माधुरी नवले व सुधीर नवले पाटील यांना ‘मराठा युवा उद्योजक’ पुरस्कार जाहीर

बेलापूर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा मराठा सेवा संघ व अहिल्यानगर जिल्हा मराठा पतसंस्थेच्या वतीने दिला जाणारा युवा उद्योजक पुरस्कार हॉटेल व रिसॉर्ट तसेच गोल्डन पाम वॉटर पार्क हा ग्रामीण भागातील सर्वात मोठा उद्योग सुरू केल्याबद्दल उद्योजक सौ माधुरी ताई नवले व श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले पाटील यांना जाहीर झाला आहे अहिल्या नगर जिल्हा मराठी सेवा संघ व अहिल्या नगर जिल्हा मराठा पतसंस्थेच्या वतीने मराठा व बहुजन समाजातील  उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान केला जातो गेल्या पंधरा वर्षापासून समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीस भविष्यात उत्कृष्ट कार्य करण्यास प्रेरणा मिळावी प्रोत्साहन मिळावे या हेतूने पुरस्कार देऊन गौरविण्यात येते यावर्षी बेलापूर व परिसरात ग्रामीण भागात हॉटेल व्यवसाय सुरू करून ग्राहकांना उत्कृष्ट सेवा दिली त्याचबरोबर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून गोल्डन पाम वॉटर पार्क ची  उभारणी केली. या गोल्डन पाम वॉटर पार्कच्या उभारणीमुळे परिसरातील अनेक बेरोजगारांना रोजगार मिळाला तसेच अनेक  नागरिक पोहण्याचा आनंद घेण्यासाठी  गोल्डन पाम वॉटर पार्क ला भेट देत आहेत नवले कुटुंबीयांनी या गोल्डन वॉटर पार्क मध्ये अनेक सुविधा उपलब्ध करून दिलेले आहेत त्याही वाजवी दरामध्ये  त्यांच्या या  कार्याची दखल घेऊन अहिल्यानगर जिल्हा मराठा सेवा संघ व अहिल्यानगर जिल्हा मराठा पतसंस्थेच्या वतीने गोल्डन पामच्या सौ माधुरी ताई नवले व बाजार समितीचे सभापती सुधीर पाटील नवले यांना मराठा युवा उद्योजक हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जाधव लॉन्स कल्याण रोड अहिल्यानगर येथे होणार असून या पुरस्काराचे वितरण शासनाचे सेवानिवृत्त सचिव सुनील जी चव्हाण यांच्या शुभहस्ते व इतिहास संशोधक डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांच्या उपस्थितीत होणार असून या कार्यक्रमास मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी आपण या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आव्हान मराठा सेवा संघाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रवीण दहातोंडे उत्तर जिल्हाध्यक्ष विवेक लोहार डॉक्टर विजयकुमार ठुबे पतसंस्थेचे उपाध्यक्ष विजय अनुभवले गुणगौरव समारंभाचे प्रमुख संचालक किशोर मरकड तसेच सेवा संघाचे पदाधिकारी व पतसंस्थेचे संचालक मंडळांनी  केले आहे

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget