Latest Post

बिना फास्ट टैग वाली गाड़ियों की हाइवे पर नो एंट्री


नई दिल्ली
मोटर व्हीकल संशोधन बिल 2019 अब कानून का रूप ले चुका है। सरकार इस कानून को सख्ती के साथ लागू करने में जुटी है। हालांकि, शुरुआत में कानून के कुछ प्रावधानों को ही   लागू किया जाएगा। धीरे-धीरे कानून के अन्य प्रवाधाओं को भी सख्ती के साथ लागू किया जाएगा। एक दिसंबर से बिना फास्ट टैग वाली गाड़ियां नेशनल हाइवे पर नहीं चल पाएंगी।  हाइवे पर टोल पार करने के लिए परिवहन मंत्रालय ने फास्ट टैग को हर व्हीकल पर जरूरी कर दिया है।
इसी के साथ ही सड़क पर ट्रैफिक उल्लंघन करने वालों पर भी एक सितंबर से सख्ती शुरू हो जाएगी। केंद्र सरकार मोटर व्हीकल एक्ट के 63 प्रावधान पूरे देश में एक सितंबर से  लागू करने जा रही है। जिसमें ट्रैफिक के नियम तोड़ने पर भारी जुर्माने और सजा का प्रावधान है। जिस तरह से देश भर में सड़क हादसे हो रहे हैं उसको देखते हुए केंद्र सरकार व्यापक प्लान के साथ इनको कम करने की कोशिश में जुट गई है। परिवहन मंत्री नितिन गड़करी ने कहा है कि अगले पांच साल में 50 फीसदी तक हादसे कम करने का लक्ष्य रखा  गया है और इसके लिए केंद्र सरकार 14000 करोड़ रुपए देश भर में सड़कों के सुधार और ब्लॉक स्पॉट खत्म करने पर खर्च करेगी। जिसके तहत राज्यों और नगरपालिकाओं की सड़कों से लेकर हाइवे की सड़को की डिजाइन, मरम्मत, सुधार और निर्माण पर काम होगा। इसके साथ ही सरकार सड़क पर लापरवाह रूप से गाड़ी चलाने वालों पर सख्ती से निपटने   के लिए नए मोटर व्हीकल एक्ट के नियमों को लागू करने जा रही रही है। कानून मंत्रालय से परामर्श के बाद केंद्र ने नए मोटर व्हीकल एक्ट कानून के 63 प्रोवीजन को एक सितंबर   से हर राज्य को लागू करना जरूरी कर दिया है। मोटर व्हीकल एक्ट के बाकी के प्रावधानों में राज्य अपने हिसाब से बदलाव कर सकेंगे।

(प्रतिनिधी)
शहरातील गटार योजनेतील सांडपाणी प्रकल्पात सुमारे 14 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी श्रीरामपूर नगरपरिषद तत्कालीन नगराध्यक्षा राजश्री ससाणे, तत्कालीन मुख्याधिकारी व इतर अधिकार्‍यांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यामध्ये श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा राजश्री ससाणे, तत्कालीन मुख्याधिकारी सुमंत गणपतराव मोरे, तत्कालीन मुख्याधिकारी संतोष महादेव खांडेकर, श्रीरामपूर नगरपरिषद बांधकाम अभियंता सूर्यकांत मोहन गवळी, तत्कालीन बांधकाम अभियंता राजेंद्र विजय सुतावणे, ठेकेदार संस्था लक्ष्मी सिव्हील इंजिनियरींग प्रा.जि.कोल्हापूर, मे.दहासहस्त्र सोल्युशन प्रा.लि. ठाणे वेस्ट यांचा समावेश आहे. याबाबत केतन खोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 2015-16 या आर्थिक वर्षामध्ये श्रीरामपूर नगरपरिषदेचे शहर भुयारी गटार योजनेतील दक्षिणेकडील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प एस.टी.पी पंपींग स्टेशनसाठी जागा उपलब्ध नसताना तसेच भुयारी योजनेतील उत्तरेकडील एस.टी.पी.चे सिव्हील वर्क पूर्ण होण्याअगोदरच आवश्यक असणार्‍या मेकॅनिकल इलेक्ट्रीक्ल वर्कची बिले अदा केली.यातून श्रीरामपुरची जनता व शासनाची फसवणूक करुन खोटे व बनावट बिले बनवून सुमारे 13 कोटी 93 लाख 84 हजार 954 रुपयांचा अपहार केला आहे. याबाबत शहर पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 618/2019 भा.दं.वि.कलम 403 ,406, 409,420 ,465,466, 467,468,471, 477(अ),34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट करीत आहे.

मुंबई -
पोलीस ठाण्यात आरोपीचा वाढदिवस साजरा करणे प्रकरण वरिष्ठांच्याही अंगलट आले आहे़ भांडुप पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांसह तीन अंमलदारांचे निलंबन करण्यात आल्यानंतर आता पोलीस ठाण्यातील कारभारावर नियंत्रण ठेवण्यात असमर्थ ठरलेल्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खाडे यांची संरक्षण आणि सुरक्षा विभागात बुधवारी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर शाम शिंदे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यात भांडुप पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास पन्हाळे यांची सशस्त्र पोलीस दलात उचलबांगडी करण्यात आली होती. त्यांच्यावरही भांडुपमध्ये एकामागोमाग वाढणारे गुन्हे व त्याविरुद्ध भांडुपकरानी उठवलेल्या आवाजामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सोनापूरमधील तरुणाचा वाढदिवस पोलीस ठाण्यात साजरा करतानाचे फोटो, व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आणि पोलीस दलात एकच खळबळ उडाली. याविरुद्ध ही भांडुपकरांनी तीव्र संताप व्यक्त केला. याविरुद्ध उपायुक्त अखिलेश सिंह यांनी विभागीय चौकशी सुरु केली. उपनिरीक्षक पंकज शेवाळे आणि सचिन कोकरे यांच्यासह तीन अंमलदारांचे निलंबन करत त्यावेळी ड्युटीवर असलेल्या नाईट पीआयसह भांडुप पोलीस ठाण्याचे वपोनि रमेश खाडे यांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्यात आली. चौकशी पूर्ण होताच खाडे यांच्या संरक्षण आणि सुरक्षा विभागात बदलीचे आदेश बुधवारी काढण्यात आले.

राहुरी शहरातील शनि चौक येथील देवस्थान दर्गा ईनाम जमिनीवर माजी खासदार तनपुरे यांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून सदर जमीन बळकावत असल्याचा आरोप करून ईनामदार कुटुंबीयांनी सदर जमीन परत मिळावी या मागणीसाठी राहुरी तहसील कार्यालयासमोर 19 आ‌‌गस्ट पासून उपोषण छेडले आहे.
ईनामदार यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की , राहुरी नगरपालिका हद्दीतील शनि चौक येथील देवस्थान दर्गा ईनाम जमिनीवर राहुरीचे माजी आमदार प्रसाद तनपुरे यांनी सदर जागेवर बेकायदेशीरपणे ताबा घेऊन पक्के बांधकाम करून अतिक्रमण केले आहे तसेच बोगस फेरफार वरून सदर जमीन स्वताच्या ताब्यात ठेवली आहे.ईनामदार कुटुंबीयांनी न्याय मिळवण्यासाठी अनेक वेळा उपोषण केले मात्र माजी खासदार व माजी आमदार असल्यामुळे तसेच नगर जिल्ह्याचे मोठे राजकीय प्रस्त असल्याने अधिका-यांवर दबाव आणून आम्हाला न्याय मिळू देत नाही.शासनाच्या अधिका-यांना हाताशी धरून आम्हाला कायद्याचा धाक दाखवून धमकवीले जात आहे.
राहुरीचे तहसीलदार शेख यांनी बोगस फेरफार रद्द करून ईनामदार कुटुंबीयांना न्याय द्यावा जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असे ईनामदार यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
सदर उपोषणाचा ४ था दिवस असुन प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही.यामुळे प्रशासन व तनपुरे यांचे काय लागेबांधे आहेत असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा अथवा विष प्राशन करून आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी भूमिका या वेळी ईनामदार कुटुंबीयांनी घेतली आहे.

काँग्रेसच्या 'अदृश्य' मतांचा चमत्कार, महायुतीच्या दानवेंसाठी उघडलं विधानपरिषदेचं दार
औरंगाबाद-जालना मतदारसंघातील विधान परिषेदच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडले होते.विशेष म्हणजे महायुतीच्या मतांपेक्षा 126 अधिकची मते (फुटल्याची) दानवेंना मिळाली आहेत.
औरंगाबाद - स्थानिक स्वराज संस्थांच्या औरंगाबाद-जालना विधान परिषद मतदारसंघात शिवसेना नेते आणि महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांचा विजय झाला. विशेष म्हणजे दानवेंना 524 मते मिळाली आहेत. त्यामुळे तब्बल 418 अधिकची मते घेऊन दानवेंनी आघाडीचे उमेदवार भवानीदास कुलकर्णी यांचा पराभव केला. आपल्या विजयानंतर अंबादास दानवेंनी आनंद व्यक्त करताना काँग्रेसला खोचक टोला लगावला. तसेच, काँग्रेसची मते आपल्याला मिळाल्याचंही मान्य केलं. 
औरंगाबाद-जालना मतदारसंघातील विधान परिषेदच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडले होते. त्यानंतर, आज सकाळी 8 वाजताच मतमोजणीला सुरुवात झाली. काही वेळातच अंबादास दानवेंच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळला. मतदानानंतरच कुठल्या पक्षाची किती मते फुटणार याची उत्सुकता मतदारसंघातील नेते आणि कार्यकर्त्यांना लागली होती. अखेर, आजच्या निकालानंतर ही उत्सुकता संपुष्टात आली असून काँग्रेस, राष्ट्रवादीसह एआयएमआयमचीही मते फुटल्याचं दिसून येत आहे. या निवडणुकांसाठी 657 पैकी 647 मतदान झाले होते. त्यापैकी दानवेंना 524 मते मिळाली असून आघाडीच्या कुलकर्णी यांना केवळ 106 मेत मिळाली आहेत. तर, अपक्ष उमेदवार शाहनवाज खान यांना फक्त 3 मते मिळाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मते फुटल्याचं स्पष्ट झालं आहे.

विजयानंतर माध्यमांशी बोलताना अंबादास दानवेंनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच, पक्षांच काम संघटनात्मक पातळीवर करत राहणं हे कार्यकर्त्याचं काम असतं. त्यानुसार मी काम करत होतो, योग्य वेळ येताच पक्ष दखल घेत असतो. उद्धव ठाकरेंनीही माझ्या कामाची दखल घेऊन मला उमेदवारी दिली. त्यामुळेच मी आमदार झाल्याचं दानवे म्हणाले. तसेच भाजपा-सेना महायुतीकडे एकूण 330मते होती. मात्र, काँग्रेसची काही अदृश्य मते मिळाली. गुप्त मतदान हेच माझ्या विक्रमी मतांचे गणित आहे, असेही दानवेंनी म्हटलंय. तर, मी केवळ काँग्रेस म्हणतोय, असे म्हणत एमआयएमची मते फुटल्याच्या प्रश्नावर त्यांनी नकारात्मकता दर्शवली. विशेष म्हणजे महायुतीच्या मतांपेक्षा 126 अधिकची मते (फुटल्याची) दानवेंना मिळाली आहेत. 

विरार :
 चारित्र्याच्या संशयावरून नालासोपारा येथे एका महिलेने पतीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नालासोपारा-तुळींज पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. पतीने आत्महत्या केलाचा बनाव रचण्याचा प्रयत्न  तिने केला. मात्र, ही हत्या असल्याचे तपासात समोर आले आहे.नालासोपारा गालानगर येथे तुलसी अपार्टमेंटमध्ये राहणारा सुनील कदम मुंबईत एका खासगी कंपनीत काम करत होता. तो आई-वडील, पत्नी प्रणाली आणि दोन मुली यांच्यासह राहत होता. सुनीलच्या चारित्र्याच्या संशयातून या दोघांमध्ये नेहमी भांडणे होत.  बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास याच मुद्दय़ावरून दोघांत वाद सुरू झाला. प्रणालीने स्वयंपाकघरातील चाकूने सुनीलवर ११ वार केले. यात सुनीलचा जागीच मृत्यू झाला. तिने रक्ताचे डाग पुसण्याचा प्रयत्न केला. सुनीलने आत्महत्या केल्याचा बनाव तिने रचला होता. मात्र, ही हत्या असल्याचे तपासात स्पष्ट झाले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget