श्रीरामपूर भुयारी गटार घोटाळाप्रकरणी सुमारे 14 कोटी रुपयांचा घोटाळा 7 जणांविरुध्द गुन्हा दाखल

(प्रतिनिधी)
शहरातील गटार योजनेतील सांडपाणी प्रकल्पात सुमारे 14 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी श्रीरामपूर नगरपरिषद तत्कालीन नगराध्यक्षा राजश्री ससाणे, तत्कालीन मुख्याधिकारी व इतर अधिकार्‍यांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यामध्ये श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा राजश्री ससाणे, तत्कालीन मुख्याधिकारी सुमंत गणपतराव मोरे, तत्कालीन मुख्याधिकारी संतोष महादेव खांडेकर, श्रीरामपूर नगरपरिषद बांधकाम अभियंता सूर्यकांत मोहन गवळी, तत्कालीन बांधकाम अभियंता राजेंद्र विजय सुतावणे, ठेकेदार संस्था लक्ष्मी सिव्हील इंजिनियरींग प्रा.जि.कोल्हापूर, मे.दहासहस्त्र सोल्युशन प्रा.लि. ठाणे वेस्ट यांचा समावेश आहे. याबाबत केतन खोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 2015-16 या आर्थिक वर्षामध्ये श्रीरामपूर नगरपरिषदेचे शहर भुयारी गटार योजनेतील दक्षिणेकडील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प एस.टी.पी पंपींग स्टेशनसाठी जागा उपलब्ध नसताना तसेच भुयारी योजनेतील उत्तरेकडील एस.टी.पी.चे सिव्हील वर्क पूर्ण होण्याअगोदरच आवश्यक असणार्‍या मेकॅनिकल इलेक्ट्रीक्ल वर्कची बिले अदा केली.यातून श्रीरामपुरची जनता व शासनाची फसवणूक करुन खोटे व बनावट बिले बनवून सुमारे 13 कोटी 93 लाख 84 हजार 954 रुपयांचा अपहार केला आहे. याबाबत शहर पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 618/2019 भा.दं.वि.कलम 403 ,406, 409,420 ,465,466, 467,468,471, 477(अ),34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट करीत आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget