श्रीरामपूर (प्रतिनिधी) श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात 31 उमेदवारांनी 44 अर्ज दाखल केले होते. काल अर्ज छाननीत चार जणांचे अर्ज एबी फॉर्म नसल्याने अवैध ठरविण्यात आले. दरम्यान अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या डॉ. चेतन सदाशिव लोखंडे यांनी आपला अर्ज मागे घेण्यासाठी तो दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल पवार यांनी दिली.विधानसभा निवडणुकीसाठी भाऊसाहेब पगारे यांचा (एमआयएम), अशोक बागुल (काँग्रेस), चरण दादा चव्हाण (वंचीत बहुजन आघाडी), रवी डोळस (काँग्रेस) पक्षाकडून अर्ज भरले होते. मात्र एबी फॉर्म नसल्याने नामंजूर झाले. तर डॉ. सुधीर क्षीरसागर यांचाही अर्ज वंचित बहुजन आघाडी कडून एबी फॉर्म न आल्याने अवैध ठरवून अपक्ष म्हणून अर्ज मंजूर झाला आहे. सना मोहंमद अली सय्यद या अपक्ष उमेदवाराच्या अर्जालाही त्या अनुसूचित जाती प्रवर्गात कशा? अशी हरकत घेण्यात आली, मात्र त्यांनी माहेरच्या नावाची अनुसूचित जातीत असल्याचे पुरावे सादर केल्याने हा अर्ज मंजूर करण्यात आला.भाऊसाहेब कांबळे (शिवसेना), लहू कानडे (काँग्रेस), भाऊसाहेब पगारे (मनसे व अपक्ष), सुधाकर भोसले (बहुजन मुक्ती पार्टी), सुरेश जगधने (एमआयएम), गोविंद अमोलिक (बहुजन समाज पक्ष व अपक्ष), अशोकराव आल्हाट (जनहित लोकशाही पार्टी) तर इतर अपक्ष म्हणून अशोक बागुल, डॉ. सुधीर क्षीरसागर, चरण दादा त्रिभुवन, अशोक जगधने, रामचंद्र जाधव, सुधाकर सहाणे, भागचंद नवगिरे, दीपक चरण चव्हाण, प्रणिती चव्हाण, कडू शेलार, मिस्टर शेलार, मंदाबाई भाऊसाहेब कांबळे, योगेश जाधव, भारत तुपे, प्रतापसिंग देवरे, भिकाजी रणदिवे, रवी डोळस, सना मोहंमद अली सय्यद, युवराज बागुल, सुरेंद्र थोरात, अॅड. स्वप्नील जाधव, भाऊसाहेब डोळस, सुभाष तोरणे, विजय खाजेकर या उमेदवारांचे अपक्ष अर्ज मंजूर झाले आहेत.दरम्यान, अपक्ष अर्ज दाखल केलेले शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव डॉ. चेतन लोखंडे यांनी आपला अर्ज मागे घेण्यासाठीच तो निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे दाखल केला आहे. शिवसेनेची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत बंडखोरांना दोन दिवसांत अर्ज माघारी घेतले नाही तर कठोर कारवाईचा इशारा दिला होता
Post a Comment