श्रीरामपूर (प्रतिनिधी)- चुकीची व उशिरा माहिती देऊन राज्य माहिती आयोगाचा अवमान करणार्या श्रीरामपूर नगर परिषदेच्या बांधकाम पर्यवेक्षकास 25 हजार रुपयांचा दंड का करू नये, अशी नोटीस नाशिक येथील राज्य माहिती आयुक्त के. एल. बिश्नोई यांनी बजावली आहे. आयुक्तांनी मागविलेला खुलासा समाधानकारक नसल्यास दंडाची कारवाई केली जाणार आहे.येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल भनगडे यांनी शहरातील मुख्य रस्त्यावरील बुवा हलवाई यांचे सिटी सर्व्हे नं. 642 ते 690 ते 685, 670 ते 679 अंतिम भूखंड क्र. 814 या व्यवसायीक इमारतीचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, साईट मार्जिन, पार्किंग व्यवस्था आदी माहिती मागितली होती. मात्र पालिकेने माहिती न देता दुसर्या भुखंडाची चुकीची व विलंबाने माहिती दिली. याबाबत भनगडे यांनी पुन्हा माहिती आयोगाकडे तक्रार केली. त्यावर सुनावणी होऊन पालिकेच्या बांधकाम पर्यवेक्षकास आयुक्तांनी नोटीस बजावली आहे.यात म्हटले आहे की, आपण मागितल्यानुसार माहिती पुरविली नाही. तसेच हेतुपुरस्सर माहिती पुरविण्यास टाळाटाळ केल्याचे दिसून येते, म्हणून माहिती अधिकार अधिनियम 2005 चे कलम 20 (1) अन्वये 25 हजार रुपये दंडांची कारवाई का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा आयोगाकडे सादर करावा. अन्यथा दंडाची कारवाई पूर्ण केली जाईल, असा आदेश आयुक्तांनी दिला आहे.
Post a Comment