Latest Post

पुणे : ज्या लोकांना वाहनकर्जाची गरज आहे. मात्र त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची कागदपत्रे नाहीत. त्यांना आपल्या जाळयात ओढून त्यांची लाखो रुपयांची वाहनकर्जे मंजुर करणाऱ्या तीन ठकसेनांना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील सरकारी व खासगी बँकांच्या विविध शाखांमधून तब्बल ५९.५ लाखांची कर्जेप्रकरणे मंजुर केली असून त्यांच्याकडून ४० लाख रुपयांच्या ४ गाड्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणात एकूण तीन जणांना अटक करण्यात आली आहे. धनंजय बाळासो जाधव (वय ४८, रा. ॠषीकेश को ऑप हौसिंग सोसायटी, माळवाडी रस्ता), आनंद प्रेमसिंग कुमार उर्फ राकेश परमार (वय ४१, वराही अपार्टमेंट, कात्रज कोंढवा रस्ता), अभिजित रमेश सोनवणे (वय ३०, कोंढवे धावडे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यापूर्वी विमाननगर येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखा व्यवस्थापक श्रृती जैन यांनी त्यांच्या बँकेतून जाधव याने वाहनकर्ज प्रकरण करुन १० लाख रुपयांची फसवणूक केल्याबाबत तक्रार अर्ज दिला होता. अर्जाची चौकशी करताना गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलीस हवालदार अजय खराडे यांना या गुन्ह्याचे स्वरुप मोठे असून त्यात आणखी काही व्यक्तींचा समावेश असल्याचा संशय आला. त्यानुसार त्यांनी तांत्रिक माहितीव्दारे तपास सुरु केला. अटक आरोपीपैकी आनंद प्रेमसिंग कुमार उर्फ राकेश परमार हा गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार आहे. तो ज्या लोकांना वाहन कजार्ची गरज आहे. मात्र त्याकरिता त्यांच्याकडे कुठलीही कागदपत्रे नाहीत त्यांना हेरुन आपल्या जाळयात ओढायचा. तसेच दुसरा आरोपी अभिजित रमेश सोनवणे याच्याकरवी बनावट आयटी रिटर्न्स, बदल केलेले शॉप अँक्ट लायसन्स तयार करण्याचे काम करत असे.  सुरुवातीला एखाद्या सहकारी बँकेत चालु (करंट) खाते काढून ज्या बँकेतून कर्ज प्रकरण केले आहे. त्या बँकांना बँक ऑफ महाराष्ट्रचे अकाऊंट देऊन त्यात पैसे ट्रान्सफर केले जायचे. परमार याने एकूण ९ सरकारी व खासगी बँकांच्या पुण्यातील विविध शाखांमधून एकूण ५९.५ लाखांची कर्ज प्रकरणे केली. आरोपीकडून ४० लाखांच्या चार गाड्या जप्त केल्या आहेत. परमार याच्यावर आणखी पाच गुन्हे दाखल असून त्याबाबत तपास सुरु आहे. पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी, परिमंडळ चारचे पोलीस उपआयुक्त प्रसाद अक्कानवरु, येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, बलवंत मांडगे, पोलीस हवालदार अविनाश शेवाळे, मोहन काळे, अजय खराडे, संजय आढारी यांनी ही कामगिरी पार पाडली.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- चुकीची व उशिरा माहिती देऊन राज्य माहिती आयोगाचा अवमान करणार्‍या श्रीरामपूर नगर परिषदेच्या बांधकाम पर्यवेक्षकास 25 हजार रुपयांचा दंड का करू नये, अशी नोटीस नाशिक येथील राज्य माहिती आयुक्त के. एल. बिश्नोई यांनी बजावली आहे. आयुक्तांनी मागविलेला खुलासा समाधानकारक नसल्यास दंडाची कारवाई केली जाणार आहे.येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल भनगडे यांनी शहरातील मुख्य रस्त्यावरील बुवा हलवाई यांचे सिटी सर्व्हे नं. 642 ते 690 ते 685, 670 ते 679 अंतिम भूखंड क्र. 814 या व्यवसायीक इमारतीचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, साईट मार्जिन, पार्किंग व्यवस्था आदी माहिती मागितली होती. मात्र पालिकेने माहिती न देता दुसर्‍या भुखंडाची चुकीची व विलंबाने माहिती दिली. याबाबत भनगडे यांनी पुन्हा माहिती आयोगाकडे तक्रार केली. त्यावर सुनावणी होऊन पालिकेच्या बांधकाम पर्यवेक्षकास आयुक्तांनी नोटीस बजावली आहे.यात म्हटले आहे की, आपण मागितल्यानुसार माहिती पुरविली नाही. तसेच हेतुपुरस्सर माहिती पुरविण्यास टाळाटाळ केल्याचे दिसून येते, म्हणून माहिती अधिकार अधिनियम 2005 चे कलम 20 (1) अन्वये 25 हजार रुपये दंडांची कारवाई का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा आयोगाकडे सादर करावा. अन्यथा दंडाची कारवाई पूर्ण केली जाईल, असा आदेश आयुक्तांनी दिला आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी)-काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय हुतात्मा एक्सप्रेसमधील हजारो प्रवाशांना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास नगर तालुक्यातील देहरे शिवारात आला. वेगात चाललेल्या रेल्वेतील प्रवाशांचे प्राण एका शेतक-याच्या सतर्कतेमुळे वाचले. रेल्वेचा मार्ग तुटल्याचे त्याने पाहताच प्रसंगावधान राखत रेल्वे थांबवण्यास भाग पाडले. तुटलेला रेल्वे मार्ग पाहून रेल्वेतील कर्मचाºयांना धक्काच बसला. शेतक-यामुळे मोठी दुघर्टना टळली.रामदास बापूराव थोरात (वय ४५, रा. विळद, ता. नगर) असे त्या शेतक-याचे नाव आहे. मनमाडहून नगरच्या दिशेने जाणारी भुसावळ-पुणे हुतात्मा एक्सप्रेस आज सकाळच्या वेळी राहुरी तालुक्यातील वांबोरीहून नगरच्या दिशेने जात होती. ही गाडी नगर तालुक्यातील देहरे, विळद परिसरात आली होती. त्यावेळी येथून रेल्वे लाईनक्रॉस करून आपल्या शेतात पाणी देण्यासाठी शेतकरी रामदास बापूराव थोरात हे जात असताना विळद-वांबोरीच्या दरम्यान रेल्वेचा मार्ग (रूळ) तुटल्याचे शेतक-याच्या निदर्शनास आले. त्याच वेळी समोरच्या दिशेने भरधाव वेगाने गाडी येत असल्याचे त्यांनी पाहिले. आता पुढे काय होणार याची कल्पना या शेतक-याला क्षणात आली. त्याच वेळी क्षणाचा विलंब न करता थोरात यांनी लगेच हालचाल सुरू केली. आपल्या जिवाची परवा न करता त्यांनी अंगातील लाल रंगाचे बनियन काढून हजारो लोकांचे प्राण वाचवण्यासाठी रेल्वे रूळातून गाडीच्या दिशेने हातात लाल बनियन फडकवत धाव घेतली. वाढते वय व शरीर यांची तमा न बाळगता ते वेगाने धावत सुटले. काळजाचा ठोका चुकावा असा तो क्षण होता. पळून त्यांना खूप दम लागला होता तरीही ते न थांबता रेल्वे रूळातून पळत राहिले. लाल कापड फडकवत असलेला व गाडीच्या दिशेने तो व्यक्ती पळत येत असल्याचे रेल्वे चालकाने पाहिले. या व्यक्तीला काहीतरी धोक्याची सूचना द्यायची असल्याचे लक्षात येताच चालकाने त्वरीत ब्रेक लाऊन गाडी थांबवली. शेतक-याने रेल्वेचा रूळ पुढे तुटल्याचे सांगितले. चालकाने व इतर रेल्वे कर्मचा-यांनी खातजमा केली. झालेली घटना त्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांना कळविली. रेल्वे कर्मचाºयांनी काही वेळात येऊन तात्पुरता रेल्वे रूळ दुरूस्त करून गाडी पुढे जाऊ देण्यात आली

बेलापूर   (प्रतिनिधी  )--सर्व धर्म समभाव ही मुस्लिम धर्माचे संस्थापक हजरत मोहंम्मद पैगंबर यांची शिकवण आहे त्यानुसारच गावातील सर्व बांधवानी जातीय सलोखा ठेवला व भविष्यातही ठेवावा असे अवाहन हाजी ईस्माईल शेख यांनी केले     मोहमंद पैगबर जयंती निमित्त बेलापूर येथील जामा मस्जिद येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते या वेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य शरद नवले उपसरपंच रविंद्र  खटोड सुधीर नवले आदि प्रमुख  अतिथी उपस्थित  होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाजी बहोद्दीन सय्यद हे होते  प्रारंभी  ईदगाह मैदाना पासुन मिरवणुकीस प्रारंभ झाला झेंडा चौकात आल्यावर मिठाई वाटण्यात आली या वेळी अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे  तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश कुर्हे हवालदार अतुल लोटके यांनी मिरवणुकीचे स्वागत केले त्यानंतर जामा मस्जिद येथे कार्यक्रम संपन्न् झाला लहान मुलांची मोहंमद पैगंबर यांच्या जिवनावर भाषणे झाली त्यानंतर बोलताना जिल्हा परीषद सदस्य शरद नवले यानी सांगितले की मोहंमद पैगंबरांनी जगाला शांततेचा संदेश दिला आहे पैगंबरांची शिकवण आचरणात आणण्याची गरज आहे  या वेळी उपसरपंच रविंद्र खटोड सुधीर नवले यांनीही मनोगत व्यक्त केले या वेळी जाफरभाई आतार अजिज शेख रफीक शेख अतिश देसर्डा पोलीस काँ .बाळासाहेब  गुंजाळ निखील तमनर पोपट भोईटे उपस्थित  होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहारुख आतार अय्याज सय्यद कौसर सय्यद मुन्ना बागवान जब्बार आतार समीर जहागीरदार यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मोहसीन सय्यद यांनी केले तरअब्रार शफीक आतार यांनी आभार मानले

बुलढाणा- 9 नोव्हे
चिखली शहरात अवैध धंद्याना उत आले असून हे धंदे सर्रासपणे चालविणाऱ्या लोकांना जणू पोलिसांची भीतीच उरली नसल्याचे प्रथमतः दिसून येत आहे.मुख्यतः शहरातील बाजार परिसरातील भर रस्त्यात व लहान लहान गल्लीबोळात सर्रासपणे वरली मटक्याचे आकडे मांडल्या जात असून याकडे मात्र पोलिसांचा अर्थपूर्ण कारणाने दुर्लक्ष असल्याने संभ्रम परिस्थिती निर्माण झालेली असल्याचे जागरूक नागरिक बोलत आहे.
     एकीकडे चिखलीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार गुलाबराव वाघ हे आपल्या कार्यकर्तव्यामुळे तालुक्यात सर्वदूर परिचित आहे. चिखली शहरात ठाणेदार गुलाबराव वाघ यांनी राबविलेल्या विवीध उपक्रमामुळे ते लोकप्रिय झाले, परंतु अश्या कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जाणाऱ्या अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रातच वरली मटका खेळणारे व खेळवणारे सर्वच सहजच दृष्टीस पडल्याशिवाय राहत नाही.सामान्य नागरिक या अवैध धंद्यांना आळा बसावा यासाठी आग्रहित आहे.या अवैध धंद्यामुळे नेहमी बाजार खरेदीसाठी जाणाऱ्या महिलांना नाहक त्रास सहन करावाच लागतो. तसेच या ठिकाणी वरली खेळणाऱ्या लोकांमधील देवाणघेवाण होत असतांना नेहमी वाद ही होतातच तर कधी कधी या वादाचे स्वरूप भांडणात व हाणामारीत परिवर्तीत होऊन बाजारातील दुकानदार, बाजार करण्यास येणारे लोकांना व महिला व लहान मुलांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो.
    चिखली शहरात सर्रास चालणारे अवैध वरली व्यवसायवर संपूर्ण बंदी घालने ठानेदार वाघ यांच्या साठी काही मोठी गोष्ट नाही फक्त त्यांनी मनावर घेतले पाहिजे,अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त करता अशी मागणी केली की,उपविभागीय पोलीस अधिकारी बरकते, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटिल भुजबळ यांनी विशेष लक्ष द्यावे.

बेलापुर प्रतिनिधी-- अयोध्याप्रश्नी निकाल हा कोणत्याही धार्मिक समुदायाने आपल्या विरोधात किंवा आपल्या बाजूने लागला आहे असा ग्रह करू नये .तो आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा असून आपण त्याचा मान राखून स्वीकारावा , , ,असे अवाहन उपविभागीय पोलिस अधीकारी   राहुल मदने यांनी केले आहे   
मोहम्मंद पैगंबर जयंती  वआयोध्या प्रश्नी  निकालाबाबत नागरीकात  संभ्रम पसरवु नये या करीता बेलापूरातील औट पोस्ट येथे शांतता कमीटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते  .
पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे यांनी अयोध्या प्रश्न हा राजकीय नसून न्यायालयीन बनलेला आहे ,त्यामुळे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करावे ,असे सांगितले ,
तर पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांनी बेलापूर च्या नागरिकांचे विशेष कौतुक करून आजपर्यंत कुठल्याही धार्मीक कार्यक्रम असो वा मिरवणूकी दरम्यान  शांतता व सुव्यवस्था राखणे कामी बेलापूरच्या नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य केले आहे व यापुढेही करतील ,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला..
या वेळी  सुनील मुथा  संघाचे मारुती राशीनकर , रणजीत श्रीगोड ,देविदास देसाई, नवनाथ कुताळ, 
प्रा. ज्ञानेश गवले, अतिष देसर्डा,
दिपक क्षत्रिय,दिलीप दायमा,तंटामुक्तीचे अध्यक्ष  प्रकाश कुर्हे अशोक गवते ,जिल्हा परिषद सदस्य शरद नवले , प .स  सदस्य अरुण पा. नाईक ,मार्केट कमिटी सदस्य सुधीर नवले ,अभिषेक खंडागळे ,  भरत साळुंके,उपसरपंच रविंद्र खटोड,लहानुभाऊ नागले ,आलम शेख,जिना शेख,दस्तगिर शेख,प्रा अशोक बडधे मोहसीन सय्यद हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे  निखील तमनर पोपट भोईटे  इ.हजर होते.काँ बाळासाहेब  गुंजाळ यांनी आभार मानले

श्रीगोंदा (प्रतिनिधी) श्रीगोंदा पोलिसांच्या पथकाने घोगरगाव परिसरात अतुल रघुनाथ आगरकरला ताब्यात घेतले तो बनावट नोटा देऊन सोने खरेदी करणार होता. त्याच्याकडिल दोन लाख 73 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून ही बनावट नोटांची लिंक थेट बारामतीपर्यंत असून श्रीकांत सदाशिव माने (रा.बारामती) याने या बनावट नोटा दिल्या होत्या. माने याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांना श्रीगोंदा न्यायालयासमोर हजर केले असता 12 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.श्रीगोंदा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावीत यांच्या पथकाने हा सापळा रचला होता. यात बनावट नोटा घेऊन आलेली ही व्यक्ती 2 लाख 83 हजार रुपये बनावट देऊन सोने खरेदी करणार होती. काळ्या रंगाच्या गाडी मध्ये आलेला अतुल रघुनाथ आगरकर रा.जवळेवाडी, सुपा, हा बनावट नोटा रक्कम रुपये 283000 बाळगताना मिळाला. त्यात 2000 रुपये दराच्या 92 व 500 दराच्या 199 नोटा बनावट बाळगताना सापडला होता त्याने सांगितल्याप्रमाणे पथकाने बारामती येथे श्रीकांत सदाशिव माने याला ताब्यात घेतले या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले त्यांना 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.आरोपी बड्या घरचेपकडण्यात आलेल्या आरोपीकडे आलिशान गाडी असून बारामतीमध्ये ताब्यात घेतलेला आरोपी बड्या घरचा आहे.रात्री या आरोपीला ताब्यात घेतल्यावर बराच गोंधळ आरोपीने केला असल्याचे सांगण्यात आले .पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेऊन बारामती पोलीस स्टेशनला माहिती दिली.बनावट नोटा छापल्या कुठे ? श्रीगोंदा पोलिसांच्या पथकाने या बनावट नोटा ताब्यात घेतल्या यात दोघांना ताब्यात घेतले असले तरी या बनावट नोटा छापणारी टोळी नेमकी कुठली आहे याचा तपास सुरू आहे.यात काही महिलांचा समावेश देखील असण्याची शक्यता आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget