Latest Post

अहमदनगर (प्रतिनिधी)  पाईपलाईनरोडवर असलेले सोन्या-चांदीचे दुकान फोडून चोरट्याने 65 हजार 250 रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे लंपास केले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, किशोर दत्तात्रय नांदुरकर (वय- 57 रा. दळवी मळा, पाईपलाईनरोड) यांचे पाईपलाईनरोडवर सागर हॉटेलसमोर सोन्या-चांदीचे दुकान आहे. शनिवारी (दि. 30) रात्री नऊ ते रविवारी (दि. 01) सकाळी सातच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने बंद दुकानाचे कुलूप तोडून दुकानात ठेवलेले 65 हजार 250 रूपये किंमतेचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेले. नांदुरकर यांच्या रविवारी सकाळी चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास तोफखाना पोलीस करत आहे.

बुलडाणा : उपद्रवी माकडाचा उच्छाद परस्परांच्या वादालाच नव्हे तर वादानंतर पोलिस तक्रारीच्या नैराश्यातून एका फिर्यादीच्या आत्महत्येला कारणीभूत ठरला आहे. 26 नोव्हेंबरला ठाण्यात विष प्राशन केल्या नंतर 30 नोव्हेंबरच्या रात्री सदर व्यक्तीचा खामगांव येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना जळगाव जामोद पोलिस ठाण्यातील आहे.

        या बाबत पोलिस सुत्रानुसार, बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद ठाणा हद्दीत आसलगाव येथील ताई उखर्डा भोंबे ह्या 26 नोव्हेंबरला आपल्या घरावर उच्छाद घालणाऱ्या उपद्रवी माकडाला हुसकावून लावण्यासाठी घरावर चढल्या. त्या माकड हाकलून लावत असतांना आरोपी पुरुषोत्तम नारायण भोंबे याने महिलेला "वेश्या" संबोधून अश्लील शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार ताई भोंबे यांनी जळगाव जा. पोलिसात केल्यावरून आरोपीविरुद्ध कलम 294, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पुरुषोत्तम नारायण भोंबे यांनी देखील ताई भोंबे विरोधात तक्रार दिली आहे.आरोपी ताई उखर्डा भोंबे, संतोष उखर्डा भोंबे, उखर्डा भोंबे यांनी संगणमताने आईला मारहाण तसेच शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी 26 नोव्हेंबरला सदर तिनही आरोपीविरुद्ध कलम 294, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र आपली तक्रार पोलिस नोंदवित नाहीत, असे  पुरुषोत्तम भोंबे यांना वाटत होते. त्यामूळे त्यांनी या नैराश्यातून त्याच वेळी ठाण्याच्या आवारात विष प्राशन केले.हे समजताच पोलीसाने त्यांना दवाखान्यात दाखल केले व पुढील उपचारासाठी त्यांना खामगांवला नेण्यात आले.तेथे उपचार सुरु असताना रात्री त्यांचा मृत्यु झाला.सदर माहिती त्यांच्या नातेवाइकांना मिळताच आज शव घेऊन ते ठाण्यात दाखल झाले व या घटनेला कारणीभूत पोलिसांवर कार्रवाई करण्याची मागणी करू लागले.उपविभागीय पोलिस अधिकारी गिरीश बोबडे,ठानेदार सुनील जाधव यांनी संतप्त लोकांची समजूत काढली व त्यांना लेखी मध्ये योग्य ती कार्रवाई करण्याचा पत्र देण्याची प्रक्रिया सुरु आहे.

चौकशी करण्यात येईल! बोबडे
ऑनलाइन गुन्हा दाखल करण्यास थोडा वेळ लागतो अशात जर विज पुरवठा खंडित झाला तर आपण समजू शकता ही तांत्रिक अडचन आहे.पुरुषोत्तम भांबे यांच्या मृत्यु प्रकारणाची सखोल चौकशी मी स्व:ता करणार आहे वे जे कोणी दोषी अढळला तर त्याच्यावर निश्चितपणे कार्रवाई करण्यात येणार अशी प्रतिक्रिया एसडीपीओ गिरीश बोबडे यांनी पत्रकारांना दिली आहे.

बुलडाणा- 30 नोव्हे.
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली शहरापासून दोन किलो मीटर अंतरावर खामगांव-जालना हायवे वरील मेहकर फाटा येथे तांदुळाने भरलेला एक ट्रक रात्री तीन वाजताच्या सुमारास मेहकर पलटी झाल्याची घटना घडली असून रात्री ट्रक ड्रायव्हर व क्लिनर घटनास्थळ वरुन पळून गेले होते.या मुळे असा व्यक्त केला जात आहे की सदर तांदुळ रेशनचे तर नाही ना ?
      चिखली जवळ असलेल्या मेहकर फाटा परिसरात तंदुळने भरलेला ट्रक क्र. MH 20 DE 5099 पलटी झाल्याची घटना रात्री घडली व ट्रक चालक व क्लीनर तेथून फरार झाले. दुपारी बाराच्या सुमारास ट्रकच्या ड्रायव्हर ने जोगेश्वरी ट्रेडिंग कंपनी, चोपडा या नावाने मालाचे बिल व बिल्टी घेऊन चिखली पोलीस स्टेशनला हजर झाला. बिल्टी वरुण स्पष्ट होते की
जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथून 25 टन तंदुळणे भरलेला ट्रक गोंदिया जाणार होता,चोपडा येथून गोंदिया जाणारा ट्रक चिखली येथे कशासाठी आला असेल ? ते तांदूळ रेशनचे आहे का ? अशे प्रश्न उपस्थित होत आहे. चिखली पुरवठा विभाग व पोलीस प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी जावून आले.या विषयी चिखली तहसीलदार अजितकुमार येळे यांच्याशी विचारले असता ते म्हणाले की,आमचे लोक गेले होते व सदर तांदूळाशी आमचा काही संबंध नाही तरीही योग्य चौकशी करण्यात येईल.या प्रकरणी ठाण्यात फक्त अपघात घडल्याचा गुन्हा नोंद होण्याची माहिती मिळत आहे.सदरचे तांदूळ रेशन माफियाचे आहे की नाही सद्या है अस्पष्ट आहे.प्रशासनाने निष्पक्षपणे चौकशी केली तर रेशन धान्य संबंधी मोठा खुलासा समोर येऊ शकते.हे तांदूळ सार्वजनिक वितरण प्रणालीचे असून काळ्याबाजारात जात होते, अशी चर्चा चिखली शहरात सुरु आहे.


कोपरगाव (प्रतिनिधी)
एका दुचाकीतील चोरीच्या गुन्ह्यात आपल्याला अटक करू नये व मदत करण्याच्या मोबदल्यात शिर्डी पोलीस ठाण्याचे दोन पोलीस शिपाई ज्ञानेश्वर पाराजी सुपेकर व विशाल पी.मैद या दोघाना चाळीस हजार रुपयांची लाचेची मागणी पुणतांबा फाटा पंचासमक्ष केल्याने नगर येथील लाच प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे.सदरचे सविस्तर वृत्त असे कि, कोपरगाव येथील रहिवाशी तरुण सागर मेहमूद सय्यद यांचे येवला रस्ता कोपरगाव या ठीकाणी विविध कंपनीच्या दुचाकी खरेदी विक्रीचे दुकान असून कोपरगाव बागुल वस्ती येथील बंडू जगताप नावाच्या एका युवकाने त्यांच्याकडून मे 2018 रोजी एक बजाज पल्सर कंपनीची दुचाकी खरेदी केली होती.त्याने ती संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील बाजारात ती अज्ञात इसमास अदलाबदल करून विकली असल्याची माहिती समजते.दरम्यान शिर्डीत दरम्यान शिर्डीत एका परप्रांतीय महिलेची पर्स ओढताना काही चोरटे पकडण्यात आले होते.त्यात हि प्लसर गाडी सापडल्याने शिर्डी पोलिस शिपाई ज्ञानेश्वर सुपेकर व विशाल मैद यांनी दुचाकी दलाल सागर सय्यद व त्यांचा भाऊ मोहसीन सय्यद यांचेकडिल असल्याचा बहाणा करून सागर सय्यद त्याचा भाऊ मोहसीन सय्यद व त्यांच्याकडे काम करणारा राहुल काकडे यांची नावे वगळण्यासाठी पन्नास हजारांची मागणी केली शुक्रवार 22 नोव्हेंबर रोजी केली होती.त्यात तडजोड होऊन ती रक्कम चाळीस हजार रुपये करण्यात आली.त्यावेळी हि रक्कम जास्त व अन्यायकारक वाटल्याने या दोघांनी या बाबत अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करून न्याय मागितला होता.त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोपरगाव नजीक असलेल्या पुणतांबा चौफुलीवर शुक्रवार दि.22 नोव्हेंबर रोजी साडेचारच्या दरम्यान सापळा लावला होता.त्यात फिर्यादी सागर सय्यद व त्याचा भाऊ मोहसीन सय्यदव त्यांच्याकडे काम करणारा मुलगा राहुल काकडे यांना अटक न करण्याच्या मोबदल्यात चाळीस हजार रुपये देण्याची चर्चा तेथे असलेल्या पंचासमक्ष चालू असताना आरोपी पोलीस शिपाई सुपेकर व मैद यांना संशय आल्याने त्यांनी पोबारा केला होता.दरम्यान या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी एच.डी. खेडकर यांनी समक्ष भेट देऊन पाहणी करून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गु.र.नं.394/2019 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन.1988 चे कलम 7 प्रमाणे आरोपी ज्ञानेश्वर सुपेकर व विशाल मैद यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक दैपाक करांडे हे करीत आहेत.दरम्यान या प्रकरणामुळे पोलीस विभागात चालत असलेला भ्रष्टाचार उघड झाल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात तृतियपंथियाचा मारहाणीत मृत्यू झाला असून श्रीरामपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.दि. 17 ऑक्टोबर रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात अश्विनी नुरजहाँ शेख (वय-45, रा.श्रीरामपूर) या तृतियपंथीयाला अज्ञात व्यक्तींनी काहीतरी टणक वस्तूने डोक्यात मारहाण केली होती. यामध्ये ते जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटल अहमदनगर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याबाबत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात वैद्यकीय अधिकार्‍यांच्या अहवालानुसार दि. 29 रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक फौजदार सुरेश रामचंद्र मुसळे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सपोनि संभाजी पाटील करीत आहेत.

बुलडाणा- 29 नोव्हे.
जिल्ह्यात गुटख्याची सर्रास विक्री सुरू आहे. ही विक्री तत्काळ बंद करुन खामगाव शहरातील मुख्य गुटखा तस्करावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता समीर खान यांनी आज जिल्हाधिकारी, अन्न व औषध प्रशासन आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे. कारवाई न झाल्यास स्वतः गुटख्याच्या गोडाऊनवर धाड टाकण्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.
     महाराष्ट्र राज्यात गुटखा, सुगंधित तंबाखूची बिक्रीवर बंदी आहे.असे असतांना अनेक लोक प्रशासनातील भरष्ट अधिकाऱ्याचा खिशा गरम करुण गुटख्याचा अवैध व्यापार करुण "गब्बर" झाले तर इतकेच नव्हे या धंध्यातुन आडमाप कमाई करत अनेकांनी आता हा धंधा बंद करुण अशे तस्कर राजकारणात सक्रिय झाले आहे.जिल्हा प्रशासनाला समीर खान यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की खामगाव शहरातील एक मोठा गुटखा तस्कर संपूर्ण जिल्हाभरात गुटखा पोहोचवतात. खामगावातील मुख्य अवैध गुटखा तस्करांची चौकशी करून त्याच्याविरूद्ध अन्न व औषध कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा येत्या 2 डिसेंबरला आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात शेवटी करण्यात आला आहे.


अंबड : प्रतिनिधी अंबड तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातून होत असलेली अवैध वाळु वाहतुक डोकेदुखी ठरत आहे. कारवाई केल्यानंतरही अवैध वाळू वाहतुक थांबत नाही. त्यामुळे ही फक्त कारवाई दिखावू आहे की काय? किंवा या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर महसूल प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे हात आहेत का? असा सवाल उभा राहत आहे. यातच जिल्हाधिकारी जालना यांनी महसूल प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे वाळू माफिया सोबत संबध उघड झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात निलंबनाच्या कारवाई मुळे मोठी खळबळ माजली आहे निलबंनाची कारवाई झालेला बडा अधिकारी कोण याची सर्वांना उत्सुकता लागली असून वाळू प्रकरणात झालेली अनियमितता हेच मोठे कारण निलबंन कारवाईचे असु शकते असा कयास बांधला जात आहे. उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी गेल्या महिनाभरापासुन वाळु माफियांच्या विरोधात कारवाईची मोहिम सुरू करीत वाळु माफियांना मदत करणाऱ्या लोकांवरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. अवैध वाळु वाहतुक रोखण्यासाठी रस्ते देखील उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी नुकतेच खोदलेले होते. निलंबनाची कारवाई झालेला तो बडा अधिकारी कोण याबाबत माहिती विचारणा करण्यासाठी उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होवु शकलेला नाही. निलंबनाच्या कारवाईमुळे महसूल प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget