Latest Post

बुलडाणा - 6 ऑक्टोबर
मराठी पत्रकार परिषदेच्या कोषाध्यक्ष, उपाध्यक्ष, आणि विभागीय सचिवांच्या घोषणा परिषदेच्यावतीने आज करण्यात आल्या आहेत. त्यात परिषदेच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र काळे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. परिषदेच्या कोषाध्यक्षपदी नांदेड येथील दैनिक  "सामना "चे जिल्हा प्रतिनिधी  विजय जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून बुलढाणा दैनिक देशोन्नती जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे, नागपूरचे योगेश कोरडे, सांगली येथील तरूण भारतचे ब्युरो चीफ शिवराज काटकर, नाशिक येथील पत्रकार यशवंत पवार, औरंगाबाद येथील महाराष्ट्र टाइम्सचे प्रमोद माने, परभणी येथील पत्रकार सुरेश नाईकवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
       परिषदेचे विभागीय सचिव म्हणून पुढील प्रमाणे नियुक्त्या करण्यात येत आहेत. पुणे विभाग बापुसाहेब गोरे (पुणे),लातूर विभाग प्रकाश कांबळे (नांदेड), औरंगाबाद विभाग विशाल साळुंखे(बीड), नागपूर विभाग अविनाश भांडेकर (भंडारा), नाशिक विभाग मनसूरभाई (अहमदनगर), अमरावती विभाग जगदीश  राठोड, कोकण विभाग विजय मोकल (रायगड), कोल्हापूर आणि मुंबई विभागाच्या विभागीय सचिवांच्या नियुक्त्या नंतर जाहीर करण्यात येणार आहेत.
      कार्यकारिणी सदस्य म्हणून अनिल वाघमारे (वडवणी), रोहिदास हाके (धुळे) महिला संघटक पदासाठी दैनिक तरूण  भारतच्या रत्नागिरीच्या जान्हवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
     या नियुक्त्या पुढील दोन वर्षांसाठी असतील. परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी पत्रकार परिषदेची ही नवी टीम आपल्या कार्यकाळात परिषद अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करेल, तसेच राज्यातील पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेल असा विश्वास एस. एम. देशमुख यांनी व्यक्त केला आहे. *सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे "बिंदास न्यूज़" कडून हार्दिक अभिनंदन.*

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील यांच्याकडे 31 कोटी एवढी संपत्ती असून ते या मतदारसंघातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार आहेत. त्यानंतर सुरेश थोरात यांच्या नावावर एक कोटी आठ लाख 51 हजार 500 एवढी संपत्ती आहे तर शेखर बोर्‍हाडे यांच्या नावावर एक कोटी 65 लाख 62 हजार रुपये एवढी संपत्ती आहे.भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील जंगम संपत्ती चार कोटी 69 लाख 762 रुपये, स्थावर संपत्ती 51 लाख 13 हजार 200 रुपये एवढी आहे. त्यांच्याकडे रोख रक्कम एक लाख 49 हजार 789 रुपये, बँक खाती दोन कोटी 37 लाख 27 हजार 856 रुपये, शेअर्स बंदपत्रे यात एक कोटी 74 लाख 954 रुपये, पोस्ट खात्यात 26 लाख 65 हजार 731 रुपये. त्यांच्याकडे 550 ग्रॅम सोने चांदी असून त्याची किंमत 20 लाख 13 हजार रुपये, अन्य मालमत्ता 6 लाख 24 हजार 362 रुपये आहे. त्यांच्या नावावर कोणत्याही प्रकारचे वाहन नसून त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. त्यांच्या पत्नी शालिनीताई विखे यांच्या नावे पाच कोटी 14 लाख 98 हजार 969 रुपये आहे. त्यांच्याकडे 1150 ग्रॅम सोने-चांदी असून त्याची रक्कम 42 लाख 57 हजार 400 रुपये आहे. त्यांच्याकडे दोन कोटी 42 लाख 79 हजार 107 रुपये बँक खाती असून रोख रक्कम 67 हजार 91 रुपये आहे. शेअर्स एक कोटी 10 लाख 52 हजार 31 रुपये एवढी संपत्ती आहे.
काँग्रेसचे उमेदवार सुरेश जगन्नाथ थोरात यांच्या नावे एक कोटी आठ लाख 51 हजार 500 रुपये एवढी संपत्ती आहे. त्यात रोख रक्कम 25 हजार रुपये असून बँकेत 44 हजार 58 रुपये आहेत. सोसायटी ठेवी तीन लाख 27 हजार 576 रुपये व त्यांच्याकडे सोने-चांदी तीन लाख 12 हजार रुपये आहे. त्यांच्याकडे मोटारसायकल, टाटा सफारी कार, टाटा एलपी कार अशी एकूण 13 लाख 37 हजार रुपयाची वाहने आहेत. त्यांच्या नावे 65 लाख 15 हजार 91 रुपये कर्ज आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे 10 हजार रुपये रोख, 14 हजार 482 बँक खाती, सोने-चांदी 6 लाख 24 हजार असे एकूण त्यांच्याकडे 7 लाख 60 हजार 547 रुपये एवढी संपत्ती असून त्यांच्या नावे 10 लाख 48 हजार 909 रुपये एवढे कर्ज आहे.काँग्रेसचे दुसरे उमेदवार शेखर बोर्‍हाडे यांच्याकडे एक कोटी 65 लाख 62 हजार रुपये एवढी संपत्ती असून त्यांच्याकडे रोख चार लाख 90 हजार, ठेवी दोन लाख रुपये, एकूण शेअर्स तीन लाख 76 हजार 541 रुपये, स्थावर जमिनी सात लाख 50 हजार, सोने 30 हजार रुपये, दोन गाड्या 11 लाख 40 हजार रुपये एवढी संपत्ती आहे. त्यांच्या नावे 41 लाख 75 हजार एवढे कर्ज आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे रोख एक लाख 50 हजार, सेव्हींग 4 हजार, ठेवी दो लाख, सोने 4 लाख, शेअर्स 74 हजार 240 अशी एकूण 1 कोटी 97 लाख 37 हजार 500 रुपये एवढी संपत्ती आहे तर त्यांच्या नावे 42 लाख 73 हजार रुपये कर्ज आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात 31 उमेदवारांनी 44 अर्ज दाखल केले होते. काल अर्ज छाननीत चार जणांचे अर्ज एबी फॉर्म नसल्याने अवैध ठरविण्यात आले. दरम्यान अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या डॉ. चेतन सदाशिव लोखंडे यांनी आपला अर्ज मागे घेण्यासाठी तो दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल पवार यांनी दिली.विधानसभा निवडणुकीसाठी भाऊसाहेब पगारे यांचा (एमआयएम), अशोक बागुल (काँग्रेस), चरण दादा चव्हाण (वंचीत बहुजन आघाडी), रवी डोळस (काँग्रेस) पक्षाकडून अर्ज भरले होते. मात्र एबी फॉर्म नसल्याने नामंजूर झाले. तर डॉ. सुधीर क्षीरसागर यांचाही अर्ज वंचित बहुजन आघाडी कडून एबी फॉर्म न आल्याने अवैध ठरवून अपक्ष म्हणून अर्ज मंजूर झाला आहे. सना मोहंमद अली सय्यद या अपक्ष उमेदवाराच्या अर्जालाही त्या अनुसूचित जाती प्रवर्गात कशा? अशी हरकत घेण्यात आली, मात्र त्यांनी माहेरच्या नावाची अनुसूचित जातीत असल्याचे पुरावे सादर केल्याने हा अर्ज मंजूर करण्यात आला.भाऊसाहेब कांबळे (शिवसेना), लहू कानडे (काँग्रेस), भाऊसाहेब पगारे (मनसे व अपक्ष), सुधाकर भोसले (बहुजन मुक्ती पार्टी), सुरेश जगधने (एमआयएम), गोविंद अमोलिक (बहुजन समाज पक्ष व अपक्ष), अशोकराव आल्हाट (जनहित लोकशाही पार्टी) तर इतर अपक्ष म्हणून अशोक बागुल, डॉ. सुधीर क्षीरसागर, चरण दादा त्रिभुवन, अशोक जगधने, रामचंद्र जाधव, सुधाकर सहाणे, भागचंद नवगिरे, दीपक चरण चव्हाण, प्रणिती चव्हाण, कडू शेलार, मिस्टर शेलार, मंदाबाई भाऊसाहेब कांबळे, योगेश जाधव, भारत तुपे, प्रतापसिंग देवरे, भिकाजी रणदिवे, रवी डोळस, सना मोहंमद अली सय्यद, युवराज बागुल, सुरेंद्र थोरात, अ‍ॅड. स्वप्नील जाधव, भाऊसाहेब डोळस, सुभाष तोरणे, विजय खाजेकर या उमेदवारांचे अपक्ष अर्ज मंजूर झाले आहेत.दरम्यान, अपक्ष अर्ज दाखल केलेले शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव डॉ. चेतन लोखंडे यांनी आपला अर्ज मागे घेण्यासाठीच तो निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे दाखल केला आहे. शिवसेनेची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत बंडखोरांना दोन दिवसांत अर्ज माघारी घेतले नाही तर कठोर कारवाईचा इशारा दिला होता

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- 221 नेवासा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अर्जाच्या छाननीत काल तीन अर्ज बाद झाल्याने निवडणूक रिंगणात 20 उमेदवारांचे अर्ज उरले आहेत. विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह एका अपक्ष उमेदवाराच्या अर्जावर क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख यांनी घेतलेल्या हरकती निवडणूक अधिकार्‍यांनी फेटाळून लावल्या.याबाबत माहिती अशी की, नेवासा विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्जांची छाननी काल झाली. त्यात अपक्ष बबन बाळाजी कनगरे, सौ. आशाताई बाळासाहेब मुरकुटे व बाबासाहेब सोना खरात या तिघांचे अर्ज अवैध ठरले. आशाताई मुरकुटे व बाबासाहेब थोरात यांनी शपथपत्र जोडले नव्हते. त्यामुळे अर्ज बाद ठरले. बबन कनगरे यांच्या अर्जावर आवश्यक संख्येने सूचकांच्या सह्या नव्हत्या. भाजपचे उमेदवार आमदार बाळासाहेब मुरकुटे व अपक्ष कारभारी विष्णू उदागे या दोघांच्या अर्जावर उमेदवार सुनीता शंकरराव गडाख व शंकरराव गडाख यांच्यातर्फे हरकत घेण्यात आली.बाळासाहेब मुरकुटे यांच्या अर्जावर घेतलेल्या हरकतीत त्यांनी त्यांच्या अर्जात शपथपत्रातील परिच्छेद 5(1) मध्ये आवश्यक ती खूण केलेली नाही. परिच्छेद 6(अ) येथे आवश्यक ती माहिती दिलेली नाही. परिच्छेद 11 मधील परिच्छेद 8 ब (1) मध्ये स्वसंपादित मालमत्तेची खरेदी किंमत नमूद करणे आवश्यक होते मात्र ते ‘निरंक’ नमूद केलेले आहे. 8ब (3) मध्ये चालू बाजारभाव नमूद न करता ‘निरंक’ म्हटले असल्याने सदर रकान्यांमध्ये दिलेली माहिती चुकीची आहे. शपथपत्रात त्रुटी असल्याने अर्ज रद्द करावा असे म्हटले होते. या आक्षेपांवर म्हणणे मांडण्याची संधी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिल्यावर म्हणणे सादर करण्यात आले.त्यावर शपथपत्रातील परिच्छेद 5, 6, 6अ मध्ये निरंक किंवा लागू नाही असा उल्लेख आवश्यकतेनुसार केलेला आहे. परिच्छेद क्र. 11 व त्यातील 8 ब नुसार स्वसंपादित स्थावर मालमत्तेची खरेदी किंमत नमूद करणे आवश्यक आहे. तथापि उमेदवाराने स्वसंपादित कोणतीही स्थावर मालमत्ता खरेदी केलेली नसल्याने त्यापुढे ‘निरंक’ लिहिलेले आहे. सदर मालमत्ता आज रोज उमेदवाराच्या मालकीची नसून अद्याप ती त्यांच्या मालकीची झालेली नाही. त्याबाबत कायदेशीर अडचण असल्यामुळे अद्याप मालकी अद्याप मिळालेली नाही. आवश्यकतेनुसार ‘निरंक’ नमूद केले असल्यामुळे सदर हरकती फेटाळ्यावर असे म्हणणे मांडण्यात आले. त्यावर मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी शाहुराज मोरे यांनी निर्णय दिला की, शपथपत्रामध्ये रकाने रिक्त न सोडता तिथे ‘लागू नाही’, ‘निरंक’, ‘माहिती नाही’ असे शब्द लिहिणे अपेक्षित आहे.त्यानुसार उमेदवाराने सादर केलेल्या शपथपत्रांमध्ये कोणताही रकाना रिक्त न सोडता निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार शब्द नमूद केल्याचे दिसून येते. अधिनियमाच्या कलम 36 नुसार छाननी करताना शपथपत्रांमधील माहितीच्या सत्यतेबाबत तपासणी करणे अपेक्षित नसून केवळ नमुना 26 मधील शपथपत्रात कोणतेही रकाने रिक्त न ठेवल्याची खात्री करणे आवश्यक आहे. सदरच्या शपथपत्रामध्ये कोणाही रकाना रिकामा सोडलेला नसल्याने शपथपत्र अधिनियमाच्या कलम 33 ए व निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार परिपूर्ण दिसून येत असल्याने अधिनियमाच्या कलम 36(4) नुसार हरकती फेटाळण्यात येत असून नामनिर्देशनपत्र वैध ठरण्यित येत असल्याचे आदेशात म्हटले.आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अर्ज सादर केलेले उमेदवार कारभारी विष्णू उदागे यांच्या अर्जावर त्यांनी नामनिर्देशनपत्रात शपथपत्रातील 6(एक) येथील भाग कोरा ठेवला तसेच निवडणुकीचे वर्ष नमूद केले नाही या त्रुटीमुळे अर्ज फेटाळावा अशी हरकत घेण्यात आली होती. त्यावर निकाल देताना निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी स्पष्ट केले की, कोणातही रकाना रिक्त सोडलेला नाही तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या निर्देश पुस्तिकेमध्ये परिच्छेद 6.9.4 व 6.9.5 मध्ये नामनिर्देशनपत्रामध्ये निवडणुकीचे वर्ष चुकीचे नमूद केले किंवा नमूद केले नाही या कारणास्तव नामनिर्देशनपत्र फेटाळणे असयुक्तिक ठरेल असे नमूद केले आहे. त्यामुळे अधिनियमाच्या कलम 36(4) नुसार हरकती फेटाळण्यात येत असून नामनिर्देशनपत्र वैध ठरविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. निवडणूक अर्जावरील हरकती व त्यावर उत्तर यासाठी बराच कालावधी लागल्याने सायंकाळी उशिरा संपूर्ण अर्जांची छाननी पूर्ण झाली. अर्जावरील हरकतींमुळे तहसील कार्यालय परिसरात उमेदवारांच्या समर्थकांची गर्दी झाली होती.
अर्ज वैध ठरलेले उमेदवार
राजकीय पक्षांचे उमेदवार (7)-बाळासाहेब ऊर्फ दादासाहेब दामोदर मुरकुटे (भाजप), शंकरराव यशवंतराव गडाख (क्रांतिकारी शेतकरी पक्ष), शशिकांत भागवत मतकर (वंचित बहुजन आघाडी), सचिन रामदास गव्हाणे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), विश्वास पौलस वैरागर (बहुजन समाज पार्टी) कारभारी रामचंद्र धाडगे (राष्ट्रीय संत संदेश पार्टी), कारभारी विष्णू उदागे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया).अपक्ष (13)- सुनीता शंकरराव गडाख, रामनाथ गहिनीनाथ गोल्हार, अशोकराव नामदेव कोळेकर, अजय अशोकराव कोळेकर, विठ्ठल विष्णू देशमुख, भाऊसाहेब शिवराम जगदाळे, मच्छिंद्र देवराव मुंगसे, राजूबाई कल्याण भोसले, राजेंद्र एकनाथ निंबाळकर, रामदास मारुती नजन, सौ. लक्ष्मी तुकाराम गडाख, विशाल वसंतराव गडाख, ज्ञानदेव कारभारी पाडळे.

बुलढाणा - 5 अक्तुबर
सरकारी कर्मी को कब अपनी गलती का खमियाज़ा भुगतना पड़ सकता है ये कहना मुश्किल ही है.अपने कर्तव्य में कुसूरवार पाए जाने पर 4 पुलिस कर्मियों को निलंबित किए जाने की खबर बुलढाणा के पुलिस विभाग में खलबली मची हुई है.
      प्राप्त जानकारी के अनुसार बुलढाणा जिलाधीश श्रीमती डॉ. निरुपमा डांगे के बंगले पर पुलिस कर्मियों को बतौर गार्ड तैनात किया जाता है.इस ड्यूटी की ज़िम्मेदारी पुलिस मुख्यालय में आरक्षित पुलिस कर्मियों को दी जाती है.बुलढाणा जिलाधीश के बंगले पर ड्यूटी लगाई जाने के बाद भी गैरहाजिर पाए गए थे.अपनी शासकीय सेवा में लापरवाही बरतने के कारण बुलढाणा एसपी डॉ. दिलीप भुजबल पाटिल ने कल एक आदेश के तहत 4 पुलिस कर्मी ताराचंद पवार,अजय माने, संदीप उकडे तथा ज्ञानोबा सोसे को निलंबित कर दिया है.किसी अधिकारी के सरकारी बंगले पर सेवा में कुसूरवार पाए जाने पर एक साथ 4 पुलिस कर्मियों को निलंबीत किए जाने की कार्रवाई पहेली बार होने की चर्चा पुलिस महकमे में हो रही है.
      निलंबन की इस कार्रवाई की सत्यता जांचने के लिए जब बुलढाणा एसपी डॉ.दिलीप भुजबल पाटिल से पूछा गया तो उन्होंने 4 पुलिस कर्मियों को निलंबित किये जाने की पृष्ठी की है.

भराडी प्रतिनिधी, येथिल होली फ़ेथ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यानी औरंगाबाद येथे झालेल्या सॉफ्ट बॉल स्पर्धेत 14 वर्ष वयोगटातिल मुलानी जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकाने ,तर 14 वर्ष मुलिनच्या संघानी तिसर्या क्रमांकाने ,17 वर्ष वयोगटातिल मुलानी व मुलिनच्या गटाने जिल्हा स्तरावर बाजी मारत विभाग स्तराकरिता निवड झाली.

यावेऴी क्रिडा जिल्हा समन्वयक श्री. गोकुऴ तान्दऴे ,मेस्टाचे शहर अध्यक्ष श्री राजिव नगरकर ,मेस्टाचे जिल्हा अध्यक्ष संतोष सोनवणे ,रुपाली सोनवणे, होली फ़ेथचे क्रिडा शिक्षक अविनाश सुरडकर आदिनची उपास्थिती होती तर विजयी विद्यार्थ्यानचे समाधान सोनवणे,प्रभाकर ठोम्बरे आदिनी अभिनंदन केले.

सिल्लोड, प्रतिनिधी : सिल्लोड- सोयगाव मतदार संघातून शेवटच्या दिवशी शुक्रवारी 11 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यापूर्वी 10 जणां उमेदवारी अर्ज दाखल केलेले असल्याने एकूण शेवटच्या दिवशी शुक्रवारी 21 अर्ज प्राप्त झाले आहे, अशी माहीती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी दिली.

    विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवसापर्यंत 21 उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात शिवेसेनेकडून माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. विरोधी गटाचे उमेदवार प्रभाकर पालोदकर, सुरेश बनकर यांनी निवडक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे खालील प्रमाणे- दादाराव वानखेडे (वंचित बहुजन आघाडी), कैसर आझाद (कॉंग्रेस), संदीप सुरडकर (बसपा), सुनील मिरकर, सविथादेवी रघुनाथ घरमोडे, रियाजुद्दीन देशमुख, मुश्ताक खाँ मेवाती, दादाराव आळणे, अरुण चव्हाण, मच्छिन्द्र पालोदकर, संतोष पालोदकर, ज्योती दणके, पुंडलीक ताठे, अजबराव मानकर, मुश्ताक शेख, संदीप इंगळे, शपिक शेख, भगवान दांडगे (सर्व अपक्ष).

    

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget