Latest Post

गंगापूर तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
बि ए एम एस डाॅक्टरने घेतला गरोदर मातेचा बळी,
गंगापुर शहरात पुन्हा एकदा बि ए एम एस डाॅक्टरने घेतला गरोदर मातेचा बळी गंगापूर तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे. वरिष्ठ अधिका-यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
शहरातील ओमसाई हाँस्पीटल मधे 28 वर्षीय महीलेची प्रसुती झाल्यानंतर जास्त रक्त स्त्राव झाल्याने तीचा मृत्यू झाल्याची घटना पहाटे पाच वाजता घडली आशमा हमीद शेख असे महीलेने नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गंगापुर शहरातील नवीन बस स्टँड जवळ असलेल्या डॉ अमीत गुंजाळ यांची पत्नी
डॉ. सौ. अर्जना गुंजाळ यांचे ओमसाई हाँस्पीटल मधे मन्सूरी काँलनी येथील आशमा हमीद शेख वय 28 वर्ष हीला प्रसुती करिता दाखल करण्यात आले होते डॉ अमीत गुंजाळ व डॉ. सौ. अर्जना गुंजाळ यांनी या महीलेची प्रसुती केली प्रसुती नंतर आशमास जास्त रक्त स्त्राव होत असल्याने डॉ गुंजाळ यांनी महीलेच्या नातेवाईकांना सागींतले आशमा हीला रक्तदाब वाढला आसुन औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला यावर नातेवाईकांनी तत्काळ घाटी रुग्णालयात घेऊन गेले असता रात्री अडीच वाजता दाखल केले परंतु उपचार चालू असतांना आशमा हीचा मृत्यू झाला या घटनेची माहिती गंगापुर पोलीसांना दिल्यावरुण पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चौधर व कर्मचाऱ्यांनी घाटी रुग्णालयात जाऊन पंचनामा केला यामध्ये आशमाच्या प्रसुतीनंतर अती रक्त स्त्राव झाल्याचा पंचनामा  पोलिसांनी केल्याचे सांगितले
आशमा हीच्यावर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात श्ववविच्छेदन करून मृतदेहास घेऊन नातेवाईक थेट गंगापुर पोलीस ठाणे गाठत जो पर्यंत डॉ. अमीत गुंजाळ व त्यांची पत्नी डॉ. सौ. अर्जना गुंजाळ यांच्याविरोधात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह हलवणार असा पवित्रा घेत मोठा जमाव पोलीस ठाण्यात जमा झाला होता मात्र पोलिसांनी आश्वासन दिल्याने नातेवाईकांनी मृत आशमावर अंत्यसंस्कार करण्यासाठी घेऊन गेले.

श्रीरामपुर (प्रतिनिधी)  तालुक्यातील भोकर येथील युवा शेतकरी प्रदीप बाबासाहेब नवले (वय-37) यांचा त्यांचे सख्खे भाऊ रविंद्र नवले याने मागील भांडणाच्या रागातून जड वस्तूने डोक्यात मारून खून करून मृतदेह गवतात लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,मुळ सुभाषवाडी, बेलापूर येथील रहिवाशी असलेले मात्र सध्या भोकर येथे राहत असलेले युवा शेतकरी प्रदीप बाबासाहेब नवले यांचा मृतदेह त्यांच्याच शेतात कांग्रेस गवतात आढळून आल्याची माहिती पोलीस पाटील बाबासाहेब साळवे यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली होती.माहिती मिळताच शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे,श्रीरामपुरचे पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट, सहायक पोलिस निरीक्षक एन जे शिंदे,पो का .पवार,बर्डे,लोंढे, दिघे आदींनी घटनास्थळी भेट दिली दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा खून झाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.प्रदीप नवले याचा खून त्याचा सख्खा भाऊ रविंद्र याने केल्याचा संशय पोलिसांना आला.पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता पोलिसांचा संशय खरा ठरला. दरम्यान मयत प्रदीप याची पत्नी भाऊबीजेला माहेरी गेली होती. याबाबत प्रदीप याची पत्नी स्वाती प्रदीप नवले यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, आपण मंगळवारी सायंकाळी भाऊबीजेला माहेरी आलो होतो.रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दीर रविंद्र याने आपले पती प्रदीप यांचेशी जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद घातले.वादातून काही तरी जड वस्तू डोक्यात मारून गंभीर जखमी केले.त्यात पती प्रदीप यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी रवींद्र बाबासाहेब नवले यास ताब्यात घेतले असून पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एन जे शिंदे करीत आहेत.


अहमदनगर (प्रतिनिधी) सततच्या पावसामुळे पोलीस मुख्यालयातील मैलामिश्रीत पाणी घरामध्ये घुसले आहे. त्यामुळे वसाहतीत राहणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत महिलांनी पोलीस अधिकार्‍यांकडे तक्रारीचा पाढा वाचला. मात्र, पोलीस प्रशासनानेही दुर्लक्ष केले असल्याचे दिसत आहे.पोलीस मुख्यालयातील वसाहतीमध्ये सलगच्या झालेल्या पावसाने गटारी तुंबल्या आहेत. त्यामुळे ते मैलामिश्रीत पाणी वसाहतीमध्ये घुसले असून नागरिकांना तेथे राहणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे वसाहतीमध्ये साथीचे आजार पसरत असून, आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत संबंधित प्रशासनाकडे तक्रार केली असता त्यांनीही दुर्लक्ष केले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे वसाहतीमधील काही महिलांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यलय गाठले.मात्र, पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांची भेट होऊ शकली नाही.गेल्या काही दिवसांपूर्वी पोलीस मुख्यालयातील कर्मचारी सुनील कुर्हे यांची मुलगी पूजा हिचा मृत्यू झाला होता. याबाबत पोलीस अधीक्षक सिंधू यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस मुख्यालयातील नागरी सुविधांची संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. यामध्ये महापालिका, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसील कार्यालयाचे अधिकारी सहभागी झाले होते. व नागरी सुविधांवर तातडीने काम करण्याच्या सुचनाही सिंधू यांनी दिल्या होत्या. त्यासाठी प्रत्येक विभागाच्या अधिकार्‍यांना टाईम लिमिट दिले होते. मात्र, आता पुन्हा नागरी सुविधाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गुहा - दि. २७ ऑक्टोबर २०१९
गुहा येथील गंगाधर बाबा छात्रलयातील अनाथ मुलांच्या सोबत दिवाळी साजरी करून देवळाली प्रवरा येथील आप्पासाहेब ढुस मित्र मंडळाच्या  सदस्यांनी परिसरातील तरुणांसमोर नवीन आदर्श ठेवला आहे.
देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच बैठक पार पडली, त्यामध्ये सण २०१९ ची दिवाळी फटाके व प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी साजरी करण्यावर सर्व सदस्यांचे एकमत झाले, त्यामुळे फटाक्यांच्या शिल्लक रक्कमे मध्ये गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालयातील अनाथ मुलांसाठी फळे देऊन त्यांचे सोबत दिवाळी साजरी करण्यात यावी यावर सर्वांचे एकमत झाले. व  आज रविवारी दि. २७ ऑक्टोबर २०१९ राजी रात्री ०८.३० वाजता एकीकडे फटाके फोडून सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना आप्पासाहेब ढुस मित्रमंडळाचे प्रसाद ढुस,  सुशांत वारुळे, राहुल पाटोळे, अरबाज शेख, साहिल शेख, तुषार उर्हे, अक्षय पाटील, प्रदीप भांड, ऋषिकेश शिरसाठ, अजित गवळी आदी कार्यकर्त्यांनी अनाथ मुलांच्या सोबत दिवाळी साजरी करून तरुण पिढीसमोर आदर्श निर्माण केला.
     या स्तुत्य उपक्रमा बद्दल गंगाधर बाबा छात्रलयाच्या वतीने पप्पू सपकाळ यांनी अनाथ मुलांच्या सोबत दिवाळी साजरी करून आप्पासाहेब ढुस मित्र मंडळाने तरुणांच्या समोर आदर्श निर्माण केला असे मांडून सर्व सदस्यांचे आभार मानले ..

बुलडाणा - 22 ऑक्टोबर
मतदान करतांनाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले हे कृत्य आपल्या गोपनीय मतदानाचा भंग आहे व हे गैर कृत्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल कण्यात यावा अश्या आशयची बातमी 21 ऑक्टोबर रोजी "बिनदास न्यूज़" कडून येताच प्रशासन सतर्क झाला व या प्रकारणी अज्ञात व्यक्तिवर बुलडाणा शहर ठाण्यात गुन्हा दाखल कण्यात आला आहे.
       21 ऑक्टोबर रोजी राज्यभरातील 288 विधानसभा मतदार संघात सकाळी 7 वाजे पासून मतदान प्रक्रिया सुरु झाली.दरम्यान बुलडाणा- 22 मतदार संघात मतदानाच्या दिवशी बुलडाणा विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावरील मतदान करतांनाचे काही व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल झाले व यात काही व्हिडीओत काँग्रेस उमेदवाराला, बसपा उमेदवाराला तर शिवसेना उमेदवाराला मत दिल्याचं दिसते.
       निवडणुकीत मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास निवडणूक आयोगाकडून बंदी असतांना ही काही मतदारांनी आदेशाला खो दिला आहे.अशे व्हिडीओ समोर आल्याने खरंच मतदान केंद्रावर मतदारांची मोबाईल तपासणी झाली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.या प्रकरणी "बिनदास न्यूज़" ने बातमीच्या माध्यमाने या गंभीर मुद्द्यावर प्रशानाचे लक्ष वेधले असता प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.बुलढाणा-22 निवडणूक निर्णय अधिकारी राजेश्वर हांडे यांच्या निर्देशावर नायब तहसीलदार अमरसिंह वामन पवार यांनी आज बुलडाणा शहर ठाण्यात जावून तक्रार दिली त्यात नमूद केले की अज्ञात मतदारने मतदानाचा हक्क गोपनिय पध्दतीने बजावण्या ऐवजी जाहिर मतदान करण्याचा प्रकार उघड करुण आदर्श आचार सहितेचा भंग केल्यामुळे अज्ञात आरोपी विरुद्ध लोकप्रतिनिधि कायदा 1951 आणि 1988 चे कलम 128 व भादवी चे कलम 188 अन्वय गुन्हा दाखल कण्यात आला आहे.पुढील तपास शहर ठानेदार शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनात पीएसआई करुनाशिल तायडे करीत आहे.

बुलडाणा - 21 ऑक्टोबर
महाराष्ट्रात विधानसभा साठी होत असलेल्या निवडणुकीत मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास निवडणूक आयोगाकडून बंदी असतांना ही मतदान करतांनाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.या वरुण सिद्ध होते की मतदान केंद्रवार कार्यरत पुलिंग पार्टी किती सतर्क होते.
      आज 21 ऑक्टोबर रोजी राज्यभरातील 288 विधानसभा मतदार संघासाठी सकाळी 7 वाजे पासून मतदान प्रक्रिया सुरु झाली.बुलडाणा- 22 मतदार संघात एकूण 7 उमेदवार मैदानात आहे त्यापैकी कांग्रेसचे विद्यमान आमदार हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना कडून संजय गायकवाड तर वंचित बहुजन आघाडीचे विजयराज शिंदे यांच्यात खरी लडत मानल्या जात आहे.आज दुपार नंतर बुलडाणा विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावरील मतदान करतांनाचे काही व्हिडीओ सोशल मीडिया वर समोर आले व यातील 5 व्हिडीओत काँग्रेस उमेदवाराला मत दिल्याचं स्पष्ट दिसून येताय तर एका व्हिडिओत बसपा उमेदवाराला मत दिल्याचं दिसते. अशे व्हिडीओ समोर आल्याने खरंच मतदान केंद्रावर मतदारांची मोबाईल तपासणी झाली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे आणि असे गैरकृत्य करणाऱ्यावर आता निवडणूक विभाग काय कार्यवाही करणार? हे बघावे लागेल.

महात्मा गांधींच्या च्या 150 व्या जयंती निमित्त नयी तालीम या विषयाअंतर्गत सर्वत्र विविध उपक्रम राबविले जात असताना,राष्ट्रीय सेवा योजने(NSS)  च्या माध्यमातून महाविद्यालयात विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले त्यात श्रीरामपूर शहरातील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित खासदार गोविंदराव आदिक विधी महाविद्यालयात NSS च्या विद्यार्थ्यांनि देखील शिरसगाव या दत्तक गावी जाऊन वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम गावात विविध ठिकाणी राबवली,त्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय,तसेच ग्रामीण रुग्णालय शिरसगाव अश्या ठिकाणी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविले.
या सर्व उपक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालया च्या प्राचार्य सौ.संघमित्रा राजभोज,उप प्राचार्या सौ.कवडे मॅडम,प्रा.ज्योती शिंदे,आणि विद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजने चे कार्यक्रम अधिकारी अ‍ॅड.प्रा.उज्वल मानकर यांनी विशेष प्रयत्न केले,त्याच बरोबर अ‍ॅड.प्रा.मुंगसे मॅडम,प्रा.गायकवाड सर मानद विश्वस्त सौ.मानसी करंदीकर मॅडमअ‍ॅड.प्रा.बिंगी मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रम यशस्वी झाल्या नंतर कार्यक्रम अधिकारी प्रा.उज्वल मानकर सर यांनी ग्रामपंचायत शिरसगाव, ग्रामीम रुग्णालया शिरसगाव यांचे आभार मानले.
या सदर च्या कार्यक्रमात रुग्णालयाचे  महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांचे समन्वयक प्रसन्न धुमाळ यांनी विद्यार्थ्यांना एच आय व्ही बद्दल माहिती दिली व मार्गदर्शन केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजने मधील विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget