माजी खासदार, आमदार विरोधात उपोषणाचा चौथा दिवस. ईनामी जमीन बळकावलेचा आरोप

राहुरी शहरातील शनि चौक येथील देवस्थान दर्गा ईनाम जमिनीवर माजी खासदार तनपुरे यांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून सदर जमीन बळकावत असल्याचा आरोप करून ईनामदार कुटुंबीयांनी सदर जमीन परत मिळावी या मागणीसाठी राहुरी तहसील कार्यालयासमोर 19 आ‌‌गस्ट पासून उपोषण छेडले आहे.
ईनामदार यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की , राहुरी नगरपालिका हद्दीतील शनि चौक येथील देवस्थान दर्गा ईनाम जमिनीवर राहुरीचे माजी आमदार प्रसाद तनपुरे यांनी सदर जागेवर बेकायदेशीरपणे ताबा घेऊन पक्के बांधकाम करून अतिक्रमण केले आहे तसेच बोगस फेरफार वरून सदर जमीन स्वताच्या ताब्यात ठेवली आहे.ईनामदार कुटुंबीयांनी न्याय मिळवण्यासाठी अनेक वेळा उपोषण केले मात्र माजी खासदार व माजी आमदार असल्यामुळे तसेच नगर जिल्ह्याचे मोठे राजकीय प्रस्त असल्याने अधिका-यांवर दबाव आणून आम्हाला न्याय मिळू देत नाही.शासनाच्या अधिका-यांना हाताशी धरून आम्हाला कायद्याचा धाक दाखवून धमकवीले जात आहे.
राहुरीचे तहसीलदार शेख यांनी बोगस फेरफार रद्द करून ईनामदार कुटुंबीयांना न्याय द्यावा जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असे ईनामदार यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
सदर उपोषणाचा ४ था दिवस असुन प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही.यामुळे प्रशासन व तनपुरे यांचे काय लागेबांधे आहेत असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा अथवा विष प्राशन करून आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी भूमिका या वेळी ईनामदार कुटुंबीयांनी घेतली आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget