221 नेवासा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तीन उमेदवारी अर्ज अवैध

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- 221 नेवासा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अर्जाच्या छाननीत काल तीन अर्ज बाद झाल्याने निवडणूक रिंगणात 20 उमेदवारांचे अर्ज उरले आहेत. विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह एका अपक्ष उमेदवाराच्या अर्जावर क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख यांनी घेतलेल्या हरकती निवडणूक अधिकार्‍यांनी फेटाळून लावल्या.याबाबत माहिती अशी की, नेवासा विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्जांची छाननी काल झाली. त्यात अपक्ष बबन बाळाजी कनगरे, सौ. आशाताई बाळासाहेब मुरकुटे व बाबासाहेब सोना खरात या तिघांचे अर्ज अवैध ठरले. आशाताई मुरकुटे व बाबासाहेब थोरात यांनी शपथपत्र जोडले नव्हते. त्यामुळे अर्ज बाद ठरले. बबन कनगरे यांच्या अर्जावर आवश्यक संख्येने सूचकांच्या सह्या नव्हत्या. भाजपचे उमेदवार आमदार बाळासाहेब मुरकुटे व अपक्ष कारभारी विष्णू उदागे या दोघांच्या अर्जावर उमेदवार सुनीता शंकरराव गडाख व शंकरराव गडाख यांच्यातर्फे हरकत घेण्यात आली.बाळासाहेब मुरकुटे यांच्या अर्जावर घेतलेल्या हरकतीत त्यांनी त्यांच्या अर्जात शपथपत्रातील परिच्छेद 5(1) मध्ये आवश्यक ती खूण केलेली नाही. परिच्छेद 6(अ) येथे आवश्यक ती माहिती दिलेली नाही. परिच्छेद 11 मधील परिच्छेद 8 ब (1) मध्ये स्वसंपादित मालमत्तेची खरेदी किंमत नमूद करणे आवश्यक होते मात्र ते ‘निरंक’ नमूद केलेले आहे. 8ब (3) मध्ये चालू बाजारभाव नमूद न करता ‘निरंक’ म्हटले असल्याने सदर रकान्यांमध्ये दिलेली माहिती चुकीची आहे. शपथपत्रात त्रुटी असल्याने अर्ज रद्द करावा असे म्हटले होते. या आक्षेपांवर म्हणणे मांडण्याची संधी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिल्यावर म्हणणे सादर करण्यात आले.त्यावर शपथपत्रातील परिच्छेद 5, 6, 6अ मध्ये निरंक किंवा लागू नाही असा उल्लेख आवश्यकतेनुसार केलेला आहे. परिच्छेद क्र. 11 व त्यातील 8 ब नुसार स्वसंपादित स्थावर मालमत्तेची खरेदी किंमत नमूद करणे आवश्यक आहे. तथापि उमेदवाराने स्वसंपादित कोणतीही स्थावर मालमत्ता खरेदी केलेली नसल्याने त्यापुढे ‘निरंक’ लिहिलेले आहे. सदर मालमत्ता आज रोज उमेदवाराच्या मालकीची नसून अद्याप ती त्यांच्या मालकीची झालेली नाही. त्याबाबत कायदेशीर अडचण असल्यामुळे अद्याप मालकी अद्याप मिळालेली नाही. आवश्यकतेनुसार ‘निरंक’ नमूद केले असल्यामुळे सदर हरकती फेटाळ्यावर असे म्हणणे मांडण्यात आले. त्यावर मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी शाहुराज मोरे यांनी निर्णय दिला की, शपथपत्रामध्ये रकाने रिक्त न सोडता तिथे ‘लागू नाही’, ‘निरंक’, ‘माहिती नाही’ असे शब्द लिहिणे अपेक्षित आहे.त्यानुसार उमेदवाराने सादर केलेल्या शपथपत्रांमध्ये कोणताही रकाना रिक्त न सोडता निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार शब्द नमूद केल्याचे दिसून येते. अधिनियमाच्या कलम 36 नुसार छाननी करताना शपथपत्रांमधील माहितीच्या सत्यतेबाबत तपासणी करणे अपेक्षित नसून केवळ नमुना 26 मधील शपथपत्रात कोणतेही रकाने रिक्त न ठेवल्याची खात्री करणे आवश्यक आहे. सदरच्या शपथपत्रामध्ये कोणाही रकाना रिकामा सोडलेला नसल्याने शपथपत्र अधिनियमाच्या कलम 33 ए व निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार परिपूर्ण दिसून येत असल्याने अधिनियमाच्या कलम 36(4) नुसार हरकती फेटाळण्यात येत असून नामनिर्देशनपत्र वैध ठरण्यित येत असल्याचे आदेशात म्हटले.आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अर्ज सादर केलेले उमेदवार कारभारी विष्णू उदागे यांच्या अर्जावर त्यांनी नामनिर्देशनपत्रात शपथपत्रातील 6(एक) येथील भाग कोरा ठेवला तसेच निवडणुकीचे वर्ष नमूद केले नाही या त्रुटीमुळे अर्ज फेटाळावा अशी हरकत घेण्यात आली होती. त्यावर निकाल देताना निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी स्पष्ट केले की, कोणातही रकाना रिक्त सोडलेला नाही तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या निर्देश पुस्तिकेमध्ये परिच्छेद 6.9.4 व 6.9.5 मध्ये नामनिर्देशनपत्रामध्ये निवडणुकीचे वर्ष चुकीचे नमूद केले किंवा नमूद केले नाही या कारणास्तव नामनिर्देशनपत्र फेटाळणे असयुक्तिक ठरेल असे नमूद केले आहे. त्यामुळे अधिनियमाच्या कलम 36(4) नुसार हरकती फेटाळण्यात येत असून नामनिर्देशनपत्र वैध ठरविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. निवडणूक अर्जावरील हरकती व त्यावर उत्तर यासाठी बराच कालावधी लागल्याने सायंकाळी उशिरा संपूर्ण अर्जांची छाननी पूर्ण झाली. अर्जावरील हरकतींमुळे तहसील कार्यालय परिसरात उमेदवारांच्या समर्थकांची गर्दी झाली होती.
अर्ज वैध ठरलेले उमेदवार
राजकीय पक्षांचे उमेदवार (7)-बाळासाहेब ऊर्फ दादासाहेब दामोदर मुरकुटे (भाजप), शंकरराव यशवंतराव गडाख (क्रांतिकारी शेतकरी पक्ष), शशिकांत भागवत मतकर (वंचित बहुजन आघाडी), सचिन रामदास गव्हाणे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), विश्वास पौलस वैरागर (बहुजन समाज पार्टी) कारभारी रामचंद्र धाडगे (राष्ट्रीय संत संदेश पार्टी), कारभारी विष्णू उदागे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया).अपक्ष (13)- सुनीता शंकरराव गडाख, रामनाथ गहिनीनाथ गोल्हार, अशोकराव नामदेव कोळेकर, अजय अशोकराव कोळेकर, विठ्ठल विष्णू देशमुख, भाऊसाहेब शिवराम जगदाळे, मच्छिंद्र देवराव मुंगसे, राजूबाई कल्याण भोसले, राजेंद्र एकनाथ निंबाळकर, रामदास मारुती नजन, सौ. लक्ष्मी तुकाराम गडाख, विशाल वसंतराव गडाख, ज्ञानदेव कारभारी पाडळे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget