमचे समाजाचे भोंबे परिवार राहतात. त्यांनी माझा भाऊ व पुतण्या यांचे विरूध्द बरेच वेळा खोटया तकारी दिल्या आहेत.दि. 26 नोव्हे. रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास माझे भावाचे सोयाबिन आमचे गच्चीवर वाळु घातलेले होते. त्यावेळी गच्चीवर माकडं आल्याने त्यांना हाकलण्यासाठी माझे भावाचा मुलगा पुरुषोत्तम हा गच्चीवर गेला व त्याने माकडे हाकलले व ते माकडं ताई भोंबे यांचे घरावर कुदले. त्या मुळे ताई भोंबे सह अन्य पांच जनांनी पुरुषोत्तम व त्याची आईला अश्लिल शिवीगाळ व लोटपाट केली. त्यानंतर ताई भोंबे ही माझे पुतण्याचे नावाचा रिपोर्ट देण्या करीता पोलीस स्टेशनला गेली व तीने पुरूषोत्तमचे नावाचा रिपोर्ट दिला. त्यानंतर पुरुषोत्तम व त्याची आई असे दोघे जण पोलीस स्टेशनला 11 वा दरम्यान रिपोर्ट देण्या करीता आले असता ठाणे अंमलदार बोंबटकार यांनी पुरुषोत्तमला दाटदपट करून थांब तु आत्ताच आला असे म्हणुन रिपोर्ट घेण्यास विलंब केला. व त्याला व आई वडिलांना गलीच्छ भाषेत शिवीगाळ करत आत टाकण्याची धमकी दिली. ठाणे अमलदाराची ही वागवणुक अपमानास्पद वाटली तसेच शेजारच्या मंडळीचे सततच्या खोटया तक्रारीला कंटाळुन पुरूषोत्तम याने पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न दि. 26 नोव्हे. रोजी केला होता. त्यानंतर त्यांचा सिल्व्हर सिटी हॉस्पीटल खामगांव येथे इलाजा दरम्यान आज 1 डिसेंबरला सकाळी 8 वाजता ते मरण पावले.
     
अरूण दशरथ भोंबे यांच्या तक्रारिवारुन मृतक पुरुषोत्तमची आत्महत्येस कारणीभुत आरोपी ताई उखर्डा भोंबे, उखर्डा भिका भोंबे, संतोष उखर्डा भोंबे,तुळसाबाई उखर्डा भोंबे, सरला उखर्डा भोंबे व ठाणे अमलदार बोंबटकार यांच्या विरुद्ध भादवीची कलम 306,294,506,34 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उपविभागीय पोलिस अधिकारी गिरीश बोबडे व ठानेदार सुनील जाधव यांनी संपूर्ण परिस्थिति व्यवस्थित संभाळली.गुन्हा दाखल झाल्या नंतर नातेवाइकांनी प्रेत ठाण्यातुन घरी नेला.

अहमदनगर (प्रतिनिधी)  पाईपलाईनरोडवर असलेले सोन्या-चांदीचे दुकान फोडून चोरट्याने 65 हजार 250 रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे लंपास केले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, किशोर दत्तात्रय नांदुरकर (वय- 57 रा. दळवी मळा, पाईपलाईनरोड) यांचे पाईपलाईनरोडवर सागर हॉटेलसमोर सोन्या-चांदीचे दुकान आहे. शनिवारी (दि. 30) रात्री नऊ ते रविवारी (दि. 01) सकाळी सातच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने बंद दुकानाचे कुलूप तोडून दुकानात ठेवलेले 65 हजार 250 रूपये किंमतेचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेले. नांदुरकर यांच्या रविवारी सकाळी चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास तोफखाना पोलीस करत आहे.

बुलडाणा : उपद्रवी माकडाचा उच्छाद परस्परांच्या वादालाच नव्हे तर वादानंतर पोलिस तक्रारीच्या नैराश्यातून एका फिर्यादीच्या आत्महत्येला कारणीभूत ठरला आहे. 26 नोव्हेंबरला ठाण्यात विष प्राशन केल्या नंतर 30 नोव्हेंबरच्या रात्री सदर व्यक्तीचा खामगांव येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना जळगाव जामोद पोलिस ठाण्यातील आहे.

        या बाबत पोलिस सुत्रानुसार, बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद ठाणा हद्दीत आसलगाव येथील ताई उखर्डा भोंबे ह्या 26 नोव्हेंबरला आपल्या घरावर उच्छाद घालणाऱ्या उपद्रवी माकडाला हुसकावून लावण्यासाठी घरावर चढल्या. त्या माकड हाकलून लावत असतांना आरोपी पुरुषोत्तम नारायण भोंबे याने महिलेला "वेश्या" संबोधून अश्लील शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार ताई भोंबे यांनी जळगाव जा. पोलिसात केल्यावरून आरोपीविरुद्ध कलम 294, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पुरुषोत्तम नारायण भोंबे यांनी देखील ताई भोंबे विरोधात तक्रार दिली आहे.आरोपी ताई उखर्डा भोंबे, संतोष उखर्डा भोंबे, उखर्डा भोंबे यांनी संगणमताने आईला मारहाण तसेच शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी 26 नोव्हेंबरला सदर तिनही आरोपीविरुद्ध कलम 294, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र आपली तक्रार पोलिस नोंदवित नाहीत, असे  पुरुषोत्तम भोंबे यांना वाटत होते. त्यामूळे त्यांनी या नैराश्यातून त्याच वेळी ठाण्याच्या आवारात विष प्राशन केले.हे समजताच पोलीसाने त्यांना दवाखान्यात दाखल केले व पुढील उपचारासाठी त्यांना खामगांवला नेण्यात आले.तेथे उपचार सुरु असताना रात्री त्यांचा मृत्यु झाला.सदर माहिती त्यांच्या नातेवाइकांना मिळताच आज शव घेऊन ते ठाण्यात दाखल झाले व या घटनेला कारणीभूत पोलिसांवर कार्रवाई करण्याची मागणी करू लागले.उपविभागीय पोलिस अधिकारी गिरीश बोबडे,ठानेदार सुनील जाधव यांनी संतप्त लोकांची समजूत काढली व त्यांना लेखी मध्ये योग्य ती कार्रवाई करण्याचा पत्र देण्याची प्रक्रिया सुरु आहे.

चौकशी करण्यात येईल! बोबडे
ऑनलाइन गुन्हा दाखल करण्यास थोडा वेळ लागतो अशात जर विज पुरवठा खंडित झाला तर आपण समजू शकता ही तांत्रिक अडचन आहे.पुरुषोत्तम भांबे यांच्या मृत्यु प्रकारणाची सखोल चौकशी मी स्व:ता करणार आहे वे जे कोणी दोषी अढळला तर त्याच्यावर निश्चितपणे कार्रवाई करण्यात येणार अशी प्रतिक्रिया एसडीपीओ गिरीश बोबडे यांनी पत्रकारांना दिली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget