January 2026

बेलापूर-( प्रतिनिधी)-गटविकास अधिकाऱ्यांनी घरकुलात सुरु असलेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिल्यामुळे पित्त खवळलेल्या सत्ताधाऱ्यांनी पत्रकबाजी सुरु केली असुन ही पत्रकबाजी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे माजी सरपंच महेंद्र साळवी व सदस्य रमेश अमोलीक यांनी प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .साळवी व अमोलीक यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की घरकुलाच्या चौकशी करीता गटविकास अधिकारी म्हस्के यांनी उपोषण सोडविताना ज्या बारा  मागण्या केल्या होत्या त्यात सत्यता असल्यामुळे चौकशी समीतीची नियुक्ती करुन सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत या चौकशी समीतीमुळे आपली लबाडी उघड होण्याच्या भितीमुळे सत्ताधारी गडबडले आहेत ही बाब नागरिकांच्या लक्षात येणार असल्याने चुकीच्या पद्धतीच्या कामावरील लक्ष विचलित करण्यासाठी गावातील काहींना  हाताशी धरून गटविकास अधिकारी मस्के साहेब यांना निवेदन देऊन चौकशीसाठी राजकीय दबाव आणला जात आहे तसेच माजी सरपंच भरत साळुंके व सभापती सुधीर नवले यांच्या खाजगी बांधकामाची चौकशीचे आदेश घेण्यात आले .मुळात बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीमध्ये बांधकाम कायदेशीर  कि बेकायदेशीर हे पाहण्याचा अधिकार ग्रामपंचायत प्रशासनाला आहे  यांच्या बांधकामाची चौकशी सरपंच व ग्रामसेवक यानी करणे गरजेचे असताना चौकशीचा फार्स कशासाठी आम्ही मांडलेल्या मुद्द्यापैकी घरकुलाच्या बाबत सरपंचांना गावातील गावकरी मडळाचे पुढारी व ठेकेदार चुकीची माहिती दिलेली दिसते कारण माननीय ना राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी शासनाकडून बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतला जी जमीन देण्यात आली त्यामध्ये काही अटी शर्ती टाकण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये मुख्य अट हि बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत च्या नावे जमीन झाल्यानंतर सदरच्या जमिनीचा लेआउट तयार करून नगरचना विभाग श्रीरामपूर यांचे कडून रेखांकन मंजूर करून सदरील भूमिहीन लाभार्थ्यांना लॉटरी पद्धतीने पाचशे स्क्वेअर फुट जागा वाटप करण्यात यावी असे असताना ग्रामसभेत दोन तास चर्चा करून ज्या लाभार्थ्यांना लॉटरी पद्धतीत भाग घ्यायचा आहे त्यांच्या सोबत काढुनी 500फुट जागा त्यांच्या ताब्यात द्यावी असे ठरलेले असताना खाजगी ठेकेदाराकडे एक लाख 35 हजार रुपये रोख स्वरूपात जमा करणारे हे कोण असा सवाल साळवी व अमोलीक यांनी केला असून पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी गरीबांच्या घरकुलासाठी जमीन देवुन ही सत्ताधाऱ्यांच्या चुकीमुळे लाभार्थी घरकुलापासुन वंचित राहु शकतात.  रेखांकन मंजूर न करता घरकुल बांधण्याची घाई का केली जात आहे तसेच सुमारे 400 लाभार्थींची ओटीपी नंबर घेऊन वाळू कोणाच्या बांधकामावर गेली किंवा त्याची विक्री करण्यात आली याची चौकशी होणे गरजेचे आहे तालुक्याचे आमदार हेमंत ओगले यांना आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवेदन दिलेले होते. त्या नीवेदनातील सर्व बाबी समजून सांगितल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून याची सत्यता जाणून घेतली व ती केलेली मागणी योग्य असल्यामुळे  तालुक्यामध्ये कुठल्याही गावांमध्ये चुकीच्या पद्धतीने काम होऊन देणार नाही मागील एक वर्षांमध्ये मा आमदार हेमंत ओगले यांनी बेलापूर ग्रामपंचायत परिसरात एक कोटी दहा लाख रुपयांची कामे मंजूर केली असून यावर्षी एक कोटीचे विकास कामांना निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिलेले आहेत.असे असताना जर कुणी आंदोलन करण्याची धमकी देत असेल तर प्रति आंदोलन करण्याची आमची तयारी आहे मागील चार दिवसांपूर्वी मा गटविकास अधिकारी श्रीरामपूर पंचायत समिती यांनी बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच यांच्या पत्रावरून लाभार्थींना दुसरा हप्ता देण्यात यावा अशी मागणी केली होती ती जर बरोबर असेल तर गटविकास अधिकारी श्रीरामपूर यांनी जोपर्यंत रेखांकन मंजूर होऊन जागावाटप होत नाही व जिओ टॅगिंग संबंधित लाभार्थींच्या व ग्राम विकास अधिकारी यांच्या फोटोसह मला उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत दुसरा हप्ता देणार नाही अशा आशयाचे पत्र बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतला देण्यात आलेले आहे बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये मागील पाच वर्षांमध्ये कोणत्या नेत्याचे चिरंजीव काम करतात हे नागरिकांना वेगळे सांगण्याची गरज नाही कामाच्या गुणवत्तेबाबत अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा अधिकाऱ्यांना इतर गावातील कामांच्या नावाने ब्लॅकमेलिंग करून बिले काढण्याचा धडाका संबंधित गावपुढ्यार्यानी केलेला आहे सरपंच सौ साळवी यांनी बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील झालेल्या कामांची पाहणी करून चौकशी करावी आपला बोलवता धनी कोण आहे हे सर्व जनतेला माहित आहे व सर्व जनतेला झेंडा चौकात वरील सर्व कागदपत्र घेऊन मी दाखवायला तयार आहे त्यामुळे बेलापूर येथील नागरिकांनी या गाव पुढ्याया पासुन  सावध राहावे असे आव्हान माजी सरपंच महेंद्र साळवी व ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक यांनी केले आहे

बेलापूरःबेलापूरची घरकुल योजना पालकमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा. यांचे संकल्पनेनुसार सुरु आहे.सदर योजनेबाबात आमदारांना बिल्डर लाॕबीकडून चुकीची माहिती दिली जात असल्याने आमदार अधिकाऱ्यांवर दबाव आणून आडकाठी आणित आहेत.वास्तविक सदर योजनेच्या स्वरुपास व योजनेस आमदारांनी आमसभेमध्ये संमती दिली.आता तेच  गोरगरीबांच्या सदर योजनेस सहकार्य करणेऐवजी ह्या योजनेत बाधा आणित आहेत.यामुळे गोरगरीब बेघरांना योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे.त्यामुळे आमदारांनी चुकीची माहिती देणा-यांच्या सांगण्यावरुन घरकुलाचे कामात बाधा आणल्यास घरकुल योजनेच्या  लाभार्थ्यांचा आमदारांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सरपंच  मिनाताई साळवी यांनी दिला आहे.               सौ.साळवी म्हणाल्या की,बेलापूरची घरकुल योजना हि राज्यात आदर्श ठरावी यासाठी नाम.विखे पा. व नाम.गोरे यांनी काही मार्गदर्शक सुचना केल्या.सदर योजनेबाबत आमदारांनी आयोजित केलेल्या आमसभेत सविस्तर चर्चा देखिल झाली.यावेळी योजनेचे सविस्तर स्वरुप व तपशील सविस्तरपणे मांडण्यात आला.तेव्हा आमदारांनी त्यास संमती दिली. माञ या योजनेमुळे बिल्डर लाॕबीच्या हितसंबंधास  बाधा येणार असल्याने  सुधीर नवले,भरत साळुंके ,रविन्द्र खटोड आदि नेत्यांनी काही जणांना चिथावणी देवून मोर्चे,उपोषणे करायला लावले.तसेच या कानभ-या नेत्यांनी आमदारांना चुकीची माहिती देवून अधिका-यांवर दबाव आणणे भाग पाडले.अशाच त-हेने या महाभागांनी महिलांच्या सार्वजनिक शौचालयाला विरोध करुन ते काम बंद पाडले.एकीकडे हे महाभाग स्वतःला नाम.विखे पा.यांचे सरर्थक म्हणवतात तर दुसरीकडे नाम.विखे पा.यांच्या संकल्पनेतील घरकुल योजनेस विरोध करण्याचा  दुटप्पीपणा करतात असा आरोप सौ.साळवी यांनी केला.                                                             घरकुल योजनेचे काम चुकीच्या पध्दतीने होत असल्याचा आरोप तथ्यहिन असून हि निवडणुका जवळ आल्याने होणारी राजकीय स्टंटबाजी आहे.आरोप करणारांनी तक्रारीत नमुद केल्यानुसार  घरकुल योजना राबवायची तर उपलब्ध जागेत फक्त ५३७ इतकीच घरकुले बसतील.यामुळे ५०० लाभार्थ्यांना घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागेल.या वंचित ५०० लाभार्थ्यांना घरकुले देण्याची जबाबदारी आमदार व तक्रार करणारे घ्यावयास तयार आहेत काय आसा सवाल सौ.साळवींनी उपस्थित केला.                    अशी वस्तुस्थिती असल्याने आमदारांनी या योजनेच्या कामाची समक्ष  पाहणी करुन योजनेची सविस्तर माहिती घ्यावी. चुकीच्या माहितीला बळी पडून स्वतःची अडचण करुन घेवू नये.अशाचत-हेने काहिजणांच्या चुकीच्या माहितीवरुन आमदारांनी टिळकनगर इंडस्ट्रिजबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्याने त्यांना कामगारांसह नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागले होते.तसेच नंतर दिलगीरी व्यक्त करावी लागली होती याची आठवण ठेवून आमदारांनी चुकीच्या माहितीच्या आधाराने घरकुल योजनेत बाधा आणून गोरगरीब लाभार्थींचा रोष पत्करु नये.अशाच पध्दतीने दत्तनगर येथे रो हऊसिंग पध्दतीचे काम केले जात आहे.तोच पॕटर्न नाम.विखे पा.यांचे सुचनेवरुन स्विकारुन घरकुलांचे काम सुरु आहे.तेव्हा आमदारांनी बिल्डर लाॕबीच्या दिशाभुलीला बळी पडून गोरगरीबांना उघड्यावर पाडू नये असे.उलट या योजनेस मार्गदर्शन  व सहकार्य करावे.तसेच ग्रामस्थांनी आमदारांना मते दिली असल्याने गावातील अरुणकुमार वैद्यपथ,मेनरोड-केशव गोविंद मंदिर रस्ता,कु-हे वस्ती, जामा मशिद - गणपती  मंदिर-ते महादेव मंदिर रस्ता आदि रस्त्यांचे कामांना आमदारनिधी द्यावा असे आवाहन सौ.साळवी यांनी केले आहे.

बेलापूर (प्रतिनिधी):येथील छ.शिवाजी महाराज चौकात   भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त  ह.भ.प. मोहन खानविलकर महाराज यांच्या हस्ते विधीवत पूजन तर बेलापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष भास्कर खंडागळे  यांचे हस्ते सृष्टीचे शिल्पकार मानल्या जाणाऱ्या विश्वकर्मा महाराजांच्या प्रतिमेचेवस पुष्पहार अर्पण करण्यात आले.               

     प्रतिमा पूजनानंतर  उपस्थितांनी भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.याप्रसंगी भरत साळुंके ,अभिषेक खंडागळे ,रविन्द्र खटोड, प्रकाश कुऱ्हे, पञकार नवनाथ कुताळ,सुहास शेलार,दिलिप दायमा, बाळू शेठ खातीजी, चंद्रकांत पाटील नाईक,  रमेश अमोलिक, श्रीराम शर्मा, संजय शर्मा, सुरज शर्मा, प्रशांत लढा, राधेश शर्मा, राजेंद्र पोपळघट, जालिंदर शिंदे, गोविंद गाडेकर, शफिक आतार, नितीन शर्मा, दत्तात्रय कुऱ्हे, सोमनाथ शिरसाठ, महादेव गाडेकर, ऋषी वाकचौरे, रामभाऊ वाकचौरे, गोविंद भराटे आणि सुनील कुऱ्हे आदिंसह  ग्रामस्थ व कारागीर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेलापूर ( प्रतिनिधी)-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलापूर बु!! मराठी शाळा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .शाळेतील सर्व मुली व मुले यांचे  कवायत व लेझीम घेण्यात आली उद्देशकांचे वाचन व असाक्षरता प्रतिज्ञा घेण्यात आली. ध्वजारोहण पोलीस पाटील अशोक प्रधान व  बोरुडे सर यांच्या हस्ते करण्यात आले विविध गुणदर्शन स्पर्धेत सहभागी असणाऱ्या मुला-मुलींना प्रशस्तीपत्रक देण्यात आले, या वेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी मनोगत, देशभक्तीपर गीत गायन सादर  केले, बेलापूर ग्रामपंचायतीच्या वतीने मुलांना रेवडी ( खाऊ) वाटप करण्यात आले. तसेच सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत डावरे व राजाभाऊ काळे, मोकाशी दादा, श्रीमती निमसे ताई यांच्या वतीने देखील खाऊ वाटप करण्यात आला या कार्यक्रमासाठी माजी. जि. प. सदस्य श्री शरद  नवले पाटील , व माजी उपसरपंच व  ग्रामपंचायत सदस्य  श्री. अभिषेक खंडागळे पाटील, श्री. अरुण पाटील नाईक, सरपंच श्रीमती मीनाताई साळवी, शाळा व्यावस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.तुफेल अहमद सय्यद,शाळा व्यवस्थापन समिती मुली अध्यक्ष निमसे ताई व माजी विद्यार्थी संघ मेळावा अध्यक्ष श्री. शाहरुख भाई शेख, उपाअध्यक्ष, राज गुडे, कृष्ण भागवत  अंगणवाडी सेविका शेलार ताई, तेलोरे ताई, बेलापूर मुले शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.उदमले मॅडम, उपमुख्यधापिका सौ. अंत्रे मॅडम, शिंदे मॅडम, देवढे मॅडम बेलापूर मुली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दहिवाळ मॅडम उपमुख्याध्यापिका सौ. भवार मॅडम, श्रीमती. परदेशी मॅडम दोन्ही शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य माता-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते..!!

बेलापूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर तालुक्यातील 11 गावामध्ये स्री पुरुष जन्मदरा मध्ये मोठ्या प्रमाणात विषमता आहे. मुलीचा जन्मदर घटण्यामागील कारणांचा शोध घेवून कोणी जर काही गैरप्रकार करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिला बेलापूर खुर्द ग्रामपंचायत च्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध योजना व मुलीचा जन्मदर वाढण्याबाबत उपाय व मार्गदर्शन या विषयावर आयोजित केलेल्या चर्चा सत्रात अध्यक्षपदावरून ते बोलत होते यावेळी उपविभागीय अधिकारी किरण सावंत ,उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख ,गट विकास अधिकारी सुभाष म्हस्के, महिला बाल विकास अधिकारी शोभाताई शिंदे सरपंच सविता राजुळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे म्हणाले की बेलापूर खुर्द या गावात मुलींचा

जन्मदर अतिशय कमी असून या मागील उपाय शोधणे आवश्यक आहे गावात व परिसरात कोणी गैरप्रकारे गर्भलिंग निदान चाचणी करत असेल तर त्याचे विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे कृत्य कुणी महिला दलाल हे करत असतील तर त्याची माहिती पोलीस खात्याला किंवा महसूल विभागाला द्या आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल उपस्थित पालकांना देखील विनंती आहे की मुलगा व मुलगी यामध्ये फरक करू नका मुलगी घराची लक्ष्मी आहे. तिच्या जन्माचे स्वागत करा आज मुलींची संख्या कमी असल्यामुळे अनेक मुले विवाह पासून वंचित आहेत यात महिलांची ही जबाबदारी तितकीच महत्त्वाची आहे. हा विषय आरोग्य विभागाचा असला तरी सामाजिक  व कायदेशीर भान आपल्याला ठेवावे लागणार आहे ग्रामपंचायत स्तरावर देखील मुलींच्या जन्माचे स्वागत केले पाहिजे असे उपक्रम सर्व ठिकाणी व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी किरण पाटील सावंत म्हणाले की एक महिला जी घर व्यवस्थित चालू शकते तालुक्याचे जिल्ह्याचे व देशाचे नेतृत्व करू शकते त्यामुळे महिलेला कमजोर समजू नका. स्री व पुरुष यांना समान वागणूक द्या मनातील नकारात्मक भावना काढून टाका आज सर्व स्तरावर मुली जोमाने काम करताना दिसत आहे त्यामुळे मुलींचा जन्मदर कसा वाढेल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे शासनाचे देखील या बाबीकडे लक्ष असणार आहे. कुणी चुकीचं काही करत असेल तर त्याला नक्कीच शासन केले जाईल असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना महिला बालविकास अधिकारी शोभा शिंदे म्हणाल्या  की मुलीचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचे गंभीर परिणाम समाजाला भोगावे लागणार आहे त्यामुळे गर्भलिंग निदान चाचणी करू नका. मुलीला गर्भातच मारू नका. त्याकरता शासनाने लेक लाडकी योजना राबविली आहे ग्रामपंचायत  व सामाजिक स्तरावर मुलीच्या जन्माचे स्वागत करून समाज जागृती होणे आवश्यक आहे असे त्या म्हणाल्या यावेळी गट विकास अधिकारी सुभाष म्हस्के, वरिष्ठ पत्रकार मारुतराव राशिनकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले.या वेळी द्वारकनाथ बडवे कैलास वाकडे गोरखनाथ बडधे, सुरेश महाडिक, सोमनाथ वाकडे, गोरख भगत, ग्रामसेवक राजेंद्र मेहत्रे विलास भालेराव, प्रशांत शहाणे, समीर सय्यद, रामदास बडधे, बाबुराव फुंदे ,सौ स्वाती घोरपडे, मानसी थोरात, उषा गुलदगड ,मनीषा थोरात , प्रियंका थोरात कल्पना भगत ग्रामपंचायत ऑपरेटर वर्षा सगळगीळे, आरोग्य विभागाचे डॉक्टर ममता धीवर, आरोग्य सेवक गिरीश जाधव, विमलताई माने ,संगीता पुजारी, अंबिका भालेराव, कल्पना भगत, आदीसह अंगणवाडी सेविका शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रणाली भगत यांनी केले तर सूत्रसंचालन रवींद्र बारहाते यांनी केले शेवटी उपसरपंच एडवोकेट दिपक बारहाते यांनी आभार मानले

बेबेलापूर (प्रतिनिधी )-जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी बेलापूरच्या विकासासाठी व गोरगरिबांच्या घरकुलाकरीता विनामूल्य जमीन दिली. परंतु सत्ताधारी स्वतः चे खिसे भरण्याच्या  व श्रेय लाटण्याच्या नादात घरकुल योजनेलाच हरताळ फासत असल्याचा आरोप बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, खटोड पतसंस्थेचे चेअरमन रवींद्र खटोड व माजी सरपंच  भरत साळुंके महेंद्र साळवी, रमेश अमोलीक यांनी पत्रकार परिषदेत केला.       बेलपुरात एकाच दिवशी दोन आमरण उपोषण सुरू झाले व त्याच दिवशी ते उपोषण सुटले याबाबत सत्ताधाऱ्याकडून खुलासे करण्यात आले त्या खुलाशाला उत्तर देण्याकरता बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हे आरोप करण्यात आले यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देताना माजी सरपंच महेंद्र साळवी व ग्रामपंचायत सदस्य श्री रमेश आमोलिक यांनी सांगितले की शासनाने गोरगरिबा करता घरकुल योजना सुरू केली परंतु सत्ताधारी त्या योजनेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वसुली करत आहेत घरकुल योजना पारदर्शक पद्धतीने राबविणे आवश्यक असताना सत्ताधारी मनमानी पद्धतीने कामकाज करत आहेत वास्तविक सर्व घरकुल लाभार्थ्यांची चिठ्ठ्या टाकून कोणाचे घरकुल किती नंबरला आहे हे निश्चित केले पाहिजे होते.प्रत्येक लाभार्थ्यांना नियमानुसार 500 चौरस फुट जागा वाटप करुन देणे आवश्यक होते परंतु तसे न करता मनमानी पद्धतीने घरकुल वाटप करण्यात येणार आहे त्याचबरोबर कॉलनी बांधण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लाभार्थ्याकडून पैसे उकळण्यात येत आहेत .या कामाचा ठेका खाजगी व्यक्तीला देण्यात आला असुन त्या व्यक्तीची नेमणूक कशी केली त्याच दर्जाच्या व्यक्ती गावात नव्हत्या का? संबंधित व्यक्ती लाभधारकाकडून १३५०००रुपये वसलं करत आहेत त्याना वसुलीचे अधिकार कुणी दिले.लाभधारकाकडून सक्तीने संमतीपत्र कुणी लिहून घेतले त्यामुळे ही वसुली पुर्ण पुणे बेकायदेशीर आहे तसेच या घरकुल योजनेची लेआउट मंजूर नाही घरकुल योजने करीता आवश्यक त्या विभागाकडून परवानगी घेण्यात आलेली नाही बेलापूर ग्रामपंचायतीने सर्व कायदेशीर प्रक्रियां डावलून खाजगी ठेकेदाराची नेमणूक करून सरपंच उपसरपंच व सत्ताधारी यांनी संगनमताने व चुकीच्या पद्धतीने घरकुल योजना राबवून लाभार्थ्यांचे फसवणूक सुरू केलेली आहे त्यामुळे हे लाभार्थी पैसे देऊनही घरकुला पासून वंचित राहू शकतात.लेआऊट मंजुरी शिवाय जागावाटप न करता बांधकाम सुरु राहील्यास लाभार्थ्यांचे नुकसान होऊ शकते त्यामुळे या योजनेची निष्पक्ष चौकशी करावी व चुकीचे नियमाला डावलून काम करणारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यांनी केली आहे.

बेलापूरःराष्ट्रिय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त काशी येथील मनकर्णिका घाट येथील नरसिंह मठ आयोजित श्रीमद कथेदरम्यान वैदिक विद्यार्थी महेश दायमा याचा विशेष गौरव करण्यात आला.            काशी येथील मनकर्णिका पिठाने श्रीमद भागवत कथेचे आयोजन केले आहे.याप्रसंगी आळःदी येथील तपोवनव्दारा आयोजित वैदिक परिक्षेत रामजन्मभुमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरीजी यांचे हस्ते सुवर्णमुद्रिका प्राप्त आचार्य महेश दायमा यांस सन्मानित,करण्यात आले.सध्या महेश दायमा काशी येथे वैदिक शिक्षण घेत आहे.                             महेश दायमा हा पञकार दिलिप दायमा यांचा मुलगा आहे.त्याच्या या सन्मानाबद्दल पञकार भास्कर खंडागळे,मारुतीराव राशिनकर ,रणजीत श्रीगोड,अशोक गाडेकर,सुनिल मुथा,नवनाथ कुताळ,देविदास देसाई,ज्ञानेश गव्हले,सुनिल नवले,विष्णुपंत डावरे,सुहास शेलार,दिपक क्षञिय,गोविंद साळुंके ,आतिश देसर्डा,शरद पुजारी,शफिक बागवान,भारत थोरात आदिंनी अभिनंदन केले आहे.

बेलापूर ( प्रतिनिधी )-बेलापूर ग्रामपंचायत  हद्दीतील बेलापूर बुद्रुक व ऐनतपुर  येथील भरत अशोक साळुंके यांच्या मालकीच्या विविध गट नंबर मधील बांधकामाची माहिती नकाशे मिळावे तसेच बेलापूर बुद्रुक हद्दीतील संस्कृती मंगल कार्यालयाची व्यापारी दराने पट्टी आकारण्यात येऊन सन 2004 पासून त्याची वसुली करण्यात यावी या मागणीकरता मयूर प्रकाश खरात व सुरज रणनवरे हे बेलापूर ग्रामपंचायत उपोषण बसले असून आज बेलापूर ग्रामपंचायत कार्यालय समोर एकाच वेळी दोन उपोषणे सुरू झालेले आहेत. बेलापूर ग्रामपंचायत कार्यालय समोर आज दोन  मागण्याकरिता दोन ठिकाणी आमरण उपोषण सुरू झाले असून मयूर प्रकाश खरात व सुरज मायकल रणवरे यांनी आपल्याला विविध माहिती वेळेत न मिळाल्याच्या निषेधार्थ आमरण उपोषण सुरू केलेले आहे त्यांची मागणी अशी आहे की बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील भरत अशोक साळुंके यांच्या मालकीच्या गट नंबर 3/1/2 या गटामध्ये रहिवाशी प्रयोजनासाठी झालेल्या बिनशेती क्षेत्राचे मंजूर रेखांकन बांधकाम परवानगी तसेच सर्व कागदपत्राची सत्यप्रत मिळावी त्याचबरोबर बेलापूर बुद्रुक अंतर्गत साळुंखे यांच्या मालकीचे गट नंबर 44/2/16 या गटामध्ये वाणिज्य प्रयोजनासाठी झालेल्या बिन शेती क्षेत्राचे मंजूर रेखांकन नकाशे बांधकाम परवानगी तसेच सर्व संदर्भातील कागदपत्रे मिळावी त्याचबरोबर साळुंके यांच्या गट नंबर तीन ऑब्लिक एक ऑब्लिक दोन या गटातील रहिवासी प्रयोजनासाठी झालेल्या बिनशेती क्षेत्राचे मंजूर रेखांकन कसे मिळावे त्याचबरोबर साळुंखे यांच्या गट नंबर 153/2 मध्ये बेलापूर बुद्रुक हद्दीतील संस्कृती मंगल कार्यालय बांधलेले असून  मंगल कार्यालयात पट्टी ही व्यापारी दराने आकारण्यात यावी. समोर असलेल्या सद्गुरु मंगल कार्यालयाला 25000 पट्टी आहे मग संस्कृती मंगल कार्यालयाला 5000  पट्टीच का असा सवाल त्यांनी केला आहे त्याचबरोबर सन 2004 पासून नवीन व्यापारी दराने आकारणी करून त्याची वसुली करण्यात यावी या मागणी करतात घरात व रणवरे हे उपोषणास बसलेले आहेत गावात एकाच वेळी दोन उपोषण सुरू झाल्यामुळे नागरिकात वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे

बेलापूर -(प्रतिनिधी)- बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत ने अकराशे घरकुलाचे बांधकाम सुरू केले असून घरकुलाची जागा कुणाचेही नावावर नसताना चुकीच्या पद्धतीने बांधकाम सुरू केले याबाबत वारंवार निवेदन देऊनही काहीच कारवाई झाली नाही त्याच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक 21 जानेवारी पासून ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक हे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहे .उपोषणाबाबत त्यांनी सर्व संबंधितांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की बेलापूर ग्रामपंचायत घरकुल रेखांकन व जागावाटप याबाबत गांभीर्याने घेणे टाळत आहेत. बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतने घरकुल बांधकाम सुरू करताना जो गाजावाजा केला तो केवळ दिखाऊ पणा होता. घरकुल कॉलनी बांधकाम करत असताना नियमानुसार काम केले नाही. आपण कोणाच्या आदेशाने हे काम चालू केले व चालू केलेले काम कोणाचे आहे हे सांगू शकत नाही. ग्रामपंचायतच्या 31 डिसेंबर रोजी झालेल्या मासीक बैठकीत सदस्य भरत साळुंके व रमेश अमोलीक यांनी लेआउट बाबत विषय मांडला होता ज्या अभियंतेकडून ले,आऊट केले आहे तो अभियंता व गावातील विविध अभियंते जे विषयात तज्ञ आहेत आणि त्यात काम करत आहेत तसेच नगररचना विभागातील अधिकारी यांची एकत्रित बैठक घ्यावयाचे ठरले होते.परंतु तसे केले नाही. ज्या लोकांना कॉलनीत घर बांधण्याची ऐपत नाही अशा लोकांना 500 चौरस फूट जागा वाटून देण्याचे ठरलेले असतानाही जागा वाटप करून न देता घरकुल कॉलनीचे काम जोरात सुरू केलेले आहे हे करत असताना सर्व नियम धाब्यावर बसवलेले आहे घरकुल वाटप करताना चिठ्ठ्या टाकून घरकुल वाटप केले पाहिजे होते . परंतु यातही वशिलेबाजी होताना दिसत असल्याचा आरोप अमोलीक यांनी केला आहे आपला स्वार्थ साधना करता सुमारे अकराशे घरकुल कुणाचे नावावर जागा नसतानाही त्या जागेवर घरकुलाचे बांधकाम सुरू केलेले आहे याबाबत वारंवार निवेदन देऊनही काहीही उपयोग झाला नाही त्यामुळे चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले घरकुलाचे काम थांबून अगोदर घरकुलाची जागा वाटप करून मगच बांधकाम केले जावे या मागणी करता त्या देशामुळे आजपासून बेलापूर ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे

लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी 'वृत्तपत्र' हा चौथा स्तंभ मानला जातो.  अनेकदा काहिजण कोणत्याही घटनेसाठी पत्रकाराला जबाबदार धरतात. त्यांच्यावर दबाव आणतात किंवा त्यांना अपमानास्पद वागणूक देतात. आजही श्री.विक्रम नाईक यांनी पञकारावर अप्रस्तुत टिका केली आहे.पञकारांवर आरोप केले आहेत.याचा प्रथमतः बेलापूर प्रेस क्लब निषेध करीत आसून श्री.नाईक यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगीरी व्यक्त करावी अशी मागणी करीत आहे.                     

आम्ही पत्रकार कुणाचे 'पगारी' नोकर नाही किंवा कोणाचे बाःधिल नाही. पञकाराने काय करावे हे शहाणपण कोणी शिकवायची गरज नाही.बेलापूर प्रेस क्लबचे  पत्रकार सदस्य समाजाप्रती असलेल्या बांधिलकीतून काम करत असतात.

बातमीची निवड हा पत्रकाराचा विशेष अधिकार आहे. कोणती बातमी प्रसिद्ध करावी आणि कोणती करू नये, हा सर्वस्वी त्या पत्रकारांचा आणि त्यांच्या संपादकांचा निर्णय असतो. बातमीचे महत्त्व, तिची सत्यता आणि समाजावर होणारा परिणाम तपासूनच बातमी लावली जाते. पत्रकारावर कोणत्याही बाह्य व्यक्तीने किंवा शक्तीने बातमीसाठी दबाव आणणे हे बेकायदेशीर आणि नैतिकतेच्या विरोधात आहे.

पत्रकार संरक्षण कायद्या सारखे पत्रकारांचे कायदेशीर कवच तरी काही अतिउत्साही व्यक्ती पत्रकारांना उद्देशून अपशब्द वापरतात किंवा टिकाटिपणी करतात.  महाराष्ट्र सरकारने 'पत्रकार संरक्षण कायदा' (२०१७) लागू केला असून त्यातील प्रमुख तरतुदीनुसार कलम ३ व ४: पत्रकारावर हिंसाचार करणे किंवा त्याच्या कामात अडथळा आणणे हा गंभीर गुन्हा आहे. कलम ५ नुसार सदर गुन्हे हे 'दखलपात्र  आहेत.                            तुमच्या राजकारणात पञकारांना आणू नका.पञकारांना राजकारणाशी काहिही घेणेदेणे नाही.दुसरे व्यक्ती वा नागरिक म्हणून पञकार स्वतंञ आहे.त्याची व्यक्ती म्हणून राजकीय विचारधारा असणे हा त्याचा नागरी अधिकार आहे.तेव्हा नागरीक म्हणून पञकाराने कोणी कोणाची  बाजू घ्यवी वा कोणाचे समर्थन करावे हा व्यक्तीगत प्रश्न आहे.त्याबाबत आक्षेप घेण्याचा कोणालाही अधिकार नाही.यापुढे अशाप्रकारची टिका प्रेस क्लबचे पञकार  सहन करणार नाहित,याची दखल घ्यावी.   याविषयी अनेक पत्रकार संघटनांनी  जाहीर निषेध करत वरिष्ठ अधिकारी यांना भेट घेणार असल्याची माहिती देखील दिली आहे कोणीही पत्रकारावर राजकीय ताबा आणू नये पत्रकारांना त्यांचे काम करून द्यावे या पद्धतीचे लवकरच निवेदन संबंधित प्रशासनाकडे माहिती मिळत आहे यावेळी            भास्कर खंडागळे(अध्यक्ष), सुहास शेलार(उपाध्यक्ष),रणजित श्रीरामपूर (सचिव),सुनिल मुथा(कोषाध्यक्ष ),विष्णुपंत डावरे(सहसचिव),सदस्यःअशोक गाडेकर,ज्ञानेश्वर गव्हले,देवीदास देसाई,नवनाथ कुताळ,सुनिल नवले,दिपक क्षञिय,दिलिप दायमा,गणेश साळुंके,शरद पुजारी,आतिष देसर्डा

सत्ता, पैसा आणि संपूर्ण यंत्रणा विरोधात असतानाही केवळ ११ मतांच्या फरकाने झालेला पराभव हा साधा निकाल राहिलेला नाही, तर तो संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. समोर दोन वेळा आमदार राहिलेले, साखर सम्राट म्हणून ओळखले जाणारे वजनदार नेते होते. त्यांनी सगळी ताकद पणाला लावली, तरीही विरोधकाला संपवू शकले नाहीत, हेच या निकालाचे मोठे वास्तव आहे.

“मी ११ मतांनी हरलो आहे, पण भीतीने नाही, झुकून नाही, विकून नाही,” अशा ठाम शब्दांत उमेदवाराने आपली भूमिका मांडली. हा निकाल एकच गोष्ट स्पष्ट करतो — जुन्या राजकारणाची मक्तेदारी आता हादरली आहे. लोकांचा आवाज दबवता येत नाही, उलट तो अधिक बुलंद होत चालला आहे.

पराभव जरी स्वीकारावा लागला असला, तरी गावागावात एकच चर्चा — ‘११ मतांची हळहळ’ सुरू आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या या उमेदवाराने थेट कारखानदारी आणि प्रस्थापित सत्तेला टक्कर दिली. पराभव असूनही जनतेच्या नजरेत ते ‘हिरो’ ठरले आहेत. “आज हरलो असेन, पण उद्याच्या लढाईसाठी अधिक ठाम, अधिक आक्रमक आणि अधिक सज्ज आहे,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या निकालानंतर स्वीकृत नगरसेवक पदाच्या न्याय्य हक्काचा प्रश्नही चर्चेत आला आहे. “हा न्याय कोण देणार?” असा सवाल उपस्थित होत असून, विखे साहेब न्याय देतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकूणच, हा पराभव नसून तो सामान्य माणसाच्या संघर्षाचा विजय मानला जात आहे. ही लढाई इथे थांबत नाही, तर खऱ्या अर्थाने आता सुरू झाली आहे, अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget